देवाची वस्त्रे

Submitted by मिनी on 4 August, 2010 - 10:11

माझ्या आजीची देवावर खुप श्रद्धा. तिचा देव्हारा बघणं म्हणजे घरी आलेल्या सगळ्यांच्या कौतुकाचा विषय असायचा. तिचं नेहमी म्हणणं असायाचं आपल्याला कसे चांगले चांगले कपडे, दागिने घालायला आवडतं तसचं देवालाही ते आवडतं. म्हणुन ती तिच्या देव्हार्‍यातल्या सगळ्या देवांच्या मूर्तींना वस्त्रे आणि दागिने घालायची. त्यावरुनच मला एकदा सुचलं की तू इतके महागाची वस्त्रे विकत आणण्यापेक्षा मी तुला शिवुन देईन. तेव्हापासुन मी दर सुट्टीत मामाकडे गेले कि आजीला वर्षभर पूरतील इतकी वस्त्रे शिवुन घ्यायचे. त्यातही सणासुदीला वेगळे, रोजचे वेगळे असे प्रकार होते.
इथे माझ्याकडे ४-५च देवांच्या मूर्ती आहेत. म्हणुन माझ्याकडे काही मोजकीच आणि मोजक्याच टाईपची वस्त्रे आहेत. ही सगळी वस्त्रे मी रेशमी किंवा काठाच्या साड्याच्या ब्लॉऊजच्या उरलेल्या कापडातुन शिवलेली आहेत.
ही बैठक, देवांखाली अंथरायला. हे आधी शिवुन घेतलं आणि मग त्याला टिकल्या चिटकवल्या.
IMG_4266.JPGIMG_4267.JPGIMG_4268.JPG
आणि हि काही वस्रे.
IMG_4269.JPGIMG_4270.JPGIMG_4271.JPG
शेवटी माझ्या देव्हार्‍यातला बाळकृष्ण.
IMG_4265.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अगदी गोड आहेत सगळी वस्त्रे. Happy
माझी इथली शेजारीण हिवाळ्याची अन उन्हाळ्याची वेगवेगळी वस्त्रे शिवत असते तिच्या गोपालजींसाठी. हिवाळ्याची लोकरीची वस्त्रे, गोधड्या, छोटे ब्लँकेट्स वैगरेचे सेट पण आहेत तिच्याकडे.

बाप्पाचा वॉर्डरोब >>> छान कल्पना Happy
गुजराथी लोकांमध्ये असे बालाजी (त्यांच्याकडे गोपाळकृष्णाला बालाजी का म्हणतात? Uhoh ) ला कपडे व अलंकार घालून सजवायची पद्धत असते, असे पाहिले आहे.

मध्ये विपत्रातून माहीती आली होती की थंडीत सारसबागेच्या गणपतीच्या मूर्तीला स्वेटर वै. घालतात म्हणून. खरे आहे का हे?

बालाजी दक्षिणेकडे ना?
>>>
अगं हो बालाजी म्हणजे दक्षिणेकडचा तीरुपती बालाजी . म्हणूनच मला हा प्रश्न पडतो की गुजराथी लोक गोपाळकृष्णाला बालाजी का म्हणतात? Uhoh माझी एक ढोलकीया म्हणून एक गुजराथी मैत्रिण आहे. ते लोक बालाजीच म्हणतात.
बहुतेक राजस्थानचे लोक गोपाळकृष्णाला ठाकुरजी म्हणतात आणि शंकराला एकलिंगजी म्हणतात.

मस्त आहेत वस्त्रे! माझी मावशी असे बरेच काही शिवत असते हौसेहौसेने! जर फोटो मिळाले त्याचे तर अवश्य टाकेन .. निंबुडा, तो बाळकृष्ण कसला नटलाय गं! Happy

खुपच छान आहेत सग्ळीच वस्त्रे, आणि ब्लाउजपिस च्या उरलेल्या तुकड्यातुन शिवण्याची कल्पना पण छानच.

ड्रेस बरोबर आलेल्या sleeves पण वापरता येतील.

Pages