ग्रिन चिकन

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2010 - 02:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ किलो चिकन साफ करुन धुवुन
२ बटाटे फोडी करुन
ग्रिन मसाला वाटण - मिरच्या १० (तिखटाच्या आवडीवर अवलंबुन) कोथिंबीर २ मुठ, पुदीना १ मुठ, आल १ इंच, लसुण ८-१० पाकळ्या.
हिंग, हळद,
चवीप्रमाणे मिठ
१ लिंबु
गरम मसाला १ चमचा
तेल

क्रमवार पाककृती: 

प्रथम धुतलेल्या चिकनला वरील वाटण, मिठ, हिंग, हळद, एक लिंबाचा रस चोळून घ्यावे व अर्धा तास मुरवत ठेवावे.
मग तेलावर वरील सगळ टाकुन बटाट्याच्या फोडी टाकाव्यात. मग सगळ एकत्र करुन वाफेवर चिकन शिजु द्यावे. शिजल्यावर गरम मसाला टाकुन परत एक वाफ आणून गॅस बंद करावा.

वाढणी/प्रमाण: 
५-६ जणांसाठी
अधिक टिपा: 

बटाटे जरुरी नाहीत. आवडत नसतील तर नाही घातले तरी चालतात. मी बटाट्याचा वापर पुरवठ्यासाठी करते.
ह्या चिकनला कांद्याची गरज नसते. तरीपण आवडत असल्यास वाटणातच घातला तरी चालेल.

माहितीचा स्रोत: 
वहीनी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सगळे एकत्र चोळावे.
chicken.JPG

तेलावर मिश्रण घालुन बटाटे घालुन वाफेवर शिजत ठेवावे.
chicken3.JPG

हे आहे तयार ग्रिन चिकन
chicken4.JPG

वर्षा अजिबात पाणि नको. अग चिकनच्या कढई किंवा टोपावर ताट ठेउन त्यावर पाणी ठेवायचे. मग खाली चांगली वाफ तयार होते. तसेही चिकनला शिजवल्यावर पाणी सुटते. पण जर तुला ग्रेव्ही हवी असेल तर पाणी गरजे प्रमाणे टाक.

अश्विनी....डायरेक्ट २रा/ ३रा फोटो बघ! पहिला फोटो तु पाहणारच नाहीस...>>> अगदी अगदी गं Sad कसंतरीच झालं.

बाकीचे फोटो उंधियो सारखे दिसताहेत.

सहीच फोटो. मी बटाटे नाही घालत, पण कांदा घालते. चांगलं लागतं ते पण.
या गटारीला हाच बेत करावा का या विचारात पडलेय. Wink

जागू, धन्यवाद.

मी तळलेला कांदा वाटून घालते(ओले, सुके खोबरे, तीळ, खसखस ऑप्शनल). बडीशेप पण वाटणात घेते. आणि चिकनला मीठ, हळद, आले-लसूण पेस्ट लावून मुरवत ठेवते. गरम मसाला आख्खाच फोडणीत घालते.

पराग, चालत असेल तर हाड असलेले चिकन घे. चव चांगली येते.

हा फोटो-
green.jpg

मी चिकन नेहमी(करी वा कोणतेही ग्रेव्ही करताना) , व्होल फूडमधले फिले वापरते. मी आधी २/३ मि. परवते व नन्तर पाणी टाकुन ३/४ मि.च शिजवते पण तरी चिकन नेहमी च्युयी होते असे माझी मुलगी तक्रार करत राहते. टेन्डर राहावे यासठी कसे शिजवावे? किती मिनीटे शिजवावे?

बोनलेस चिकन घ्यायचं की हाडांसकट ? >> पग्या खरा खवय्या असशील तर मग तु बोनलेस चिकन खाणार नाहीस कधी Proud

अमेरिकेत बुचरकडे किंवा हलाल मीट स्टोअर मधे घेतलं चिकन तर ते पाहिजे तसे तुकडे करून देतात.
ग्रोसरीमधल्या पेक्षा थोडं महाग पडतं, पण विथ बोन पाहिजे असेल तर तो चांगला पर्याय आहे.

"पब्लिक्स" मधे त्यांच्या स्वतःच्या "ग्रीनवाईज" ब्रँडचं चिकन मिळतं. हे ऑरगॅनिक असतं. आणी तिथे तुम्ही होल चिकन सिलेक्ट केलं की तुम्हाला हवे तसे विथ किंवा विदाऊट बोन पीसेस करून मिळतात. हलाल मीटचं दुकान अगदीच जवळ नसेल तर हा एक चांगला पर्याय आहे.

जागू ताई तिकडे पारंपारीक चिकनच्या रेसेपी वर प्रश्ण विचारलाय. उत्तर द्याना.

लाजो, सिंडरेला धन्स,

पराग, मी नेहमी हाडांसकटच घेते.

चिंगि अग करुनच टाक बघ आवडेल.

लालू ,तेही मी नेहमी करते, पण ग्रिन चिकन कधीतरी चेंज म्हणुन करते.

मिरा, चिकन हे मटणापेक्षा खुप जलद शिजत. अग बटाटा शिजला की मी पाहते तेंव्हा चिकन शिजलेल असते. बटाट्या एवढाच वेळ चिकन शिजायला लागतो. बटाटा टाकत नसशिल तर उकळी आल्यावर ५ मिनीटांनी शिजलय का ते तोडून बघत रहा.

मिनी, अगदी बरोबर.

मेघा, अमेरीकेच्या ज्ञानाबद्दल मी ०.

प्रॅडी तुम्हाला उत्तर दिल आहे.

मी ग्रीन चिकन बनवताना चिकन शिजले की उरतायच्या आधी अर्धी मुठ किंवा त्यापेक्षाही कमी असा वाळलेल्या मेथीपानांचा चुरा टाकते. खुप छान चव येते मेथीपानांमुळे.