गप्पागोष्टी स्नेहभेट उर्फ गटग

Submitted by मंदार-जोशी on 1 August, 2010 - 10:51

गप्पागोष्टी ह्या गप्पांच्या पानाला फार काळ लोटलेला नसल्याने आणि इथे येणारी लोकं प्रचंड कार्यमग्न असल्याने पानही फारसे वाहतं नसतं. अनेकांचे भ्रमणध्वनी क्रमांकही एकमेकांकडे नव्हते यामुळे गटगला उपस्थिती किती असेल ह्याबाबत मी जरा साशंकच होतो, तरीही Slow and steady... ह्या इंग्रजी म्हणीप्रमाणे गटग आयोजित करण्याचे धाडस तर करुया या विचाराने सगळ्यांना विपत्र टाकले. त्याप्रमाणे एक ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजता कोथरुड येथील किमया हॉटेलमध्ये भेटायचं ठरलं.

सव्वापाच वाजता मी किमया हॉटेलबाहेर गाडी लावली आणि पाच मिनिटं झाली नसतील तेवढ्यात भ्रमणध्वनी वाजला. नंबर अनोळखी होता. "हेलो, मंदार जोशींचा नंबर का?, मी आरती खोपकर. तुमचा नंबर दक्षिणा कडून घेतला. आलेत का कुणी? तुम्ही कुठे आहात?"
"हो, मी बाहेरच आहे, आलोच", असं म्हणून मी आत गेलो. ठरल्यावेळेला हजर राहणारी मी पाहिलेली ही एकमेव पुणेकर ;).

एकमेकांची जुजबी ओळख करून घेतली आणी इतरांची थोडावेळ बाहेर वाट बघायची असं ठरवून गप्पा मारू लागलो. असाच काही वेळ गेल्यावर दुचाकीवरून आशिष फडणीस उर्फ ashuchamp आला. पुन्हा गप्पा सुरु झाल्या. पावणेसहा वाजेपर्यंत वाट पाहून मग आत गेलो. काही वेळाने विवेक देसाईचा फोन आला की तो दहा मिनिटाने येतो आणि सांगितल्याप्रमाणे तो चक्क दहाव्या मिनिटाला हजर झाला. हे दोघेही आपापल्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून आले हे विशेष. अनिल मतिवडे उर्फ अनिल७६ ची थोडावेळ वाट बघितली आणि मनातल्यामनात.....असो. नंतर तो टांगारू होण्याचं कारण त्याचा बॉस अचानक कार्यालयात उगवला हे होतें हे गप्पागोष्टी पानावर त्याने टाकलेल्या पोस्टीने समजलं. दक्षिणाच्या घरी ऐनवेळी पाहूणे आले.

पुढील चित्रात सगळ्यात डावीकडे आशिष फडणीस उर्फ ashuchamp, मध्ये विवेक देसाई आणि उजवीकडे आरती खोपकर उर्फ आरती२१.

पुढील चित्रात सगळ्यात डावीकडे मी, मग आशिष फडणीस आणि उजवीकडे विवेक देसाई.

आम्ही भेटण्याआधी अनेकांचे भ्रमणध्वनी क्रमांकही माहित नव्हते, त्यामुळे ओळख होणे हे एक अत्यंत महत्वाचे काम पार पडले हेही नसे थोडके. Happy

एकंदर मनमोकळ्या भरपूर छान गप्पा; एकमेकांच्या व्यवसाय-नोकरी, मूळ गाव, तसंच घरच्यांबद्दल माहिती घेत; पुढचं गटग आरतीच्या घरी साजरं करण्याची योजना आखत, आणि अनेक टांगारूंची आठवण काढत आधी अपेक्षित असलेल्या ४ याच आकड्यावर आमचं पहिलंवहिलं गटग साजरं झालं. Proud

गुलमोहर: 

अरे मंदार, मला सांगितला असतास माबोवर टाकणार आहे फोटो तर जरा बरी पोझ दिली असती ना. मला वाटले जनरल फोटोसेशन चाललय. हे काय बरे नव्हे. स्मित
एकदंरीत मज्जा आली.

लाजो चहा पिलाय की दिस्ल्या नैत का तुला कपबश्या???:हाहा:
मंद्या मस्त रे Happy
मी का आले नाही याच एक्सप्लेनेशन मी देणार नाही, मला ते निरर्थक वाटत असो. मिसल मी सगळ Sad

>>मी का आले नाही याच एक्सप्लेनेशन मी देणार नाही, मला ते निरर्थक वाटत असो

अग्गं बाय एक्सप्लेनेशन कशाला द्यायचं? आणि निरर्थक काहीच नसतं ग बाय...
चलता है, काहीतरी अडचण, कारण असतंच की Happy

पण त्यानिमित्ताने तुला टांगारू म्हणण्याची संधी आम्ही कशाला सोडू Proud

पण त्यानिमित्ताने तुला टांगारू म्हणण्याची संधी आम्ही कशाला सोडू- मंद्या Lol म्हण रे टांगारू कारण माझ एक्सप्लेनेशन कितीही खर असल तरी मी आले नाही हे सत्य आहे त्यामुळे गो अहेड Lol

दक्षे, गुब्बे टांगारू बायकांनो (कोण रे तिकडे बायका म्हणतय)......

तर बायकांनो...चालतं हो...

>>मंद्या आपण सिंहगड गटग करुयात का??? (फक्त पोरी आजारी नकोत अशी देवाजवळ प्रार्थना देवाजवळ)

करुयात की Happy तू ठरव कधी जायचं ते.

मला पुढील तारखांना वेळ आहे ८ (रविवार), १४-१५ (शनि-रवी), आणि २९ (रविवार)

अरे हो पोरींची तब्येत बरी आहे ना? की तेच कारण होतं Sad

.

गुब्बे एक महत्वाचं: कापूर जाळ रोज संध्याकाळी. कीप्स फ्लू अवे.

>>(एक भोचक प्रश्न- अ‍ॅक्टीवा चढेल का सिंहगड???)

न चढायला काय झाल, घोरपडीचा जमाना गेला Happy

तू माझ्या घरी ये. आमची अ‍ॅल्टो घेऊन जाऊयात. मी एकटाच आहे सद्ध्या त्यामुळे गाडीत आणखी ४ मोठे किंवा छोटेकंपनी मावेल***

***आकारमाना प्रमाणे Proud

गुरुवारी फोन करतो तुला, तो पर्यंत समजेल काय ते ८ तारखेचं मला.

.

गुरुवारी फोन करतो तुला, तो पर्यंत समजेल काय ते ८ तारखेचं मला.- ओके. पिल्लू कुठे गेलय आईच्या माहेरी का?

>>मंद्या मी सिंहगड रोडला राहते मग तूच यायला हव ना माझ्या घरी शहाण्या अ ओ, आता काय करायचं

हे मला कै माहित तू तिथे रहातेस ते? चालेल. मी फोन करीन तेव्हा ठरवू नक्की कसं करायचं ते.

>>पिल्लू कुठे गेलय आईच्या माहेरी का?

येस, सगळी कंपनी बायकोच्या माहेरी
काम करी पीतांबरी (पावडर, नस्त्या शंका घेउने Wink )

अरे व्वा, हे छान झाल, उत्तरोत्तर सन्ख्या वाढत जाईलच, पण सुरुवात तर केलीत >>>

अनुमोदन आणि शुभेच्छा ! मंद्या तुझी मेल मिळाली होती, पण नेमके त्याच दिवशी आम्हीही ठाण्यात भेटणार असल्याने नाही येवू शकलो. Happy

मी आणी निळ्यानी सामुहीक मिसलरे हे गटग..... पण लोचे होते रे.... आमचे आइ आणी बा गेलेत हैदराबादला ... त्यांना प्रकाशचित्र काढणार यंत्र हव होत... आणी एका शोनुल्याचा पहिलाच वाढदिवसपण होता.... मग दोन्ही कारणांसाठी इकड बळी द्यावा लागला मोहाचा.... जाऊद्या पुढच्या वेळी टिराय मारू.....

व्वा! चार तर चार, पण सगळे एका वेळी एकत्र जमलात हे काय थोडे आहे का! छान वाटले वृत्तांत वाचून Happy

अरे व्वा! Happy चला सुरुवात तर चांगली झाली म्हणायची...उत्तरोत्तर संख्या वाढतच जाईल!
पण मी टांगारु नाही हं ...मी म्हणुन आधीच कन्फर्मेशन दिलं नव्हतं!

मंदार सिंहगड करूयाच...धमाल येईल.. मी माझ्या बायकोला आणि पोराला पण घेऊन येतो. तुफान वातावरण आहे सिंहगडवर. रोज राजाराम पुलावरून जातो तेव्हा धुक्याने लपेटलेला सिंहगड दिसतो आणि मी चरफडत ऑफिसला जातो.

काल आमचा कॉम्प झोपला होता, म्हणून जरा उशीरा प्रतिक्रिया देतेय . मंदार मस्त ! अन मुळात तू हे गटग ठरवलस अन तू स्वतः येऊन पारही पाडलस त्याबद्दल धन्यवाद Happy
खरच मजा आली भेटून. मस्त गप्पा झाल्या. मी प्रथमच माबोवरच्यांना भेटत होते. तशात एक "मी-आर्या" शिवाय कोणाचा फोन नं ही नव्हता माझ्या कडे. ( झाला खरा थोडा बावळटपणा ) मनात जरा साशंकता होती, कसं काय ओळखायचं एकमेकांना ?
माझ्या नेहमीच्या वाईट्ट सवईने अगदी पाचला पाच मिनिटं असतानाच पोचले. आधी इकडे तिकडे नजर टाकून कोणी फेटेवाला ( मंदार ) दिसतोय का? कोणी छोट्या परीसोबत दिसतय का ( गुब्बी )? कोणी प्रचंड बारीक झालेलं दिसतय का (दक्षिणा )? असा प्रयत्न केला. मग गुमानं वेटरकडे चौकशी केली. पहिल्या मजल्यावर ८-१० मंडळी बसली आहेत असं कळल्यावर थोडं आश्चर्य करतच वर चढले. पण लक्षात आलं काहीतरी सत्कार वगैरे चाललाय. मग परत खाली आले. मग "मी-आर्याला" फोन केला. तिच्याकडून कळंल ती नाही पण "दिप्ती" येणार आहे. मग तिचा फोन नं मागून घेतला. तिला फोन केला, तिनेही तीच न्यूज दिली. पण त्यातल्या त्यात एक बरं झालं तिच्याकडे मंदारचा फोन नं होता. तो तिनं माझ्याशी ओळख नसतानाही, अगदी लगेच पाठवला.(मंदार प्लिज नोट Wink दक्षिणा अजून भेटलीच नाहीये मला, ना प्रत्यक्ष ना फोनवर ) मग मंदारला फोन केला. " आहे, मी बाहेरच आहे, आता येतो. " असे शब्द आले अन मग हुश्श झालं , आपण मामा बनवले गेलो नाहीत तर Happy
मग मात्र एक एक करत आम्ही चौघे जमलो अन मस्त गप्पा रंगल्या. मंदार अन आशिषच्या गोड पोरांचे फोटो बघितले, एकमेकांची खबरबात घेतली. आशिष नक्की बोलू आपण बांधवगडवर. फार मस्त आहे बांधवगड !
अन हो आम्ही फक्स्त चहा कॉफी नाही प्यायली बरं का. नाही तर म्हणाल हे पक्के पुणेकर ! विवेक जरा उशीरा आले, पण आम्ही तिघांनी मस्त खालं, प्यालं. अन मंदारने लेकाची पार्टी म्हटल्यावर आम्ही आमची पाकिटं पुन्हा खिशात घातली Happy
अनिल, दक्षिणा, गुब्बी या सगळ्यांची आठवण काढत, पुन्हा भेटण्याचे ठरवत आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
मंदार, खरच खुप मजा आली. आता पुन्हा भेटू, जरा जास्त लोक्स Wink

Pages