गप्पागोष्टी स्नेहभेट उर्फ गटग

Submitted by मंदार-जोशी on 1 August, 2010 - 10:51

गप्पागोष्टी ह्या गप्पांच्या पानाला फार काळ लोटलेला नसल्याने आणि इथे येणारी लोकं प्रचंड कार्यमग्न असल्याने पानही फारसे वाहतं नसतं. अनेकांचे भ्रमणध्वनी क्रमांकही एकमेकांकडे नव्हते यामुळे गटगला उपस्थिती किती असेल ह्याबाबत मी जरा साशंकच होतो, तरीही Slow and steady... ह्या इंग्रजी म्हणीप्रमाणे गटग आयोजित करण्याचे धाडस तर करुया या विचाराने सगळ्यांना विपत्र टाकले. त्याप्रमाणे एक ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजता कोथरुड येथील किमया हॉटेलमध्ये भेटायचं ठरलं.

सव्वापाच वाजता मी किमया हॉटेलबाहेर गाडी लावली आणि पाच मिनिटं झाली नसतील तेवढ्यात भ्रमणध्वनी वाजला. नंबर अनोळखी होता. "हेलो, मंदार जोशींचा नंबर का?, मी आरती खोपकर. तुमचा नंबर दक्षिणा कडून घेतला. आलेत का कुणी? तुम्ही कुठे आहात?"
"हो, मी बाहेरच आहे, आलोच", असं म्हणून मी आत गेलो. ठरल्यावेळेला हजर राहणारी मी पाहिलेली ही एकमेव पुणेकर ;).

एकमेकांची जुजबी ओळख करून घेतली आणी इतरांची थोडावेळ बाहेर वाट बघायची असं ठरवून गप्पा मारू लागलो. असाच काही वेळ गेल्यावर दुचाकीवरून आशिष फडणीस उर्फ ashuchamp आला. पुन्हा गप्पा सुरु झाल्या. पावणेसहा वाजेपर्यंत वाट पाहून मग आत गेलो. काही वेळाने विवेक देसाईचा फोन आला की तो दहा मिनिटाने येतो आणि सांगितल्याप्रमाणे तो चक्क दहाव्या मिनिटाला हजर झाला. हे दोघेही आपापल्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून आले हे विशेष. अनिल मतिवडे उर्फ अनिल७६ ची थोडावेळ वाट बघितली आणि मनातल्यामनात.....असो. नंतर तो टांगारू होण्याचं कारण त्याचा बॉस अचानक कार्यालयात उगवला हे होतें हे गप्पागोष्टी पानावर त्याने टाकलेल्या पोस्टीने समजलं. दक्षिणाच्या घरी ऐनवेळी पाहूणे आले.

पुढील चित्रात सगळ्यात डावीकडे आशिष फडणीस उर्फ ashuchamp, मध्ये विवेक देसाई आणि उजवीकडे आरती खोपकर उर्फ आरती२१.

पुढील चित्रात सगळ्यात डावीकडे मी, मग आशिष फडणीस आणि उजवीकडे विवेक देसाई.

आम्ही भेटण्याआधी अनेकांचे भ्रमणध्वनी क्रमांकही माहित नव्हते, त्यामुळे ओळख होणे हे एक अत्यंत महत्वाचे काम पार पडले हेही नसे थोडके. Happy

एकंदर मनमोकळ्या भरपूर छान गप्पा; एकमेकांच्या व्यवसाय-नोकरी, मूळ गाव, तसंच घरच्यांबद्दल माहिती घेत; पुढचं गटग आरतीच्या घरी साजरं करण्याची योजना आखत, आणि अनेक टांगारूंची आठवण काढत आधी अपेक्षित असलेल्या ४ याच आकड्यावर आमचं पहिलंवहिलं गटग साजरं झालं. Proud

गुलमोहर: 

अरे वा लोक आता निधडे झाले कि. चक्क फोटो आणि त्याखाली नावे पण देतात. पुर्वी मायबोलीवर तोंडओळख असा वेगळा बीबी होता. आणि स्वतःचे थोबाड दाखवूनच, दुसर्‍याचे थोबाड बघता येत असे.
पुढच्या वेळी, निदान फोनद्वारे सहभागी होईन म्हणतो.

मंदार माझा एक मित्र आहे (फेसबुक वर आहे) त्याचे नाव आहे मनीष मेहरोत्रा.
त्याला गेली १८ वर्षे ओळखतो. तरुणपणी तो अगदी तूझ्यासारखा दिसायचा.

मंदार माझा एक मित्र आहे (फेसबुक वर आहे) त्याचे नाव आहे मनीष मेहरोत्रा.
त्याला गेली १८ वर्षे ओळखतो. तरुणपणी तो अगदी तूझ्यासारखा दिसायचा. >>> दिनेशदा, तो मंदारचा बचपनमे गाँव की जत्रा मे बिछडा हुआ जुडवा भाई असेल....... Proud Proud Proud

मंदार, हे काय? एकच एक फोटो टाकून चुपचाप बसलाहेत? बाकीचे फोटो कुठाहेत?

अनिल, तुम्ही आमच्या नाशिकच्या सकाळ वृत्तसमुहाचे संपादक उत्तम कांबळे (सध्या ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व "सकाळ माध्यम समूहा'चे मुख्य संपादक आहेत.) यांच्यासारखे दिसता...खुपच साम्यय तुमच्या दोघांच्या चेहर्‍यात आणि बांध्यात....

Pages