देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग १)

Submitted by किरण on 1 August, 2010 - 14:59

देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)

नमस्कार! सर्वसाधारणपणे अापण नेहमी अमुक शब्दाचा ‘अपभ्रंश’ तमुक अाहे असे म्हणतो. जसे की अॉफिस चा अपभ्रंश होअुन हापिस हा शब्द. हॉस्पिटल चे अीस्पितळ, िअ. वरील अुदाहरणे िअंग्रजी शब्दांची अाहेत. मात्र मराठी शब्दांतही असे बदल घडुन येतात. जसेः जाहला – झाला. पण हे सर्व अपभ्रंश अुच्चाराबाबत अाहेत. अपभ्रंशाची सोपी व्याख्या म्हणजे ‘भ्रष्ट नक्कल’. भ्रष्ट म्हणजे जी मूळ प्रतिशी समरुप नाही अशी.

अापण कधी हा विचार केला अाहे का की असा प्रकार अापल्या लिहीण्याच्या पद्धतीत देखील होतो / होअु शकतो? वर्षानुवर्षे देवनागरी लिपी अनेक लोक वापरत अालेले अाहेत. त्यातील अनेक वैशिष्ट्यांमुळे संस्कृत शिवाय अनेक भाषेतील मजकूर जतन करण्यासाठी देवनागरी लिपी वापरली गेली / जात अाहे. मराठी व हिंदी ही नेहमीची अुदाहरणे. मात्र खुप कमी लोकांना हे माहित असेल की देवनागरी लिपी १४ पेक्षा अधिक भाषांसाठी वापरली जाते.

अापल्या पुर्वजांनी देवनागरी लिपी तयार करताना अनेक बाबींचा शास्त्रोक्त विचार केला होता, मात्र वर सांगितल्याप्रमाणे त्यात वेळोवेळी बदल घडत गेले अाणि तत्कालिन कालानुरुप हे बदल ग्राह्य मानले गेले. मात्र अनेक भाषा देवनागरीचा वापर करत अाल्याने त्या त्या भाषेसाठी अनुकूल असेही काही बदल करण्यात अाले अाणि ते काही भाषांपुरते मर्यादित राहिले.

अुदाः हिंदी भाषिकांनी खासकरुन अुर्दू अुच्चारातील बदल कळावा म्हणून नुक्ता (अधोबिंदू ़ कागज़) वापरणे सुरु केले. तसेच काही हिंदी अक्षरे (अ, झ, अंक ५, ८) हे हिंदीत वेगळ्या पद्धतीने लिहीतात.

मराठीत श अाणि ल यांचे लेखन वेगळ्या प्रकारे केले जाते.

केवळ मराठीमध्ये असलेले ‘ळ’ हे विशेष अक्षर हिंदी व संस्कृत मध्ये देखील नाही.

सिंधी भाषादेखील काही ठिकाणी देवनागरीत लिहिली जाते. तिथे काही अक्षरांना अधोरेषा अाहे. (ॻ)

ह्या सर्व नंतरच्या पुरवण्या अाहेत ज्या अापापल्या सोयीप्रमाणे घातलेल्या अाहेत. अॅ व ऑ ह्या अगदी अलिकडच्या मराठीतील भरी!

ह्या भरींबरोबरच काही अक्षरे (मुख्यतः स्वर) त्यांच्या अुच्चारांसकट लयासही गेली अाहेत. जसे की दीर्घ ऋ = ॠ. ऌ व ॡ. ह्यातील ऌ हा मराठीतील क्ऌप्ती ह्या अेकमेव माहित असलेल्या शब्दामुळे जिवंत अाहे.

मात्र मी जो अपभ्रंश म्हणतोय तो हा नव्हे. मूळ देवनागरी लिपीपासून फारकत व्हायला फार पूर्वीपासून सुरुवात झाली असावी. ह्याचे मुख्य कारण एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे केवळ भुर्जपत्रावरील हस्तलिखीताच्या स्वरुपातच हस्तांतर झाले. शिवाय प्रत्येकाच्या लिहीण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे त्यात बदल घडत गेले. छपाईचे तंत्रज्ञान अाल्यावर त्या वेळी वापरात असलेल्या लिपीमधे पुढील बदल घडणे थोडे स्थिरावले.

हे बदल कसे घडले असावेत ते अापण पुढच्या भागात पाहू. मात्र पुढचा भाग लिहीण्यासाठी मला किरण फाॅण्ट ची गरज पडेल कारण लिपी वरील कोणतेही illustration Unicode च्या अावाक्याबाहेर अाहे.

किरण फाॅण्ट http://www.kiranfont.com येथून मोफत मिळवा.

(भाग १ समाप्त)
देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)

काही महत्वाच्या प्रतिक्रिया
limbutimbu | 2 August, 2010 - 23:23

>>>> केवळ मराठीमध्ये असलेले ‘ळ’ हे विशेष अक्षर हिंदी व संस्कृत मध्ये देखील नाही.
माझ्याकडील पुस्तकात, श्री विष्णूसूक्तात दुसरा श्लोक असा आहे
इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधानिदधे पदम
समूहळमस्य पांसुरे
हा ळ नन्तर ल ऐवजी प्रक्षिप्त असेल का? जाणकारान्नी खुलासा केल्यास बरे होईल स्मित

किरण | 3 August, 2010 - 14:28

pdf मध्ये पण कधी कधी गोंधळ होतो म्हणून बहुतेक इमेज च टाकावी लागेल नाहीतर वाचकांना द्राविडी प्राणायाम करावा लागेल.

लिंबू: संस्कृत मध्ये ळ नाही हे नक्की. बरेच संस्कृत शब्द मराठीत आहेत पण काही शब्द ज्यात मराठी रुपात ळ आहे तो संस्कृत मध्ये ल आहे उदा: कमळ = कमल नळ = नल इ.

बहुधा ती प्रिंटींग मिस्टेक असावी.

अथर्वशीर्षातही "ॐ गं गणपतये नमः" आणि "स ग हिता संधी" ह्या २ ठिकाणी ग च्या जागी वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळी चिह्ने वापरलेली मी पाहिली आहेत. काही ठिकाणी आणि आता बर्‍याच पुस्तकात तर "संहिता संधी" असेही वाचले आहे. अशी बरीच चिह्ने आपण हरवलेली आहेत

उच्चाराबबतही योग्य निरीक्षण. मला तर असे वाटते की आपल्या भाषेचे ते वैशिष्ट पूर्वी तरी नक्किच असे होते की तो शब्द ऐकल्यावर त्याच्या उच्चारावरुनच त्याचा अर्थ अभिप्रेत व्हावा.

जसे सॅड गाणे ऐकल्यावर शब्दांशिवायच ते दु:खी गाणे आहे हे समजावे त्याप्रमाणे.

देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी उ कधी कधी अु (अ च्या खाली उकार) असा काढतो. जो युनिकोड मध्ये नेहेमी बरोबर दिसतेच असे नाही. ही वि. दा. सावरकरांनी पुरस्कृत केलेली पद्धत आहे.

हा लेख मी ऑफलाईन टाईप केला होता.

किरण छान लिहिलयत.
पण आम्हाला आ किंवा अ‍ॅ, ओ अशा अक्षरांच्या जागी एक तुटक रेषांचा पोकळ गोल दिसतोय. त्यामुळे नीट वाचता येत नाहीये. मी मॅक वरुन पोस्ट लिहिली की असा प्रकार होतो असा माझा अनुभव आहे. आणि ते मॅकवरुन कळत नाही , विंडोज वरच असा पोकळ गोल दिसतो.
तुम्हाला कदाचित तुमच्या कॉम्प्युटरवरून ते दिसत नसेल. कृपया बघाल का काय झालय ते?

माफ करा पण हा प्रोब्लेम मी दुरुस्त करु शकत नाही कारण युनिकोड आधारित संगणक उपप्रणाल्या प्रत्येक संगणकावर वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या, बसवल्या गेल्यामुळे हा घोळ निर्माण झालेला आहे.

ईथे ह्याविषयी मी ह्याबाबत चर्चा सुरु केली आहे.
http://www.maayboli.com/node/16886

मात्र जर तुम्ही किरण फॉण्ट ईन्स्टॉल केलात आणि खालील मजकूर वर्ड प्रोसेसिंग सोफ्ट्वेअर मध्ये कॉपी करुन त्याचा फॉण्ट KF-Kiran, KF-Amruta, KF-Aarti पैकी कोणताही सेट केलात तरी आपणास जसाचा तसा (म्हणजे मी लिहिताना जसा मला दिसला होता तसा) मजकूर दिसू शकेल. लिपीवरील ले़ख असल्याने मला किरण फॉण्टचाच वापर करावा लागेल. पण नाहीतर मी इमेज करुन टाकायचा प्रयत्न करेन.

कारण इथे मायबोलीत HTML चा Font tag allowed नाही.

खालील मजकूर मी http://kiranfont.com/kf/utilities.asp येथून युनिकोडातून किरण फॉण्ट मध्ये परावर्तित करुन घेतला आहे.

कोणाला दुसरा उपाय माहित असेल तर कृपया सांगावे धन्यवाद.

namaskxar! sava_saaQaarNapaNao AapaNa naohmaI Amaukx Sabdacaa ‘ApaBa`MSa’ tamaukx Aaho Asao mhNataao. jasao kxI AaVifxsa caa ApaBa`MSa haoAuna haipasa ha Sabd. haVispaTla cao AIispataL, iA. varIla AudahrNao iAMga`jaI SabdaMcaI Aahota. maa~a marazI SabdaMtahI Asao badla GaDuna yaotaata. jasao: jaahlaa – Jaalaa. paNa ho sava_ ApaBa`MSa Auccaarabaabata Aahota. ApaBa`MSaacaI saaopaI vyaaKyaa mhNajao ‘Ba`YT naWkxla’. Ba`YT mhNajao jaI maUL pa`itaSaI samar]pa naahI ASaI.

AapaNa kxQaI ha ivacaar koxlaa Aaho kxa kxI Asaa pa`kxar Aapalyaa ilahINyaacyaa pad\QataIta doKaIla haotaao / haoAu Sakxtaao? vaYaa_nauvaYao_ dovanaagarI ilapaI Anaokx laaokx vaaparta Aalaolao Aahota. tyaataIla Anaokx vaOiSaYT\yaaMmauLo saMskRxta iSavaaya Anaokx BaaYaotaIla majakUxr jatana kxrNyaasaazI dovanaagarI ilapaI vaaparlaI gaolaI / jaata Aaho. marazI va ihMdI hI naohmaIcaI AudahrNao. maa~a Kaupa kxmaI laaokxaMnaa ho maaihta Asaola kxI dovanaagarI ilapaI 14 paoXaa AiQakx BaaYaaMsaazI vaaparlaI jaatao.

Aapalyaa pauva_jaaMnaI dovanaagarI ilapaI tayaar kxrtaanaa Anaokx baabaIMcaa Saas~aaoWta ivacaar koxlaa haotaa, maa~a var saaMigatalyaapa`maaNao tyaata vaoLaovaoLI badla GaDta gaolao AaiNa tatkxailana kxalaanaur]pa ho badla ga`a+ maanalao gaolao. maa~a Anaokx BaaYaa dovanaagarIcaa vaapar kxrta Aalyaanao tyaa tyaa BaaYaosaazI AnaukUxla AsaohI kxahI badla kxrNyaata Aalao AaiNa tao kxahI BaaYaaMpaurtao mayaa_idta raihlao.

Auda: ihMdI BaaiYakxaMnaI Kaasakxr]na AudU_ AuccaarataIla badla kxLavaa mhNaUna nauWtaa (AQaaoibaMdU Þ kxagajaÞ) vaaparNao saur] koxlao. tasaoca kxahI ihMdI AXaro (A, Ja, AMkx 5, 8) ho ihMdIta vaogawyaa pad\QataInao ilahItaata.

marazIta Sa AaiNa la yaaMcao laoKana vaogawyaa pa`kxaro koxlao jaatao.

koxvaL marazImaQyao Asalaolao ‘L’ ho ivaSaoYa AXar ihMdI va saMskRxta maQyao doKaIla naahI.

isaMQaI BaaYaadoKaIla kxahI izkxaNaI dovanaagarIta ilaihlaI jaatao. itaqao kxahI AXaraMnaa AQaaoroYaa Aaho. (gaá)

+a sava_ naMtarcyaa paurvaNyaa Aahota jyaa Aapaapalyaa saaoyaIpa`maaNao Gaatalaolyaa Aahota. AV va AaV +a AgadI AilakxDcyaa marazItaIla BarI!

+a BarIMbaraobarca kxahI AXaro (mauKyata: svar) tyaaMcyaa AuccaaraMsakxT layaasahI gaolaI Aahota. jasao kxI dIGa_ P - PR. Í va ÍxR. +ataIla Í ha marazItaIla WÍptaI +a Aokxmaova maaihta Asalaolyaa SabdamauLo ijavaMta Aaho.

maa~a maI jaao ApaBa`MSa mhNataaoya taao ha navho. maUL dovanaagarI ilapaIpaasaUna fxarkxta vhayalaa fxar paUvaI_paasaUna saur]vaata JaalaI AsaavaI. +acao mauKya kxarNa ekxa ipaZIpaasaUna dusa%yaa ipaZIkxDo koxvaL Bauja_pa~aavarIla hstailaKaItaacyaa svar]paataca hstaaMtar Jaalao. iSavaaya pa`tyaokxacyaa ilahINyaacyaa vaogawyaa pad\QataImauLo tyaata badla GaDta gaolao. Cpaa[_cao taM~a&aana Aalyaavar tyaa vaoLI vaaparata Asalaolyaa ilapaImaQao pauZIla badla GaDNao qaaoDo isqaravalao.

ho badla kxsao GaDlao Asaavaota tao AapaNa pauZcyaa Baagaata paahU. maa~a pauZcaa Baaga ilahINyaasaazI malaa ikxrNa fxaVNT caI garja paDola kxarNa ilapaI varIla kxaoNataohI iAlausT^oSana yauinakxaoDcyaa AavaaWyaabaahor Aaho.

Baaga dusara (yaota Aaho) : sagawyaata ApaBa`MiSata Jaalaolao dovanaagarI AXar ‘r’

मलादेखील युनिकोडमध्ये हीच अडचण येत आहे.. किरण, किरण फाँट कुठून डाउनलोड करायचा व इन्स्टॉल करायचा ते सांगशील का? (हे फाँट इन्स्टॉल करणे मला कधीच जमले नाय Sad )

टण्या, kiranfont.com वर,Get FREE Fonts वर क्लिक करुन तुझा इमेल दिलास की तुला Step-by-Step Instructions सकट fonts ची झिप फाईल मिळेल. कधी कधी अ‍ॅटॅचमेंट असल्याने ती स्पॅम मेल मध्ये जाते.

किरण, या सगळ्याची पीडीएफ फाईल तयार होईल का ? म्हणजे मूळ लिपीतले सौंदर्य दिसेल.
या लिपीचे सपाटीकरण झाल्यासारखे वाटते आता. मायबोलीवर जरातरी चांगली दिसते, पण बाकीच्या साईट्स वर, अगदी बरहा वापरताना पण, काहीतरी विचित्रच दिसते.
ञ, ङ हि अक्षरे पण कूठे वापरतो आपण ? पञ्चगंगा, वाङमय हे शब्द असेच लिहायला हवेत.

>>>> केवळ मराठीमध्ये असलेले ‘ळ’ हे विशेष अक्षर हिंदी व संस्कृत मध्ये देखील नाही.

माझ्याकडील पुस्तकात, श्री विष्णूसूक्तात दुसरा श्लोक असा आहे
इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधानिदधे पदम
समूहळमस्य पांसुरे

हा ळ नन्तर ल ऐवजी प्रक्षिप्त असेल का? जाणकारान्नी खुलासा केल्यास बरे होईल Happy

>>>> पञ्चगंगा, वाङमय हे शब्द असेच लिहायला हवेत.
मी कालच, अथर्वशीर्षाचा अर्थ अभ्यासत होतो, त्यात ग चा उच्चार वर अनुस्वार व बिन्दूरुप असा काहीसा उल्लेख आहे. गं या एकाक्षरी मन्त्राच्या उच्चाराचे ते वर्णन वाटते, मी पुन्हा पुन्हा उच्चारून बघितले.
मनातील भिती घालविण्यास खं या एकाक्षरी मन्त्राचा जप उपयोगी पडतो, - अनावश्यक बाबी बाहेर फेकतो आहे अशी काहीशी जाणीव होते, तर गं चा उच्चार मनातल्या मनात वा उघड केले असता काही एक "धारण" करत असल्याची भावना तयार होताना जाणवते - कदाचित तो भासही असेल, काय की!
हे विश्लेषण द्यायचे कारण असे की, वर दिलेले ङ हे अक्षर गं ऐवजी वापरायचे असेल का का?
पण तसे नसावे, अनुस्वार वर द्यायला सान्गितला आहे व स्पष्टपणे गणातिल पहिले अक्षर असे सान्गितले आहे.
असो, यावर विचार करावा लागेल
बीबीवेगळा विषय आहे, पण इथेच मान्डावासा वाटला

pdf मध्ये पण कधी कधी गोंधळ होतो म्हणून बहुतेक इमेज च टाकावी लागेल नाहीतर वाचकांना द्राविडी प्राणायाम करावा लागेल.

लिंबू: संस्कृत मध्ये ळ नाही हे नक्की. बरेच संस्कृत शब्द मराठीत आहेत पण काही शब्द ज्यात मराठी रुपात ळ आहे तो संस्कृत मध्ये ल आहे उदा: कमळ = कमल नळ = नल इ.

बहुधा ती प्रिंटींग मिस्टेक असावी.

अथर्वशीर्षातही "ॐ गं गणपतये नमः" आणि "स ग हिता संधी" ह्या २ ठिकाणी ग च्या जागी वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळी चिह्ने वापरलेली मी पाहिली आहेत. काही ठिकाणी आणि आता बर्‍याच पुस्तकात तर "संहिता संधी" असेही वाचले आहे. अशी बरीच चिह्ने आपण हरवलेली आहेत

उच्चाराबबतही योग्य निरीक्षण. मला तर असे वाटते की आपल्या भाषेचे ते वैशिष्ट पूर्वी तरी नक्किच असे होते की तो शब्द ऐकल्यावर त्याच्या उच्चारावरुनच त्याचा अर्थ अभिप्रेत व्हावा.

जसे सॅड गाणे ऐकल्यावर शब्दांशिवायच ते दु:खी गाणे आहे हे समजावे त्याप्रमाणे.

किरण, माहितीबद्दल धन्यवाद Happy

[पण या वरल्या चर्चेमुळे मी मात्र एका वेगळ्याच विषयात दन्गलोय. जप मोठ्याने/हळूहळू/मनातल्यामनात वगैरे करतात. तर वरील खं आणि गं या अक्षरान्चा जप ओठ घट्ट मिटून पण आतल्या आत ऐकु येइल अशा पद्धतीने उच्चार केल्यास पूर्णतः स्वतन्त्र अनुभूती येते असे मला जाणवले - अभ्यास करतोय - काय गम्मते ना? विषय कोणता? मी कुठे चाल्लोय?]

लिंबू, तुला विषयाला सोडुन अशीच एक गम्मत सांगतो. मी कुठल्या तरी पुस्तकात वाचले होते की
"प्राण कंठाशी आलेले" असताना लोक देवाचा धावा करतात. ह्या लेखकाच्या पहाणीत एक बाई होत्या आणि त्या घरात एकट्या असताना हार्ट अ‍ॅटॅक आला. सर्व अंग आक्रसून जाऊ लागले छातीत दुखू लागले, श्वास कोंडतोय की काय असे वाटू लागले पण मन ताळ्यावर होते, त्यांनी जिवाच्या आकांताने विठ्ठलाचा गजर सुरु केला "विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल,...", आणि काय आश्चर्य त्यांना थोड्या वेळातच बरे वाटू लागले.

आता ही गोष्ट वाचून कोणाला वाटेल की किती धार्मिक गोष्ट आहे वगैरे. गोष्ट खरी की खोटी माहीत नाही पण लेखकाने दिलेले स्पष्टीकरण मला विचार करण्यास भाग पाडून गेले.

त्यातला जो ठ्ठ चा उच्चार आहे तो जोरात करताना खोकल्यासारखी शरीराची हालचाल होते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन पुर्ववत होऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नाही

पण मी वर म्हटल्याप्रमाणे मंत्रोच्चारामुळे जो परिणाम साधला जात असे तो त्यामुळे निर्माण होणार्‍या कंपनामुळे ही असू शकेल.

"र्‍या" यातिल र मात्र सावरकरी पद्धतीनेच लिहीला जातो हल्ली, बरोबर ना?
मुलान्ना पडणारे प्रश्न अगदी अचूक मान्डलेस, मलाही लहानपणी शिकताना हे प्रश्न पडले होते.

(ते विठ्ठलाचे उदाहरण चपखल)

लिंब्या, तू म्हणतोयस तो भाकर्‍या किंवा तर्‍हा ह्यातल्या अर्ध्या र चे रुप जे अ‍ॅ (चिह्न) सारख्या आकाराचे आहे.
हे असे सांगण्याचे कारण काही जणांना युनिकोड आधारित सिस्टीममधील त्रुटींमुळे हे अक्षर र् किंवा नुक्तावाला पाय मोडका र् दिसण्याची शक्यता आहे.

होय बरोबर. त्याला सावरकरीच म्हणावे लागेल. पण मी जितक्या पुस्तकांत ह्याबद्दलचा उल्लेख वाचलाय तेथे मी ते आडवी रेघ व उभी रेघ (वर दाखवल्याप्रमाणे) बघितली आहे पण बहुतेक त्यांना मी शेवटी दाखवल्याप्रमाणेच अक्षर अभिप्रेत असावे. पुस्तक छापताना तसा खिळा उपलब्ध नसल्यामुळे किंवा तेवढी कल्पकता खिळे जोडणार्‍या कारागीराकडे नसल्यामुळे कदाचित तसे पहायला मिळाले असण्याची शक्यता आहे.

ठाण्यात नौपाड्याला मला वाटते 'ब्राह्मण सेवा संघ' नावाचा एक दुमजली हॉल आहे. त्यातील वरच्या हॉलमध्ये सावरकरांची काही सुभाषिते ह्या पद्धतीने लिहीलेली मी बर्‍याच वर्षांपूर्वी पाहिली होती. आता ती आहेत की नाही माहित नाही.

लिंबू, अथर्वशीर्षाच्या बाबतीतले तु़झे निरीक्षण बरोबर आहे.

गकार: पूर्वरूपम्
अकारो मध्यमरुपम्
अनुस्वारश्चांत्य रुपम्
बिन्दुरुत्तररूपं

आणि ह्यानंतर

ॐ गँ गणपतये नमः मधला गँ ह्याचेच हे वरील वर्णन आहे. ह्याचा उच्चार माझ्या माहितीप्रमाणे गं (गम्) असाच करायचा आहे. मात्र काहीजण तो (गॅम्) असा करतात.

हे गृहितक जर बरोबर असेल तर अनुस्वार आणि अनुनासिक ह्यासाठी टिंबाचा आणि अर्धचंद्राचा वापर
ह्याचा अर्थ लागू शकतो.

म्हणजे अनुस्वारासाठी अर्धचंद्रबिन्दू (जसे मँत्र - मन्त्र साठी) आणि अनुनासिकासाठी नुसता अनुस्वार (जसे, कसं काय?)

पण ह्याला कोणताही आधार नाही किंवा असे दाखले मी तरी पाहिलेले नाहीत.

हो धन्यवाद मंडळी. पण ते टायपायला न इमेजायलाच जास्ती वेळ लागतोय.

इमेजमधली सर्व अक्षरे (फक्त शेवटचा रफार आणि ऋकार व ट्र मधला र ह्यांचे ओरिजिनल रुप ह्याव्यतिरिक्त बाकी सर्व अक्षरे किरणफॉण्ट मध्ये काढता येतात. सावरकरांच्या विशेष अक्षरांसकट!! आणि मुख्य म्हणजे कोणत्याही संगणकावर / ब्रोऊजरवर (Windows Mac Linux) तशीच्या तशीच दिसतात. फक्त फॉण्टस् एकदा इन्स्टॉल केले की झाले!

>>>> ह्याचा उच्चार माझ्या माहितीप्रमाणे गं (गम्) असाच करायचा आहे.
तुम्ही म्हणता ते बोलीभाषेच्या उच्चारशास्त्रानुसार समजवुन सान्गायला-कृतित आणायला बरोबरच आहे.

मात्र अध्यात्मिक शाखेत, खास करुन मन्त्र उच्चारणाबाबतीत पुढील प्रमाणे भेद मानला जातो. याबाबत जाणकारान्चे मत अपेक्षित आहे.

परवा मन्त्रोच्चारणाच्या याच विषयावर माझ्या एका ज्योतिषतज्ञ मित्राशी चर्चा झाली.
तेव्हा उच्चारताना ग व त्यावर अनुस्वार असाच चपखल उच्चार अपेक्षित आहे
त्यात म चा अन्तर्भाव दोषात्मक आहे - म (अर्धवट देखिल) उच्चारू नये असे त्याचे मत पडले व मला ते दोन्ही पद्धतीने तत्काल उच्चार करुन बघितल्यावर पटले
याचे मला जाणविलेले कारण की निखळ गं चा उच्च्चार केला तरच "अकारो मध्यमरुपम्" भेसळ न होता लाम्बवित नेता येऊन, नासिका रन्ध्रातून वर मेन्दूपर्यन्त पोचतो हे जाणवते (अनुस्वारश्चांत्य रुपम्).
मात्र शेवटच्या बिन्दुरुत्तररूपं या उक्तिचा अनुभव वा अनुभुती अजुन मला झाली नाहीये. एक शक्यता जाणवते ती म्हणजे, अकार वाढवित नेताना एक क्षण असा येतो की छातीतील सर्व हवा सम्पलेली असते, मात्र त्याच वेळेस ब्रह्मरन्ध्राकडे एकाग्रता पराकोटीची निर्माण होऊन त्या क्षणी काहि अनुभव्-अनुभूती मिळण्याची शक्यता आहे. नविन माणसास, गं चा उच्चार ओठ बन्द न करता व गम् मधिल म चा उच्चार ओठ बन्द करत केला असता हा फरक जाणवेल. प्रत्यक्षात माझे निरीक्षण असे की अभ्यासाअंती ओठ उघडे ठेवुन वा न ठेवताहि निखळ गं चा उच्चार आतल्या आत करता येतो व परिणाम अनुभवता येतात.

[खाडकन धडक मारून एकाच प्रयत्नात दरवाजा उघडणे, वा हळूवार टक टक करीत दरवाजावर त्या टकटकीच्या "धडका मारून" पलिकडील शक्तिस जागृत करणे यात जो फरक असेल, तोच माझ्या सध्याच्या प्रयत्नात आहे. दरवाजा दोन्हीमुळे उघडेलच, पण दुसर्‍या प्रकारात वेळ लागेल - कदाचित आन्तरिक शक्ति जागृत होऊन तीच दरवाजा उघडेल. अर्थात धडक मारण्याची शारिरीक्-मानसिक क्षमता माझेत नाही, तेव्हा पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत रहाणे हा उपाय]
(सदर मित्र सध्या वनस्पतीन्वर वेदोक्त मन्त्रशक्तीचे परीणाम अभ्यासण्याच्या एका प्रोजेक्टवर काम करतोय ज्यास नासा व अन्य काही अमेरिकन सन्स्थान्चे सहाय्य आहे. - देशात मात्र हे व असेच ज्योतिषादिक वेदोक्त विषय विद्यापिठात ठेवायचे की नाही यावरच राजकारन नि सुन्दोपसुन्दी चालूहे - चालुद्या अन काय!)
(या बीबीचा हा विषय नाही, पण ओघात येते ते सर्व लिहीणे भाग पडले, अर्धवट उल्लेख करुन विषय लटकत ठेवणे मला जरा अप्रशस्त वाटले, तरीही विषयान्तराबद्दल क्षमस्व)

Pages