अतुल्य! भारत - भाग ८ : राजस्थान (उदयपुर, चित्तौडगढ, माउंट अबू)

Submitted by मार्को पोलो on 1 August, 2010 - 04:03

केसरीया बालम आवोनी,
पधारोनी म्हारे देस रे,
पधारोनी म्हारे देस...
राजांची भूमि रा्जस्थान, विरांची भूमि रा्जस्थान, शिलरक्षणासाठी जोहार करणार्‍या पतिव्रतांची भूमि राजस्थान, पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप आणि ईमानी चेतक ह्याच मातीतले...
चला आता ह्या राज्याचा थोडा फेरफटका मारू या...
अरावली पर्वतरांगांनी राजस्थानचे दोन भाग केले आहेत. पुर्वेला मेवाड आणि पच्शिमेला मारवाड. मेवाडचे लोक लढवय्ये होते तर मारवाडचे लोक हे धंद्यात अतिशय हुशार...
आपल्याला वाटतो तेव्हढा रा्जस्थान रूक्ष नाहिये. मेवाड पट्टा बर्‍यापैकी हिरवा आहे. थर चे वाळवंट हे जैसलमेर आणि बिकानेर (मारवाड) च्या भागात आहे. ईथे फार प्राचीन काळी समुद्र होता. आजही ह्या वाळवंटात समुद्रजिवांचे जिवाश्म मिळतात.
भटकंतीस योग्य काळ : नोव्हेंबर ते जानेवारी. डिसेंबर-जानेवारी मध्ये दिवसाचे तपमान अतिशय छान आणि आल्हाददायक असते. डिसेंबर मध्ये जैसलमेर भागात रात्रि अतिशय कडाक्याची थंडी असते. ईथे ऊन्हाळा अतिशय तीव्र असतो.
आम्ही पाहिलेली स्थळे: उदयपुर, चित्तौडगढ, माऊंट अबू, जोधपुर, जैसलमेर, तनोट, अजमेर आणि जयपुर.
दिवसः १० ते १२

उदयपुर :
उदयपुर चे प्रमुख आकर्षण म्हणजे सिटी पॅलेस आणि लेक पॅलेस.सिटी पॅलेस उदय मिर्झा सिंग ने १५५९ मध्ये पिचोला ह्या सरोवराच्या किनार्‍यावर बांधला. ह्या महालात हॉटेल, म्युझियम, मंदिर, उपहारगृह असे बरेच काही आहे.
लेक पॅलेस हे हॉटेल पिचोला सरोवराच्या मध्ये एका लहान द्विपावर स्थित आहे. हा महाल/हॉटेल महाराणा जगत सिंग दुसरा याने १६४६ - १७४३मध्ये बांधला. ईथे बर्‍याच चित्रपटांचे चित्रिकरण होते. गाजलेला बाँडपट "ऑक्टोपसी" त्यातलाच एक.
उदयपुर मध्ये महाराणा प्रताप यांचे एक स्मारक आहे. उदयपुरमध्ये "सहेलियो की बाडी" म्हणून एक ऊद्यान आहे. ह्या ऊद्यानात बरीच कारंजी आहेत. हे ऊद्यान महाराणा भुपाल सिंग ने त्याच्या राणी साठी बांधले. ह्या ऊद्यानाची एक खासियत अशी कि ईथली सर्व कारंजी गुरुत्वाकर्षणाच्या बलावर चालतात.

प्रचि १
एका उद्यानातली मिनी ट्रेन

-
-
-
प्रचि २
सहेलियों कि बाडी

-
-
-
प्रचि ३
सिटि पॅलेस प्रवेशद्वार

-
-
-
प्रचि ४
सिटि पॅलेस

-
-
-
प्रचि ५
राजमुद्रा

-
-
-
प्रचि ६
लेक पॅलेस आणि पिचोला सरोवर

-
-
-
प्रचि ७

-
-
-
प्रचि ११
सिटि पॅलेस पिचोला सरोवरातुन

-
-
-
प्रचि १२
सिटि पॅलेस मध्ये रहाणार्‍या पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यासाठी खास गाड्या. पहा ओळखता येता आहेत का ते.

-
-
-
प्रचि १३

-
-
-
प्रचि १५
महाराणा प्रताप

-
-
-
चित्तौडगढ:
चित्तौडगढउदयपुर पासुन ६० किमी अंतरावर आहे. जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजुला सरसोंची समृद्ध शेती लागते. सरसों चे शेत पाहिल्यावर आम्हां सर्वांतला "सारूख खान" जागा झाला आणि DDLJ effect सुरु झाला. शेतात घुसुन मनसोक्त फोटोज् काढुन घेतले. आपल्या शेताचे फोटोज् काढतायत म्हणुन तो शेतमालकही खुष झाला..
चित्तौडगढकिल्ल्याबद्दल माहिती प्रचि २० मध्ये दिलेली आहे.
ह्या किल्ल्यात सुंदर शिल्पकला असलेली बरीच देवळे आहेत. पण मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी ईथल्या मंदिरांची आणि मुर्त्यांची बरीच तोड्फोड केली आहे. ह्या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे "विजयस्तंभ" (प्रचि ६५).

प्रचि १७
सरसों के खेत

-
-
-
प्रचि १८

-
-
-
प्रचि १९
DDLJ effect Wink

-
-
-
प्रचि २०

-
-
-
प्रचि २१
किल्ल्याची तटबंदी

-
-
-
प्रचि २३

-
-
-
प्रचि २४

-
-
-
प्रचि २७

-
-
-
प्रचि २९

-
-
-
प्रचि ३०

-
-
-
प्रचि ३१

-
-
-
प्रचि ३३

-
-
-
प्रचि ३६

-
-
-
प्रचि ३७
किल्ल्याचा परिसर

-
-
-
प्रचि ३८

-
-
-
प्रचि ४०

-
-
-
प्रचि ४१

-
-
-

प्रचि ४३

-
-
-
प्रचि ४६

-
-
-
प्रचि ४७

-
-
-
प्रचि ४८

-
-
-
प्रचि ४९

-
-
-
प्रचि ५०

-
-
-
प्रचि ५१

-
-
-
प्रचि ५२

-
-
-
प्रचि ५३

-
-
-
प्रचि ५७

-
-
-
प्रचि ५८

-
-
-
प्रचि ५९

-
-
-
प्रचि ६०

-
-
-
प्रचि ६१

-
-
-
प्रचि ६३

-
-
-
प्रचि ६४

-
-
-
प्रचि ६५
विजयस्तंभ राणा कुंभा ह्याने ईसवीसन १४४२ - १४४९ मध्ये मालवा आणि मेहमुद खिलजी ह्यांच्यावर मिळविलेल्या विजयाची आठवण म्हणुन बांधला. ह्याची उंची ३९.१९ मीटर असुन हा ९ मजली आहे.

-
-
-
प्रचि ६६
किल्ल्याचे मागील प्रवेशद्वार

-
-
-
प्रचि ६७

-
-
-
प्रचि ६८
किल्ल्यावरून दिसणारा भोवतालचा परिसर

-
-
-

माउंट अबू :
माउंट अबू उदयपुर पासुन ४-५ तासांच्या अंतरावर अरावली च्या पर्वतरांगामध्ये वसलेले आहे. ईथे पहाण्यासारखी ठिकाणे म्हणजे गुरु शिखर, प्रजापिता ब्रम्हकुमारी आश्रम व दिलवाडा मंदिरे.
गुरु शिखर हे अरावली पर्वतरांगांमधले सर्वोच्च शिखर आहे. ह्याची उंची १७२२ मीटर आहे. ईथे दत्तात्रेयांचे मंदिर आणि पाऊलखुणा आहेत. ईथे समोरच एक ऑब्झरव्हेटरी आहे. ईथुन समोरच्या पर्वतरांगांचे विलोभनीय दॄष्य दिसते.

प्रचि ७०
दत्तात्रेयांच्या पाऊलखुणा

-
-
-
प्रचि ७१
ऑब्झरव्हेटरी

-
-
-
प्रचि ७२

-
-
-
प्रचि ७३
टोड रॉक

-
-
-
दिलवाडा मंदिरे :
दिलवाडा मंदिरे हि जैनांची ११व्या ते १३ व्या शतकातली मंदिरे आहेत. हि मंदिरे चालुक्य राजवटित बांधली गेली. ईथे एकूण पाच मंदिरे आहेत. ईथे आपल्याला संगमरवरातले (बहुदा जगातील) अत्युच्य कोरीव काम पहायला मिळते. माझ्या मते ईथले कोरीव काम हे ताज महाल पेक्षाही सरस आहे (माझ्या मते ताज महाल फक्त भव्य आहे.). मी आजपर्यंत पाहिलेल्या शिल्पकलांमध्ये सर्वश्रेष्ठ कोरीव काम मी ईथे पाहिले. दुर्दैवाने ईथे फोटो काढण्यास मनाई आहे. खाली जे फोटोज् दिले आहेत ते मी काढलेले नाहियेत. ईथे मिळणार्‍या पुस्तकातुन स्कॅन केलेले आहेत. हे फोटोज् फक्त आपणांस ईथल्या शिल्पकलेची कल्पना यावी म्हणुन दिलेले आहेत.
प्रचि ७४

-
-
-
प्रचि ७५

-
-
-

प्रचि ७६

-
-
-
प्रचि ७७

-
-
-
प्रचि ७८

-
-
-
प्रचि ७९

-
-
-
प्रचि ८०

-
-
-
प्रचि ८१

-
-
-
प्रचि ८२

-
-
-
प्रचि ८३

-
-
-
प्रचि ८४

-
-
-
प्रचि ८५

-
-
-
प्रचि ८६

-
-
-
प्रचि ८७

-
-
-
प्रचि ८८

-
-
-
प्रचि ८९

-
-
-
प्रचि ९०

-
-
-
प्रचि ९१

-
-
-
प्रचि ९२

-
-
-
प्रचि ९३

-
-
-
प्रचि ९४

-
-
-
प्रचि ९५

-
-
-
प्रचि ९६

-
-
-
प्रचि ९७

-
-
-
प्रचि ९८

-
-
-
प्रचि ९९

-
-
-
प्रचि १००

-
-
-
प्रचि १०१

-
-
-
-------------------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत - क्रमशः

आगामी आकर्षण - राजस्थान (जैसलमेर व तनोट)
"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407
-
-
-

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त सैर करून आणलीस राजस्थानची. अप्रतिम....

चंदन, काल घाईघाईत फोटो बघून घाईघाईतच प्रतिसाद पोस्ट केला होता.

आवडलेल्या गोष्टी Happy
१) राजस्थान
२) पॅलेस ३) दिलवाडा मंदिर व त्यावरचं कोरिव काम
४) लास्ट बट नॉट द लिस्ट : तुझे फोटो नेहमीप्रमाणेच.

खटकलेल्या गोष्टी Sad
१) प्रचि ५७ च्या कोरीव खांबावरील ते घड्याळ
२) हे तर सगळीकडेच खटकतं - प्रचि ३६, ६७ मध्ये कलाकारांनी लिहिलेली नावं त्या ठिकाणची शोभा Angry वाढवतायत.

नेहमीसारखे लै भारी.

ते जुने राजवाडे पाहिले की उगीच मन भरुन येते. इतका ग्रेट देश पण आक्रमकांनी पार रसातळाला घातला.

चंदन, दिलवाडा सारखे संगमरवरावचे कोरीव काम गुजराथी अन राजस्थानी कारागीर लोक उच्च करतात. कुठल्याही BAPS स्वामीनारायण मंदिरात गेलास तर अगदी तसेच कोरीव खांब, छत वगैरे दिसेल.

खल्लास! मी अवाक् झाले आहे इतके सुंदर कोरीव काम, नक्षी, कलाकुसर बघून! धन्स हे फोटोज शेअर केल्याबद्दल! Happy

बेस्ट झालाय हा एपिसोड.. सुंदर सगळॅच फोटोज!!
पण त्या DDLJ फोटु मधे पांढरा सलवार कमीझ घातलेल्या मुलीची कमी आहे Proud

बापरे! केवढे हे ऐतिहासिक ऐश्वर्य! केदार म्हणतो ते खरे आहे.. यातले सर्व काही रसातळाला गेले.

सुंदर चित्र!

चंदन, तूझ्या कलेने भग्नावशेष पण जिवंत होतात. आणखी काय लिहू ?
मी पण या भागाची सैर केली होती. पण त्यावेळी खास संगमरवर आणायला, राजसमंदी ला गेलो होतो.

आऊटडोअर्स,
मस्त सैर करून आणलीस राजस्थानची. अप्रतिम...>>>>>>>
आगामी आकर्षण - राजस्थान (जोधपुर, जयपुर, जैसलमेर).... कहानी अभी बाकी है मेरे दोस्त Happy
-------------------------------------------------------------------------------------
सायो,
मस्त फोटो. दिलवाडाचे तुम्ही काढलेले असते तर बहार आली असती.>>>>>>>>
होना. एव्हढ्या अप्रतिम शिल्पांचे फोटोज् नाही काढता आले ह्याची नेहमी चूटपुट लागुन राहिली आहे. Sad
-------------------------------------------------------------------------------------
केदार आणि बी,
ते जुने राजवाडे पाहिले की उगीच मन भरुन येते. इतका ग्रेट देश पण आक्रमकांनी पार रसातळाला घातला.>>>>>>
अरे अजुनही बरेच वैभव बाकी आहे. ते फक्त आपल्याला जतन करता आले पाहिजे.

दिलवाडा सारखे संगमरवरावचे कोरीव काम गुजराथी अन राजस्थानी कारागीर लोक उच्च करतात. कुठल्याही BAPS स्वामीनारायण मंदिरात गेलास तर अगदी तसेच कोरीव खांब, छत वगैरे दिसेल.>>>>>>
मी दिल्ली चे स्वामिनारायण मंदिर पाहिले आहे पण एव्हडि अत्युच्य आणि पराकोटिची कलाकुसर कुठेच पहायला नाही मिळाली.
-------------------------------------------------------------------------------------
दिपांजली,
पण त्या DDLJ फोटु मधे पांढरा सलवार कमीझ घातलेल्या मुलीची कमी आहे>>>>>>>>
ती मुलगी अजुन भेटायची होती. Happy
-------------------------------------------------------------------------------------
दिनेशदा,
मी पण या भागाची सैर केली होती. पण त्यावेळी खास संगमरवर आणायला, राजसमंदी ला गेलो होतो.>>>>>>>>
अरे हो, आम्ही पण घराचा संगमरवर राजस्थानातील किशनगढ येथुन आणला होता.

चंदन, मान गये हुजूर.. राजस्थान सुंदर आहेच शिल्पकलेच्या दॄष्टीने पण तू फोटो काढलेस तिथल म्हणजे आम्हाला ते खूप जवळून पाहिल्यासारखं वाटलं. Happy

a_1.jpg

सुंदर.
सरसोंके खेत, DDLJ लै भारी. Lol
उदयपूर पॅलेस खरंच देखणा आहे आतूनही. अजूनही तिथे कुणीतरी रहात असावं असं वाटतं. शेवटी पाय दुखायला लागतात पण राजवाडा पाहून पूर्ण होत नाही.
आम्ही गेलो होतो तेव्हा पिचोला तलावात खूप कमी पाणी होतं. कचराही खूप होता. त्यामुळे आम्ही तलावाची सैर केली नाही.
राणा प्रतापाच्या स्मारकाच्याजागी त्याचा जो पुतळा आहे, त्यावर संध्याकाळ झाली की प्रकाशझोत सोडतात. आणि खालच्या रहदारीच्या मुख्य रस्त्यावरून काळ्या डोंगरातला तो लखलखता पुतळा खूपच सुंदर दिसतो. त्याचा फोटो कसा काय नाही?

ललिता-प्रीति
खालच्या रहदारीच्या मुख्य रस्त्यावरून काळ्या डोंगरातला तो लखलखता पुतळा खूपच सुंदर दिसतो. त्याचा फोटो कसा काय नाही? >>>>

संध्याकाळपर्यंत आम्ही उदयपुर सोडले होते. Sad

व्वा चंदन..माझी २ वर्षांपुर्वीची राजस्थान ट्रीप तशीच्या तशी डोळ्यांसमोर आली..मस्तच!!
दिलवाडाच्या कोरीव कामाबद्दल १००% अनुमोदन..त्यातले खांब कोणालाच मोजता येत नाही ना Happy

सगळे फोटो सुरेखच! तरी ह्यात आमेर, कुंभलगड किल्ले, हल्दीघाटी म्युसीयम, महाराणा प्रताप स्मारक, ब्रह्मकुंमारी पीस पार्क चे वगैरे प्र चि नाहीत...ही सगळी ठिकाणं पण मस्त आहेत Happy

सुमेधा,
धन्यवाद. Happy
आमेर, >>>
तुम्हाला जयपुर चा आमेर फोर्ट म्हणायचा आहे का? तोच असेल तर तो राजस्थानच्या जयपुर ह्या भागात येईल.

कुंभलगड किल्ले, हल्दीघाटी म्युसीयम>>>
ईथे वेळेअभावी जाता नाही आले. Sad

महाराणा प्रताप स्मारक>>>
ह्याचा फोटो वर दिला आहे. तुम्हाला हेच म्हणायचे आहे काय?

ब्रह्मकुंमारी पीस पार्क >>>
ह्याचे फोटोज् आम्हाला काढू नाही दिले. Sad

पहिल्यांदा धन्यवाद राजस्थानची सफर घडवल्याबद्दल
आणि फोटो बद्दल तर काय सांगू शब्दच नाहीत .....अप्रतिम
३३,४६ मधील पोटोतील स्वच्छता पाहून थोड आच्छर्य वाटल कारण आपल्या इथ
अशी स्वच्धता किल्यात पहायला मिळत नाही.
७१ ऑब्झरव्हेटरी चा फोटो अप्रतिम .खुपच आवडला

परत टाकलेच ह्यानी फोटो त्रास द्यायला.... Lol

आम्ही उदयपूरला गेलो होतो तेव्हा आमचे नशिब वाईट होते त्यामुळे राजवाडा बघता नाही आला... तिथल्या कोणाचे तरी निधन झाल्यने तो राजवाडा तीन दिवस बंद होता... Sad

पण बाकीची ठिकाणं बघितली.... दिलवाडा मंदीरांबाबत पूर्ण अनुमोदन.. फारच सुरेख आहे तिथली शिल्पकला.. पण फोटो काढता येत नाहीत हे फार वाईट आहे.. कारण माहिती नाही पण काही फी ठेवून कॅमेरा वापरू द्यायला पाहिजे तिथे. बर्‍याच ठिकाणी अशी सोय आहे खरतर...

आणि लोकांनी केलेली कलाकुसर... ह्याबाबत तर काही बोलूच नये... अर्थात स्थानिक लोकांसाठी ही ठिकाणं अतिपरियात अवज्ञा अशी झालेली असतात त्यामुळे हे असले प्रकार बाहेरुन आलेल्याना बघायला मिळतात..

.

आम्ही साधारण नऊ वर्षांपूर्वी गेलो होतो उदयपूर, माउंट अबूला.
सहेलियोंकी बाडी तर मस्तच आहे. तिथे वापरलेले टेकनीक पाहून आश्चर्य वाटतं की जुन्या काळात लोक किती प्रयोगशील होते. Happy
अबूला नक्की लेकला बोटींगची मजा औरच आहे. दिलवाडा मंदिरे तर अवर्णनीय अगदी.

फोटो सगळेच मस्त. फक्त एक विनंती आहे- एकदम एवढे फोटो एकावेळी नका टाकू. आमच्याकडे डाऊनलोड व्हायला फार वेळ लागतो हो Happy

पधारो मारो देस... ही उक्ती सार्थ करणारे राजस्थानी लोक व भूमी मस्त आहे.
या फोटोतून तर अवर्णनीय सैर घडवून आणलीय, धन्यवाद चंदन.

अप्रतिम फोटो, असामान्य कलाकुसार, सुंदर राजवाडे!
केदारला अनुमोदन. अशी कितीतरी प्राचीन सुंदर कलाकारी परकीय आक्रमणात उध्वस्त झाली. आपण जे पाहतो ते उरलेले १०% असेल.
टोड रॉकवरची लोकांची कलाकुसर पाहून वाईट वाटले. सगळ्या पर्यटक स्थळांवर आपला शिक्का उठवण्याची लोकांची हौस ह्या वास्तू अजुनच खराब करते. मी पाहिलेले वेरुळ, अजिंठा, दौलताबादचा किल्ला आणि शिवकालीन अनेक किल्ले X Loves Y च्या संदेशांनी भरुन गेले आहेत.

Pages