प्रवेशिका - ४१ ( milya - चार-चौघांसारखे जगणार नाही... )

Submitted by kaaryashaaLaa on 13 October, 2008 - 23:41


"चार-चौघांसारखे जगणार नाही"
बोलणे सोपे! कृती जमणार नाही

जोडली आहे नभाशी नाळ माझी
मी कधीही पूर्ण कोसळणार नाही

वृक्ष आहे का असा बागेमधे - जो
पश्चिमी वार्‍यांपुढे झुकणार नाही?

माणसे निष्क्रीय ही झालीत इतकी
थंड जितके प्रेतही असणार नाही

कोण चुकले, हे नको सांगू कुणाला
वाच्यता मी ही कुठे करणार नाही

व्यर्थ तू शोधू नको दाही दिशांना
तो जरी असला तरी दिसणार नाही

बोलते खोटे किती आयुष्य माझे
रोज म्हणते "मी तुला छळणार नाही"

घाव शेवटचा तरी घालू नको तू
मी तसाही फारसा तगणार नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वाह! क्या बात है! पूर्ण गजल आवडली.
नभाचा आणि प्रेताचा शेर एकदम खल्लास!

पून्हा एकदा वाह! Happy

चौथा व शेवटचा शेर आवडला.

व्वा सगळीच आवडली

कृती जमणार नाही; पश्चिमी वार्‍यांपुढे; माणसे निष्क्रीय
आणि शेवट्चे ३ हे छानच जमलेत

८ गुण

बोलते खोटे किती आयुष्य माझे
रोज म्हणते "मी तुला छळणार नाही"

घाव शेवटचा तरी घालू नको तू
मी तसाही फारसा तगणार नाही

हे शेर छान आहेत.
माझ्या मते ६ गुण.
-सतीश

जोडली आहे नभाशी नाळ माझी
मी कधीही पूर्ण कोसळणार नाही

घाव शेवटचा तरी घालू नको तू
मी तसाही फारसा तगणार नाही

हे शेर खुप आवडले. एकुण सगळीच गझल मस्त आहे... ८ गुण

जीवघेणी गझल...

"बोलते खोटे किती आयुष्य माझे
रोज म्हणते "मी तुला छळणार नाही"

१० पैकी १०...

सुरेख!
मतला, नभ आणि व्यर्थ हे शेर फार आवडले!
माझे - ७.

प्रेत, आयुष्य आणि घाव सुरेख!

५ गुण
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....

आवडली
७ गुण
--------------------------------
आली दिवाळी! Happy

"चार-चौघांसारखे जगणार नाही"
बोलणे सोपे! कृती जमणार नाही

जोडली आहे नभाशी नाळ माझी
मी कधीही पूर्ण कोसळणार नाही

बोलते खोटे किती आयुष्य माझे
रोज म्हणते "मी तुला छळणार नाही"

सुंदर ... माझे ८ गुण

मिल्या, क्या बात है यार ! फार सुंदर झालिये गझल. खूप आवडली.