जनुकं ?

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून आईची स्वयंपाकघरात खुडबूड सुरू आहे. एवढ्यात बाबांना जाग येते, ते उठून बसतात. आईची चाहूल लागल्याबरोबर-

"ऐकलं का ?"
"ऐकते आहे. बोला !!"
"बदाम आहेत का घरात ?"
"आहेत. का ?"
"शिरा कर मग"
"बदामाचा शिरा ? आज काय विशेष ?"
"खावासा वाटला म्हणून कर म्हणालो. शिरा काय तुझ्या मांजरी बाळांत झाल्यावरच करावा असे थोडीच आहे"
"हो !! जसं काय तुमच्यासाठी काही करतच नाही"
"म्हणून तर सांगतोय, शिरा कर"

मग आई बदाम भिजत घालते. बदामाचा शिरा फारच जड पडतो म्हणून आई सगळा बदामाचाच शिरा नाही करत. एक वाटी रवा आणि एक वाटी वाटलेले बदाम असं करते.

"घ्या तुमचा शिरा" आई बाबांच्या हातात शिर्‍याची बशी ठेवत म्हणते.
"एवढा ? कमी कर..कमी कर"
"खा तेवढा. आवडतो ना तुम्हाला ?"
"आवडतो म्हणून एवढा खायचा का ? घास दोन घास दे फक्त"
"बदामाचा शिरा काही नेहमी होत नाही. केलाय तर खा"
"नको नको...कमी कर"

दुपारी जेवणात आईने खमंग लसणाची फोडणी घालून एखादी पातळ भाजी नाही तर पिठलं, लाल मिरच्यांची चटणी नाही तर ठेचा असे काही तरी केलेले असते. पोटभर जेवून तृप्त मनाने बाबा म्हणतात, "हे खरं जेवण. तो तुमचा (?) शिरा कसा चवीपुरता खायला. पोटभर जेवायचं तर भाजी-भाकरी-चटणीच हवी."
*****************************************************
शनिवार असूनही नेहमीप्रमाणे ईशानची आई सकाळी लवकर उठली आहे. आधुनिक आई असल्यामुळे स्वयंपाकघरात खुडबूड करण्याऐवजी ती की-बोर्डाचा खडखडाट करते आहे. एवढ्यात ईशानला जाग येते, तो आईची चाहूल घेत बाहेर बैठकीच्या खोलीत येतो.

"I don't want to drink milk"
"आं ?"
"Mamma, Can you please make brown shiraa ?"
"आज शिरा खायचाय मनीमाऊला ? बरं तू पटकन दात घासून घे. आपण शिरा करू."

कार्टं स्वतःहून काही तरी खायला मागतंय ह्या आनंदात मी शिर्‍यासाठी रवा भाजायला घेते. ईशान शिरा तयार होण्याची वाट बघत स्वयंपाकघरात खेळत बसतो.

"ईशान चल शिरा खाऊन घे"
"I don't want so much shiraa"
"आं ?"
"I don't want to eat so much shiraa"
"खा गुपचूप. तुला आवडतो, तू मागितलास म्हणून केलाय ना ?"
"...."

तरी फार फार तर अर्धी वाटी शिरा खाऊन तो स्वयंपाकघरातून धूम ठोकतो. दुपारी जेवणात पराठे किंवा भाजी-पोळी किंवा आमटी-पोळी असे काही तरी असते. पहिला घास पोटात गेल्या बरोबर ईशान म्हणतो,

"hmmmmmmmmm....yummy"
"आवडली आमटी ?"
"I don't like sheeraa"
"आं ?"
"Mamma, I like spicy. Can you make spicy every day ?"
"...."

विषय: 
प्रकार: 

विनायक, मानली भाऊ तुझी हिंमत. एकाच दगडात डायरेक दोन शिरे गारद केलेस?
आता दिसुदे बेटा तू शिट्टीत, तुझं शिर जाग्यावर राहायचं नाही! Proud

शाब्बास रे इशान. असंच करत जा. रोज वेगवेगळे पदार्थ मागत जा. सिंड्रेलाची जरा प्रॅक्टीस होईल पदार्थ करायची. म्हणजे मग मी कधी आलो तुझ्याकडे तर मला ट्राईड अ‍ॅन्ड टेस्टेड पदार्थ खायला मिळतील.

स्वगत - आता बघ, पुढच्यावेळी मी जेव्हा येईन तेव्हा शिरा अतिगोड झाला नसेल. -

Proud

Smiley
शिर्षक वाचून वाटलं काहीतरी सायंटिफिक लेख लिहिलायस की काय? Uhoh रच्याकने, आम्ही तुझ्या मांजरीचा लेख अजिब्बात लक्षात ठेवायचा नाही असं ठरवलंय.

ही नको ती जनुकं निरनिराळ्या वयाच्या सगळ्या भारतीय ओरिजिन च्या पुरुषां मधे असतात च.. पोळी- भाजी- वरण भात टाइप चं जेवण = स्वर्गसुख Proud
आमचे बाबा, माझा नवरा, मै चा नवरा,मैत्रेयीचा पोरगा सगळे पोळी भाजी पब्लिक .. मुली/बायका टोटल विरुध्द !

भारी Happy
खरं आहे पण.

आउटडोअर्स,
मलाही वाटलं होतं साय्फाय असेल कायतर.....

मस्त किस्सा. माझ्या एका मैत्रीणीचा मुलगा पण अमरिकेत रहायला लागल्यावर I don't want to eat Rava stuff असे म्हणला होता. ते त्याच्या आज्जीने कौतिकाने सांगितले होते. Happy

Pages