जनुकं ?

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून आईची स्वयंपाकघरात खुडबूड सुरू आहे. एवढ्यात बाबांना जाग येते, ते उठून बसतात. आईची चाहूल लागल्याबरोबर-

"ऐकलं का ?"
"ऐकते आहे. बोला !!"
"बदाम आहेत का घरात ?"
"आहेत. का ?"
"शिरा कर मग"
"बदामाचा शिरा ? आज काय विशेष ?"
"खावासा वाटला म्हणून कर म्हणालो. शिरा काय तुझ्या मांजरी बाळांत झाल्यावरच करावा असे थोडीच आहे"
"हो !! जसं काय तुमच्यासाठी काही करतच नाही"
"म्हणून तर सांगतोय, शिरा कर"

मग आई बदाम भिजत घालते. बदामाचा शिरा फारच जड पडतो म्हणून आई सगळा बदामाचाच शिरा नाही करत. एक वाटी रवा आणि एक वाटी वाटलेले बदाम असं करते.

"घ्या तुमचा शिरा" आई बाबांच्या हातात शिर्‍याची बशी ठेवत म्हणते.
"एवढा ? कमी कर..कमी कर"
"खा तेवढा. आवडतो ना तुम्हाला ?"
"आवडतो म्हणून एवढा खायचा का ? घास दोन घास दे फक्त"
"बदामाचा शिरा काही नेहमी होत नाही. केलाय तर खा"
"नको नको...कमी कर"

दुपारी जेवणात आईने खमंग लसणाची फोडणी घालून एखादी पातळ भाजी नाही तर पिठलं, लाल मिरच्यांची चटणी नाही तर ठेचा असे काही तरी केलेले असते. पोटभर जेवून तृप्त मनाने बाबा म्हणतात, "हे खरं जेवण. तो तुमचा (?) शिरा कसा चवीपुरता खायला. पोटभर जेवायचं तर भाजी-भाकरी-चटणीच हवी."
*****************************************************
शनिवार असूनही नेहमीप्रमाणे ईशानची आई सकाळी लवकर उठली आहे. आधुनिक आई असल्यामुळे स्वयंपाकघरात खुडबूड करण्याऐवजी ती की-बोर्डाचा खडखडाट करते आहे. एवढ्यात ईशानला जाग येते, तो आईची चाहूल घेत बाहेर बैठकीच्या खोलीत येतो.

"I don't want to drink milk"
"आं ?"
"Mamma, Can you please make brown shiraa ?"
"आज शिरा खायचाय मनीमाऊला ? बरं तू पटकन दात घासून घे. आपण शिरा करू."

कार्टं स्वतःहून काही तरी खायला मागतंय ह्या आनंदात मी शिर्‍यासाठी रवा भाजायला घेते. ईशान शिरा तयार होण्याची वाट बघत स्वयंपाकघरात खेळत बसतो.

"ईशान चल शिरा खाऊन घे"
"I don't want so much shiraa"
"आं ?"
"I don't want to eat so much shiraa"
"खा गुपचूप. तुला आवडतो, तू मागितलास म्हणून केलाय ना ?"
"...."

तरी फार फार तर अर्धी वाटी शिरा खाऊन तो स्वयंपाकघरातून धूम ठोकतो. दुपारी जेवणात पराठे किंवा भाजी-पोळी किंवा आमटी-पोळी असे काही तरी असते. पहिला घास पोटात गेल्या बरोबर ईशान म्हणतो,

"hmmmmmmmmm....yummy"
"आवडली आमटी ?"
"I don't like sheeraa"
"आं ?"
"Mamma, I like spicy. Can you make spicy every day ?"
"...."

विषय: 
प्रकार: 

Happy Happy Happy

मस्तच हा.... आईला मी आणी बाबांनी मिळून कस छळलय याची आठवण करुन दिलीत,,,,,

मला वाटल होत एखादी कविता असावी.... मोबाइल वर फफ्त शिर्षक वाचुन टिचकल होत..

मला तर बॉ सिंडीचा स्वानुभव असेल ह्याबद्दल खात्री होती. Happy

छान लिहीलंय..

आमच्याकडे सैपाकघरातच रमण्याची जनुकं आलीयेत बहुधा.. त्यामुळे आत्ता ती लुडबुड वाटली तरी अजून 7-8 वर्षांनी हॉलमध्ये नुसतं बसून राहण्याच्या कल्पनेनेच सुखावून जायला होतं Wink

मंजुडी.... Proud

संभाळून हा... काळानुरुप बदल झाले तर स्वप्न स्वप्न राहतील आणी तु ७-८ वर्षांनी आजच्या दिवशीला फ्लॅशबॅक मध्ये बघत असशील...

चिमण, मी कविता लिहिली असेल असं तुला वाटलच कसं ? Uhoh

मामी इथे अमेरिकेचा काय संबंध ? देशात जन्माला आला असता तर जनुकं बेगळी बांधुन आली असती का ?

सर्वांना धन्यवाद Happy

मलापण आधी वैज्ञानिक वगैरे काही असेल अस वाटलेलं शीर्षका वरुन :फिदी:.
सिंडे, विनायक तुझ्यापेक्षा लहान असला तरी किती शूर आहे बघ! घाबरत नाही कोणाला (एक exception असेल बहुतेक) :).

सिंडे मी काल फक्त कविता आणी गझलाच वागत होतो... बहुतेक त्याच्या परिणाम झाला असावा...

आणी आइला कालच सांगितल पण फोन करुन.... शनिवारी येइल तेव्हा स्पेशल गुळाचा शिरा हवाय म्हणुन.....

तोपर्यंत काय करु.... ???????? Angry

सिंडे, मस्तच लिहिलंयस. ही जनुकं कशी बरोब्बर उतरतात बघ पुढच्या पिढीत.
माझ्या बाबांना सामिष जेवण फार प्रिय. तर तीच आवड नातवातही उतरलीय. रोज आज चिकन करणार आहेस का विचारून वैताग आणतो. वर मी आजोबांसारखा आहे याचा त्याला कोण अभिमान.

अगदी मुंजीच्या वेळी पक्वान्नांनी भरलेल्या ताटावर नजर फिरवून 'यात चिकन दिसत नाही' असं म्हणून मला लाज आणली होती Happy

Pages