प्रवेशिका - ३८ ( vaibhav_joshi - नजर भिडवायची नाही... )

Submitted by kaaryashaaLaa on 12 October, 2008 - 23:54


नजर भिडवायची नाही , हसू दडवायचे नाही
कसे समजू तुला काहीतरी सुचवायचे नाही?

तुझ्या शाळेत आयुष्या , चला इतके तरी शिकलो
इथे कोणी कुणा काही कधी शिकवायचे नाही

मघाशी बोलणारे ते तुझे नव्हतेच का डोळे?
फिरव तू चेहरा पण बोलणे फिरवायचे नाही

जरासा वेळ जातो पण पुढे होते मनाजोगे
तिला लाजायचे असलेच तर अडवायचे नाही

अरे आधी तुम्ही त्यांच्या भुकेची सोय केली का?
असे निद्रिस्त स्वप्नांना उगा उठवायचे नाही

मला माझ्याच पारंब्या अता शिकवायला आल्या
कसे उगवायचे नाही , कुठे उगवायचे नाही

तुझे रेशीम आहे आणि हा कशिदा तुझा आहे
मला म्हणुनीच हे माझे जिणे उसवायचे नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मघाशी बोलणारे ते तुझे नव्हतेच का डोळे?
फिरव तू चेहरा पण बोलणे फिरवायचे नाही

अरे आधी तुम्ही त्यांच्या भुकेची सोय केली का?
असे निद्रिस्त स्वप्नांना उगा उठवायचे नाही

मस्त! मक्ताही आवडला..

मला खूप आवडली. सगळेच शेर खास आणि भाषा सहज...
माझे ८ गुण.

मला माझ्याच पारंब्या अता शिकवायला आल्या
कसे उगवायचे नाही , कुठे उगवायचे नाही>>>.वावा फारच मस्त शेर

वा वा....
माझे गुण ८
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

अरे आधी तुम्ही त्यांच्या भुकेची सोय केली का?
असे निद्रिस्त स्वप्नांना उगा उठवायचे नाही

वा..! वा..!

माझे ७ गुण.

कुठे उगवायचे नाही.. मस्तच रे!
उगा उठवायचे नाही... हा ही खासच!

खास जमलिये.. सगळेच शेर आवडले. माझे ८ गुण..

हाय!
सगळेच आरपार!
माझे ९
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

अरे आधी तुम्ही त्यांच्या भुकेची सोय केली का?
असे निद्रिस्त स्वप्नांना उगा उठवायचे नाही

मला माझ्याच पारंब्या अता शिकवायला आल्या
कसे उगवायचे नाही , कुठे उगवायचे नाही
>>>> क्या बात है जी! वाह!

आणि शेवटचा शेर!!!!
९ गुण

--------------------------------
आली दिवाळी! Happy

पारंब्या,स्वप्ने आणि मकता अगदी जबरी!

_________________________
-A hand that erases past can create a new begining.


मला माझ्याच पारंब्या अता शिकवायला आल्या
कसे उगवायचे नाही , कुठे उगवायचे नाही

वावाव्वा! क्या बात है! जबरदस्त!

तुझ्या शाळेत आयुष्या , चला इतके तरी शिकलो
इथे कोणी कुणा काही कधी शिकवायचे नाही

वाव्वा!

नजर भिडवायची नाही , हसू दडवायचे नाही
कसे समजू तुला काहीतरी सुचवायचे नाही?

वा!

तुझे रेशीम आहे अन् तुझा आहे कशीदाही किंवा तुझे रेशीम आहे, हा तुझा आहे कशीदाही असे करावेसे वाटले. भरघोस आणि चांगली गझल.

खूपच छान!
मतला - मस्त!
आयुष्याची शाळा - छानच!
अरे आधी तुम्ही त्यांच्या भुकेची सोय केली का?
असे निद्रिस्त स्वप्नांना उगा उठवायचे नाही

मला माझ्याच पारंब्या अता शिकवायला आल्या
कसे उगवायचे नाही , कुठे उगवायचे नाही

तुझे रेशीम आहे आणि हा कशिदा तुझा आहे
मला म्हणुनीच हे माझे जिणे उसवायचे नाही

ग्रेट! विशेषतः रेशीम... फारच आवडले.

माझ्या मते ९ गुण.
-सतीश

"अरे आधी तुम्ही त्यांच्या भुकेची सोय केली का?
असे निद्रिस्त स्वप्नांना उगा उठवायचे नाही
"
क्या बात है... Happy

पारंब्या आणि कशिदा मस्त!
९ गुण.

वा! अप्रतिम गझल आहे!!
आयुष्य, स्वप्न, पारंब्या हे शेर खासच.
माझे - ९.

वा! सुरेख गझल. पारंब्यांचा शेर सर्वाधिक आवडला.

अप्रतिम गझल. निद्रिस्त स्वप्नं, पारंब्या, रेशिम कशिदा मस्त.

सुंदर...सगळेच शेर आवडले....७ गुण

कितीदा दाद द्यायची ! केवळ अप्रतिम.

आवडली !!
माझे ८ गुण !

छान गझल
माझे ७