प्रवेशिका - ४ ( desh_ks - सत्यातल्या जगातुन... )

Submitted by kaaryashaaLaa on 29 September, 2008 - 01:33

मित्रहो,

ठरल्याप्रमाणे कार्यशाळेत निर्दोष ठरलेल्या प्रवेशिका तुमच्यासमोर सादर करत आहे.
तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहेच, पण आणखी एक जबाबदारीही आहे तुमच्यावर.
प्रत्येक गझलला तुम्ही १० पैकी गुण द्यायचे आहेत.
हे गुणांकन तुमच्या अभिप्रायातच नोंदवायला हरकत नाही.

तर सादर आहे आजची प्रवेशिका....

सत्यातल्या जगातुन जागे कुणीच नाही
भेटून मी खर्‍याला म्हणतो; उगीच नाही!

प्रत्येक वेदनेची मुद्रा जरा निराळी
माझ्या अनोळखीची, परकी, कुणीच नाही

झाले म्हणे कुठेसे काही अमानवी, पण
आहे नवीन वार्ता? ती कालचीच ना ही?

हळव्या खुळ्या मनाने गुंतू नयेच कोठे
ना बंधही सुखाचा, सुटका मुळीच नाही

गर्दीत भोवतीच्या माणूस सापडेना
माणूस शोधण्याला का योग्य मीच नाही?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी तेवढी पात्रता नाही तरीपण...
५ गुण

बरीचशी गद्याच्या जवळ जातेय. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शेवटापर्यंत पोहचण्याच्या जिद्दीचे ४मार्क्स

काही ठिकाणी व्याकरण चुकले आहे. 'ना ही' म्हणजे 'नाही' असे होऊ शकत नाही.
शिवाय मतल्यात 'जगातुन' असे वापरल्याने मात्रांची तडजोड खटकली जरा.
पण मतला छान आहे. दुसरा शेरही ब-यापैकी आहे. बाकीचे तेच तेच वाटतात.
४ द्यावेत की ५ द्यावेत हे मात्र कळत नाहीये.; अपूर्णांकात गुण देणे शक्य नाही.

राहू द्या:
घ्या ५ गुण.

२,३,५ आवडले.

६/१०

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

हळव्या खुळ्या मनाने गुंतू नयेच कोठे
ना बंधही सुखाचा, सुटका मुळीच नाही

आवडला.
माझे ५ गुण..

========================================
मी वैशाखातला दर्द, तू श्रावण हिरवागर्द..!

>>गर्दीत भोवतीच्या माणूस सापडेना
माणूस शोधण्याला का योग्य मीच नाही?<<
वा!
आवडली. ७ गुण

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

Pages