प्रवेशिका - ३४ ( daad - का कुणा कळलोच ना... )

Submitted by kaaryashaaLaa on 12 October, 2008 - 23:44

का कुणा कळलोच ना, पर्वा तशी मी करत नाही
हे खरे, माझा मला कळतो तसा मी वळत नाही

माझिया अस्वस्थ आत्म्याचेच का हे बिंब सारे?
हा असावा प्रश्न की उत्तर असावे, कळत नाही

'सागराला भेटणे उद्दिष्ट धारांचे असावे'
पात्र माझे कोरडे, नियमात मी ह्या बसत नाही

पाजळा हिरव्या ऋतूंनो, शस्त्र गंधित पाकळ्यांचे
भंगल्या हृदयास भीती खंजिराची उरत नाही

शौक घे पुरवून आयुष्या तुझे सारेच येथे
तू तिथे नसणार अन, येणार मीही परत नाही

जाणतो, शब्दांत कैशा कल्पना होतात पंगू
प्रार्थनांची अक्षरे लिहिण्यास मग मी धजत नाही

प्राण बनुनी मी तुझ्या श्वासात दरवळतोच आहे
हे तुला ठाऊक ना, हा दोष माझा ठरत नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाणतो, शब्दांत कैशा कल्पना होतात पंगू
प्रार्थनांची अक्षरे लिहिण्यास मग मी धजत नाही

यात कुठेतरी अदखळते वाचतांना. बाकी मस्त ! ७ गुण

मस्तय.
माझे ७
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

छान आहे.

माझे ७ गुण.

'सागराला भेटणे उद्दिष्ट धारांचे असावे'
पात्र माझे कोरडे, नियमात मी ह्या बसत नाही

जाणतो, शब्दांत कैशा कल्पना होतात पंगू
प्रार्थनांची अक्षरे लिहिण्यास मग मी धजत नाही

हे जास्त आवडले. माझे ७ गुण

पात्र माझे कोरडे... आह! वाह! क्या बात है!
सगळेच शेर आवडले. खास आहे गजल!

शौक घे पुरवून .... छानच

५ गुण

लयीत अडखळते वाचताना. पण मनाला भावते.
शेवटचे दोन छान.
माझे ५

चार ते सात शेर आवडले. 'हिरव्या ऋतूंची शस्त्रे', 'प्रार्थनांची अक्षरे', 'श्वासातून दरवळणारा प्राण' या कल्पना आणि हे तीनही शेर विशेषच छान!
माझ्या मते ६ गुण.
-सतीश

प्रार्थना आणि आयुष्य हे शेर फार आवडले!
माझे - ७.