प्रवेशिका - ३१ ( sanghamitra - वरदहस्त का त्याचा... )

Submitted by kaaryashaaLaa on 9 October, 2008 - 23:49

वरदहस्त का त्याचा आम्हां सर्वांवरती समान नाही?
नशीब देऊ केले त्याने, मजला मंजूर दान नाही

निघून गेली तरूण वर्षे आयुष्याशी झुंजण्यामधे
नीरस वाटे दिवस आजचा, वणवा नाही, तुफान नाही

"उदास का तू राजमहाली?" यावर मी ही काय म्हणावे?
अमृतप्याला हाती, जेव्हा पाण्याचीही तहान नाही

होते पैसे म्हणून म्हटले, घेऊ स्वप्ने जाता जाता
रिक्तहस्त मी तुझ्या अंगणी, या रस्त्याला दुकान नाही

सरल्यावरती रंग गुलाबी, कसे निभावे सांगा आता?
ती ही नाही तितकी सोशिक, तो ही तितका महान नाही!

नदीकाठच्या शांत दुपारी अनुभवते मी जेथे निर्गुण
मंदिर नाही, मशीद नाही, नसे आरती, अजान नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानचं! शेवटचा शेर फार सुरेख आहे. माझे ९ गुण.

निघून गेली तरूण वर्षे आयुष्याशी झुंजण्यामधे
नीरस वाटे दिवस आजचा, वणवा नाही, तुफान नाही>>>झकास

अमृतप्याला हाती, जेव्हा पाण्याचीही तहान नाही>>>मिसरा मस्त

होते पैसे म्हणून म्हटले, घेऊ स्वप्ने जाता जाता
रिक्तहस्त मी तुझ्या अंगणी, या रस्त्याला दुकान नाही>>>आपोआपच व्वा निघावा असा शेर....मस्तच

मक्तापण मस्त

छान आहे. शेवटचे तीन शेर तर खासच. माझे ७ गुण.

वा! मस्त गजल.
निघून गेली तरूण वर्षे आयुष्याशी झुंजण्यामधे
नीरस वाटे दिवस आजचा, वणवा नाही, तुफान नाही

"उदास का तू राजमहाली?" यावर मी ही काय म्हणावे?
अमृतप्याला हाती, जेव्हा पाण्याचीही तहान नाही

हे जास्त आवडले.
८ गुण
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!

"नदीकाठच्या शांत दुपारी अनुभवते मी जेथे निर्गुण
मंदिर नाही, मशीद नाही, नसे आरती, अजान नाही"

खुपच छान...
९ गुण...

८ गुण.. शेवटचा शेर आवडला..

शेवटचे ३ शेर फार सुंदर आहेत!
माझे गुण - ८.

होते पैसे म्हणून म्हटले, घेऊ स्वप्ने जाता जाता
रिक्तहस्त मी तुझ्या अंगणी, या रस्त्याला दुकान नाही
हा शेर फारच सुंदर! शेवटचा शेरही खूप छान आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या शेरांमधली दुसरी ओळ मस्त आहे. त्या मानाने पहिली तितकीशी उठावदार नाही वाटली.
माझ्या मते ७ गुण.
-सतीश

व्वा, फारच सुंदर
फक्त अजान चा अर्थ कळला नाही

८ गुण

वाह... वाह...
सगळीच्या सगळी आवडली....
माझे गुण १०....
(हातचे राखून ठेवून काय करु?)
जो_एस,
अजान म्हणजे मशिदीची बांग..ना?
(लोकहो,बरोबर ना?)

*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

"उदास का तू राजमहाली?" यावर मी ही काय म्हणावे?
अमृतप्याला हाती, जेव्हा पाण्याचीही तहान नाही

नदीकाठच्या शांत दुपारी अनुभवते मी जेथे निर्गुण
मंदिर नाही, मशीद नाही, नसे आरती, अजान नाही

हे दोन शेर आवडले.. ६ गुण..

आशय आणि शब्द छान आहेत.
माझे ७

सुंदर! शेवटचे तीन अगदी आरपार आहेत.
माझे ८
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

निघून गेली तरूण वर्षे आयुष्याशी झुंजण्यामधे
नीरस वाटे दिवस आजचा, वणवा नाही, तुफान नाही

"उदास का तू राजमहाली?" यावर मी ही काय म्हणावे?
अमृतप्याला हाती, जेव्हा पाण्याचीही तहान नाही

जबरदस्त...

माझे ८ गुण.

उदास का तू राजमहाली?" यावर मी ही काय म्हणावे?
अमृतप्याला हाती, जेव्हा पाण्याचीही तहान नाही

सुंदर....माझे ७ गुण

नशीब देऊ केले त्याने, मजला मंजूर दान नाही>>>

अमृतप्याला हाती, जेव्हा पाण्याचीही तहान नाही>>>

होते पैसे म्हणून म्हटले, घेऊ स्वप्ने जाता जाता
रिक्तहस्त मी तुझ्या अंगणी, या रस्त्याला दुकान नाही

सरल्यावरती रंग गुलाबी, कसे निभावे सांगा आता?
ती ही नाही तितकी सोशिक, तो ही तितका महान नाही!

नदीकाठच्या शांत दुपारी अनुभवते मी जेथे निर्गुण
मंदिर नाही, मशीद नाही, नसे आरती, अजान नाही

आशय , शब्द सगळच सुरेख.

९ गुण

मित्रा....... मनापासून अभिनंदन Happy

होते पैसे म्हणून म्हटले, घेऊ स्वप्ने जाता जाता
रिक्तहस्त मी तुझ्या अंगणी, या रस्त्याला दुकान नाही

नदीकाठच्या शांत दुपारी अनुभवते मी जेथे निर्गुण
मंदिर नाही, मशीद नाही, नसे आरती, अजान नाही !

अतिसुंदर !

संघमित्रा,

खूप खूप अभिनंदन!
तुझ्या सहजसुंदर लिखाणाचे आम्ही सर्व आधीपासून चाहते आहोतच.
या गझलेबद्दल तरी काय वेगळे बोलू ? अप्रतिम!
कल्पना, शब्दयोजना व मांडणी सारेच अप्रतिम.

अभिनंदन मित्रा!
_________________________
-A hand that erases past can create a new begining.

व्वा!!

सन्मे,
सगळेच शेर तोडीस तोड.. लाजवाब!!!

अभिनंदन!!!

~~~~~~~~~~~~~~~~~
आलो कुठून कोठे तुडवून पायवाट
काटे सरून गेले उरली फुले मनांत

Pages