सिमला मिरची व काकडीची भाजी (झटपट होणारी)

Submitted by uju on 22 July, 2010 - 04:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बारीक चिरलेली सिमला मिरची (४), बारीक चिरलेली काकडी (३),हिंग, मीठ, तेल

क्रमवार पाककृती: 

पॅनमध्ये तेल तापवून त्यात हिंग परतून त्यात बारीक चिरलेली सिमला व काकडी घालून मीठ घालून पाच ते आठ मिनीट वाफेवर शिजवावी.भाजी लगेच तयार होते.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

फूलक्या सोबत मस्त लागते. कोणाला ओळखताच येत नाही नक्की कशाची आहे भाजी ते .

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

दिनेशदा मैत्रिणीने सांगितली.
अकु,सिंधी रेसिपी नाहीये ग ही.
मी अमि, हो वाफेवर म्हणजे तू म्हणते तशीच, फक्त शिजल्यावर झाकण काढून कोरडी होइस्तोवर परतवून घ्यायची.
फक्त खूप मउ नाही शिजवायची भाजी, आणि हिंग पण थोडा जास्तच घालायचा नेहमीपेक्षा फोडणीला.
मस्तच लागते.

उजु, मी काल केली होती ही भाजी. मस्त झाली होती. गेले दोन-तीन दिवस काही ना काही निमित्तानं खूप तिखट खाल्ले होते. काल ही साधी बिनतिखटाची पण खमंग भाजी खूप आवडली.. Happy

मी पण परवा फक्त काकडीची भाजी केली होती.
तेल, मीठ वगैरे सांभाळून घालावं लागतं.. कारण या भाजीला ते खूप कमी लागतं.