दिवाळी अंक २००८ - घोषणा

Submitted by संपादक on 16 September, 2008 - 17:55

'मायबोली मराठी - गेलं तप, येणारं तप'
हितगुज दिवाळी अंक २००८

सप्रेम नमस्कार सुजनहो,

यंदा आपल्या हितगुज दिवाळी अंकाचं नववं वर्षं. आपली 'मायबोली' यंदा बारा वर्षांची झाली.

ज्ञानोबांनी जिला वळण दिले... श्रेष्ठ संतपरंपरा, जाणते असे राजे, दूरदृष्टीचे समाजसुधारक, निर्भीड तत्त्वज्ञ, अभिजात साहित्यिक, क्रांतीकारक आणि उत्क्रांतीकारक अशा सर्वांनी जिला वळण लावले... ती तुम्ही आम्ही ७०० वर्षे जोपासलेली मायबोली जालावर अवतरली, त्यालाही एक तप झाले. एक तप पूर्ण होणे याला महत्त्व का आहे ? तप म्हणजे केवळ काळाचा एक तुकडा एवढेच नव्हे, तप ही साधना आहे... तपाची गरज भासणे आणि त्यानुसार तयारी करणे ही क्रांती असते आणि त्यानंतर येणारा १२ वर्षांचा काल म्हणजे उत्क्रांती होय. त्यामुळेच जेव्हा एक तप पूर्ण होते तेव्हा होते ते स्थित्यंतर.... आमूलाग्र !

हे स्थित्यंतर होते मनाचे, देहाचे...व्यक्तीचे, समूहाचे.... ७०० वर्षांच्या मायमराठीचे आणि १२ वर्षांच्या मायबोलीचेसुद्धा.

या वर्षी आपण साजरा करत आहोत तो हा स्थितीबदल... जो घडला तो आणि जो येऊ घातला आहे तोही. या दीपावलीच्या शुभप्रसंगी आपण घेऊया एक आढावा - गेल्या एका तपात आपल्या 'मायबोली'मध्ये आणि एकूणच 'जे जे काही मराठी' त्या त्या सर्वांमध्ये झालेल्या बदलांचा... आणि त्याचवेळी डोकावून बघूया आगामी बदलांकडे, आगामी उत्क्रांतीकडे.

मायबोली हे संकेतस्थळ, आपली सगळ्यांची भाषा, देशविदेशात विखुरलेला मराठी समाज यांत झालेल्या व होऊ घातलेल्या बदलांबद्दल तुमचे ललित लेख, कथा, कविता आम्हांला पाठवा.

याशिवाय नेहमीप्रमाणेच कथा, कविता, ललित, हलकेफुलके लेख, प्रवासवर्णन, परिक्षणं, मुलाखती वगैरेबरोबरच बाल साहित्याचंही स्वागत असणार आहे. आणि बालसाहित्य मायबोलीकरांच्या मुलांच्या लेखणीतून उतरलेले असेल तर उत्तमच!

तुमच्या छायाचित्रांचे, कलाकुसरीचे, रेखाटनांचे, इतर कुठल्याही गुणप्रदर्शनाचे देखील स्वागत आहे! दर्जेदार लिखित साहित्याच्या बरोबरीच्या दॄक अन श्राव्य कलाकृती हे आपल्या अंकाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. यंदाच्या अंकात मायबोलीकरांच्या कलागुणांचा आविष्कार दॄक अन श्राव्य माध्यमातून सर्व वाचकांच्या पुढ्यात मांडता येईल.

साहित्य पाठवण्याचा शेवटचा दिवस ऑक्टोबर १५, २००८ राहील. दिवाळी अंकासाठी तुमचे साहित्य या दुव्यावर पाठवा. त्याचबरोबर नियम व सूचनाही प्रकाशित करत आहोत. तरी तुमच्या शंका वा प्रश्न sampadak AT maayboli DOT com या पत्त्यावर जरूर पाठवा!

मग करताय ना सुरुवात? आपल्या दिवाळी अंकात प्रत्येक मायबोलीकराचा सहभाग हवाच!

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्यासंबंधी काही सूचना आणि नियम -

गणेशोत्सवाची सांगता होता-होता आपल्या दिवाळी अंकाची तयारी सुरू झालेलीच आहे. तुम्हीही अंकासाठी साहित्य पाठवायच्या तयारीला नक्कीच लागला असाल. तेव्हा ते कसे, कधी, कोठे पाठवायचे असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. त्यासाठी या काही सूचना आणि नियम.

१. दिवाळी अंकासाठी पाठवायचे साहित्य १५ ऑक्टोबर २००८ पर्यंत संपादक मंडळाकडे पोहोचले पाहिजे.

२. साहित्य सॉफ्ट कॉपीमध्ये आणि देवनागरी लिपीमध्येच पाठवावे. जर काही कारणाने ते देवनागरी लिपीमध्ये पाठवणे शक्य झाले नाही तर ते रोमन लिपीमध्ये असले तरी त्याभोवती dev tag टाकून त्याचे देवनागरीमध्ये सहजगत्या लिप्यंतर होऊ शकेल असे पहावे. नुसते Minglish मध्ये पाठवलेले साहित्य स्वीकारले जाणार नाही. तसेच मायबोलीकर नसलेल्या कोणाकडून विशेष साहित्य आणले असल्यास ते दिवाळी अंकासाठी पाठवणार्‍या मायबोलीकराने त्याचे देवनागरीकरण करून सॉफ्ट कॉपीमध्ये पाठवावे.

३. साहित्य पाठवताना शक्यतो व्याकरणाचें आणि शुद्धलेखनाचें नियमांत बसेल असे पहावे.

४. साहित्य स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे सर्वाधिकार संपादक मंडळ राखून ठेवत आहे. साहित्य नाकारण्याचे कारण किंवा स्पष्टीकरण देण्यास संपादक मंडळ बांधील नाही. याबाबत संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील.

५. आपल्या दिवाळी अंकात याही वर्षी काही साहित्यकृतींसोबत रेखाटने असतीलच. रेखाटन समिती आणि संपादक मंडळ रेखाटनासाठी साहित्य निवडण्याबाबतचा निर्णय घेतील आणि तो अंतिम असेल.

६. अंकासाठी कोणत्या प्रकारचे आणि किती साहित्य पाठवायचे यावर अर्थातच बंधन नाही. परंतु पाठवलेले सर्व साहित्य स्वीकारले जाईलच असे नाही. कृपया पूर्ण लेख / कथा / कादंबरी / कविता एकाच पोस्टमध्ये पाठवावे.

७. आपण जे साहित्य पाठवू इच्छिता त्याचा आकार जर मोठा असेल आणि ते मायबोलीवरुन पाठवणे शक्य होत नसेल तर कृपया संपादक मंडळाशी संपर्क साधा.

८. दिवाळी अंकात आपली मायबोलीवरची ओळख प्रसिद्ध व्हावी की आपले नाव हे तुम्हीच ठरवायचे आहे. साहित्य पाठवताना ते कृपया नमूद करावे. तसेच आपले नाव प्रसिद्ध करायचे असेल तर ते आपल्याला जसे प्रसिद्ध व्हावे असे वाटत असेल तसे कळवावे. उदाहरणार्थ पूर्ण नाव की फक्त नाव की नाव आणि आडनाव.

९. साहित्य मिळाल्याची पोच शक्य होईल तशी पाठवली जाईलच.

मालकीहक्काबद्दल सूचना व खुलासा:

हितगुज दिवाळी अंकाच्या वाढत्या लोकप्रियतेला लक्षात घेता आम्हाला दिवाळी अंकासाठी आपण पाठवत असलेल्या कुठल्याही प्रवेशिकेच्या मालकीहक्काविषयी ( Copyright information ) स्पष्टीकरण आपल्या संरक्षणासाठी देणे महत्त्वाचे वाटते. यासाठीचे नियम खालीलप्रमाणे असतीलः

येणार्‍या प्रत्येक प्रवेशिकेचे पूर्ण मालकीहक्क ती प्रवेशिका पाठवणार्‍या यथायोग्य साहित्यिकाच्या किंवा कलाकाराच्या ताब्यात राहतील. परंतु पाठवण्यात आलेल्या व स्वीकारल्या गेलेल्या प्रत्येक प्रवेशिकेसाठी, तुम्ही मायबोली प्रशासनाला त्या प्रवेशिकेला maayboli.com वर प्रसिद्ध करण्याचा किंवा maayboli.inc ला त्या प्रवेशिकेचा इतर कुठल्याही माध्यमात वापर करण्याचा अमर्याद, कायमस्वरूपी व रद्द न करता येणारा परवाना देत आहात.

याचा अर्थः

* प्रवेशिकेचे पूर्ण मालकीहक्क तुमचे असतील व तुम्ही त्या प्रवेशिका इतरत्र प्रसिद्ध करु अथवा तुमच्या वैयक्तिक आर्थिक नफ्यासाठी विकू शकता.
* परंतु मायबोली प्रशासन ती प्रवेशिका मायबोलीवर अथवा इतर कुठल्याही माध्यमांमधे अनिर्बंध वापरु शकते. (अमर्याद परवाना)
* भविष्यात ती प्रवेशिका मायबोलीवरुन अथवा इतर माध्यमांमधून काढून टाकावी असे तुम्हाला वाटले तरी मायबोली तसे करण्यासाठी बांधिल राहणार नाही. (कायमस्वरुपी परवाना)
* तुम्ही तुमची प्रवेशिका इतर कोणाला विकली, तरी नवीन मालक ती प्रवेशिका मायबोलीवरून काढून टाकण्याविषयी असमर्थ असेल. (रद्द न करता येणारा परवाना)

यासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया संपादक मंडळाशी ईमेलद्वारे संपर्क साधावा. धन्यवाद.

Copyright remains with respective author and artists. But by submitting your work, you are giving unlimited, perpetual and irrevocable license to maayboli to publish on maayboli.com or where ever maayboli.inc wants to use it in any media.

What it means:
* The copyright and ownership remains with author / artist and they can use it however they want such as sell, publish their work etc.
* But they have given the right to maayboli to publish on maayboli or any other media such as PDF, CD etc in future. (unlimited)
* Maayboli is not obligated to remove the work from maayboli or other media if author wants in future. (perpetual)
* If author sells his/her copyright to a new owner, the new owner can not ask maayboli to remove the work from maayboli. (irrevocable)

If you have any further questions related to this, please email the Sampadak Mandal. Thank you.

आपले साहित्याभिलाषी
संपादक मंडळ

पूनम, मी नाही एकत्रीत केलं ते सर्व. इथे खाली एक लिंक देतो आहे त्यावर जाऊन पहा तिथे तुला एकत्रीत केलेलं दिसेल. संपादकांपैकीच कुणीतरी एकत्रीत केलं असेल ते. पण त्या पानावर कुणी जाऊन ते सर्व वाचेल असे वाटत नाही.

http://vishesh.maayboli.com/node/1

बरं, ते तिथून तू इथे आणलंस म्हणून तुझे आभार Happy
मुखपृष्ठावरची आणि प्रत्येक पानावरची लिंक तर वाचतील ना लोक? Happy
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!

माझी कथा मी बराहा मध्ये टाईप केली आहे. ती इथे कशी देता येईल?
तशीच मेल केली तर चालेल का?

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

आशिष, बरहा मधले टेक्स्ट इथे जसेच्यातसे पेस्ट करू शकता. वर जो साहित्यलेखनाचा दुवा उपलब्ध करून दिला आहे, त्यावर जाऊन तुमचे बरहामधले लेखन पेस्ट करा. 'रफार' तेवढे तुम्हाला ठीक करावे लागतील, बाकी सगळे व्यवस्थित दिसते. सर्वात खाली असलेले 'सुपूर्त करण्यायोग्य' बटण सीलेक्ट करून सबमिट करा.
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!

>>लिहून पूर्ण झालं की 'सुपूर्त कर' मात्र<<
एक लेख सुपूर्त केलाय बरंका! तो मिळालाय ना एवढे कळवावे.
(वा नीरजा वा.. वेळेके आतमधेच लेख लिह्या!! तू सॉलिड बॉस है राव!!)
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

पुनम, धन्यवाद!

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

मायबोलिवर पाटलेल्या मजकुराला प्रावस्स्स काय........

अजीत...

>>>>>>>>वर जो साहित्यलेखनाचा दुवा उपलब्ध करून दिला आहे, त्यावर जाऊन तुमचे बरहामधले लेखन पेस्ट करा.
मलाही हाच प्रश्न पडतो पण मुळात बराहा मधले मराठी लेखन सिलेक्ट/कॉपी करायचे कसे ? कृपया या बाबत मदत करु शकाल का ?
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

चाफ्फा.. बरहा मध्ये पहिल्यांदा "Edit -> Convert" केले की तुमचे लिखाण वरच्या भागात देवनागरीत दिसू लागेल. एकदा का ते तिथे आले, की त्याच भागात right click करुन ते लिखाण Copy करता येते. आणि मग तुम्हाला ते इकडे चिकटवता येईल.

बाकी, बरहा डायरेक्ट वापरून तुम्ही Microsoft Word मध्ये थेट मराठीमध्ये टाईप करू शकता. कोणतेही वेगळे फाँट्स् न वापरता. आणि ते लिखाण अगदी सहजी इकडे आणता येते.

अजित घोसळकर,

इथेच वरती साहित्य पाठवण्यासाठी दुवा ( http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1 ), शेवटची तारीख व इतर नियम, सूचना आहेत. याशिवाय काही प्रश्न असल्यास कृपया sampadak AT maayboli Dot com या पत्त्यावर इमेल पाठवा.

दृक कार्यक्रम सादर करण्याबद्दल अधिक माहिती :

संगणकावर फाइल ठेवता येईल अशा कुठल्याही कॅमेर्‍याने चित्रण करता येईल. चित्रण करताना शक्यतो SP मोड ठेवता येईल असे पहावे.

पाककॄतींचे ( वा इतर कलाकुसरीच्या कामाचे ) चित्रण करताना सर्व साधारण दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमाचे तंत्र लक्षात असू द्यावे. सर्व पदार्थ पाहिजे तितक्या प्रमाणात कापून, सोलून, वाटून इत्यादी घेतलेले असावेत. सर्व घटकांची नावे व लागणारे माप नीट सांगितले गेले पाहिजे. स्थल / काल परत्वे काही घटक सहज मिळत नसतील तर त्याऐवजी काय वापरता येईल हे ही सांगावे. उकडण्याची, ओव्हन मधे शिजवण्याची वेळ संपूर्ण दाखवली पाहिजे असे नाही. ओव्हन मधे ठेवण्याचा शॉट अन बाहेर काढण्याचा शॉट दाखवला तर पुरेल. पण किती वेळ, किती तापमान हे सांगायला विसरू नये. पाककृतींबद्दल काही इतर माहिती, त्यामागची प्रेरणा, रितीभाती, एखादी व्यक्तिगत आठवण असे निवेदन सुद्धा करता येईल

इतर कलाकृती सादर करताना त्या कलाकृतीबद्दल तुमचे विचार मांडावेत. म्हणजे ती विशिष्ठ कलाकृतीच सादरीकरणासाठी का निवडली, त्यात तुम्हाला दिसणारी सौंदर्यस्थळे याचे विवेचन कृपया करावे. तिचा काही विशिष्ठ इतिहास, काही रंजक माहिती अशा पूरक गोष्टी शक्यतो सांगाव्यात. जर एखादी कलाकृती सादर करताना असे निवेदन शक्य नसेल तर सुरुवातीला हे निवेदन/विवेचन केले तरी चालेल.

निवेदन शक्यतो मराठीतून असावे . चित्रण सुरू करायच्या अगोदर निवेदनाचा कच्चा मसुदा तरी लिहिलेला असला तर 'अम्म', 'बर्का' वगैरे म्हणावे लागणार नाही.

शूटिंगची रंगीत तालीम करून बघितली तर लागणारा वेळ, कॅमेर्‍याची हालचाल, निवेदनाचा वेग या सर्वांचा अंदाज येईल.

मायबोली कडे हे चित्रण पाठवण्याबाबत लवकरच घोषणा करू.

संपादक, ही 'दिवाळी अंक संभाव्य लेखक' काय कल्पना आहे? खाली संकेतस्थळ देतो आहे ते पहा:

http://www.maayboli.com/node/3613

सर्व लेखकांना एक आठवण करायची आहे, लेखन पूर्ण झाल्यावर कृपया 'सुपूर्त करण्यायोग्य' हे बटण क्लिक करा, नाहीतर लेख पूर्ण होऊनही त्याची स्थिती 'अपूर्ण' रहात आहे, आणि त्याचा समावेश अंकात करता येत नाहीये.

ज्यांचे लेखन अपूर्ण आहे, त्यांनी लवकर लवकर ते पूर्ण करून 'सुपूर्त' करून टाका Happy
-------------------------------
जलो, मगर दीप जैसे!

संपादक,
मी एक मेल पाठवली आहे. जरा बघणार का?

मायबोलीचा दिवाळी अंक प्रिंट माध्यमात असतो का???जर नाही तर तो प्रिंट का करत नाही???
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

संपादक मंडळ, मी तुम्हाला मेल केली आहे. प्लीज चेक कराल का?

संपादक, मेल ला रिप्लाय केला आहे.. एकदा तो परत आला... पोच देणार का?

सम्पादक,
मी दिवाळी अंकासाठी कांही साहित्य पाठविले आहे. आपणांस ते मिळाल्याची पोहोच्पण आली आहे. मात्र आता ते "तुमचे लिखाण" मधे दिसत नाही. कवितांच्या प्रती माझ्याकडे आहेत पण काल पाठविलेला लेख हा थेट मायबोलीवरच टाईप केलेला होता ज्याची माझ्याकडे प्रत नाही. ती मला माझ्या ईमेल आय डी वर उपलब्ध करून देता येईल का ?
................अज्ञात

अज्जुका
नेमके काय बदल करायचे आहेत यासंदर्भात संपादकांना इमेल पाठवा. काय बदल करायचे आहेत त्यानुसार पुढची सूचना देउ.
धन्यवाद

चिन्या१९८५

दिवाळी अंक प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवसांनी अंकाची एक पीडीएफ आवृत्ती काढली जाते.

गेली काही वर्षे मायबोली दिवाळी अंकात श्राव्य माध्यमातल्या कलाकॄती सादर होत आहेत. यंदा काही दृकश्राव्य माध्यमातील कलाकृती पण असतील. हे सारं कसं छापता येइल ? लेखी साहित्याची पी डी एफ यंदा पण प्रकाशित होइलच. ती ऑफ लाइन वाचता येईल.

संपादक मंडळ, तुमची ईमेल मिळाली. धन्यवाद.
मी तुम्हाला अजून एक ईमेल केलीय. प्लीज चेक कराल का?

सम्पदक
मी विनायक पाचलग
महरश्त्रत रहनारा व ११वीत शिकनारा एक लेखक आहे माझे लेख मि आपणाला देवु इछितो मझ्यकदे मराठी फोन्त्ल प्रोब्लेम येत आहे मझे सर्व लेख मझ्यकदे स्चन करुन थेवलेले आहेत मी ते तुम्हाला पथवले तर चल्तील का चालत असल्यास कोथे पथवु
माझा मैल आय दी देवु का

विनायक.

साहित्य पाठवण्याचा शेवटचा दिवस ऑक्टोबर १५, २००८ आहे. स्कॅन केलेला लेख sampadak AT maayboli DOT com या पत्त्यावर पाठवा!

संपादक्,लेख पाठवला आहे तो मिळाला का???
दिवाळी अंक छापल्यास जे इंटरनेटवर येत नाहीत त्यांनाही तो वाचता येईल. पिडीएफ प्रिंट करुन कोण वाचणार??द्रुकश्राव्य छापता येणार नाही म्हणुन काय झाले??
बाकी मी सहज एक आयडीया दिली.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

संपादक, मी ललित लेख पाठवला आहे. तुम्हाला काम खूप असल्याने तुम्ही पोच दिलीच पाहिजे अशी अपेक्षा नाही. पण तुम्हाला मिळाल्याचे कसे कळेल?

मायबोली दिवाळी अंकासाठी कविता पाठवली आहे. कृपया पोच देणार का?

नाना_नेने, सुपरमॉम,
आपल्या साहित्याची मायबोलीवरुन इमेल ने पोच दिली आहे.

सायुरी,
तुमचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत का?

अज्ञात,
तो लेख तुम्हांला इमेल मधे पाठवता येईल. चालेल का?

संपादक,
त्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती, तसं तुम्हाला नंतरच्या मेलमधून कळवलंही होतं. त्याच मेलमध्ये अजून एक विनंती होती. असो. मी तुम्हाला लेख सुपूर्त केला आहे. धन्यवाद.

Pages