आदिपथ फाउण्डेशन आणि रिसर्च सेंटर

Submitted by मुग्धानंद on 24 July, 2010 - 05:58

आदिपथ फाउण्डेशन आणि रिसर्च सेंटर ही एक अशि सेवाभावी संस्था आहे जी स्त्रिया आणि मुले यांच्या वर होणाय्रा घरगुति हिंसाचाराच्या विरोधात काम करते. तसेच या वर्गाच्या समुपदेशनाचे काम करते. स्त्रिया आणि मुले यांच्या साठि सुरक्षीत आणि मुल्याधारित समाजाची निर्मीती हे आमचे प्रमुख उद्दीष्ट आहे. त्या साठी आम्ही दु. १२ ते सा. ६ अशी एक फोन लाईन चालु (Warm Line) सुरु केलेली आहे.
कोणतेही चांगले काम सुरु करण्यासाठी समाजाच्या मदतीची अतिशय गरज असते.
आम्हाला पहिले प्रोत्साहन दिले, "क्लब नोस्टाल्जिया" यांनी. क्लब नोस्टाल्जिया हे सामाजिक कार्याला स्फुर्ती म्हणुन निधी संकलनासाठी संगीत रजनीचे आयोजन करीत असतात.
याचाच एक भाग म्हणुन क्लब नोस्टाल्जिया ने स्व. मोहम्मद रफी यांच्या ३० व्या स्म्रुतीदिनाचे औचित्य साधुन, दि. १३ ऑगस्ट, २०१० रोजी एका संगीत रजनीचे आयोजन आदिपथ फाउण्डेशन आणि रिसर्च सेंटर च्या मदतीसाठी केले आहे. हा कार्यक्रम यशवंत नाट्य मंदीर, माटुंगा (प.) येथे सा. ८ वा. होणार आहे.
या प्रयत्नात आपण मा. बो. करांनिही आपला खारीचा वाटा उचलावा.
१. तुम्हि हा कार्यक्रम पुरस्क्रुत करु शकता, आपल्या उद्योगाची वा, आस्थापनेचि जाहीरात कार्यक्रमाच्या ठिकाणी होइल
२. आपण या कार्यक्रमाचे टिकीट घेवु शकता.
या बद्दल आधिक माहिती साठी aadipath@gmail.com, neelimakanetkar@gmail.com, bpitke@yahoo.com या वर संपर्क करु शकता अथवा माझि वि.पु. मधे विचारा.
आदिपथ फाउण्डेशन आणि रिसर्च सेंटर आधिक माहिती येथे मिळवा.draft scheme help line-new.doc (63 KB)
New Microsoft Office Word 97 - 2003 Document.doc (27.5 KB)

Group content visibility: 
Public - accessible to all site users