गडद निळे गडद निळे यंदाचे टीशर्ट आले
चपलचरण हे हरीण जणू,सुखवस्तू अन् तुंदिलतनू
लेऊनी रंग हर्षाचे,मायबोलीकर हे वविला निघाले
ह्रदयी आले भरते गं, मनात सावरी फुलते गं
बरसती अंबर, सृष्टी सुंदर, लेवूनी स्वरसाज गाती गं
उत्साहाचे लेणे गं, अविरत आनंद झिरपे गं
सरींवर सरी येती गं, सचैल मायबोलीकर न्हाती गं......
(कवी बा. भ. बोरकर ह्यांची क्षमा मागून...)
जून महिना आला, पाऊस आला, वविची दवंडी आली आणि पाठोपाठ मायबोलीचे टीशर्टही आले की...
टीशर्टचा रंग आपल्या सर्वांनाच आवडणारा 'गडद निळा'... आहे की नाही छान?
वर चित्रात दर्शवल्याप्रमाणे यंदाचे टीशर्टस् राऊण्ड नेक परंतू लेडिज आणि युनिसेक्स अश्या दोन प्रकारात पुढील साईजेसमध्ये उपलब्ध आहेतः-
-- Extra Small (XS)
-- Small (S)
-- Medium (M)
-- Large (L)
-- Extra Large
-- Extra Extra Large
टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-
साईज-------रुंदी(2 L)-------उंची(H)
XXL-------46"-------33"
XL -------44"-------31.5"
L -------42"-------30"
M -------40"-------28.5"
S -------38"-------27"
XS -------36"-------25.5"
XXS-------34"-------24"
लेडीज आणि युनिसेक्स दोन्ही प्रकारच्या टीशर्टसाठी ही मापे आहेत.
टीशर्टच्या उजव्या बाहीवर आपल्या मायबोलीचा लोगो आणि टीशर्टच्या पाठीवर URL Address : www.maayboli.com असेल.
यंदा मायबोलीच्या टीशर्टची संकल्पना आणि सुलेखन केले आहे सिद्धहस्त चित्रकार मायबोलीकर पल्ली हीने.... तिच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला विसरू नका
टीशर्टची किंमत आहे : रूपये १६०/- + रूपये ५०/-(देणगी) = एकूण रूपये २१०/-फक्त
मायबोली टीशर्ट उपक्रमातून उभी होणारी देणगीची रक्कम आपण ह्यावर्षी 'एकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यास' ह्या संस्थेला देणार आहोत. ही संस्था २००२ सालापासून पुण्यात कार्यरत आहे. वेश्यांच्या, मद्याधीन, एड्सग्रस्त पालक आणि एकटे पालकत्वाची शिकार असलेल्या समाजातील दुर्लक्षित अश्या मुलांसाठी ही संस्था काम करते. ह्यातील बहुतेक मुले ही दारीद्र्य रेषेखालील गटात मोडतात. ह्या मुलांचे 'उत्तम भविष्य घडवणे' ह्या ध्येयाने प्रेरीत झालेल्या एकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यासाला मदत करण्यासाठी जास्तीत जास्त टिशर्ट्स घ्या असे टिशर्ट समिती आपणां सर्वांना आवाहन करीत आहे. ह्या संस्थेची अधिक माहिती आपल्याला इथे मिळेल http://www.ekalavyapune.org येथे मिळेल.
मग चला तर, आपली ऑर्डर tshirt@maayboli.com ह्या पत्त्यावर खालील स्वरूपात धाडा पाहू
१. नाव (अनिवार्य)
२. मायबोली id (अनिवार्य)
३. पत्ता आणि भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमांक (अनिवार्य)
४. टी- शर्ट चा प्रकार - लेडिज्/जेण्ट्स/किड्स (अनिवार्य)
५. टी- शर्ट चा साईझ (अनिवार्य)
६. टी- शर्टची संख्या (अनिवार्य)
७. पैसे कुठे भरणार - पुणे/मुंबई
मेलच्या subject मध्ये Maayboli T-shirt order असे लिहावे.
आपण पाठवलेल्या मेलची पोचपावती देण्यात येईल.
आपली ऑर्डर दिनांक २६ जून २०१० पर्यंत नोंदवावी. त्या नंतर कुठलीही ऑर्डर स्विकारली जाणार नाही.
टीशर्टचे पैसे भरण्यासाठी दिनांक २७ जून २०१० रोजी आपण पुणे व मुंबई ह्या दोन्ही ठिकाणी मेळावा आयोजित करणार आहोत.
पुणेकर मायबोलीकरांसाठी:
स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील वटवृक्षाखाली
वेळ: सं. ५.३० ते ८.००
मुंबईकर मायबोलीकरांसाठी:
स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात
वेळ: सं. ५.३० ते ८.००
दिनांक २७ जून २०१० पर्यंत ज्यांचे पैसे जमा होतील त्यांचीच ऑर्डर नक्की करण्यात येइल ह्याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी.
ह्यादिवशी आपल्याला प्रत्यक्ष हजर राहून पैसे भरणे शक्य नसल्यास किंवा टिशर्टसंदर्भात इतर काही शंका असल्यास आमच्या संयोजकांशी संपर्क साधावा, ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील.
विनय भिडे (मुंबई) - ९८२०२८४९६६
आनंदसुजू (मुंबई) - ९८२०००९८२२
परेश लिमये (पुणे) - ९८९०४३०१२३
टीशर्ट वाटप होईल दिनांक ११ जुलै २०१० रोजी पुढील ठिकाणी, ह्या दिवशी आपण वर्षविहार २०१० ची वर्गणी गोळा करण्यासाठी भेटणार आहोतच.
पुणे:
स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील वटवृक्षाखाली
वेळ: सं. ५.३० ते ८.००
मुंबई:
स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात
वेळ: सं. ५.३० ते ८.००
टीशर्ट वाटपाच्या दिवशी जे मायबोलीकर हजर राहू शकणार नाहीत ते वर्षाविहाराच्या दिवशी टीशर्ट घेऊ शकतील. जे मायबोलीकर टीशर्ट वाटपाच्या दिवशी अथवा वर्षाविहाराच्या दिवशीही आपले टीशर्ट घेऊ शकणार नाहीत त्यांनी संयोजकांशी संपर्क साधून टीशर्ट घेण्याची व्यवस्था करावी.
मुंबई - पुण्याबाहेर तसेच भारताबाहेर राहणारे मायबोलीकर मुंबई - पुण्यातील मायबोलीकर मित्रमंडळी अथवा नातेवाईकांमार्फत टीशर्टचे पैसे भरू शकतात तसेच टीशर्ट घेऊही शकतात. मात्र ऑर्डर नोंदवताना त्यांनी कोणामार्फत पैसे भरणार व टीशर्ट घेणार तसेच त्या मायबोलीकराचे/ नातेवाईकाचे पूर्ण नाव व भ्रमणध्वनी क्रमांक देणे अनिवार्य आहे.
तेव्हा, दरवर्षीप्रमाणे यंदाही मायबोली टीशर्ट उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्या.... आपली ऑर्डर त्वरीत नोंदवा.
टीशर्टांची ऑर्डर नोंदणी दिनांक २८ जून २०१० रोजी बंद करण्यात आली आहे. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
टीशर्ट उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
आज शेवटचा दिवस आहे नोंदणी
आज शेवटचा दिवस आहे नोंदणी करण्याचा, ज्यांनी अजुन ऑर्डर केली नसेल त्यांनी लवकर ऑर्डर करा. आणि १८ जुलैला "काकांच्या स्वयंपाकघरात" (अहो तेच ते Uncle's Kitchen) येताना तेच घालुन या
एक शर्टची ऑर्डर पाठिवली आहे.
एक शर्टची ऑर्डर पाठिवली आहे.
मामी, शर्ट नाहीये.......
मामी, शर्ट नाहीये....... टीशर्ट आहे.
मंजूडी.. टि चा कप हातात न
मंजूडी.. टि चा कप हातात न घेताच.. इथे पोस्टी टाकली वाटते मामींनी ! म्हणून टी राहीला.
पोहचल्याची पावती द्या...
पोहचल्याची पावती द्या...
टी शर्ट समिती ऑर्डर दिली आहे.
टी शर्ट समिती ऑर्डर दिली आहे. धन्यवाद.
माझं शिपात येणं अचानक काही
माझं शिपात येणं अचानक काही unavoidable reasons मुळे cancel करावं लागतंय. पण टिशर्ट हवाय नक्की. निंबुडा आत्ताच बोललीये मेधाशी (मेधा चक्रदेव). माझ्या वतीने माझे २१० रु. मेधा भरणारे. चालेल ना?
मला ही टीशर्ट हव्येत ऑर्डर
मला ही टीशर्ट हव्येत ऑर्डर दिलेली आहे
काल काही कारणास्तव प्रत्यक्ष
काल काही कारणास्तव प्रत्यक्ष येणे न जमल्याने पैसे भरता आले नाहीत.
आज पुणे येथे कुठे आणि कोणाकडे पैसे जमा करण्याची सोय असल्यास आणि तसे चालत असल्यास कळवावे.
टी-शर्ट ची नोंदणी रद्द करू नये ही विनंती.
टीशर्टांची ऑर्डर नोंदणी
टीशर्टांची ऑर्डर नोंदणी दिनांक २८ जून २०१० रोजी बंद करण्यात आली आहे. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
टीशर्ट उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
डिजाईन मस्तच! पण मुलींसाठी
डिजाईन मस्तच!
पण मुलींसाठी ब्वाईश निळा रंग का? पिंक सारखा गर्लिश का नाही?
(उगीच एक पिंक)
बालटी चे माप कसे कळावे? वयानुसार माप दिले तर बरे होईल!
अहो आज ९ जुलै आहे. आनि मि
अहो आज ९ जुलै आहे.
आनि मि औरन्गाबाद ला रहतो उपाय सान्गा................???
मी तुमच्या (आपल्या ) वेब साईट साटी औरन्गाबाद मधे काहि करु शकेल तर नक्की कळवा.
टीशर्ट समिती, अटलांटा ग्रुपचे
टीशर्ट समिती,
अटलांटा ग्रुपचे टीशर्ट इथे पोचले. टीशर्ट छान आहेत. रंग फोटोत दिसतो त्यापेक्षा थोडासा वेगळा वाटला.. पण मला तसाच हवा होता.
वेळेत टीशर्ट पोचवण्यासाठी सगळं कोऑर्डीनेट केल्याबद्दल मंजू, हिम्या तसेच समितीतल्या सर्वच सदस्यांचे आभार..
mast shirts ahet...
mast shirts ahet...
मि खुपच उशिर केला, लेट फी
मि खुपच उशिर केला, लेट फी भरउन मिळू शकतो का?
टी शर्ट अजुन उपलब्ध आहेत का?
टी शर्ट अजुन उपलब्ध आहेत का? L साईझमध्ये एखादा? वविच्या फोटोत पाहुन इथे शोधत आलो..
मागणी असल्यास अजुन एक बॅच काढा रे
हिम्स.. यावर्षीपण तुझाच हात होता का?..
मागणी आहे अजुन......! मी पण!
मागणी आहे अजुन......! मी पण!
मागणी आहे अजुन......! मी पण!
मागणी आहे अजुन......! मी पण!
४४ चा जेन्टस टीशर्ट एक्स्ट्रॉ
४४ चा जेन्टस टीशर्ट एक्स्ट्रॉ आहे माझ्याकडे कोणाला हवा असेल तर.
एकदा धुऊन देणार का? ... मला
एकदा धुऊन देणार का?
... मला ४२ चा हवाय...
धुवायचा कशाला. मी चार घेतलेत
धुवायचा कशाला. मी चार घेतलेत त्यात एक ४४ चा आहे जो कोराच आहे , प्लास्टिकच्या पिशवीत पॅक केलेला तस्साच्या तसाच. कारण ४२ च्या ऐवजी चुकुन ४४ ची ऑर्डर दिली गेली माझ्याकडुन
कोणाला हवा असेल तर सांगा पण धुवुन बिवुन मिळणार नाय ज्याचा त्यानी धुवुन घ्या.
पुढच्या वर्षी घेईन.
पुढच्या वर्षी घेईन.
धष्टपुष्ट होऊन येईन चांगला
>>४२ च्या ऐवजी चुकुन ४४
बॅड लक पण घेईल कोणीतरी बिल्डर माणुस.
ए कोणी आहे का माई का ४४ लाल ?
टीशर्ट आता पुढच्या वर्षी..
टीशर्ट आता पुढच्या वर्षी.. नविन डिझाईन आणि नविन रंगात
44 धुवून 44 च राहणार, 42 किंवा 46 होणार नाही.
टीशर्ट्समिती, बालसदरा लै भारी
टीशर्ट्समिती, बालसदरा लै भारी आहे बर्का. आमचे बाल एकदम खूश झाले . धन्यवाद.
Pages