केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लांबी तेवढीच ठेऊन काहीतरी करता येईल का ते पाहते.. कोणाला काही आयडीया असल्यास सांगा..
>>
बहुतेक लेयर्स छान वाटेल तुझ्या केसांना. माझी पार्लरवाली केस तेव्हढेच ठेऊन मस्त लेयर कट मारुन देते.

माझे केस तेल न लावता ऑइली होतात अगदी लहानपणापासुनच.
मी जर आज केस धुतले तर आज छान राहतात पण उद्याला लगेच चप्पु होउन जातात. त्यामुळे मला एक दिवसा आड केस धुवायला लागतात. काही उपाय आहे का ?

लिंबु किंवा मुलतानी माती लाउन धुवत जा, तेल थोडे कमी होईल.

बाकी उपाय काही असेल असे वाटत नाही, जशी तेलकट त्वचा असते तसेच काहींचे केसही तेलकट असतात.. देवाची देणगी, गुपचुप सहन करायचे Happy

योगमहे, तुझी पार्लरवाली कुठे आहे?? माझा पार्लरवालीचा अनुभव चांगला नाहीये. इंचभर कापायला गेले तर फुटभर कापलेले एकदा. तेव्हापासुन घरीच कापते इंचभर.. Happy

मनिषा
मी पण डव्हच वापरत होते. पण नीधप म्हणाली की सुरवातीला चांगले होतात केस आणि नंतर वाट लागते. आणि बर्‍याच जणींचा तोच अनुभव आहे. तर मी घाबरून बंद केला. सध्या हिमालयाचा वापरते. पण केस गळतातच.

मी ब-याच आधी पँटिन वापरायचे, पण त्याचा दर्जा खालावला. मग लोरिये नोर्मल हेअर वापरायला लागले. मला सुट होतो तो. मुलीने जबरदस्तीने मला सनसिल्क ब्लॅक घ्यायला लावला. दोनदा केस धुतले त्याने. तोही चांगला वाटला.

आयुर्वेदिक शांपु वापरले तर त्याने केसांचे तेल जात नाही आणि तेल पुर्ण जाऊन केसांचा हातांना कुरकुरीत फिल आला नाही तर मला केस धुतल्यासारखे वाटत नाही. हिमालयाचा आणलेला, चांगलाय पण त्याने केस भुरभुरीत होतात. लोरिये सारखी चमक येत नाही केसांना. लोरिये/सन्सिल्कने केस सॉफ्ट आणि चमकदार होतात..

मी वापरलेले आणि चांगले रिझल्ट दिलेले हे:
1. Matrix Biolage: Hydrating / Matrix Biolage: Fortifying
2. Ultra Doux: Wheatgerm / Ultra Doux: Walnut Oil n Peach Leaf (बाकीचे ब्रँड वापरायला लागण्याआधी जवळपास दहाएक वर्षं हा ब्रँड मी बदलला नव्हता. मस्त राहिले केस याने.)
3. L'oreal Absolute Repair

हिमालयाने तेल निघते का>> नाही फेस निघतो Light 1 सॉरी सॉरी.
मी वापरायचे हिमालया अ‍ॅंटी डँड्रफ. त्याने निघायचे तेल. कोणी रामदेव बाबांचा दिव्य केशकांती का असच नाव असलेला शँपु वापरलाय का? मला चांगला वाटतो तो.

कुठला रामदेव बाबांचा का? मला सध्या केस गळायचा त्रास नव्हता.त्यामुळे कळले नाही. पण केसांचा पोत सुधारला असे वाटले. तेल पण निघते. मी तो शँपु वापरते आणि त्यानंतर कंडिशनर म्हणुन जास्वंद जेल.

हसरी,माझ्या आईने कदाचित तो बोरीवलीत भगवती हॉस्पिटलच्या समोर रामदेवबाबाच्या उत्पादनांचं दुकान आहे तिथुन आणला आहे.

योगमहे, तुझी पार्लरवाली कुठे आहे??
>>
भांडुपला गं..

डव्हने केस धुतले की पहिल्या दिवशी छान वाटतात अगदी सॉफ्ट सॉफ्ट. दुसर्‍या दिवशी नुसते भुरभुरीत...

dove baddal kya mat ahe ?
m sadhya tari toch vaparte . Maze kurale kes ahet . ani ikade US madhe konta dusra brand vaparala nahi .
(Maaf kara marathi neet lihita yet nahi mala ajun . Praytnya chalu ahe marathi lihinyacha)

हेम, ट्राय करून बघ... Wink

साधना, मनिषा, मानुषी मी पण डवच वापरते... माझे केस, कुठलाही शाम्पू लावला तरी गळतात...:( कोणी म्हणालं सारखे सारखे शाम्पू बदलल्यानेपण गळतात केस.. म्हणून डव्ह वापरते... इतरांपेक्षा सॉफ्ट वाटला म्हणून...

नक्की कुठ्ला शाम्पू वापरू कळत नाहीय... Sad

साधना, मी गेली ३ वर्षं लाझुरवाल्यांचाच प्लमेज (विथ कंडीशनर), डॅन्-ओ-पॉझ (अँटी डँड्रफ) वापरते. आईसाठी चारुता किंवा स्पॅरिनो (मेथीचा) वापरते. मोठाल्या बाटल्याच घेऊन ठेवल्यात. अज्जिबात हार्श नाहीत आणि केस गळणं तर जवळ जवळ नाहीच.

आश्विनी माझे केस लांब आहेत कमरेच्या खाली केसात कोंडा नाही पण गळण्याचा त्रास आहे.
मि कधीच कंडिशनर कधीच वापरले नाही तु सांगितलेल्या लाझुरवाल्यांचा प्लमेज चांगला आहे ना? आणि किंमत काय?
केस आठवड्यातुन किती वेळा धुणे आवश्क आहे. माझे केस लांब असल्याने धुवायला आणि सुकायला खुप वेळ लागतो.

प्लमेजला फेस भरपूर येत नाही हा स्वानुभव.. Sad
त्यामुळे तो केसांवर व्यवस्थित पसरत नाही. परीणामी केसातलं तेल पूर्ण निघत नाही. तेल निघण्यासाठी शॅम्पू जास्त वापरला तर केस भरभरीत होऊन जातात. Sad

मला कोणीतरी बाटली दिली होती. कसाबसा तो संपवला. आणि आता त्यात मध भरून ठेवला आहे. Happy

प्लमेजला फेस भरपूर येत नाही हा स्वानुभव..
त्यामुळे तो केसांवर व्यवस्थित पसरत नाही. परीणामी केसातलं तेल पूर्ण निघत नाही. तेल निघण्यासाठी शॅम्पू जास्त वापरला तर केस भरभरीत होऊन जातात.

सेम पिंच...

अश्विनी, मीही प्लमेज आणलाय. एकदाच वापरला, पण तेल काही निघाले नाही, शिवाय केसही भरभरीत झाले.

केस आठवड्यातुन किती वेळा धुणे आवश्क आहे
मुंबईत रोज स्कुटर/बसचा प्रवास असेल तर केस दोन दिवसाआड धुणे आवश्यक होते. धुळीने केस अगदी जाड होतात, हात लावायलाही जिवावर येते. घरातुन बाहेर पडताना केसांना कायम स्कार्फ बांधुन ठेवला तर केस जास्त खराब होत नाहीत हा स्वानुभव. मी दर तिस-या दिवशी केस धुते...

Pages