प्रवेशिका - २ ( ashwini_k - उरीचे मुके बोल ओठात नाही )

Submitted by kaaryashaaLaa on 29 September, 2008 - 01:25

मित्रहो,
ठरल्याप्रमाणे कार्यशाळेत निर्दोष ठरलेल्या प्रवेशिका तुमच्यासमोर सादर करत आहे.
तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहेच, पण आणखी एक जबाबदारीही आहे तुमच्यावर.
प्रत्येक गझलला तुम्ही १० पैकी गुण द्यायचे आहेत.
हे गुणांकन तुमच्या अभिप्रायातच नोंदवायला हरकत नाही.
तर सादर आहे आजची प्रवेशिका....

उरीचे मुके बोल ओठात नाही
जसा नाद या एकतार्‍यात नाही

जरी छेडले स्पंद होती तराणे
तरी मोर पाऊल तालात नाही

बहाणे हजारो जगाया करावे
अशी मानसी तेवती वात नाही

मऊशार केसांत गुंतून जावे
खुळ्या मोगर्‍याच्या अवाक्यात नाही

अवेळी धुमार्‍यांस जाळे निखारा
विझावे असा थेंब डोळ्यात नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या गुटगटीतने मोर पाऊल चा इतका छान सरळ सोपा अर्था सांगितला तरी इथे १० जण मोर पाऊल आवडलं नाही म्हणत आहे. कळल नाही म्हणून आवडल नसेल तर फक्त कळलं नाही म्हणावं. आवडलं नाही असे म्हंटले तर तुम्हाला गझलीची ती ओळ समजली नाही हे खरे.

मोगरा, बहाणे आवडलं.

५ गुण.

शेवटचा शेर छान आहे. बाकी ठिकाणी सहजतेचा अभाव आहे.

माझे गुणः २

मोर पाऊल तालात नाही...... सोपे आहे की समजायला.. बहुतेक दिल मांगे मोर ऐकून ऐकून मराठीत सुद्धा मोर आहे हे विसरले असतील सर्वजण..

Happy

७ गुण

Pages