किल्ले माहुलीच्या जवळच वसलेले हे जैन धर्मियांचे भगवान पार्श्वनाथ यांचे मंदिर आसनगाव रेल्वे स्थानकापासुन ६ किमी अंतरावर आहे (आसनगाव ते मानस मंदिरला जाण्यासाठे स्थानकाबाहेर रिक्षा उपलब्ध असतात). मुंबई-नाशिक हायवेवर शहापुरच्या अलिकडेच असलेला एक रस्ता आपल्याला या मंदिरापर्यंत नेतो. हाच रस्ता पुढे किल्ले माहुलीला जातो. हिरव्यागार पार्श्वभुमीवर सफेद रंगाचे हे जैन मंदिर मनाला निश्चितच भुरळ घालते. एका छोट्याशा टेकडीवर हे मंदिर वसले आहे. येथे छोटी छोटी अनेक मंदिरे पाहताना जणु काहि आपण देवळांच्या गावातच फिरतोय असा भास होतो. पांढर्या दगडावरचे कोरीवकाम बघण्यासारखे आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातुन एक दिवस मोकळा ठेऊन या मंदिराच्या प्रांगणात येऊन शांततेचा अनुभव नक्कीच घ्या.
अशीच हिरवीगारं पार्श्वभुमी असलेले सुंदर मंदिर लोणावळा - पौड मार्गावर दुधिवरे येथे (श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर) आणि कोळवण जवळ हाडशी येथे (साई मंदिर) आहे.
==================================================
==================================================
प्रचि १











































२,६,८,१७,२०,२२,२५,२८,३५,४०,४३
२,६,८,१७,२०,२२,२५,२८,३५,४०,४३ मस्त !
काही फोटो जरा तिरके वाटले, त्यांना सरळ केल तर जास्ती मजा येईल असे वाटते. ( ५, ६ )
९ मधली डावीकडची वायर गायब करता आली तर मजा येईल, फोशॉ मध्ये जमते ते माहिती असेल्च, नसेल तर मला विपूत लिही.
११ मस्तच, पण नक्की काय आहे ते? म्हणजे त्या दगडाचे काही वैशिष्ट्य ?
२५ चे पर्सपेक्टिव्ह काय आलेय!
२८ आणि ४३ ही सही.
पहिला फोटो पाहिला, त्यातली पताका पाहिली अन आमच्या आधीच्या घरातला किस्सा आठवला. आम्ही आधी राहत होतो तिथे जैन मंदिर नुकतेच झाले होते, अन त्याच्या उदघाटनाचा ( दुसरा शब्द आठवत नाहीये ) सोहळा चालू होता. त्यात ही पताका लावण्याचा मान मिळावा म्हणून कितीची बोली लागली असेल असं वाटतय ? चक्क सोळा लाख ! हो १६,००,००० रुपये !
नेहमी प्रमाणेच कडक फोटो..
नेहमी प्रमाणेच कडक फोटो..
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद!!!!
@वैभव
सर्वात आवडला तो तुझा फोटो...... (प्रचि ११ वाला ) अतिसुंदर>>>>:हाहा:
@माधव
फोटो मस्तच आहेत पण 'जग्गू' टच नाहीये कुठे - म्हणजे वेगळा अँगल, वेगळी मांडणी नाही दिसली>>> पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवीन
@सॅम
पण फोटोंची संख्या जरा जास्तच आहे>>>>>>सॅम, अरे ते मंदिर वेगवेगळ्या कोनातुन दाखवण्याच्या प्रयत्नामुळे फोटोंची संख्या वाढली.
@आरती
११ मस्तच, पण नक्की काय आहे ते? म्हणजे त्या दगडाचे काही वैशिष्ट्य ?>>>>नक्की मलापण माहित नाहि
२५ चे पर्सपेक्टिव्ह काय आलेय! >>>>मुख्य मंदिरात जाण्याचा तो तो एक मार्ग आहे.
चक्क सोळा लाख ! हो १६,००,००० रुपये ! >>>>अरे बापरे!!!!
सुंदर फोटो ,सुंदर मंदिर
सुंदर फोटो ,सुंदर मंदिर
सुंदर फोटो ,सुंदर मंदिर
सुंदर फोटो ,सुंदर मंदिर
आहाहा, सुरेख. ती महावीरांची
आहाहा, सुरेख.
ती महावीरांची मुर्ती तर अप्रतिम.
मलापण परिसर बघुन साळावचं बिर्लामंदिर आठवलं.
Pages