देवळांच्या देशा - "मानस मंदिर"

Submitted by जिप्सी on 9 July, 2010 - 00:15

किल्ले माहुलीच्या जवळच वसलेले हे जैन धर्मियांचे भगवान पार्श्वनाथ यांचे मंदिर आसनगाव रेल्वे स्थानकापासुन ६ किमी अंतरावर आहे (आसनगाव ते मानस मंदिरला जाण्यासाठे स्थानकाबाहेर रिक्षा उपलब्ध असतात). मुंबई-नाशिक हायवेवर शहापुरच्या अलिकडेच असलेला एक रस्ता आपल्याला या मंदिरापर्यंत नेतो. हाच रस्ता पुढे किल्ले माहुलीला जातो. हिरव्यागार पार्श्वभुमीवर सफेद रंगाचे हे जैन मंदिर मनाला निश्चितच भुरळ घालते. एका छोट्याशा टेकडीवर हे मंदिर वसले आहे. येथे छोटी छोटी अनेक मंदिरे पाहताना जणु काहि आपण देवळांच्या गावातच फिरतोय असा भास होतो. पांढर्‍या दगडावरचे कोरीवकाम बघण्यासारखे आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातुन एक दिवस मोकळा ठेऊन या मंदिराच्या प्रांगणात येऊन शांततेचा अनुभव नक्कीच घ्या.
अशीच हिरवीगारं पार्श्वभुमी असलेले सुंदर मंदिर लोणावळा - पौड मार्गावर दुधिवरे येथे (श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर) आणि कोळवण जवळ हाडशी येथे (साई मंदिर) आहे.

==================================================
==================================================
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३

प्रचि ४४

गुलमोहर: 

योग्या, देवदूताचं काम चोख बजावतो आहेस. Happy योगेश बाबामहाराज सातारकरांनी बांधलेल्या प्रतिपंढरपूर मंदिराचे फोटो पण लवकरात लवकर टाक.

सुंदर मंदिर आहे हे. मला माहिती नव्हती याची. (किती बघायचे राहिलेय !!)
पूर्वी शहाडचे मंदिर तेवढे माहीत होते, पण ते टिपिकल बिर्ला मंदिर असल्याने, आता तिथला वावर कमी झालाय, असे वाटते.

योगेश एकदम छान फोटो.
माहूलिच्या किल्ल्यावर गेलो होतो तेव्हा ह्या मंदिरचा उल्लेख तिथल्या गावकर्‍यानी केला होता. तेव्हा मंदिराचे बांधकाम चालू आहे असेही त्यांनी सांगितले होते. उन्हाच्या प्रचंड तापामुळे तिथे गेलो नाही.
तुझ्यामुळे आता ते प्रत्यक्ष पहायला मिळाले.
धन्यवाद...

धन्यवाद!!!!
उंचावर आहे का हे मंदिर?>>> अंजली, जास्त उंचावर नाही आहे. थोड्या पायर्‍या आहेत. जर स्वतःची गाडी असेल तर थेट मंदिरापर्यंत जाता येते.

खुपच छान फोटो ! आम्ही शहापूरलाच रहातो पण अजून मानस मन्दिर पहायचा योग आला नाही.

फारच सुंदर फोटो, नेहमीप्रमाणे... Happy
मस्त परिसर हिरवागार, आणि त्यात हे सुंदर शुभ्र मंदिर, आणि त्यात भर त्या दाटलेल्या ढगांची Happy

<<<साळावच्या बिर्ला मंदिराची आठवण झाली...>> अगदी

नेहमीप्रमाणे छान फोटो!
गेल्यावर्षी कॉलेजच्या पहिल्या आठवड्यात (ऑगस्टमध्ये) आमच्या १५-१६ जणींचा ग्रुप गेला होता. पण तिथले रिक्शावाले फार मनमानी करतात. आम्ही एका रिक्शामध्ये ४ जणी आणि प्रत्येकीचे १५ रू. याप्रमाणे ६ कि. मी. साठी जायला ६० आणि यायला ६० (अशा ४ रिक्शा) असे जवळ जवळ ५०० रू. मोजले.
माझं गाव शहापूरमध्येच आहे त्यामुळे प्रत्येक माणसाला पाहिल्यावर उगीचच असं वाटत होतं की, अरे या माणसाला कुठेतरी पाहिलंय...

पण मंदिर छान आहे. त्यामुळे पैसे गेल्याचं दु:ख नाही. Happy

आणि ट्रेनमधून परत ठाण्याकडे येताना कल्याणच्या आसपास कळलं की एका मैत्रिणीला ड्रॉप लागलाय(पण आम्ही हे तिला सांगितलं नाही, आमच्या एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू असा प्रकार झाला होता...)
Sad

तुमच्या फोटोंच्या निमित्ताने या आठवणी ताज्या झाल्या...

ललिता-प्रिती, ट्रेनने जाणार असाल तर आसनगाव स्टेशनला उतरायचं व माहुलीला जाण्याचा रस्ता पकडायचा. जाताना उजव्या हाताला हे मंदिर नजरेस पडेल.

व्वा! सुरेख, प्रशस्त मंदिर आणि निसर्गरम्य परिसर!

मला का कोण जाणे, सारखी पुण्याच्या शत्रुंजय मंदिराची आठवण येत होती फोटो बघताना! Happy

सुन्दर..... शाहापुरला जातांना डावीकडे या मंदिराच कलस नेहमी दिसायचा.... पण जाण्याचा योग मात्र कधी आला नाही... ते आता तुज्या फोटोमधून पाहता आल

फोटो मस्तच आहेत पण 'जग्गू' टच नाहीये कुठे - म्हणजे वेगळा अँगल, वेगळी मांडणी नाही दिसली Happy

बाकी इतक्या छान मंदिराची ओळख करून दिल्याबद्दल (आणि ते पण कसे जायचे ते सांगून) धन्यवाद. नक्की जाणार. तुला संपर्कातून मेल केली आहे.

Pages