छत्री - २

Submitted by विशाल कुलकर्णी on 8 July, 2010 - 07:13

अमित जी ची छत्री ही सुंदर कविता वाचली अन राहवलं नाही....

पाऊस आला..
हलकेच मी छत्री उघडली..
अन नजर तुझी फुरंगटली..
वेडाच आहेस...!
अरे शहाण्या...
तुझ्या मिठीत भिजण्याची मजा
त्या छत्रीला कशी कळणार?
पावसाच्या स्पर्शाने शहारलेलं..
ओलेतं अंग मग तूला कसं बिलगणार...?
माझ्या डोक्यावर पडणारे...
पाणी अडवण्याच्या बहाण्याने अलगद..
तू माझे ओलेकच्च केस कसे स्पर्शणार?
पाऊस..तर निमित्त रे केवळ...
तुझ्या जवळ येण्याचं
त्या छत्रीखाली ते कसं जमणार?
तिथे तू मला आणि मी तूला..
पाऊस लागू नये म्हणून धडपडणार..!
त्या नादात...
तूझ्यासवे भिजण्यातली..
रंगत मात्र हरवणार...
नको रे...
चल मीट ती छत्री...
तुझा हात माझ्या हातात...
अन् धुंद करणारी रंगेल बरसात...
त्या सोबत भिजण्यातली...
मजा काही वेगळीच असणार...

विशाल

गुलमोहर: 

एक अकेली छत्री में जब आधे आधे भिग रहे थे...... या 'इजाजत' मधल्या गाण्याची आठवण आली. छत्री शिवाय भिजण्यात वेगळीच मजा आणि अशी आधे आधे भिजण्यात वेगळीच Happy

छान कविता, विश्ल्या Happy

पहिल्या तीन ओळी 'त्याच्या' अन् बाकी सगळ्या 'तिच्या' आहेत का? किंवा कसं?>>>>

मंजाक्का, पहिल्या तीन ओळी त्याच्या आहेत, पुढच्या सगळ्या ओळी त्याने इमॅजिन केलेल्या आहेत, तिच्या नजरेत Happy

धंकू बर्का समद्यास्नी Happy

जुन्या -----माझ्या------------------------खूsssssssssssssssssssssssssssप जुन्या आठवणींना उजाळा दिला--------------------------हम भी रूऊऊऊऊऊ sssssssss मा नी हो गये!!!
Happy
Happy Happy
Happy Happy Happy

मस्त Happy

वाह!!! Happy

आत्ता कळलं विशाल... मलेरीया कसा झाला ते .

गिरीशजी, मला ते आधिच माहीत होतं,चार चौघात वाच्यता नको म्हणुन गप्प होतो. Happy

sundar.jpg

किती वेडा किती खूळा,
तुझ्यामाझ्या सोबतीला,
सख्या हाच तो विरंगूळा..

नको आता अडसर कसला,
चिंब ओले एकरूप होताना,
तू होशील का रे पाऊस वेडा
मी त्या धुंद सरींना साद घालताना..

तेवढेच मला होईल बिलगणे,
असंख्य थेंबाच्या ह्या गर्दीतूनी,
थरथर होईल या चंचल देहा,
स्पर्श तुझा अलवार ओघळूनी..

--- सुर्यकिरण..

विशल्या हा बघ असा अनुभवला होता मी छत्रीविना पाऊस ! Wink

विशाल... अप्रतिम! ही लिंक आधी का नाही मिळाली...

सुकि ने पाठवली आत्ता... माझ्या पावसाच्या आठवणींचा लेख वाचून!

आहा काय्च्या काय रोमँटिक!
असं वाटलं ही माझीच कविता आहे... मी नवर्‍याला सांगतेय...
पण त्याला पाऊस आवडत नाही Sad भिजायला तर नाहीच नाही.. Sad Sad

बघुया ही कविता पाठवतेय... आता तरी आवडतोय का पाऊस... Happy

सुकि... नेहमीप्रमाणेच हळवी शब्दवेल्हाळ आणि गोड!

वाह... विशाल... मस्त , सुकी मस्तरे..

आज खोड्या काढायचा मुड आहे म्हणुन
माझी एक कविता.. अगदी छोटी.. चार्क्षरी:)

"रेनकोट,
चल काहीतरीच, चावट!!! "

कशी वाटली? Happy

सर्व भिज-कवी ववि ला येणार ना ? छत्र्या घरीच ठेवून या>>>>

तुम्ही फक्त तुमची छत्रीच पाठवून दिली तरी चालेल Proud

Pages