छत्री.

Submitted by A M I T on 8 July, 2010 - 05:42

काल पावसाची चढाई
परतवण्यासाठी
छत्रीचं शस्त्र
उगारलं
आणि छत्रीसंगे
उघडली
आठवणींची बंद
कवाडे
एकट्या छत्रीत
अर्धी भिजणारी तू
अन् अर्धा भिजणारा मी
गेल्या पावसात
आपल्या दोघांचं
मिलन पाहू नये
म्हणून आभाळाकडे
आपण छत्रीचा
अडसर केलेला
तरी छत्रीच्या
आठही टोकांवरून
सांडणार्‍या
थेंबांनी आपली
लगट ओझरती
पाहून ओल्या
मातीच्या कानांशी
कुजबुजण्यासाठी
घाई केलेली
आता लख्ख
आठवताहेत
छत्रीमधील
एकमेकांत
गुंतलेले श्वास
एकसारखी पडणारी
पावले
आणि छत्रीसंगे
मिटून पडलेले
ते ओले स्पर्श
आणि काही चिंब आठवणी...............

गुलमोहर: 

छान

मस्त छत्री, म्हणजे कविता! Wink

चित्र तर एकदम बहारच!

ते बघून आठवल्या माझ्या कधीकाळी लिहिलेल्या या ओळी.

असाच भुरभुर पाउस होता, अन् उडणारी एकच छत्री
आठवली का हळूच माझ्या कानी कुजबुजलेली गाणी?

Happy