मासे ७) तिसर्‍या (शिवल्या)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 2 July, 2010 - 02:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तिसर्‍या (शिवल्या) १ ते २ वाटे
लसुण पाकळ्य ४-५
१ मोठा कांदा चिरुन
आल, लसूण, मिरची कोथिंबीर वाटण दिड चमचे.
अर्धा वाटी सुके खोबरे व १ मोठा कांदा भाजून केलेले वाटण
हिंग, हळद
२ चमचे मसाला
चविपुरते मिठ
अर्धा ते १ चमचा गरम मसाला.

क्रमवार पाककृती: 

पहिला तिसर्‍या स्वच्छ धुवुन घ्यावात. मग त्या एका टोपात त्या बुडतील इथपर्यंत पाणी टाकायचे. व त्याला एक उकळी आणायची. टोप मोठच घ्यायच. तिसर्‍या सोडून टोप अर्ध रिकाम राहील पाहीजे नाहीतर कधी कधी उकळल्यावर पाणी बाहेर येत. उकळी आणल्यावर तिसर्‍या सुट्ट्या होतात. मग त्यातील ज्याला तिसरीचे गर आहे अशी शिंपली घ्यायची व दुसरी काढुन टाकायची.

आता पातेल्यात किंवा कढईत तेलावर लसणाची फोडणी द्यायची व त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तळायचा. मग त्यावर आल लसुण पेस्ट, हिंग, हळद, मसाला, तिसर्‍या घालाव्या. जे तिसर्‍या उकडलेले पाणी असते त्यातलेच थोडेसे पाणी ह्यात घालावे. जर रस्सा करायचा असेल तर जास्त पाणी घालायचे. थोडावेळ वाफेवर ठेउन मग त्यात कांदा खोबर्‍याचे वाटण, गरम मसाला व मिठ घालायचे. परत थोडावेळ वाफ देउन गॅस बंद करावा. ह्या शिजलेल्या असल्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नसते.

वाढणी/प्रमाण: 
५-६ जणांसाठी
अधिक टिपा: 

* ह्या न उकडता विळीवर मधुन कापुन दोन शिंपल्या बाजुला करता येतात. त्यामुळे उकडल्यावर जे पाणी फु़कट जाते ते जात नाही कारण त्यात तिसर्‍यांचा रस उतरलेला असतो. पण हे कापायला वेळ लागतो म्हणून बहुतेक जण उकडूनच करतात.

* ह्यात आंबट घालण्याची तशी गरज नसते. पण जर आवडत असेल तर एखादा टोमॅटो घालावा.

* ह्याच प्रकाराने रस्साही करता येतो. रश्यामध्ये तिसर्‍या उकडलेले जे पाणी असते तेच वापरायचे.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या आहेत तिसर्‍या
Shivali 1.JPG

ह्या उकडलेल्या तिसर्‍या
Shivali2.JPG

अशा प्रकार गर असलेली एक एक शिपंली घ्यायची.
Shivali3.JPG

हे आहे तिसर्‍यांचे सुके.
Shivali 4.JPG

हाय.. तोंडाला पाणी सुटले गं एकदम.. मी पण अस्सेच करते तिस-याचे सुके, फक्त उकडुन घेत नाही, चव थोडी कमी होते उकडल्यावर.. खाताना काय लागते....

हल्ली तुझ्यामुळे मी मासेवालीकडे प्रेमाने पाहायला लागले, पण आज सक्काळीच तिने १०० चे सहा बांगडे सांगुन मला स्वप्नातुन जागे केले Sad

पण आज सक्काळीच तिने १०० चे सहा बांगडे सांगुन मला स्वप्नातुन जागे केले >>> अय्या, ठाणे कौपिनेश्वर मार्केटमधे तर २५ रु. डझन बांगड्या मिळतात.

Proud

अश्वे, कशाला गं मीठाची बरणी रिकामी करतेस माझ्या जखमांवर?? देव तुला पुढच्या जन्मी पट्टीची मासे खाणारी करो आणि तेव्हा १ बांगडा १०० रु.ला मिळो असा शाप आहे माझा तुला Proud

तोंपासु. Happy मला करता येत नाहीत हे प्रकार. ओळखता आणि साफ करता येत नाहीत. तुझ्याकडे रितसर शिकवणी लावेन आधी त्यासाठी तोपर्यंत तुच करुन खायला घाल मला Proud

मस्तच जागु. आम्हीपण असेच करतो तिसर्‍याचे सुके.

पण माझ्या सासुबाई तिसर्‍या आणल्या की धुवुन फ्रिझरमध्ये टाकतात, मग संध्याकाळी त्या बाहेर काढुन विळीवर कापतात. असे केले की तिसर्‍या कापायला त्रास होत नाही असे त्या म्हणतात. मी या वाटेला कधी जात नाही त्यामुळे मला अनुभव नाही, मी फक्त त्यांनी केलेले सुके खाण्याचे काम करते. Happy

जुई,साधना, अश्विनी, पौर्णिमा, दिप्स, कविता, वर्षा-म, वर्षा-११, नंदीनी धन्यवाद.

साधना अग अश्विनीने हातातल्या बांगड्यांची किंमत सांगितली आहे. खाण्याच्या बांगड्यांची नाही.

कविता अग असा शिकायचा कंटाळा नाही करायचा. तु प्रयत्न कर बघु मी टेस्ट करुन तुला सांगते.

वर्षा-११त्या अशाही कापता येतात. पण थोडा वेळ जातो.

वर्षा म जर तुला चावता येत असतील आणि पचवता येत असतील तर खाउ शकतेस शिंपले.

जागु मी पुर्ण शाकाहारी आहे, पण ही डिश भलतीच तोंपासो दिसतेय..
हे शिंपल्यासकट करी करायची असते? Uhoh
ते पण खाता का आणि तुम्ही?

दिसतेय भलतीच सुरेख पण..

हो दक्षीणा ह्याची शिंपल्या सकटच करी करायची असते. खाताना शिंपल्यातील गोळा काढून खायचा असतो.

तु नीट वाच. साफ काही नाही करायच त्याच्यात. फक्त उकळवण्याच्या आधी पाण्याने धुवायच्या. मग उकळल्यावर आपोआप त्या सुटतात मग गर असलेली शिंपली घ्यायची ती सहज निघते.

चांगले ताजे शिंपले कसे ओळखायचे? कारण मला हे काहीच करता येत नाही पण नवरा खुश होईल जर मी असे काही बनवायला लागले तर्.जागू तुझ्यामुळे माशांचे प्रकार कळले.एरवी फक्त लालन सारंगच्या लेखात वाचलेत.पण फोटो पाहून जरा कल्पना येते.

नीट बघुन साफ करा गं बायांनो..कधीकधी एखादी शिवली नुसतीच रेतीने भरलेली असते. आतल्या जीवाने हे घर सोडुन दुसरीकडे घरोबा केलेला असतो Happy

शिवल्याही खेकड्यांसारख्याच जिवंत असतात. (पाण्यात टाकुन ठेवल्या तर कधीकधी उघडमीट करतात. लहानपणी शिवल्या आणल्यावर त्यांना पाण्यात टाकुन पाहात बसणे हा माझा आवडता छंद होता. ) त्यामुळे त्यांना विळीवर उघडताना त्रास होतो जरा (त्यांच्या त्रासाबद्दल आपण काही चिंता व्यक्त करत नाही Sad ) फ्रिजमध्ये ठेवल्यावर कदाचित आतले जीव मरत असतील आणि मग सहज उघडाता येत असतिल शिवले. मी तर तसेच उघडते. जरा जोर द्याव्या लागतो...

इथे गोव्याचे कुणी नाही का ? गोव्याला आकारावरुन त्यांना वेगवेगळी नावे आहेत. (शिनोणे वगैरे) त्यातल्या एका प्रकारात तर पेढ्यासारखे दिसणारे मांस असते.

इथे गोव्याचे कुणी नाही का ? गोव्याला आकारावरुन त्यांना वेगवेगळी नावे आहेत

गोव्याची त-हाच निराळी, एकाच माशाचे दहा प्रकार ज्या गोव्यात बनवतात, तिथे एकाच जातीचे मासे वेगवेगळी रुपे घेऊन आले तर नवल कसले???

(देवा, मला परत इथे पाठवणार असशिलच तर मग गोव्यात जन्माला घाल.. तिथला माणुस जन्मानेच रसिक असतो - सगळ्याच बाबतीत..)

मस्त. तिसर्‍याची एकशिपी पदार्थ आहे तो हाच काय?
काल मी मद्रासात मसाला झिन्गे व तळलेला मासा खाल्ला तेव्हा जागू तैंची लै आठवण आली.
साधने बांगडे तळणार कि कालवण? छ्या मी आज शहाण्यामुलीसारखे वरण भात खाणार होते पण आता जीभ खवळलीये.

बांगडे मस्त खरपुस तळायचे, सोबत झक्कास वरणभात करायचा आणि मस्त तोंडी लाऊन खायचे.. अन्न हेच परब्रम्ह ह्याचा प्रत्यय येतो....

श्रावणी साधनाच्या टिप्स बरोबर आहेत. पण जर तु उकडून घेतल्यास तर माती असलेल्या शिवल्या उघडतच नाहीत. त्यामूळे रेतिच्या शिंपलीची काळजी मिटते.

मेधा, दिनेशदा, असुदे, अश्विनीमामी आणि साधना तुलाही परत एकदा धन्यवाद.

Pages