प्रवेशिका - १५ ( prasad_shir - काय वाटते कुणास... )

Submitted by kaaryashaaLaa on 2 October, 2008 - 23:51


काय वाटते कुणास हे अजमावत नाही
कारण तुलाच माझी कविता भावत नाही

ज्याच्या त्याच्या तोंडी गप्पा कलंदरीच्या
(कोण सुखाचा चाकर होउन धावत नाही?)

आज कोसळू पाहे सारे तिने दिलेले...
उगाच कोणासाठी नभ पाणावत नाही

तिचे नि माझे उधाण हल्ली असेच आहे
ती बोलावत नाही... मीही धावत नाही...

मजेत आहे मी माझ्या दुःखांच्या सोबत
दार सुखांचे आताशा ठोठावत नाही

थकलो आहे इतका ऐकुन जीवन गाणे
दोन क्षणांच्या ओळीही फरमावत नाही....

दुःख कोंडण्यासाठी मनात इतके कप्पे
हर्ष तेवढा मनात माझ्या मावत नाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटचे चार शेर छान आहेत.. आवडलेत. पण पहिले दोन जमले नाहीत. 'फरमावत' हा उर्दू शब्द का वापरलास.. असो.. तू एक चांगला प्रयत्न केला त्या करिता ७ गुण. शैली, प्रवाह, शब्दरचना, शेर, आशय - या निकषावरून.

मजेत आहे मी माझ्या दुःखांच्या सोबत
दार सुखांचे आताशा ठोठावत नाही.

थकलो आहे इतका ऐकुन जीवन गाणे
दोन क्षणांच्या ओळीही फरमावत नाही....

दुःख कोंडण्यासाठी मनात इतके कप्पे
हर्ष तेवढा मनात माझ्या मावत नाही!

छान..!

७ गुण द्यायला हरकत नाही.

========================================
मी वैशाखातला दर्द, तू श्रावण हिरवागर्द..!

तिचे नि माझे उधाण हल्ली असेच आहे
ती बोलावत नाही... मीही धावत नाही...

काळजात घुसला हा शेर! व्वा!!

दोन क्षणांच्या ओळीही फरमावत नाही....

सुंदर...!!!

७ गुण
--------------------------------------------------------------------
अव्यक्ताचे धुके दाटता.....व्यक्त साठते दवबिंदूसम !

शेवटचे चार शेर जबरदस्त.. मक्ता तर एकदम सही..
माझ्याकडून ७ गुण..

उधाण आणि मक्ता जीवघेणा,
एकंदर परत एक मस्त गझल, आवडेश

आणि तेच ते असलं तरी, किती वेग-वेगळया त-हेनी प्रत्येक जण मांडतोय याची मजा वाटतेय Happy

४ , ५, ६ ,७ शेर एकदम जबरदस्त!!!!!! व्वा!!

७ गुण

बेहद्द आवडली. दुसर्‍या शेरात, ते कंसातलं खास! सगळेच शेर सुंदर आहेत. उधाण आरपार!
माझे ९
-----------------------------------------------------
वह सुबह का अहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ खुर्शीद सर्-ए-बाम तो आया

ही गझल पहिल्या दहात नक्की जाईल...
आता जरा "गझल" वाटाव्या अशा रचना यायला लागल्या आहेत... मैफल रंगात येत्येय..

आई शप्पथ....
इथे शेर सटासट गोळी घुसावी तसे घुसताहेत...

"उगाच कोणासाठी नभ पाणावत नाही"

तिचे नि माझे उधाण हल्ली असेच आहे
ती बोलावत नाही... मीही धावत नाही...

थकलो आहे इतका ऐकुन जीवन गाणे
दोन क्षणांच्या ओळीही फरमावत नाही....

दुःख कोंडण्यासाठी मनात इतके कप्पे
हर्ष तेवढा मनात माझ्या मावत नाही!

माझे गुण ८
पण यार.. मतलाच मग का बरं फिका झालाय???

*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

ज्याच्या त्याच्या तोंडी गप्पा कलंदरीच्या
(कोण सुखाचा चाकर होउन धावत नाही?)

मजेत आहे मी माझ्या दुःखांच्या सोबत
दार सुखांचे आताशा ठोठावत नाही.

थकलो आहे इतका ऐकुन जीवन गाणे
दोन क्षणांच्या ओळीही फरमावत नाही....

हे शेर मस्त आहेत. आवडले.

माझ्या मते ७ गुण.
-सतीश

गजल मस्त जमलीये!
उधाण.. वाह!
दोन ओळी.. मस्त!

('उधाण' शेराने आठवण करून दिली

रोज नेटाने तहावर स्वाक्षर्‍या ठोकोन देतो
ती अनावर होत नाही, मी अनावर होत नाही

सांगण्यासाठी बरी ही स्वाभिमानाची कहाणी
वेळ आली की सुखाचा कोण चाकर होत नाही ?.... वैभवा Happy )

नंतर नंतर गजल रंगत जाते Happy
शेवटचे ४ मस्त.

पण बर्‍याच जागी शब्दांची सूट घेतली आहे, जे खटकले.. ('अ'जमावत का 'आ'जमावत?)
५ गुण
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!

खास एकदम. भाषा सुंदर. गुण? ८

"मजेत आहे मी माझ्या दुःखांच्या सोबत
दार सुखांचे आताशा ठोठावत नाही"

मला वाटते ही एका कवीने दु:खांला दिलेली मानवदंनाच आहे!
हा शेर माझ्या मनाला फार भावला!

१० पैकी १०!!!

८ गुण. क्षणभर वाटले १० द्यावेत. ही गझल पहिल्या दहात नक्की जाईल...असं मलाही वाटतं. उच्च.
सटासट बाण घुसले.....

>>आज कोसळू पाहे सारे तिने दिलेले...
उगाच कोणासाठी नभ पाणावत नाही

तिचे नि माझे उधाण हल्ली असेच आहे
ती बोलावत नाही... मीही धावत नाही...

मजेत आहे मी माझ्या दुःखांच्या सोबत
दार सुखांचे आताशा ठोठावत नाही

दुःख कोंडण्यासाठी मनात इतके कप्पे
हर्ष तेवढा मनात माझ्या मावत नाही!

सुरेख! ८ गुण.

शेवटचा शेर आवडला... विषय जरा घिसापीटा वाटला... शब्दांच्याबाबतीत पूनम ला मोदक..
५ गूण.

मस्त गझल!
कलंदर आणि नभ विशेष आवडले!!
मतला कमकुवत वाटतो बाकीच्या शेरांच्या मानाने. जीवन्-गाणे नीट कळला नाही.
माझे गुण - ७.

वा छान जमलीये ७ गुण

वा छान जमलीये ७ गुण

सुखाचा चाकर -शेर कल्पना आवडली.
माझे ४ गुण

आतापर्यंत सर्वात आवडलेली गजल. ८ गुण

आज कोसळू पाहे सारे तिने दिलेले...
उगाच कोणासाठी नभ पाणावत नाही

तिचे नि माझे उधाण हल्ली असेच आहे
ती बोलावत नाही... मीही धावत नाही...

हे दोन शेर अतिशय आवडले.
आणि एवढ्याचसाठी ,
माझे गुण: ७

Pages