केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मामी,
शाळेत असतांना माझेही केस कमरेच्या खालपर्यंत होते. आदल्या दिवशी सकाळी आई वेण्या घालुन द्यायची ती दुस-या दिवशी शाळेत जायच्या वेळेसच सुटायच्या....! तसेच वेण्यांमुळे केस वाढतात, असे म्हणतात.
नी म्हणते तसं थोडं तेल तर लावावच लागतं...वेणी घट्ट बसायला. शिवाय केसांचा जर कुठला कट केलेला असेल तर वेण्या अजिबात बसत नाही....वेण्यांमुळे केसांची टोके ताणुन बांधली जातात त्यासाठी केसांना खाली टोकं (शेंड्या)आलेच पाहिजेत ज्यामधे रिबिन्स गुंफता येतात. वेणीचे शेवटचे ३-४ पेड राहिले की त्यातच रिबिन गुंफायची आणि सगळ्यात शेवटी गाठ मारायची नंतर वेणी वळवुन वर डोक्यापर्यंत नेउन किंवा पाहिजे त्या अंतरावर रिबिनीचे फुल मारायचे!

धन्यवाद ग सर्वांना. आज तेल लावून घातल्यात. रिबिनी लावायला गेले तर रिबिनी स्कर्टच्या खिशात. अन
स्कर्ट मावशींनी इमानदारीत भिजविलेला. मग ओल्या रिबिनी धुऊन तिच्या हातात कोम्बल्या. रिबिन नसली तर पीटी टीचर मारतात चक्क. आज रात्री ट्रायल मारते. उद्या गुरवार व्हाईट रिबिनी. व्हाईट ड्रेस. जय गुरुदेव.

सनसिल्क चे शांपू व कंडिशनर चा ट्विन पॅक आणला आहे. मस्त आहे व अतिशय माइल्ड वास आहे त्याला.

शिवाय केसांचा जर कुठला कट केलेला असेल तर वेण्या अजिबात बसत नाही....वेण्यांमुळे केसांची टोके ताणुन बांधली जातात त्यासाठी केसांना खाली टोकं (शेंड्या)आलेच पाहिजेत ज्यामधे रिबिन्स गुंफता येतात.
>>
अगदी अगदी आर्या. मामी वर सर्वांनी सांगितल्याप्रमाणेच भरपुर तेल लावत जा लेकीच्या केसांना आणि वेण्या थोड्या घट्ट घाला. शक्यतो सुट्टीतही केसांचा लेयर किंवा स्टेप कट करु देऊ नका. नंतर अज्जिबात वेण्या नीट येत नाहीत.

तेल लावुनही वेण्या सुटत असतील तर वेणी फोल्ड केली की त्या फोल्डच्या थोडंसं वर ब्लॅक रबरबॅन्ड लावा, जेणेकरुन पुर्ण वेणी सुटणार नाही.

मामी....तीची वेणी घालण्या आधी वर एक रबर लाऊन मग डबल वेणी घाला आणि योगमहे ने सांगितल्याप्रमाणे खाली पण एक रबर लावा....मी पण हेच करायचे...केस निदान जास्त वेळ बांधलेले तरी राह्तात........ Happy

सर्वान्ना हाय...मी मायबोलीवर नवीन आहे.
मेन्दीबद्दल मला असे विचारायचे आहे कि ती लावायच्या आधी तेल लावयचे असते का? काही जण म्हणतात लावावे तर काही जणान्चा सल्ला असा असतो कि मेन्दी कोरड्याच केसाना लावावी. कोरड्या म्हणजे अगदी धुतलेल्या केसाना लावावि..आणि मेन्दी धुतल्यावर मगच तेल लावावे...मी खरच खुप कनफ्युज झाले आहे..मला माहित नाही हा प्रश्न याआधी विचारला गेला आहे का .....प्लीज मला कोणी सान्गाल का?

प्रिती, तेल लावलेल्या केसांना मेंदी लावली तर रंग कसा चढेल मेंदीचा???

केस स्वच्छ धुवुन मगच त्यावर मेंदी लावावी. मागे एका टिवीवर एका कार्यक्रमात ऐकले होते की केस थोडे ओलसर असतानाच मेंदी लावलेली उत्तम. पण मी तसे करत नाही. मी केस धुतल्या दिवशी किंवा त्याच्या दुस-या दिवशी मेंदी लावते. केस खुप खराब झालेले नसावेत. मुंबईत धुळ व घामामुळे केस तिस-या दिवशीच चिकट होतात.

हवा तेवढा वेळ मेंदी ठेवल्यावर मग मेंदी धुवुन टाकावी, केसांना शांपु करु नये, तसेच वाळवावेत आणि मग तेल लावुन ठेवावेत. दुस-या तिस-या दिवशी शांपु करावेत. छान मऊ होतात. मी तरी असेच करते.

मि क्लीनिक ऑल क्लिअर शान्पु वापरते पण तो डोळ्याना लागला कि खुप डोळे चुरचुरतात त्याने काही डोळ्याना त्रास होणार नाही ना?

धन्यवाद साधना माझेहि मत असेच आहे पण काहि मैत्रिणि तेल लावुन मेन्दी लावतात.. आणि त्यान्चे केस खुप मऊ झालेले वाटतात म्हणुन विचारले तर बर्याच जणिन्चे हेच उत्तर होते कि आधि मेन्दि लावल्याने रन्गण्याबरोबर केस खुप मऊ होतात म्हणुन हे कन्फ्युजन्...जेवढे ऐकावे तेवढे नविन प्रकार कळतात आणि प्रत्यक्श पाहिल्यावर तर कन्फुजन वाढतच जाते....:)

तु दोन्ही ट्राय करुन का बघत नाहीस?? आधी तेल लावुन मग मेंदी लावुन बघ आणि पुढच्या वेळेस तेल न लावता मेंदी लावुन बघ,. पण मेंदीनंतर शांपुच्या आधी मात्र तेल लावच लाव. मेंदी केसांना कोरडे करते, त्यामुळे तेल लावणे जरुरीचे आहे.

मेन्दी विशयी आणखी एक प्रश्न असा आहे की कोणती मेन्दी चान्गली? मी सध्या दादरच्या एका दुकानातुन केसान्चि मेन्दी आणली आहे..पण काल भिजवताना कळले की ती एकदम डार्क लाल रन्गाची आहे वरून कापडि पिशवीचे packing असल्यामूळे घेताना समजले नाहि. आता लावायचे खुप टेन्शन आले आहे. पण या नन्तर मेन्दि घेतान कोणती घेत जाऊ? प्लिज एखादा चान्गला ब्रान्ड माहित असेल तर सान्गा..

प्रिती मी तेल लावुनच मेंदी लावते.त्यात अंडयाचं पांढरं,आणि दहि,ऑलिव्ह ऑईल टाकते.माझे केस कोरडे आहेत्,पण अशी मेंदी लावल्यापासुन खुपच फरक पडलाय.मी मेंदी ३ तासतरी ठेवते. नंतर फक्त पाण्याने धुते .३ ते४ दिवसांनंतर शांपू करते.
मेंदी मी बोरिवलीतुन एक होलसेलचं दुकान आहे,तिथुन घेते(खरतर ती स्पेशल केसासाठी नाहि)

usually मेन्दी हातासाठी आणि केसासाठी combine च असते ना...म्हणजे जी मेन्दी दुकानातुन मिळते...जस दुल्हन वगैरे नावे असलेली...:)...पण जी जाहिरातीत असते गोद्र्रेज ची वगैरे किन्वा black rose kaali mehendi वगैरे ही खास केसान्साठी असते...अर्थात काली (?) मेहेन्दी कीती ओरीजनल आहे हे त्यानाच माहित्...पण आयुर्वेदिक दुकानातून कूणि मेन्दी घेतली आहे का असेल तर कोणते दूकान आणि मेन्दीचा अनुभव पण सान्गा प्लीज....

मी गोदरेज ची नुपुर मेंदी वापरते. शिवाय इथे दिलेल्या सल्ल्याप्रमाणे कॉफीच्या पाण्यात भिजवते. मंडूर पाव्डर टाकली की अजुन सुरेख रंग येतो, पण माझ्याकडची पावडर आता संपलीय आणि दादरच्या भानुपद्ममध्ये जायला आता काही जमायचे नाही Sad

भान, मीही २० वर्षांपुर्वी मेंदी लावायचे तेव्हा त्यात दही किंवा अंडे टाकायचे, वर थोडे तेलही टाकायचे आणि मग ते मिश्रण लावायचे. पण अंड्याचा वास येतो खुप. आणि तेल, कोरडे केस अजुन कोरडे होऊ नये म्हणुन टाकायचे असा सल्ला दिलेला कोणीतरी..... अर्थात तेव्हा माझे २०% केस पांढरे होते. आता २०% काळे उरलेत Sad म्हणुन जास्तीत जास्त रंग चढणे आवश्यक आहे माझ्यासाठी...

साधना,मी मेंदीत अंडं टाकलं किंवा नुसतं जरी लावलं तरी केस सुकल्यावर वास जातो अंड्याचा.(सहि ना :)) मेंदीमध्ये अंडं टाकलं तर अजिबातच येत नाहि वास.मला खरतर कलर महत्वाचा नाहि,पण तरीहि १ वेगळाच छान कलर येतो.:) माझे केस खुप कोरडे असल्याने मला तसंपण नेहमी थोडं का होईना पण तेल लावावेच लागते.आणि तेल लाऊन मेंदी लावली कि केस जरा बरे वाटतात.

चला एकदाची मेन्दी लावुन बसलेय्.......हात " भयानक" लाल झाले आहेत...:( ते बघुन केसान्चे काय होइल ही भीती आहे...सध्यातरी wait and watch!! एवढेच करु शकते..:(

मेंदी पावडर जेवढी हिरवी गार तेवढी ति ताजी आणी त्याचा रंग चांगला. मेंदि चहाच्या पाण्यात भिजवली तरि चालते.
मी पण ऐकल आहे की मेंदिच्या आधी तेल लावाव पण ते अगदी हलक आणी ते पण केसांच्या मुळाला. याच कारण आहे की मेंदी मुळात थंड असते. १ ते ३ तास डोकीवर घातल्यावर काही काही जणांना बाधु शकते. म्हणुन थोड तेल लावाव.

मी बाधु नये म्हणुन मेंदित थोडे निलगिरी तेल घालते ५-६ थेंब. मस्त वास येतो नंतर...
उर्जिता जैनचे एक तेल आहे, नाव विसरले. ते घातले की केस मस्त चमकदार होतात. घरी जाऊन बघते आणि लिहिते इथे नाव..

सखी , मी काल लाल करुन घेतले हात Happy

मेन्दी धुतली आहे...रन्गाचि जी भीती होती ती अजुन तरी खरी ठरलेली दिसत नाहि..(नशीब माझे)!!!

साधना , नक्कि तेल सान्ग हा...खरतर केसान्च्या बाबतीत मी अचानक जागे झाले आहे....इतके दिवस नीट काळजी घेतली असती तर आज ही वेळ आली नसती....(वाटल नव्हत केसासाठी मी कधी अस काही म्हणेन) का......................श !!!!!!!!!!!!!!!!!!! Sad Sad

सखी तू मुंबईत आहेस असं दिसतं. पण पुण्याच्या ग्रीन फार्मसीची मेंदी अप्रतीम आहे. आयुर्वेदिक. व केसांना लाल रंग न येता ब्राऊनिश शेड येते. आणि मेंदी लावण्यापूर्वीच तेल लावायचं असेल तर अगदी थोडं लाव. कारण तेलकट केसांवर मेंदी कशी बसणार?

इतके दिवस नीट काळजी घेतली असती तर आज ही वेळ आली नसती

घाबरू नकोस.. केस हे वाढणारे शेत आहे. निगा घेतली तर निट वाढते आणि नाही घेतली तर..
आता निगा घेतेयसच तर नीट वाढणारच. माझे केसांनी अती भयाण पासुन अती सुंदर पर्यंतचा सगळा प्रवास केला आहे. एके काळी इतके फाटे फुटले होते की अगदी वरपर्यंत केस दुभंगलेले दिसायचे. आता लांब असुनही क्वचितच फाटे दिसतात... सो, हॅव फेथ... Happy

ते तेलाचे विसरलेले, आज रात्री सांगते.

साधना ...माझे केसांनी अती भयाण पासुन अती सुंदर पर्यंतचा सगळा प्रवास केला >>>>>

सही.....आता थोडा कोन्फिडन्स आलाय Happy ....पण ह्या प्रवासात नक्की कशी काळजी घेतलीस केसान्ची ते सुध्धा कळू दे ना..म्हणजे मी आणि माझ्यासारख्या अनेकजणी असे बोलू शकतील...:)
तूझ्या बोलण्यात वारन्वार भानूपद्म चा उल्लेख असतो...माझे माहेर दादरला असल्यामूळे तिथे मधून मधून जाणे होते...काहि खास गोश्टी असतील तिथे केसान्साठी तर ते ही सान्ग...

मानुषी .... ती मेन्दी मूम्बईत मिळू शकेल का?

अग
भानुपद्ममध्ये तसे खास काही नाही, पण मला ते दुकान सोयीचे पडते म्हणुन. तिथे आंबेहळद, मुलतानी माती, शिकेकाई, शतावरी, जेष्टमध पावडर वगैरे ब-याच गोष्टी चांगल्या दर्ज्याच्या मिळतात. उर्जिता जैनची उत्पादनेही मिळतात. तिच्या उत्पादनातली आयुर्वेदिक उत्पादने तिथे सुट्टीही (म्हणजे तिची नव्हे तर त्यांची, unbranded) मिळतात आणि जरा स्वस्त असतात, पण दर्जा चांगलाच असतो. त्यांना मी दोघातला फरक विचारला तर म्हणाले की तिच्या पावडरी वस्त्रगाळ असतात तर यांच्या चाळणीने चाळलेल्या. बाकी दर्जा मात्र सारखाच.

भानुपद्म आवडायचे अजुन एक कारण म्हणजे तिथे गेले की तिथल्या सगळ्या आयु. पावडरींचा एक मस्त वास दुकानात दरवळत असतो. मला तो खुप आवडतो. इतर आयु. दुकानांसारखे कोंदट, काळोखे वातावरण आणि दुर्मुखलेले म्हातारबाबा गल्ल्यावर असे दृष्य तिथे नाहीये.. Happy मला बरे वाटते तिथे जायला..

केसांसाठीची मेंदीही तिथे मिळते. इंदुरचा brand आहे, मला नाव आठवत नाही, पण माझा एक मित्र ती आवर्जुन वापरायचा. त्याच्या मते ती बेस्ट होती. मी कधी वापरली नाही. पण चांगली असावी.

केसांसाठी उर्जिताचे मोतिया रोशा तेल मेंदीमध्ये चार्-पाच थेंब टाकायचे. केसांना अगदी सिल्क्सारखी तकाकी येते आणि अतिशय सुंदर वास येतो. अर्थात मेंदी भिजवताना टाकायचे नाही तर आपण जेव्हा लावणार केसांना तेव्हाच टाकायचे, मेंदी परत चांगली मिक्स करायची आणि मग थापायची डोक्यावर Happy

भानुपद्म आवडायचे अजुन एक कारण म्हणजे तिथे गेले की तिथल्या सगळ्या आयु. पावडरींचा एक मस्त वास दुकानात दरवळत असतो. मला तो खुप आवडतो >>>>>>>> सेम हिअर Happy
पण तूझ्या प्रवासाबद्दल सान्ग ना....कशी काळजी घेतलीस नक्की...?

मनिषा लिमये , कमल धन्यवाद्..मी कधी तिथे गेले तर नक्की बघेन मेन्दी मिळते का..

अगं त्यातही खास काहीच नाही.

लग्नाआधी केस कापायला मनाई होती. पण नंतर मात्र मी सरळ बॉयकटपासुन सुरवात केली. माझा कित्येक वर्षे शोल्डर कट होता. नियमीत केस कापल्यामुळे फाटे फुटलेले केस कमी झाले. धुवायच्या आधी तासभर तरी केसांना तेल लावुन ठेवते. साधे खोबरेल तेलच लावते. १०-१५ मिनिटे मालिश करते. तेवढ्यानेच कंटाळा येतो. आठवड्यातुन दोन्-तिन दिवसांनीतरी केस धुते. मुंबईत केस खुप लवकर चिकट होतात.

केस रोज निट विंचरते. मधली काही वर्षे खुप घाईगडबडीत गेली, तेव्हा ऑफिसला जाताना वरुन फणी फिरवुन केस तसेच बांधुन जायचे. कधीकधी पुर्ण दिवस केस तसेच राहायचे, एकदम दोन दिवसानंतर केसात नीट फणी फिरवुन विंचरायला मिळायचे. पण मग मी काळजीपुर्वक दिवसातुन एकदातरी केस मुळापासुन खालपर्यंत हळुवार हाताने केस विंचरायला लागले.

केस विंचरताना, विशेषतः धुतलेले केस विंचरताना, कधीच वरपासुन सुरवात करत नाही तर अगदी टोकापासुन सुरवात करते आणि अगदी हळुवार हाताने गुंता सोडवत वर जाते. एकदम ओले केस अजिबात विंचरायचे नाहीत. मधुन्मधुन मुड आणि वेळ असला की कोरफड लावायचे.. मेंदी पण नियमितपणे लावायला लागले. मेंदीत जमेल तसे दही/अंडे घालायचे.

असे करत हळुहळु केस अगदी छान झाले. गेले पाच वर्षे फक्त इंचभर कापतेय.. नो हेअरकट... आता वाढलेतही मस्त आणि हातांना फिलही मस्त मऊ येतो. फक्त पांढरे केस जास्त झालेत हा एकमेव प्रॉब्लेम आहे. पण पांढरे झालेले केस तडतडीत होतात तसे माझे झाले नाहित. त्यांचा फिल तोच आहे मुळचा. Happy

आता काहीतरी छान हेअरकट करायचा विचार करतेय. लांबी तेवढीच ठेऊन काहीतरी करता येईल का ते पाहते.. Happy कोणाला काही आयडीया असल्यास सांगा.. Happy

साधना छान लिहलंयस गं

उर्जिता जैनचं तेल... डोना केयर तर नव्हे? Uhoh
मी ९९/- ची जम्बो बाटली आणलेय पॅराशूट तेलाची... कोमट करून केसाच्या मुळांना मालिश करते... मस्त डोळे मिटून अशी समाधी लागते ना... Happy

जैनचं जास्वंद जेल आणि डोना केयर वापरते... पूर्वी माझ्या केसांना अज्जिबात चमक नव्हती, रूक्ष रखरखीत निर्जीव केस दिसायचे... मग या धाग्यावर वाचलं जास्वंद जेल... आणलं फर्क पडतोय... पण खोबरेल तेल मस्ट! ते लावतेच लावते.

आणि नीधपचा खासा उपाय, नारळाचं दूध... फर्स्ट क्लास... नेहमी नाही जमत... (आळस! दुसरं काय!) मग ठरवलं सोलकढी करायची ठरवेन, थोडंसं दूध केसांसाठी बाजूला काढून ठेवेन...

जैनच्या डोना केयर चा पण फरक पडलाय... आणि असं वाटतेय की ते छोटे छोटे अपूर्ण वाढीचे केस पण बर्‍यापैकी वाढू लागलेत... कशामुळे नक्की देव जाणे! केस चमकदार वगैरे झालेत आणि कोंडा पण खूप कमी झालाय Happy जैन प्रॉडक्ट्स आणि खोबरेल प्रॉडक्ट्स झिंदाबाद! Happy

Pages