थोडंसं काहीतरी लिहावं..

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

थोडंसं काहीतरी लिहायचय
पण नक्की काय लिहु तेच समजत नाहिये.
जे मला म्हणायचय ते लिहू कि
जे तुला वाचायचय ते लिहू?

असं पण नाही की जे मला म्हणायचय तेच तुला ऐकायचय..
काठाच्या दोन टोकाना बसून आपला हा संवाद चाललाय.
मीच बोलते तू तर ऐकत पण नाहीस..
तरीही,,
तरीही.. मला काहीतरी लिहायचय.
पांढर्‍यावर काळं करायचय..
स्वतःचेच नि:श्वास कागदावर आणायचेत..
कारण कधी ना कधी तरी तुला हेच ऐकायचय
हेच वाचायचय..
आणि म्हणुनच मला काहीतरी लिहायचय.. फक्त तुझ्यासाठी..
मला काहीतरी लिहायचय...

विषय: 
प्रकार: 

मस्त लिहिलंय!!

हाय नन्दीनी,

खूपच छान लीहीलेयस.

प्रतीभेची देणगी आहे तूला.

khup sundar aahe ......
marathi select karun sudhaa marathi lihita yet nahi mhaun english (english-marathi) madhe reply Happy

लिहीणार्‍याने लिहीत जावे वाचणार्‍याने वाचत जावे.
अस लिहावे की जणू मनाच फूलपाखरू कागदावर उतरतय.
अस वाचाव की जणू कोणी शब्दांचे फूलच हूंगतय.
एक वेळ अशी येईल की फूल आणि फूलपाखरू एकच होउन जाईल.
तेंव्हा आणि फक्त तेन्व्हाच तूझ्या लिखाणाला आणि माझ्या वाचण्याला अर्थ राहील.

वा केदार क्या बात है. मस्तच..
नन्दिनी छान.
अनघा

.