गंगा किनारेवाले आलू (डुबकीवाले आलू)

Submitted by निंबुडा on 31 May, 2010 - 04:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) बटाटे

२) ग्रेव्ही साठी

  • कोथिंबीर
  • पुदीना
  • दही
  • आमचूर (ऐन वेळी आमचूर नसल्यास मी चाट मसाला वापरते.)
  • हिरवी मिरची
  • आलं

३) फोडणी साठी

  • तूप
  • जिरं
  • बडिशोप
  • ओवा
  • मेथीचे दाणे
  • हळद

****मोहरी नको****** (मला नाही बाई आवडत. तुम्हाला आवडत असल्यास घाला.)

४) चवीसाठी:

  • मीठ
  • तिखट
  • गरम मसाला
क्रमवार पाककृती: 

माझ्याकडे एक रेसिपी बुक आहे. त्यामध्ये ही उत्तर प्रदेशीय भाजीची रेसिपी दिलेली आहे. नावाच्या वैचित्र्यामुळे आमच्या घरात ती फेमस आहे. त्या पुस्तकाचे नाव आणि लेखिकेचे नाव आता आठवत नाहिये. शोधून नक्की देईन. या रेसिपी बुक मधल्या काही काही भाज्या आणि सूप्स माझे फेवरिट आहेत. त्यांपैकीच एक ही गंगा किनारेवाले आलू (डुबकीवाले आलू) ची भाजी. खाली दिलेल्या रेसिपी मध्ये मूळ कृती पुस्तकाप्रमाणे असली तरिही मी माझ्या मनाने त्यात काही बदल केले आहेत. त्यामुळे ही निंबुडा पद्धतीची भाजी आहे याची कृपया नोंद घ्यावी. Happy

काल (रविवारी) साबांची तब्येत बरी नसल्याने स्वयंपाकघराचा ताबा अस्मादिकांकडे होता. त्यामुळे माझ्या पाककौशल्याला स्फुरण चढले आणि वर सांगितलेल्या रेसिपी बुक च्या मदतीने मी ही भाजी ट्राय केली. (माहेरी खूप वेळा केली होती, पण सासरी आवडेल की नाही याची शाश्वती नसल्याने आगाऊपणा केला नव्हता).

१) साधारण ५-६ बटाटे मऊ उकडून घ्या. साल काढून हाताने फोडून घ्या. एका कढईत (पॅन मध्ये) तूपावर मीठ घालून हलके परतून घ्या.

२) ग्रेव्हीची कृती:

  • कोथिंबीर + हिरवी मिरची + पुदीना + आलं मिक्सर मध्ये बारीक वाटून पेस्ट बनवून घ्या.
  • दही (४-५ चमचे पुरे आहे. खूप घातल्यास भाजी आंबट होते.) + आमचूर फेटून घ्या.

३) फोडणी:
कढईत तूपावर वर दिलेले फोडणी साहित्य घालून फोडणी करा आणि त्यात वर दिलेल्या (स्टेप नं. २ मधील) मिरची+कोथिंबीर ची पेस्ट आणि फेटलेले दही + आमचूर घालून परता.

४) थोडा वेळ परतल्यानंतर गरम मसाला घाला.

५) उकडून स्मॅश केलेला व तूपावर परतलेला बटाट्याचा लगदा यात घाला. अंदाजाने पाणी घाला. व ढवळा.

६) चवीनुसार मीठ घाला. तिखटपणा कमी वाटल्यास तिखट टाका.

७) ग्रेव्ही घट्ट होऊन बटाटा त्यात छान एकजीव होईस्तोवर ढवळा.

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४ जणांसाठी
अधिक टिपा: 

माझ्या मेहेनतीचे चीज: नवरोबा, साबा आणि साबु ना भाजी आवडली. Happy
चाटून पुसून कढई साफसूफ Wink
या भाजीचे वैशिष्ट्य म्हणजे तेल वापरलेले नाही. ओन्ली तूप Lol

माहितीचा स्रोत: 
उषा पुरोहितांचे पाहुणचार (शानदार पाककृती) नावाचे पुस्तक.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लालू,
फोटो बद्दल धन्यवाद Happy

मोहरी पण टाकलीस का तू? काळे काळे ठिपके दिसताहेत म्हणून विचारतेय.

लालू, डुबकीवाले आलू फोटोत दिसतात किती गोलूमोलू....! Happy मी त्या मानाने सुकी भाजी केली होती.... पण आलू डुबक्या मस्त लगावत होते! निंबुडे.... शाही अरबी कुठे गेली?

मला वाटतं ही रेसिपी उषा पुरोहितांच्या पाहुणचार पुस्तकातील आहे. >>>

हो रत्ना, मी चेकलं घरी. सेम पुस्तक आहे. रेसिपीच्या खाली आता लेखिका आणि पुस्तकाचं नाव मेन्शन केलं मी. Happy

लालू, रेसिपीचं 'डुबकीवाले' नाव सार्थ केलंस. Wink
मी ही आजच केलेले. पण मी फार ग्रेव्ही ठेवली नव्हती. थोडे कोरडे केले,पण भाजी आवडली. माझी बहिण कोथिम्बिर,पुदिना वगैरे घालून आलू चाट करते त्याच्याच सारखी चव वाटली.
निंबुडा थॅन्क्स.

आज मी केले होते हे आलू. चव एकदम मस्त. फक्त एकच सजेशन, दह्याची खट्टाई बघून आमचूर पावडर घालावी. दही आंबट असेल तर आमचूर लागत नाही. थँक्स ग निंबुडा.

Aaloo.jpg

गंगा किनारेवाले आलू (डुबकीवाले आलू) >>> टायटल बघुन मला वाटलं गंगेच्या पाण्यातच हे बटाटे बुचकळुन काढले तरच ही डिश होते नाही तर नाही Proud

आर्च, फोटो मस्तच दिसतोय.
निंबुडा, मी ही केली होती ही भाजी काही दिवसांपूर्वी. फक्त डुबकीवाले न करता पाणी आटवून जरा कोरडीच केली. बडीशेप घातल्यामुळे चव खूप छान येते भाजीला. आता पुढच्या वेळी लालू, आर्च ह्यांच्यासारखी रसाची करुन बघेन Happy

गंगा किनारेवाले आलू (डुबकीवाले आलू)

>>> ह्या नावावरुन एक डिश आठवली ... जवळ्पास १-१.५ वर्षापुर्वी खाल्लेली ..." कनोजी बैंगन " : अहाहा : आपण भरली वांगी करतो तशीच बर्‍या पैकी सीमिलर ,पण टेस्त वेगळीच होती भन्नाट !!! कुठला मसाला ,कसा बनवला , कसा वापरला माहीत नाही ....>>>>

मित्राने त्याच्या बागेतले फिंगरलिंग बटाटे दिले होते गेल्या आठवड्यात. त्याची ही भाजी केली आज. एकदम मस्त झालेली. मी बटाटे तुपात परतून घेतले नाहीत अन फोडणीला पण तूप + तेल असं मिसळून घातलेलं तरी तुपाचा , पुदिन्याचा अन फोडणीतल्या ओवा -शोपेचा स्वाद छान लागला.

Pages