Submitted by सुमेधा आदवडे on 22 June, 2010 - 23:22
कोसळणार्या पावसात, छत्रीच्या इवल्याश्या जीवावर
देहाचा एकेक इंच सावरत चालत असताना,
त्याची नजर तिच्यावर पडली.
तिनेही अगदी अलगद रस्त्यावरच्या पाण्यावर पावलं
सावरताना त्याच्याकडे हळुच पाहिले.
दोघांचीही मनं उगाचच वाहवत गेली पावसात...
खरंतर हा पाऊस जितका ओळखीचा,
तितकीच ’ही’ अनोळखी.
तरीही मन का सांगड घालतंय दोघांची?
हा पाऊस जितका छळवादी,
तितकीच ’ह्या’ची नजर..
तरीही का काहीतरी आपलंसं वाटतंय?
विचार करता करता,चालत वळणावर
येईपर्यंत पाऊस थांबलाही होता.
त्याच्या आठवणींच्या ओंजळी रित्या
झाल्याही होत्या.
पण दोघं विरुद्ध दिशांना वळताना,
मनाच्या ओंजळी एकत्र येऊन त्यांना
पाऊस कधी भरु लागला..
हे कुणालाच कळले नाही..अगदी पावसालाही नाही!
आता मात्र काही रितं होणार नव्हतं.
आता मात्र काही रितं राहणार नव्हतं.
पाऊस थांबला तरीसुद्धा!
-सुमेधा पुनकर
गुलमोहर:
शेअर करा
छान आहे ग
छान आहे ग
सुंदर
सुंदर
मस्तचं..
मस्तचं..
वाह..... अफलातून.........!!!
वाह.....
अफलातून.........!!!:)
मस्त, सुमेधा.. बर्याच
मस्त, सुमेधा.. बर्याच दिवसांनी...
सुमा... हा पाऊस... ना असाच
सुमा...
हा पाऊस... ना असाच असतो...
अगदी त्याच्यासारखा .....
येतो येतो म्हणताना अलगद हुलकावणी देतो..
गेला गेला म्हणताना अचानक समोर येतो ...
खरे तर तो मुळी गेलेलाच नसतो...
तो रुजतो...
मनाच्या खोलवर गेलेल्या मुळांमधून...
गात्रा गात्रांच्या हळुवार स्पंदनांतून...
एकदा का तो आला ...
किं रिकामी झोळी शिगोशिग भरुन टाकतो...
इतकी की रितेपणाची जाणिवच संपून जाते...!
तो थांबणारच... शेवटी पाऊसच
तो थांबणारच... शेवटी पाऊसच तो.
धन्यवाद मंडळी..सर्वांचे
धन्यवाद मंडळी..सर्वांचे मनापासुन आभार..

सु.की..बर्याच दिवसांनी सुचलीये कविता..मलाही आश्चर्य वाटत होतं..पाऊस आला तरी काही सुचलं कसं नाही
विशाल दादा..मस्त कविता
सुमेधा , कविता अतिशय हळुवार
सुमेधा ,
कविता अतिशय हळुवार आणि सुंदर आहे. खूप आवडली. मस्त. अभिनंदन. खरी उत्स्फूर्त अगदी सहज आतल्या मनातून आलीय.
....................अज्ञात
कविता छान.
कविता छान.
खुप सुंदर...
खुप सुंदर...
सहज सुंदर!!
सहज सुंदर!!
क्या बात है!! छान कविता,
क्या बात है!!
छान कविता, वेगळा विषय....
मला ही माझी एक अशीच "पावसाळी" आठवण आली...
पुनश्चः सर्वांचे खुप खुप आभार
पुनश्चः सर्वांचे खुप खुप आभार
क्या बात है सुमेधा... खुप
क्या बात है सुमेधा... खुप दिवसांनी तुमची कविता वाचली अन दिल खुश हो गया... माझी पण ओंजळ भरली !!!