प्रवेशिका - ४ ( desh_ks - सत्यातल्या जगातुन... )

Submitted by kaaryashaaLaa on 29 September, 2008 - 01:33

मित्रहो,

ठरल्याप्रमाणे कार्यशाळेत निर्दोष ठरलेल्या प्रवेशिका तुमच्यासमोर सादर करत आहे.
तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहेच, पण आणखी एक जबाबदारीही आहे तुमच्यावर.
प्रत्येक गझलला तुम्ही १० पैकी गुण द्यायचे आहेत.
हे गुणांकन तुमच्या अभिप्रायातच नोंदवायला हरकत नाही.

तर सादर आहे आजची प्रवेशिका....

सत्यातल्या जगातुन जागे कुणीच नाही
भेटून मी खर्‍याला म्हणतो; उगीच नाही!

प्रत्येक वेदनेची मुद्रा जरा निराळी
माझ्या अनोळखीची, परकी, कुणीच नाही

झाले म्हणे कुठेसे काही अमानवी, पण
आहे नवीन वार्ता? ती कालचीच ना ही?

हळव्या खुळ्या मनाने गुंतू नयेच कोठे
ना बंधही सुखाचा, सुटका मुळीच नाही

गर्दीत भोवतीच्या माणूस सापडेना
माणूस शोधण्याला का योग्य मीच नाही?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हळव्या खुळ्या मनाने गुंतू नयेच कोठे
ना बंधही सुखाचा, सुटका मुळीच नाही

... ६ गुण.. ( मायबोलि मात्र या शेराला अपवाद आहे... मायबोलिवर गुन्तले तर चालते.. हा बन्ध सुखाचा आहे... )

अमानवी भावला. ५ गुण.

३रा आणी शेवटला शेर छान- ४ गुण

नवीन वार्ता, आणि
योग्य मीच नाही?
मस्तच

६ गुण

मतला कळला नाही Sad
बाकी सगळे शेर छान.
६ गुण
-----------------------------------------------
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!

चांगला प्रयत्न आहे -

१) गझलचा विषय - १ गुण
२) शैली - १ गुण
३) शब्दरचना - १ गुण
४) प्रवाह - ० गुण
५) शेर - १ गुण
============
ऐकून गुण - ०४

हळव्या खुळ्या मनाने गुंतू नयेच कोठे
ना बंधही सुखाचा, सुटका मुळीच नाही

गर्दीत भोवतीच्या माणूस सापडेना
माणूस शोधण्याला का योग्य मीच नाही? ......... मस्त

५ गुण

झाले म्हणे कुठेसे काही अमानवी, पण
आहे नवीन वार्ता? ती कालचीच ना ही?

हळव्या खुळ्या मनाने गुंतू नयेच कोठे
ना बंधही सुखाचा, सुटका मुळीच नाही>>> हे दोन्ही शेर आवडले...

मतल्याचा अर्थ सहजी कळत नाहीये असं मला वाटतय..

प्रत्येक वेदनेची मुद्रा जरा निराळी
माझ्या अनोळखीची, परकी, कुणीच नाही>>> अनोळखीची आणि परकी हे दोन्ही शब्द एकत्र वापरायची गरज होती का खरोखर?

५ गुण

प्रत्येक वेदनेची मुद्रा जरा निराळी
माझ्या अनोळखीची, परकी, कुणीच नाही

हा शेर आवडला.

४ गुण

मतला मलाही नीटसा कळला नाहीये. पण शेरांमधली सहजता... बहोत खूब. वेदना, वार्ता आवडले.
माझे ५.
-----------------------------------------------------
जान दी, दी हुई उसी की थी
हक तो यह है, के हक अदा न हुआ

जगातुन, अनोळखीची खटकले,
वेदना आणि योग्य मी च्या कल्पना छान वाटल्या.
तरी पण अजून प्रभावी करता आली असती असे वाटते. प्रयत्न छानच आहे.

गुण - ४

जगातुन जरासे खटकले.

गर्दीत भोवतीच्या माणूस सापडेना
माणूस शोधण्याला का योग्य मीच नाही?

चांगला प्रयत्न. ४ गुण.

४ गुण

व्वा...सगळे शेर छान आहेत..

"झाले म्हणे कुठेसे काही अमानवी, पण
आहे नवीन वार्ता? ती कालचीच ना ही?"

शेवटच्या ' ना ही ' ने रदिफ साधलाय पण गेयता जाते असे नाही का वाटत..?
(म्हणजे मला चाल वगैरे नाही लावता येत्...पण तरीही :डोमा:)

माझे ६ गुण..

नाही .. ना ही...

मला हिनाचे गाणे आठवले...
प्यार करना मेरे जीवन का है एक अंगहि ना |
मै हू खुशरंग हिना ||

मलता कळला नाही..
बाकी ठिकठाक..

हळव्या खुळ्या मनाने गुंतू नयेच कोठे
ना बंधही सुखाचा, सुटका मुळीच नाही >>> आवडला..

५ गुण..

सुंदर गझल....
शब्दयोजना खूप आवडली...
फक्त
"सत्यातल्या जगातुन जागे कुणीच नाही" यात ''जगातुन जागे'' जी रचना कळली नाही...
पण बाकी वाह....
माझे गुण ६.

*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

गर्दीत भोवतीच्या माणूस सापडेना
माणूस शोधण्याला का योग्य मीच नाही?>>>>

पहिला शेर अर्थास क्लिष्ट वाटतो.
माझे गुण ५

मतला नाही कळला Sad
वेदना - छान आहे. अनोळखी / परकी - तशी द्विरुक्तीच वाटतेय. मयुरेशशी सहमत.
वार्ता - वा! वा! पण...
"ना ही" - हे २ शब्द म्हणजे "नाही" हा रदीफ असे होऊ शकत नाही असे वाटते.
गर्दीत भोवतीच्या माणूस सापडेना
माणूस शोधण्याला का योग्य मीच नाही?
मस्त. ये हुई ना बात!!

माझे गुण - ६

हळव्या खुळ्या मनाने आणि गर्दीत भोवतीच्या हे दोन शेर आवडले खूप.
गुण? - मीच शिकायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे... Happy

पुढील गझलेसाठी शुभेच्छा!

तीन - चार आवडले Happy
हे गुण देणं नाय जमणार बा

माझं ज्ञान तोकडं पडतंय पण एकूणच खूप झेपली नाही !
एकूण गुण -- ४

अतिशय गंभिर गझल आहे..

हळव्या खुळ्या मनाने गुंतू नयेच कोठे
ना बंधही सुखाचा, सुटका मुळीच नाही

गर्दीत भोवतीच्या माणूस सापडेना
माणूस शोधण्याला का योग्य मीच नाही?

हे शेर तर अत्युच्च.
गुण ६

प्राजु

मक्ता खुप छान आहे... आवडली
५ गुण

वार्ता आणि शेवटचा शेर खासच!
मस्त गजल.

गर्दीत भोवतीच्या माणूस सापडेना
माणूस शोधण्याला का योग्य मीच नाही?

शेवटचा शेर खासच!!!

७ गुण..

६ गुण
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....

शेवटचा शेर छान.
वार्ता - हा शेरही मस्तच.

गुण - ६

गझल खूप छान आहे. आशयाला जास्त गुण.

कार्यशाळा: भाग घेतलेल्यांनी पण गुण द्यायचे ना?

Pages