प्रवेशिका - १ ( ITgirl - असे भोगले, राहिली आस नाही..)

Submitted by kaaryashaaLaa on 29 September, 2008 - 01:23

मित्रहो,
ठरल्याप्रमाणे कार्यशाळेत निर्दोष ठरलेल्या प्रवेशिका तुमच्यासमोर सादर करत आहे.
तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहेच, पण आणखी एक जबाबदारीही आहे तुमच्यावर.
प्रत्येक गझलला तुम्ही १० पैकी गुण द्यायचे आहेत.
हे गुणांकन तुमच्या अभिप्रायातच नोंदवायला हरकत नाही.
तर सादर आहे आजची प्रवेशिका....

असे भोगले, राहिली आस नाही
सुखे सोसले, मानला त्रास नाही

मनी कोंडला, सूर बेभान वेडा
असो बेसुरा! कोरडा खास नाही

जरी दु:ख दाटे, उरी भंगल्याचे
कुणा हाक देईन, हा ध्यास नाही

किती लोभ माझ्यावरी वेदनेचा
मिळाली सदा साथ, आभास नाही

असा होतसे प्राण श्वासांत गोळा
तरी साहिले, सोडला श्वास नाही

कधी जीत झाली, कधी हार झाली
तराजूमधे, तोलली रास नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"... कोरडा खास नाही" आणि "तराजूमधे..." हे शेर आवडले. 'वेदनेची साथ हा आभास नाही' ही कल्पनाही छान आहे.
'तराजूमधे रास न तोलण्याची' कल्पना नवीन वाटली.
उरी भंगल्याचे - काय भंगल ते (स्वप्न, आशा, इ.) स्पष्ट व्हायला हवं होतं असं वाटलं.
माझ्या मते गुण ४.

-सतीश

सहा गुण..दोन कोरड्याला व दोन तराजूला.

६ गुण- सगळे शेवटच्या दोन्ही शेरांसाठी...

असो बेसुरा...छान

४ गुण

'देईन' ही टायपो आहे का?
बेसुरा मस्त. छान आहे गजल, पण इतकी दु:खी का? Sad
५ गुण
-----------------------------------------------
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!

मस्तच!

गुण द्यायचे राहून गेले:

१) गझलचा विषय - १ गुण
२) शैली - १ गुण
३) शब्दरचना - २ गुण
४) प्रवाह - २ गुण
५) शेर - २ गुण
============
ऐकून गुण - ०८

किती लोभ माझ्यावरी वेदनेचा
मिळाली सदा साथ, आभास नाही

असा होतसे प्राण श्वासांत गोळा
तरी साहिले, सोडला श्वास नाही

हे शेर मस्त

६ गुण

किती लोभ माझ्यावरी वेदनेचा
मिळाली सदा साथ, आभास नाही

आणि

कधी जीत झाली, कधी हार झाली
तराजूमधे, तोलली रास नाही

हे दोन्ही शेर मस्त....

माझ्याकडुन ६ गुण....

असो बेसुरा! कोरडा खास नाही आणि तराजूमध्ये तोलली रास नाही - मस्त जमलेत.. ५ गुण

सुखे सोसले -- सुखे सोसली असं हवंय ना? जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.

गझल चा प्रयत्न छान आहे.

२ गुण.

बी, हे ऐकून गुण काय आहे? इथे गझल ऐकता येण्याची काही सोय आहे का?

व्वा!
सूर बेसूर होत नाही आवाज सुरात लागला नाही की त्याला बेसूर म्हणतात. तरीही त्या शब्दांत ती कल्पना बेफाम उतरलीये. वेदनेचाही आवडला.
माझे ६.
-----------------------------------------------------
जान दी, दी हुई उसी की थी
हक तो यह है, के हक अदा न हुआ

असा होतसे प्राण श्वासांत गोळा
तरी साहिले, सोडला श्वास नाही

छान!
माझे ६

व्वा !!
छान...
माझेही ६ गुण..

पूनम,

'देईन' व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे.

==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

सूर आणि वेदनेचे शेर आवडले..
माझे गुण - ४

*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

४ गुण

सुरुवातिलाच अशी विमनस्कता का??? Sad
छान आहे गझल.. ! चालित वाचण्याच्या दृष्टीने एकदम perfect..

actually.. इथे फिडबॅक देणं आणि गुण देणं मला जरा odd वाटतयं.. कारण खरच आपली तेव्हडी लायकी आहे का हा प्रश्ण आहे.. पण स्पर्धा असल्याने गझलकारांनो.. cbdg..

७ गुण..

वेदनेचा शेर सुंदर आहे.
तसेच तराजूचाही . माझे ६ गुण

वेदनेचा शेर - "सदा" ऐवजी "खरी" योजले तर "आभासा"ची कल्पना आणखी स्पष्ट होईल. पण शेर आहे तसाही मला फार आवडला!
कोरडा सूर ही छान. पण सुराला बेभान, वेडा, बेसुरा, कोरडा - इतकी विशेषणे जरा खटकली.
माझे - ५ गुण.

सहज जमुन आल्यासारखी वाटली , आणि सगळीच्या सगळीच आवडली,त्यातही २-३-५ जास्त आवडले
गुण देण्याएवढी समज अजून मला नाही Happy

वेदनेचा आणि बेसुरा खूप आवडला.
गुण? - मीच शिकायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे... Happy

पुढील गझलेसाठी शुभेच्छा!

वेदना आणि शेवटचा शेर आवडला. बेसुरा या शेरावर अजून विचार करतो आहे.
तोवर माझ्यातर्फे ५ गुण

>> असा होतसे प्राण श्वासांत गोळा
तरी साहिले, सोडला श्वास नाही

हा शेर खूपच आवडला.
माझे एकूण ५ गुण !

छान आहे गझल..
मनी कोंडला, सूर बेभान वेडा
असो बेसुरा! कोरडा खास नाही

हा शेर सुंदर.

गुण - ६

प्राजु

बेसूरा आणि वेदनेचा विशेष आवडला!
सुंदर गजल (गुणांचं बघू नंतर Happy )!

२ रा आणि ५ वा शेर अतिशय छान आहेत

गुण - ६

"किती लोभ माझ्यावरी वेदनेचा
मिळाली सदा साथ, आभास नाही "

क्या बात है!!!

गुण - ७.

५ गुण
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....

किती लोभ माझ्यावरी वेदनेचा
मिळाली सदा साथ, आभास नाही

असा होतसे प्राण श्वासांत गोळा
तरी साहिले, सोडला श्वास नाही

आवडले.

गुण - ५

माझी तेवढी लायकी नाही पण द्यायला हवे.
माझ्याकडुन ७ गुण.
भिडली. आवडली Happy

Pages