Submitted by अमृता on 15 June, 2010 - 17:03
कधी कंटाळा येतो तेव्हा आयतं खायला, कधी आपल्याला पिकनीकला जायचं असतं तेव्हा, कधी बाहेरगावी जाणार तिथे कुठे करत बसणार म्हणुन, जेवण नीट न येणार्या/वेळ नसणार्या नवर्याला/मुलाला खायला पटकन मिळावं म्हणुन तुम्ही घरी कधी करता का असं रेडी टु इट?
असल्या घरी करता येउ शकणार्या व टिकणार्या पाककृती इथे येउद्या.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजकाल भारतात अश्या गोष्टी
आजकाल भारतात अश्या गोष्टी अगदी सहज मिळतात. गोडाचा शिरा, सांजा(तिखटाचा शिरा), साबुदाणा खिचडी, साधी खिचडी.
वरील पदार्थांत साबुदाणा खिचडी सोडली तर बाकिचे पदार्थ अगदी सोपे आहेत. कोरडं साहित्य भाजुन, फोडणी, तिखट, मीठ घालुन झिपलॉक मधे भरुन ठेवता येतं. वेळेवर फक्त पाणी घालुन शिजवायचं.
अजुन असले काही पदार्थ सुचतायत का?
साखि कशी करत असतील?
माझी एक मैत्रीण पराठे करुन
माझी एक मैत्रीण पराठे करुन फ्रीझ करते. आलू पराठे किंवा प्लेन पराठे. थोडेसे जाड लाटून पुर्ण भाजून मग फ्रीझ करते. पण ती ते त्याच आठवड्यात संपवते बहुतेक.
फु.पा. पराठे स्टोअर कसे करते
फु.पा. पराठे स्टोअर कसे करते ती? झिपलॉक मधे की डब्यात?
ती फॉइल पेपर मधे बांधून मग
ती फॉइल पेपर मधे बांधून मग झिपलॉक मधे ठेवते.
माझी एक मैत्रिण पण पराठे
माझी एक मैत्रिण पण पराठे फ्रीझ करते. अर्धवट भाजते, पूर्ण थंड होऊ देते. पराठ्यामधे वॅक्स पेपर टाकते. ३-४ (एकावेळी घरातील २ माणासाना लागेल तितके) पराठ्यांचा गट्ठा झिपलॉकमधे घालून फ्रीझरमधे स्टोर करते.
पण पराठे बाहेर नाही घेउन जाता
पण पराठे बाहेर नाही घेउन जाता येणार
लगेच फ्रिझ करायला हवेत ते.
शेवया भाजुन, फोडणी मधे टाकून
शेवया भाजुन, फोडणी मधे टाकून , तिखट, मीठ घालून स्टोअर करता येइल्..हवे तेव्हा मॅगी साऱखे पाणी घालून शिजवता येइल..
MTR चा रवा ईडलीचा पॅक आणुन
MTR चा रवा ईडलीचा पॅक आणुन त्यात गरम पाणी घातले की मस्त उपमा होतो.
शेवया लक्षात आल्या नव्हत्या.
शेवया लक्षात आल्या नव्हत्या. थँक्स स्वप्नाली.
MTR चा उपमा मीही खाल्लाय. बराच बरा होतो तो.
एम्टीआरचे रवा इडली, डोसा
एम्टीआरचे रवा इडली, डोसा वगैरे पाणी घालून भिजवायचे पॅक्स मी ही आणलेत पण चवीला अजिबातच चाम्गले नाहीत ते. नवरे घरात एकटे असताना हवे असतील तर मे बी सांबाराकरता डाळ शिजवून फ्रिज केली आणि आयत्या वेळेला पाणी घालून उकळली तर सांबार जमू शकेल. दिपच्या फ्रोझन चटण्या चांगल्या आहेत. आणि डोशाचं पीठ मिळतंच तयार.
मला तरी त्या पोळ्या, पराठे करुन फ्रिज करणं हा ऑप्शन नको वाटतो. कितीही आयत्या वेळेला गरम करु म्हटलं तरी कडक होतातच.
घरच्या घरी इन्स्टन्ट सांबार
घरच्या घरी इन्स्टन्ट सांबार पावडर करता येते. मी इंटरनेटवर पाकृ वाचली होती. ती पावडर फक्त गरम पाण्यात घालायची, आवडीच्या भाज्या चिरून त्यात घालायच्या, उकळी आणली की सांबार रेडी!
मूगडाळखिचडी, तूरडाळखिचडी, भाताचे प्रकार असे कोरडे परतून ठेवता येतात फ्रीजमधे.... आयत्या वेळी भाज्या, पाणी घालून शिजवायचे!
वेगवेगळी पिठे कोरडी भाजून त्यात ड्रायफ्रूट्स, भाजलेले सुक्या खोबर्याचे काप इ. घालून पण स्टोअर करता येते. आयत्या वेळी गरम दूध, गूळ/ साखर घालून उकळी आणायची.... मस्त पॉरिज. किंवा नुस्त्या त्या मिक्श्चर मधे गरम दूध, साखर घालून सारखे करून खायचे. सातू, कणीक, पंढरपुरी डाळ्याचे पीठ वगैरे.
मुळ्याचे पराठे सक्सेसफुली
मुळ्याचे पराठे सक्सेसफुली फ्रीझ केले आहेत. कळत सुद्धा नाही , इतके छान फ्रीझ होतात.
कुकीज च मिक्स कधीतरी मुड आला तर घरी तयार करते. टाइम सेव्ह करण्यासाठी. पैसे सेव्ह वगैरे होत नाहीत. उलट विकतच्या कुकी मिक्स पेक्षा ते महाग पडत. पण मला त्या कुकीज आवडतात.
रेडिमेड उपमा मिक्स आई करुन देते. दुपारच्या वेळी भुक लागली कि खायला बर पडते.
अकु, खिरीची आयडीया छान. सीमा,
अकु, खिरीची आयडीया छान.
सीमा, आई उपमा मिक्स करते तेव्हा त्यात कांदा घालते का? कांदा घातलेलं बरेच दिवस टिकणार नाही ना?
मी सांजा(तिखटाचा शिरा) करते त्यात कांदा नाही घालत तो कितीही टिकतो.
कांदा नाही घालत आई (बहुदा).
कांदा नाही घालत आई (बहुदा).
ठांकु अमृता! फक्त ३-४
ठांकु अमृता!
फक्त ३-४ दिवसांचा प्रश्न असेल तर ग्रेव्ही देखील करून ठेवता येते फ्रीजमध्ये. कोरडे खोबरे, सुक्या मिरच्या, गरम मसाला/ पंजाबी मसाला, टोमॅटो प्यूरी वगैरे वापरून. आयत्या वेळी हवी तेवढी काढून घ्यायची, त्यात उकडलेल्या भाज्या (बटाटे, फ्लॉवर इ.) च्या फोडी किंवा पनीर घालून गरम करायची भाजी आणि खादडश्चमे!
त्यात आजकाल रेडी टू ईट मिक्सेस चिक्कार मिळतात बाजारात! आपण करून तो पदार्थ फ्रीझ केला तरी कधी कधी तो टिकेल की नाही ह्याची धाकधूक असते. त्यापेक्षा रसोई मॅजिक किंवा तत्सम रेडी टू ईट मिक्सेस आणून ठेवली की त्यात आवश्यक भाज्या वगैरे घालून कालवण रेडी!
ज्यांना गोड पदार्थ आवडतात त्यांच्यासाठी वेगवेगळे साखरांबे, मुरंबे, सुधारस वगैरे प्रकार करून ठेवता येतात.
नमस्ते, मी बाहेरगावि जातना
नमस्ते,
मी बाहेरगावि जातना नेहमि पुरणाच्या पोळ्या क्रुन ठेवते भरपूर घरी राहिलेल्यअन्साठि. मस्त टिकतात १५-२० दिवस.
शेन्गदाण्याची चटणी, मेत्कुट असे जोडीला.
http://showmethecurry.com/odd
http://showmethecurry.com/odds-ends/how-to-make-masala-in-bulk
फार उप्योग होतो या मसाल्याचा.