असा मला एक भुताचा चित्रपट काढायचाय...

Submitted by ऋयाम on 11 June, 2010 - 21:41

हो. असा मला एक भुताचा चित्रपट काढायचाय.

कारण.... बरीच वर्षं झाली आता, रामसे बंधु रिटायर झालेत... नवा पिक्चर काढतच नाहीयेत... म्हणजे एखादा "शैतान का ... ", नाहीतर "खुनी ... " किंवा "प्यासी ... "? काहीच नाही तर नुसतंच "आ~"? अमिताभच्या "पा~" सारखं?

बर चित्रपट सोडा. एखादा "झी हॉरर शो" तरी बघितला असता? तिथं तर दर आठवड्याला नवं भुत, त्याचं नवं "भुतडं"! "भुताचं रुप म्हणजे भुतडं" असं म्हणता येईल का हो?? त्यातुन त्यांना (म्हणजे आदरणिय रामसे बंधुंना) बरी गोष्ट मिळाली तर मग दोन भाग! फुल्ल भारी! या आठवड्यात भुत बघायला गेलं, की "आयला! याला कुठं तरी पाहिलंय... थांब आठवतो... सांगु नकोस. आठवेल .. हां! "मास्तर.." नाही.. "पी एम"... नाही.. " "आयला, हे तर आपलं लास्ट वीकचं भुत!" पण आजकाल "झीवर हॉरर शो" ही नशिबात नाही. तिथं "झीटीव्ही"वर "मिल्या" फेम "काय रे देवा सारेगमप" चालु असतं. आता "आपल्या पल्लवी" ला कोणी "म्हातारी" म्हटलं असतं तर त्याचा खुन प्यायला मी भाड्यानं भुतं पाठवली असती, पण तिचे ते ड्रेसेस हॉरर आहेत असं कोणी म्हटलं मात्र मोदकच पाठवीन...

बाकी मग "सागर बंधु"ही सुट्टीवर गेलेत... त्यांचा "हॉरर शो" नसला, तरी "भुतंखेतं" होतीच की त्यांच्या राज्यात. म्हणजे आपली "अलिफ़ लैला!"
"अलिफ लैला", "अलिफ लैला", "अलिफ लै ए ए ए ए ला"
एका एका एपिसोड मधे पन्नास पन्नास राक्षस. त्यांच्या राक्षशीणी. (इथं एकास एक प्रमाण नव्हतं बहुतेक... )
तर ते राक्षस! त्यांच्या मोठ्या मोठ्या भिवया. काळे कुरळे वीग आणि सुटलेली पोटं. राक्षसांची जीन्स कुठली बघायला हवं पण. नाहीतर सगळ्या राक्षसांचे केस काळेच कसे असतात? आणि एकदम घनदाट वगैरे... खुद्द सिंदबाद काय कमी हॉरर होता??

भुतंच हवी तर मग थोडंसं "ब्योमकेश बाबु" चं "ब्योमकेश बक्षी" बघितलं असतं. त्यातही मधुन मधुन भुतं असत. पण ते तर बंदच पडलंय... हाट.

काल रात्री घरी आलो, आणि युट्युब बघितलं. तिथं बरेच दिवसांपुर्वी त्यावर एक चित्रपट पाहिला होता.. "फ्रँकेन्स्टाईन्स कॅसल ऑफ फ्रीक्स"! रामसे बंधुंनी कुठुन प्रेरणा घेतली असावी याचा अंदाज आला. पण तो चित्रपट पाहिल्यापासुन एकुणच आपल्या भारतिय भुतांची फारच आठवण येत होती. पण पर्याय नव्हता. वरचं सगळं आठवलं आणि गदगदुन, भरभरुन आलं.

म्हणुन मग मला वाटु लागलंय. मनात आलंय. आणि असा मला एक भुताचा चित्रपट काढायचाय.
नाव सुचवा : -
१. राखी की हवेली.
२. राखी इन भुतांची फॅक्टरी. ( हो. मराठी मधे. कक्षा रुंदावुया की इथेही. आणि आपली राखी शेवटी मराठीच आहे ना. (कशीही असली तरी असं मी अजिबात म्हटलं नाही! ) ) आणि
३. "रा~" (बरोबर. पा~ सारखं.)
* हाट. "राखी का स्वयंवर" आधीच गेलं Sad

बरोब्बर. आपली हिरॉईन फिक्स आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी. तिनही भाषेत चित्रपट बनवायचाय. या तिनही भाषा अस्खलित येणारी, सुंदर, केवळ भुमिकेच्या गरजेपोटी "अं" प्रदर्शन करणारी, छान डांस करणारी एखादी हिरॉईन हवी होती. आपली राखीच काय वाईट आहे? म्हणुन ती फिक्स आहे.
तिची धाकटी. बर मोठी. मोठी बहिण म्हणुन "आपल्या पल्लवी" ला घेऊ. पण केवळ ती सारेगमप मधील वार्डरोब मधे येणार असेल तरच! आणि एक हिरो हवा आहे. सापडेल.... हिरोचं काही महत्त्व नसतं हॉरर चित्रपटात... Light 1

आणि हां... लोकेशन उटीमधे. ती जागा "सावन कुमारनं" सोडली म्हणतात. तर तिथं एखादी हवेली शोधीन म्हणतो. हवेलीत लाईट्स नसावेत. सगळीकडे झुंबरं मात्र हवीत. आणि मेलेल्या वाघांचे "आ~" केलेले ... "काय म्हणतात त्याला??" टेबल क्लॉथ? तर ते वाघाचे टेबल क्लॉथ.. आणि ढाली-तलवारी हव्यात. मग एक? नाही ३. ३डॉबरमॅन कुत्रे. हवेलीत एखादा कुबड असलेला, कंदिल घेतलेला नोकर घ्यायचाय. त्याची मुख्य भुमिका आहे, राखीनंतर. तोच तिला घाबरवणार आहे. कॉमेडियन्स लागतील ४-५. त्याशिवाय रिलीफ कसा मिळणार! बाकी म्युझिक बॉप्पीदा. डान्स डायरेक्टर "सुबल सरकार". गायक चालेल कोणीही.

आणि हां! एक पाद्री हवाय... अन्नु कपुर काय करतो हल्ली? मराठी येतं त्याला. सचिन-लक्षा-अशोक सराफच्या चित्रपटात होता कुठेतरी. आपल्या चित्रपटात पहिला बळी त्याचाच! कुबड्या नोकर मात्र मरणार नाही. पुढे..... पुढे..... पुढे काही सुचत नाहीये हो... पण सुचेल. काही सुचलं नाही तर "भुमिकेच्या गरजेपोटी" राखीची दोनचार गाणी टाकु. भिती वाटवायला "पल्लवीला" अजुन दोनचार ड्रेस बदलायला लावु. अगदीच काही नाही, तर एखादा नवा हॉलिवूड चित्रपट पाहु.

आणि हो. विसरलोच होतो. मुख्य भुमिका भुताची! तुमच्या आजुबाजुला कोणी होतकरु भुतं असतील, तर माझ्या विपु मधे डोकवायला सांगा. "दिवसा"च. हो. हो. दुसरं योग्य भुत मिळालं नाही, तर मीच भुत होईन म्हणतो. मीही परफेक्शनीस्ट आहे. Light 1 बाकी, भुतांसाठी "रा बंदु आणि सा बंधु"शीही संपर्क साधला आहे. त्यांचं उत्तर आलं, की लग्गेच डिटेल स्टोरी लिहायला घेणार आहे. स्टोरीचं होईल काहीतरी, पण तुर्तास सांगणे इतकेच, की ह्या लाईन वरती असा मला एक भुताचा चित्रपट काढायचाय...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राखी सावंतला घेतल्याने मराठीच्या 'कक्षा' रुंदावतील यात शंका नाही Proud
पल्लवी जोशीला सारेगमपच्या वॉर्डरोबसकट घेणे हे सगळ्यात 'हॉरर' आहे.

मस्त लिहिलय. मेकप साठी शाहनाझ हुसैन ला पर्याय नाही. हवा तर एखादा रोल तिलाच देता येईल (वेगळ्या मेकपची गरज नाही. ) नृत्य दिग्दर्शनासाठी सरोज खान. एखादी भुमिका तिलाही देता येईल (वेगळ्या मेकपची गरज नाही)
सर्वधर्म समभाव म्हणून एक हिंदू मांत्रिक हवाच.

शहनाझ हुसेन बद्दल अगदी सहमत!
वाघाचे टेबलक्लॉथ घातलेल्या टेबलाशेजारी शहनाझ हुसेन नेहेमीसारखे वाघाचे कपडे घालून, केस पिंजारून बसली तर किती भयाण सुंदर दिसेल!! Lol

शहनाझ हुसैन बद्दल फुल्ल सहमत! Happy
फराह खान पण चालली असती. पण ती आली की शाहरुखला घ्यायला लागेल. तिच्या भावाला घ्यावं लागेल. श्रेयस लाही. Uhoh (श्रेयस आपलाच आहे, पण ... )

दिनेशदा, सर्वधर्मसमभाव भारी Happy
असं करुया का?
हिंदु मांत्रिक, ख्रिश्चन पाद्री. हवेली मधे इतर भाडेकरु(?) म्हणुन एक बाँगॉली जॉडपू. राखी आणि मंडळी (हिरो चं ठरलं की सांगु..) पिकनिकला येताना एका उडूपी हॉटेलात राखीचा कॅब्रे. तिथलं "मेदु वडा-उडिद वडा मिक्स" सांबार खाताना हिरो का दिल राखी पे. की साउथही खुश.
गाडीचा ड्रायव्हर पंजाबी. की तेही झालं. आता पुर्वोत्तर राज्ये राहिली. त्यांना आपलं सरकारही विचारत नाही. आपण काय बात ? Sad

>> बाकी म्युझिक बॉप्पीदा
बॉप्पीदांचा मीटर डाउन आहे सध्या. सोने की गलियोंमे गाने को जगा नही असं काय्तरी मागच्याच मुलाकतीत बोललेले ब्वॉ. पण ते आउटसोर्स करतात गाणं आउटहाऊसमध्ये राहणार्‍या बाप्पाला हिरीला.
नाहीतर्मग दाबून मलिक आहेच !

>> त्यांना आपलं सरकारही विचारत नाही
म्हणूनतर गुरखा फिरवायचा. [गुटखा नव्हे]

Happy जबरी हॉरर होईल चित्रपट. काही ठिकाणी अपेक्षितपणे तर काही ठिकाणे अनपेक्षितपणे.

राखी चे सर्व उल्लेख राखी सावंत बद्दल आहेत ना? नाहीतर राखी (ती जुनी 'मेमसाब') चा कॅब्रे हा हॉरर चा स्वतंत्र विषय होईल Happy

<सोने की गलियोंमे गाने को जगा नही >
हे बॉप्पीदा कसं म्हणु शकतात? Uhoh

मंदार्_जोशी,
बघा बघा. मराठी माणुस मराठीच्या कक्षा रुंदावायचा प्रयत्न करतोय, आणि तुमच्यासारखे लोक... Angry

फारएण्ड,
आप्ली राखी म्हणजे, सावंतांची राखी. का जो कोणी तिचा नवरोबा आहे त्याची. तु ती गुलजार काकांची म्हणतोय्स का? Happy की अजुन कोणी?

सिम्मी, डॉली ठाकूर, (सध्याची) कु. रेखा (गणेशन), सबिरा मर्चंट, (सध्याची) बिंदू या सगळ्यांना कबरींच्या मागे उभे केले, तर खरी भूतं पण घाबरुन पळून जातील.
ऋयाम, सर्वधर्म समभावात त्यांना पण नको का खुष करायला ?

काय मंदार Happy

दिनेशदा, नमस्कार तुम्हाला.
ह्यातले विशेष कोणीच माहित नाहीत. सबिरा मर्चंट कोणीतरी मॉडेल असेल म्हणुन पाहिली, आणि आता झोपायला भिती वाटु राहिलीये Uhoh

योगेश२४,
हुमा खान पण डन Happy तिला हिंदीच बोलायला देऊ. मराठी येतं का माहित नाही... Happy
पण कास्टींग चं आपण दिनेशदांकडे द्यावं का असा विचार चाल्लाय.

"भरून आले आसमंत
रडू लागले संत
या ऋयामच्या सिनेमात
ती टवळी राखी सावंत?" राखीच्या लग्नात तिच्या नवरोबाला हा उखाणा म्हणून चालेल! Rofl

अर्रे हेलनला पण विसरलात की काय.... आणि आताची झीनत अमान, आताची निर्मिती सावंत, आताची अरुणा इराणी.... भूतनायिकांची यादी खूप मोठी आहे रे! Happy

हुमा खान ने दादा कोंडके यांचा एका चित्रपटात (थोडे कपडे घालून) नाच केला होता की.
सबिरा मर्चंट तशी पुर्वी चांगली दिसायची. दूरदर्शनवर व्हॉट्स द गुड वर्ड नावाचा कार्यक्रम करायची. स्ट्रीटकार नेम्ड डिझायर, नाटकात भुमिका करायची. शाम बेनेगलच्या त्रिकाल मधे पण होती. तिचा नवरा छोटू मर्चंट, त्याचा नरिमन पाँईटला स्टुडिओ २९ म्हणुन क्लब होता. (इति सबीरा पुराण संपुर्ण )

खरच हल्ली भुताचे सिनेमे का नाही निघत?? कित्ती कित्ती मजा असायची त्यात. भुतं बघुन हहगलो होत असे कायम. Proud
काढाच हा सिनेमा. आम्ही जरुर बघु. Wink

बाकी लेख वाचलेला नाही अजून. बाकी शहनाझ हुसेनचं मी समजू शकते. तिला रामसेंनीच संधी दिली असती तर रुयामवर अशी वाईट वेळ नसती आली Wink पण सबिरा मर्चंट? आणि ती ही हॉरर पिक्चरमध्ये? Uhoh

दिनेशदा,बस्के.. शहनाझ हुसेन?? Lol
ऋयाम नी कालची रविवार ची सुट्टी कांदाभजी न करता रामसे बन्धूंना चॅलेंज कसं करायचं हा विचार करण्यात घालवलेला दिस्तोय Biggrin

>>राखी चे सर्व उल्लेख राखी सावंत बद्दल आहेत ना?
मी पण हेच विचारणार होते Wink
बाकी तुझा सिनेमा हिट होईल नक्की Happy

पण कास्टींग चं आपण दिनेशदांकडे द्यावं का असा विचार चाल्लाय.>>>>ऋयाम चालेल रे Happy

पण संगीत दिग्दर्शक म्हणुन हिमेश रेशमियालाच घे (मराठीची ट्रेनिंग आपण देऊच), नाहीतरी तो नाकातच गातो त्यामुळे बॅकग्राउंड हॉरर म्युझिक वेगळे द्यायला नको (तेव्हढाच तुझा खर्च वाचेल :)). आणि दुसरा फायदा तो काय गातोय ते कळणारच नाही त्यामुळे आपल्या "मला चुकीची ऐकू आलेली गाणी" या बाफवरपण भरपुर प्रतिसाद येतील. Wink

हीरो साठी पर्यायः१)किशन कुमार (आज ही हमने बदले है कपडे वाला)
२)राहुल महाजन (याला सन्वाद नाही द्यायचे फक्त हसायला सान्गायचे)
३)उतरन मधला 'वन्श' (याचे खरे नाव माहित नाही)

>> बाकी शहनाझ हुसेनचं मी समजू शकते. तिला रामसेंनीच संधी दिली असती तर रुयामवर अशी वाईट वेळ नसती आली

शहनाझ हुसेन या नावाची हिरवीण होऊन गेली Uhoh Proud

चित्रपटाचा पहिला सीनः पल्लवी डास मारतेय. त्याचा आवाज झुंबरांमधून Eco होतोय आणि टाळ्या वाजल्यासारखे वाटते आहे. कुबडवाला नोकर कंदील घेऊन येतोय, पण अंधार पडलेला नाहीय म्हणून तो काचा पुसायचं काम करतोय. राखी सांवत येते. कपडे यापुढे काढणं मराठी सेंसारला झेपणार नाही, म्हणून फक्त नेकलेस काढतेय. कॅमेरा झुम इन. मग तिचा ड्वायलागः ताई काय करतेस? (अंगाला आळोखे पिळोखे: कॅमेरा अर्थातच गळ्यावर.. सस्पेंस). डास मारण्यावरून आठवलं, मला डान्स करावासा वाटतोय.... दणादणा मुझिक आणि हिमेशच्या गाण्यावर नाच. Happy

Pages