टीशर्ट आले! टीशर्ट आले!!

Submitted by टीशर्ट_समिती on 10 June, 2010 - 06:59

गडद निळे गडद निळे यंदाचे टीशर्ट आले
चपलचरण हे हरीण जणू,सुखवस्तू अन् तुंदिलतनू
लेऊनी रंग हर्षाचे,मायबोलीकर हे वविला निघाले
ह्रदयी आले भरते गं, मनात सावरी फुलते गं
बरसती अंबर, सृष्टी सुंदर, लेवूनी स्वरसाज गाती गं
उत्साहाचे लेणे गं, अविरत आनंद झिरपे गं
सरींवर सरी येती गं, सचैल मायबोलीकर न्हाती गं......

(कवी बा. भ. बोरकर ह्यांची क्षमा मागून...)

जून महिना आला, पाऊस आला, वविची दवंडी आली आणि पाठोपाठ मायबोलीचे टीशर्टही आले की... Happy

tshirt final 2010.jpg

टीशर्टचा रंग आपल्या सर्वांनाच आवडणारा 'गडद निळा'... आहे की नाही छान?

वर चित्रात दर्शवल्याप्रमाणे यंदाचे टीशर्टस् राऊण्ड नेक परंतू लेडिज आणि युनिसेक्स अश्या दोन प्रकारात पुढील साईजेसमध्ये उपलब्ध आहेतः-
-- Extra Small (XS)
-- Small (S)
-- Medium (M)
-- Large (L)
-- Extra Large
-- Extra Extra Large

टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-

साईज-------रुंदी(2 L)-------उंची(H)
XXL-------46"-------33"
XL -------44"-------31.5"
L -------42"-------30"
M -------40"-------28.5"
S -------38"-------27"
XS -------36"-------25.5"
XXS-------34"-------24"

Tshirt size.JPG

लेडीज आणि युनिसेक्स दोन्ही प्रकारच्या टीशर्टसाठी ही मापे आहेत.

टीशर्टच्या उजव्या बाहीवर आपल्या मायबोलीचा लोगो आणि टीशर्टच्या पाठीवर URL Address : www.maayboli.com असेल.

यंदा मायबोलीच्या टीशर्टची संकल्पना आणि सुलेखन केले आहे सिद्धहस्त चित्रकार मायबोलीकर पल्ली हीने.... तिच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला विसरू नका Happy

टीशर्टची किंमत आहे : रूपये १६०/- + रूपये ५०/-(देणगी) = एकूण रूपये २१०/-फक्त

मायबोली टीशर्ट उपक्रमातून उभी होणारी देणगीची रक्कम आपण ह्यावर्षी 'एकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यास' ह्या संस्थेला देणार आहोत. ही संस्था २००२ सालापासून पुण्यात कार्यरत आहे. वेश्यांच्या, मद्याधीन, एड्सग्रस्त पालक आणि एकटे पालकत्वाची शिकार असलेल्या समाजातील दुर्लक्षित अश्या मुलांसाठी ही संस्था काम करते. ह्यातील बहुतेक मुले ही दारीद्र्य रेषेखालील गटात मोडतात. ह्या मुलांचे 'उत्तम भविष्य घडवणे' ह्या ध्येयाने प्रेरीत झालेल्या एकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यासाला मदत करण्यासाठी जास्तीत जास्त टिशर्ट्स घ्या असे टिशर्ट समिती आपणां सर्वांना आवाहन करीत आहे. ह्या संस्थेची अधिक माहिती आपल्याला इथे मिळेल http://www.ekalavyapune.org येथे मिळेल.

मग चला तर, आपली ऑर्डर tshirt@maayboli.com ह्या पत्त्यावर खालील स्वरूपात धाडा पाहू Happy

१. नाव (अनिवार्य)
२. मायबोली id (अनिवार्य)
३. पत्ता आणि भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमांक (अनिवार्य)
४. टी- शर्ट चा प्रकार - लेडिज्/जेण्ट्स/किड्स (अनिवार्य)
५. टी- शर्ट चा साईझ (अनिवार्य)
६. टी- शर्टची संख्या (अनिवार्य)
७. पैसे कुठे भरणार - पुणे/मुंबई

मेलच्या subject मध्ये Maayboli T-shirt order असे लिहावे.

आपण पाठवलेल्या मेलची पोचपावती देण्यात येईल.

आपली ऑर्डर दिनांक २६ जून २०१० पर्यंत नोंदवावी. त्या नंतर कुठलीही ऑर्डर स्विकारली जाणार नाही.

kids tsh.jpg

टीशर्टचे पैसे भरण्यासाठी दिनांक २७ जून २०१० रोजी आपण पुणे व मुंबई ह्या दोन्ही ठिकाणी मेळावा आयोजित करणार आहोत.

पुणेकर मायबोलीकरांसाठी:
स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील वटवृक्षाखाली
वेळ: सं. ५.३० ते ८.००

मुंबईकर मायबोलीकरांसाठी:
स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात
वेळ: सं. ५.३० ते ८.००

दिनांक २७ जून २०१० पर्यंत ज्यांचे पैसे जमा होतील त्यांचीच ऑर्डर नक्की करण्यात येइल ह्याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी.

ह्यादिवशी आपल्याला प्रत्यक्ष हजर राहून पैसे भरणे शक्य नसल्यास किंवा टिशर्टसंदर्भात इतर काही शंका असल्यास आमच्या संयोजकांशी संपर्क साधावा, ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील.

विनय भिडे (मुंबई) - ९८२०२८४९६६
आनंदसुजू (मुंबई) - ९८२०००९८२२
परेश लिमये (पुणे) - ९८९०४३०१२३

टीशर्ट वाटप होईल दिनांक ११ जुलै २०१० रोजी पुढील ठिकाणी, ह्या दिवशी आपण वर्षविहार २०१० ची वर्गणी गोळा करण्यासाठी भेटणार आहोतच.

पुणे:
स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील वटवृक्षाखाली
वेळ: सं. ५.३० ते ८.००

मुंबई:
स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात
वेळ: सं. ५.३० ते ८.००

टीशर्ट वाटपाच्या दिवशी जे मायबोलीकर हजर राहू शकणार नाहीत ते वर्षाविहाराच्या दिवशी टीशर्ट घेऊ शकतील. जे मायबोलीकर टीशर्ट वाटपाच्या दिवशी अथवा वर्षाविहाराच्या दिवशीही आपले टीशर्ट घेऊ शकणार नाहीत त्यांनी संयोजकांशी संपर्क साधून टीशर्ट घेण्याची व्यवस्था करावी.

मुंबई - पुण्याबाहेर तसेच भारताबाहेर राहणारे मायबोलीकर मुंबई - पुण्यातील मायबोलीकर मित्रमंडळी अथवा नातेवाईकांमार्फत टीशर्टचे पैसे भरू शकतात तसेच टीशर्ट घेऊही शकतात. मात्र ऑर्डर नोंदवताना त्यांनी कोणामार्फत पैसे भरणार व टीशर्ट घेणार तसेच त्या मायबोलीकराचे/ नातेवाईकाचे पूर्ण नाव व भ्रमणध्वनी क्रमांक देणे अनिवार्य आहे.

तेव्हा, दरवर्षीप्रमाणे यंदाही मायबोली टीशर्ट उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्या.... आपली ऑर्डर त्वरीत नोंदवा.

टीशर्टांची ऑर्डर नोंदणी दिनांक २८ जून २०१० रोजी बंद करण्यात आली आहे. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

टीशर्ट उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.

टी शर्ट छान आहेत. फक्त तो डीझाईनवाला पार्ट अजून मोठ्या इमेजमधे टाकाल का??

वेगळं डीझाईन दिसतय म्हणून उत्सुकता!! Happy

-- Extra Small (XS) 36"
-- Small (S) - 38"
>>
ह्या दोघांपैकी नेमकं कोणतं मला येईल ह्याबाबत गोंधळ आहे. प्रत्यक्ष टी-शर्ट पाहुन सांगितलं तर चालेल का??

सहीच! सगळ्यांना आवडता रंग निवडल्याबद्दल आभार!
७. पैसे कुठे भरणार - पुणे/मुंबई >> हे अनिवार्य नाहीये ते बरे झाले! Wink

टीशर्ट डिझाईन मस्त आहे! Happy
पुण्यामुंबई बाहेरच्यांनी कशी नोंदवायची ऑर्डर? आणि टीशर्ट जर ११ जुलैला घ्यायला जमलं नाही तर कोणाकडून आणि कसे घ्यायचे?

यो तू Small (S) - 38" घे. झाला तर थोडा लूज होईल पण ते बरं ना. मला ४२" लूज होईल पण वाढत्या मापाचाच बरा Proud

पल्लीतै, डिझाईन मस्त !! पाठीवर थाप भेटलीस की मग घालेन ! Happy
टीशर्ट समिती धन्यवाद ! Happy

पल्ले खुप मस्त ग Happy

खुपच छान.

मलाही नेहमी हाच प्रश्न पडतो की यातला आपल्याला नक्की कोणता होईल आणि मग या विचारात शेवटी राहुनच जात Sad

टिशर्टचं डिझाइन आवडलं.माझ्यासाठी २
आमच्या आफ्रिकन रंगाला शोभेल का टीशर्ट? Proud

मी ऑर्डर नोंदवली सुद्धा.
पल्ली, अभिनंदन. अत्यंत सुंदर डिझाईन. Happy

शैलजा, वत्सला,

वर लिहील्याप्रमाणे आपण मुंबई - पुण्यात राहणार्‍या आपल्या मायबोलीकर मित्रमंडळी अथवा नातेवाईकांमार्फत टीशर्ट्स नक्कीच घेऊ शकता.

योगमहे, मनिषा लिमये
सर्वसाधारणपणे बाजारात मिळणार्‍या टीशर्टच्या मापांप्रमाणेच ह्या टीशर्ट्सची मापे आहेत.

आशूडी,
दिनांक २७ जून २०१० पर्यंत ज्यांचे पैसे जमा होतील त्यांचीच ऑर्डर नक्की करण्यात येइल ह्याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी.

वा, वा! पल्ली मस्त डिझाईन. साधे आणि सुबक.
स्त्रियांसाठी वेगळे ठेवलयाबद्दल आभार.
ऑर्डरची इमेल लवकरच पाठवत आहे.

माझ्याजवळच्या मायबोली कराने त्वरीत मला संपर्क साधावा.. मला २ टि शर्ट हवे आहेत. Wink बाकी डिझाईन बद्दल माझ्या अनुशंघाने मी लिहिनचं.

पल्लीचं टीशर्टावरलं डिझाइन आवडलं. रंग पण छान निवडला आहे.

भारताबाहेर असणार्‍यांसाठी टीशर्टांची काही सोय होऊ शकते आहे का? अमेरिकेतून भारतात जाणारी (आणि इकडे परत येणारी) मंडळी शर्ट्स आणू शकत असल्यास त्यांनी या बाफावर तसं कळवलं तर खूप बरं होईल. भारताबाहेरच्या लोकांसाठी पैसे भरायची काही सोय आहे का? कृपया कळवा.

यावेळी टोप्या नाहीत का?

पल्ली मस्त डिझाईन .. आवडल. आमची पण ऑर्डर नक्की...

मागे युएस वाल्यांसाठी पण काहितरी सोय होती. किरणने कॉर्डीनेट केलेल तेव्हा(मागे म्हणजे २००० साली असावं.) तस काही करता येइल का?

मृ, मी जात्ये देशात जुलै मधे. मी आणेन कुणाला हवा असेल तर. Happy

Pages