जॉर्जियातल्या खाऊगल्ल्या

Submitted by मिनी on 10 May, 2010 - 10:29

जॉर्जिया स्पेशली अटलांटा आणि आजुबाजुच्या चांगल्या देसी-नॉनदेसी हॉटेल/ रेस्टॉरंट बद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.

cat1.jpg

(त. टी. फोटो अंतरजालावरुन साभार. )

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या काही आवडत्या जागा.
देसी स्टाईल नॉन व्हेज : झायका, पटेल ब्रदर्स जवळ, डिकेटर. चिकन ६५ ऑस्सम मिळतं तिथे.
हिमालया : पीच ट्री इंडस्ट्रीयल बुलेवार्डवर. तंदुरी चिकन मस्त मिळतं तिथे.
देसी : मोक्श, भोजनीक, पॅलेस.
थाय फुड : नान, डाउनटाउन अटलांटामध्ये
सात्ये हाऊस, अल्फारेटामध्ये हायवे ९वर
जापनीज : शुगन, ठिकाण आठवत नाही नक्की.
अजुन आठवेल तसं लिहिन.

कधी आमच्या अ‍ॅS थेन्स जॉSS ज्या मधे गेलात तर ब्रॉड स्ट्रीटवर गिरो/ यिरो/ गायरो (GYRO) रॅप्स मधे नक्की जा. व्हेज असलात तर फलाफल रॅप्स अप्रतिम असतात.
आणि जॉSS ज्या बद्दल बोलताय तर वॉफल हाउसेस मधे जाणं मस्ट आहे. कुठेही... जॉSS ज्या च काय सगळ्या साउथमधे.

पूर्वी एक जपानी रेस्टॉरंट होतं तिथे ते अजून आहे का नाही ते बघून मग इथे टाकेन.

साऊथ इंडियन फूड करता - सर्वणाभवन, एमजीआर पॅलेस (स्टोन माऊंटन जवळ आहे, जुन्या मद्रास सर्वाणाभवनच्या टीम चे).
श्रीकृष्ण विलास आणि उडिपी पण आहेत पण आम्ही तिथे १-२ वर्षात गेलो नाही आहोत

थाय करता - कॉब मधलं 'टॉप स्पाईस' जबरदस्त आहे!

बाकी आठवतील तसे टाकेन.

कुणाला मेक्सिकन तापाज साठी अल्फरेटा किंवा आसपास चांगलं ठिकाण माहीत आहे का? पूर्वी जोन्स ब्रीजवर एक होतं पण ते बंद झालं.
हायवे ९ वरच्या हॉट ब्रेड्स मधे चिकन ६५ ट्राय केलं. रंग रंगोटी जास्त होती पण चव छान!!
चिकन आणी मटण बिर्यानी साठी हायवे ९ वरच रॉसवेल मधे "अलिबाबा ग्रोसरीज". दर शुक्रवारी मिळायची बिर्यानी. खूप दिवसात जाणं नाही झालं त्यामुळे वार बदलला असल्यास माहीत नाही. पूर्वीच्या "मिनर्व्हा" मधला माणूस पण घरी ऑर्डर प्रमाणे बिर्यानी बनवून देतो. मी ट्राय नाही केली पण ईथलं तेलगू पब्लीक जाम फिदा आहे.

बिर्यानी श्रीकृष्ण विलास मधे पण मस्त असते एकदम !
तिथले सगळेच राईसचे प्रकार चांगले असतात...

मेक्सिकन तापाज म्हणजे काय ?

तापाज म्हणजे अ‍ॅपेटायझर्स चे छोटे छोटे पोर्शन्स असतात. चटपटीत स्पॅनिश फूड. श्रीकृष्ण विलास कडे फार सोडा घातल्या सारखी वाटते राईसची चव. निदान बुफेला तरी. अ ला कार्ट साठी असते का चांगली बिर्यानी? चाट छान असतं त्यांच्या कडे.

वीकेंडला अ‍ॅव्हेन्यू मॉलमध्ये(Exit 13) "टिन ड्रम" ट्राय केलं. देसी स्टाईल चायनीज फूड.छान होतं.

मेक्सिकन्/इंडीयन्/अमेरिकन फ्युजन फुड साठी डिकेटर मधलं भोजनीक चांगलं आहे. नॉन देसी मित्रांना घेवुन जायला वगैरे.....अ‍ॅम्बीयन्स देसी नसतो...तसंच लाइव्ह बँड वगैरे असतो कधी कधी....

नॉन देसी साठी अजुन एक म्हणजे वोर्टेक्स बार अँड ग्रिल...अ‍ॅटलांटा मधे दोन तीन ठिकाणी आहे....बजेट मधे आणि गुड फुड...

भोजनिक बद्द्ल खूप ऐकलं आहे. बरेच दिवसांपासून लिस्टवर आहे.कुणी ते "वेस्ट ईन सन डायल रिव्हॉल्व्हींग रेस्टॉरंट" ट्राय केलंय का डाऊन टाऊन मधे? असेल तर फूड, अँबियन्स्,आणी प्राईज च्या बाबतीत माहिती देऊ शकाल का?

वेस्ट ईन सन डायल रिव्हॉल्व्हींग रेस्टॉरंट" >>> ह्याला म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा! Proud
मी इथे आल्यावर पहिल्यांदा कुठे गेले असेन तर ते वेस्ट ईनला. अँबियन्स् भन्नाट + रोमॅन्टीक आहे. फूड बकवास आहे. डेझर्ट जबरी आहेत पण. खुप महाग. रोज उठुन जाण्यासारखं नाही.
रिझर्वेश्न करुन जावं लागतं आणि फॉर्मल्स मस्ट आहेत. इथे माहिती मिळेल.

सन डायल भारी आहे एकदम !! जर डिनर करायचं असेल तर फॉर्मन कंपल्सरी आहे. लाऊंज मधे बिजनेस कॅज्यूअल चालतं. अर्थात दोन्ही कडे शॉर्ट, चप्पल इ. चालत नाही. अँबियन्स् , व्ह्यू, फुड सगळं लई भारी आहे.

काही मिडल इस्टर्न जागा :
१. कॅफे इफेंडी : तुर्की रेस्तराँ. कबाब भारी असतात एकदम. तुर्की चहा आणि कॉफी तसच आर्यन नावाचं ताक पण चांगलं असतं. बकलावा रॉक्स. Happy बेली डान्सींग पण असतं. जागा छान आहे. अल्फारेटा मधे आहे.
२. जेरूसलेम बेकरी : ओल्ड मिल्टन पार्कवे वर आहे. मिडल इस्टर्न फास्टफुड Happy इथल्या चिकनच्या डिशेस चांगल्या होत्या. इथला बकलावा एव्हडा आवडला नाही.
३. सुलतान : हायवे ९ ला आहे. ४०० वरून २८५ वेस्टला गेल्यावर पहिलचं एक्झिट घेऊन उजवीकडे वळायचं. इथे हुक्का मिळतो. भारी असतो. Happy डिनर बफे असतो साधारण १२/१३ डॉलरला. पूर्ण पैसे वसूल बफे. अनलिमिडेट बकलावा, फिरनी, हलवे, केक वगैरे वगैरे. दुसर्‍या दिवशी उपास करावा लागतो. Happy
४. अल्लादिन : नॉर्थ रिज रोडचं वरून हायवे ९ ला जाताना रस्त्यात लागतं. इथे एक गटग झालं होतं. छान आहे हे पण. इफेंडी किंवा सुलतान पेक्षा जरा कमी दर्जा आहे जेवणाचा पण डिसेंट इनफ.
५. कॅफे इस्तांबूल : डिकेटरला आहे. इथे मी गेलो नाहिये पण मित्रांकडून लई वेळा वर्णन ऐकली आहेत. (तिथल्या बर्‍याच गोष्टींची) Proud
६. दालिया : नॉर्थ पॉईंट पार्कवे वर आहे. लंच करायला चांगली जागा आहे. चिकन गिरो/गायरो/जायरो/जिरो चांगल असतं. सेल्फ सर्व्हिस असल्याने जेवण पटकन उरकून निघता येतं.

याशिवाय काही जागा म्हणजे :
कॅफे इंटरमेजो : हे डाउन टाऊन, एअरपोर्ट आणि डनवुडीत आहे. आमचा दोन वेळा ठरलेला प्लॅन कॅन्सल झाला. Sad वेबसाईटवर मेन्यू भारी वाटतो एकदम.
तडका : रात्री इंडियन चायनीज चांगलं मिळतं. पूर्वी लंच बफे अफाट सही असायचा. हल्ली क्वालिटी खूपच ढासळली आहे.
ला पारिआ : विंडवर्ड आणि हायवे ९ च्या कोपर्‍यावर (आयहॉप समोर) आहे. सालसा आणि चिप्स चांगले असतात. मेक्सिकन फुड पण एकूणात चांगलं होतं. लाईव्ह बँड असतो आणि टिपीकल हँग ऑट प्लेस.
सिएनएन सेंटरच्या खाली पण एक मेक्सिकन आहे. बरं आहे तसं. नाव आठवत नाहिये. तिथलं फ्राईड आईस्क्रिम बेक्कार होतं पण.
अटलांटीक स्टेशन ला सिपीकेच्या जरा आतल्या बाजूला एक थाई आहे. चांगली चव आहे. ह्याचं पण नाव आठवत नाहिये. आणि समोरच एक चिकन-चिकन की तत्सम नावाचं आहे. तिथल्या डिशेस पण मस्त होत्या एकदम. फक्त क्वांटीटी खूपच कमी होती. सदर्न स्टाईल सी फुड मिळतं. अटलांटीक स्टेशन पण मस्त हँग आऊट प्लेस आहे !

अल्फासोडा : हेन्स ब्रीज आणि ओल्ड मिल्टन इंटरसेक्शनच्या जवळ आहे. सलाड आणि अमेरीकन पेस्ट्रीज चांगल्या मिळतात. टिपिकल लंच प्लेस आहे.
हेलनला मेन रोडवर कॅफे ईंटरनॅशनल नावाचं एक रेस्टॉरंट आहे. नदीच्या काठावर आहे. मस्त अंबियन्स एकदम. सी फुड सलाडच्या खूप सही डिशेस आहेत.

रॉजवेलला खूप सारी ब्राझिलीयन आउटलेट्स आहेत. फक्त तिथे सगळ्यात बीफ असतं. तिथे जाऊन काय खावं हे कळत नाही. तसचं तिथे काही ग्रीक रेस्टॉरंट पण आहेत. पण तिथे जाणं झालं नाही अजून.

आणि सगळ्यात भारी म्हणजे डनवुडीत २, पीच ट्री सिटी मधे १ आणि डिकॅटर मधे १ अश्या ४ जागी पण लई मस्त आणि टेस्टी खाणं शिजतं, अगदी आगत्याने आणि आग्रहाने वाढलं जातं. कधीतरी नक्की जाऊन बघा. Wink

पराग सहीच माहिती दिली. ला परिला, ईफेंडी, जेरुसेलेम बेकरी, तडका ईत्यादी ला अनुमोदन. दालिया नक्की कुठे आहे नॉर्थ पॉईंट पार्कवे वर? नॉर्थ पॉईंट मॉलच्या जवळ ब्युका डी बेपो म्हणून ईटालियन प्लेस आहे. छान असतं तिथलं जेवण. एकदा ट्राय करा.अल्फा सोडा आत जाऊन ट्राय नाही केलं पण टेस्ट ऑफ अल्फारेटाला स्टॉल असतो दरवर्षी.

नॉर्थ पॉईंट पार्क वे वरचं स्पोर्ट अ‍ॅथोरीटी / सबवे असलेलं काँप्लेक्स माहिती आहे का? तिथेच आहे दालिया.

ब्युक डी बेपो मधे मी कधी गेलो नाही. जायला पाहिजे एकदा.

रॉसवेलमधे आहे का तो अख्खा देशी मॉल? तिथल्या फूडकोर्टात सगळी भारतीय दुकानं होती. भेळ आणि देशी चायनीज खाऊन सगळ्यांच्या पोटांचे हाल बेहाल.

हा मॉल ज्या रस्त्यावर आहे त्याच रस्त्यावर रॉसवेलमधेच दोन मोठी भारतीय हॉटेलं होती. नाव आठवलं की लिहिते. त्यातल्या एकात अप्रतीम जेवण मिळालं. (बहुतेक हे बांग्लादेशी माणसाचं हॉटेल आहे. पब्लिक्स प्लाझासमोर).

तिथल्या फूडकोर्टात सगळी भारतीय दुकानं होती. >>>> नाही नाही. तू ग्लोबल मॉल बद्दल बोलत असशील तर तो नॉरक्रॉसला आहे. I-८५ च्या जिमी कार्टर बुलेवार्ड एक्जिट वर. तो ठिकठिकच आहे. लोकं लाई उड्या मारतात ग्लोबल मॉल म्हंटलं की. तिथल्या एका दुकानातले छोले भटूरे मस्त असतात. आणि तिथेच पानाचा ठेला पण आहे.

हो तोच तो मॉल (बहुतेक). तिथलं साउथिंडियन दुकान चांगलं होतं. सांबार आणि चटण्या चवीला बर्‍या होत्या. (काही बाधलं नाही.) Proud

एक 'पूना' नावाचे रेस्टॉ बघितले, बहुधा प्लेझंट हिल रोड वर. नंतर कळाले की त्यात मराठी बिराठी काही नाही. आम्ही रॉयल इन्डियन कुझीन मधे गेलो होतो (Duluth). बरे होते.

आजच झायकामध्ये पान कुल्फी खाल्ली.
अ प्र ति म!!! खरोखरीचं पान आहे त्यात, आणि रंग पिस्ता कुल्फीसारखा.
एकदा जरुर ट्राय करा.

अरे हो खूप छान आहे ती कुल्फी. नुकतीच ट्राय केली.अगदी पान खाल्ल्या सारखं वाटतं. भोजनीक पण झालं एकदाचं ट्राय करून. उगीच हाईप केल्या सारखं वाटलं. समोसा चाट छान होता तिकडे. बाकी ओके ओके.

कुठे ट्राय केलीस ग पान कुल्फी ?
उगीच हाईप केल्या सारखं वाटलं. >>> मला तर अमेरिकेतल्या सगळ्याच गोष्टींबद्दल तसं वाटतं Proud

जायकाचं भाग्य फळफळलं होतं. करमरकरांनी जायका मध्ये जाऊन पान कुल्फी खाल्ली. Proud
@भोजनिक : मला ती थाळी अम्मा किचनच्याच तोडीची वाटली. अम्रू जनता जाते म्हणून गाजावाजा आहे बाकी काही नाही.

कॄष्णविलास - मस्त बुफे...
तडका - व्हेज डिशेस चांगल्या होत्या
चाटपट्टी - सगळ्या टिपी डिशेस, एस.पी.डि.पी पासून सुरळीवडी इ.इ.
मद्रास चिटणाड की काय आहे ते ट्राय केले आहे का कोणी?

चिकन ६५ न खाता कुल्फी खाल्ली? <<<
असं कसं होईल???
मन-कवडा तुम्ही अटलांटात मूव्ह झालात की काय? मद्रास चेट्टीनाड आहे ते. फूड चांगलं आहे. मालक गुजराथी आहे. त्यामुळे स्टारटर्स मध्ये कधी कधी ढोकळा वगैरे पण छान असतो.

Pages