जॉर्जियातल्या खाऊगल्ल्या

Submitted by मिनी on 10 May, 2010 - 10:29

जॉर्जिया स्पेशली अटलांटा आणि आजुबाजुच्या चांगल्या देसी-नॉनदेसी हॉटेल/ रेस्टॉरंट बद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.

cat1.jpg

(त. टी. फोटो अंतरजालावरुन साभार. )

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो प्रॅडी Happy

>>मद्रास चेट्टीनाड आहे ते
ओह..

आजच एके ठिकाणी थाई फूड खाल्ले.. अ‍ॅनीज थाई म्हणून आहे.. चांगले आहे

>>चिन-चिन मधे
सहसा चायनीज मध्ये मी जात नाही कारण तिथे व्हेज मिळत नाही

मद्रास चेट्टीनाड ला जाउन आलो.. मला आवडले...

अजून एके ठिकाणी जाऊन आलो, अम्माज किचन.. संपूर्ण व्हेज सो मस्त वाटले Happy

मी गेलो नाहिये अम्माज किचन मधे अजून पण ऐकलय नाव...
इथे एक साई मुरली नावचं पण झालय नविन.. मिक्स रिव्ह्यू ऐकलेत..

मनकवडा, अटलांटात आहेस का? भेट की म्ग कधी.. !!

साई मुरली बरंच जुनं आहे. आधी डोसा हाऊस नाव होतं मग प्रिया आणी आता साई मुरली. फूड काही खास नाही. क्युरियॉसिटी म्हणून जायचं असेल तर एकदा जाऊन या. अम्मा किचन, क्वालिटी दिवसेंदिवस कशी घालवायची ह्याचा उत्तम नमुना. एटी अँड टी च्या पब्लिकला चार वाजता चहा प्यायचं हक्काचं ठिकाण. गेलात तर फार फार डोसा ईडली पुरतं ठीक. अलीकडे डोशाला पण कढईतल्या तळणीच्या तेलाचा वास जाणवतो. पूर्वी मद्रास चेट्टीनाड च्या जागी जे मिनर्व्हा होतं त्याच मालकाने विंडवर्ड वर स्पाईस टच म्हणून छोटसं रेस्टॉरंट काढलं आहे(विंडवर्ड आणी डिअरफील्ड्चं इंटरसेक्शन). प्राइजेस अम्मा किचनला कंपेअरेबल आहेत पण चव अप्रतीम. ईडली चटणी सांबार ह्या साध्याच डिशेस पण चव खरोखर वाखाणण्या सारखी आहे.(आणी ईतक्या साध्या डिशेस ची वाट कशी लावण्यात येते हे अम्मा कडे अनुभवावं) बाकी प्रिपरेशन्स पण छान आहेत. जरूर ट्राय करा.

स्पाईस टचची बिर्याणी फारच ड्राय !! आम्हाला तरी भोजानीक आवडल. श्री क्रुष्ण विलास चा बफे छान. तडकाच्या आवारातच बांबू गार्डेन म्हणून आहे तिथे डिनर छान मिळत. पुना मधे फार पूर्वी गेलो होतो तेव्हा काही खास नव्हत.
सर्वना भवन चांगल आहे पण सर्विस अतिवाईट !!
कॅरेबियन फूड साठी बहामा ब्रिझ म्हणून आके नॉर्थ पॉईंट मॉल जवळ !! थाई साठी टिन ड्र्म म्हणून आहे पेरिमीटर मॉल च्या जवळच्या टार्गेट कॉम्प्लेक्स मधे. तिथे करी चिकन ट्राय करा. अमेरिकन रोमँटिक डिनर साठी canoe म्हणून Paces Ferry रोड वर आहे.

मध्यंतरी अम्माज किचनमध्ये जाऊन आलो. आम्हांला आवडलं.. छान सात्त्विक जेवण होतं.. Happy
टिपीकल साऊथी... अजिबात मसालेदार, हेवी काही नाही.. दोन्हीवेळी पायसम मस्त होतं.. !
बाहेर देसी जेवायचं असेल आणि हेव नको असेल तर अगदी उत्तम जागा...

पराग तुझी मागे डनवुडी मधलं चिन चिन आवडतं म्हणून पोस्ट पाहिली होती. विंडवर्ड वर पण एक आहे तिथे गेला आहेस का? मी फार काही फॅन नाही चिन चिन ची पण विंडवर्ड वर पाहिलं आणी तुझी पोस्ट आठवली.सँडविच आवडत असतील तर विंडवर्ड वरच चिपोट्ले च्या काँप्लेक्स मधे Wchich wich म्हणून एक जॉईंट सुरू झालाय. अ‍ॅव्हेन्यू मॉल मधे पण आहे टिन ड्रम च्या शेजारी. छान आहेत सँडविचेस.

काल ऐजा म्हणून एका एशियन रेस्टॉरंटला गेलो होतो. बकहेडमध्ये आहे. चांगला ३० लोकांच्या ग्रूपने गेलो तरी कुठेही ऑर्डर, बीलींग मध्ये गोंघळ नाही झाला. अँम्बियन्स अमेझिंग आहे. जेवण पण मस्त आहे.
इथे माहिती मिळेल.

जोन्स ब्रीजला सर्वाणा भवनची ब्रँच सुरु झालीये. डिकॅटरपेक्षा जास्त पोर्शन आणि कमी किंमत आहे असा माझा दावा आहे.. माझं दोन्ही वेळा पोट भरलं !! डिकॅटरमधे दोन्ही वेळा घरी येऊन परत जेवावं लागलं होतं.. Happy

शिवाय इथे सोमवार ते शुक्रवार लंच बफे आहे.. १ डोसा आणि १ पुरी लिमिटेड.. बाकी सगळं अनलिमिटेड..
चांगला ऑप्शन आहे वीक डे लंच साठी..

कमिंगला चेरीयनच्या शेजारी जाफरान नावाचं नविन रेस्टॉ सुरु झालय.. नविन म्हणजे डिसेंबरमध्ये सुरु झालं म्हणे.. झायका सारखं आहे.. बिर्यानी टू गूड !!! होती.. कुल्फीपण चांगली होती..
बाकी चिकन ६५ वगैरेपण चांगलं दिसत होतं.. कमिंगच्या चेरीयनमध्ये ग्रॉसरीसाठी जात असाल तर नक्की जाफरानमध्ये जाऊन या !

जाफरान बघितल पण आता ट्राय करू. किंबाल ब्रीजवरच्या h-mart जवळ New Saigaon म्हणून थाई रेस्टॉरंट आहे खूपच छान आहे.

आज डनवुडीतल्या सिझन्स ५ मध्ये लंचला गेलो होतो.. मस्त आहे एकदम ! तिथे (म्हणे) प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळा मेन्यू असतो. डेजर्टचं कलेक्शन पण चांगलं आहे. वेटर्स सगळ्या डेजर्टचे लहान लहान बोल असलेला ट्रे टेबलवर घेऊन येतात.. त्यामुळे हवे ते उचलून पटापट खाता येते आणि वेळ वाचतो.. Proud
ब्लॅक्नड फिश टॅकोज चांगले होते.. कुठल्या कुठल्या उकडलेल्या भाज्या आणि फ्लॅट ब्रेड्सपण चांगले होते..

ह्यांची बकहेडला पण शाखा आहे..

प्रॅडी,, विंडवर्डच्या विच विच मध्ये गेलो होतो थोडे दिवसांपूर्वी.. मस्त सँडविचेस होती.. एकूणात त्यांची सँडविचेस ऑर्डर करायची पध्दत भारी आहे.. !

विंडवर्ड वर होम डिपोच्या जवळ पॅराडाईज बिर्याणी ट्राय केलं आज. अमेझिंग चव. क्वांटिटी पण भरपूर असते. अगदी ऑथेंटिक वाटली चव.

डिकेटर ला "थाली" नावाचं गुजराथी थाळी सर्व करणारं रेस्टॉरंट सुरू झालंय. पटेल कडे नियमीत ग्रोसरीज ला जाणार्यांनी कदाचित आधीच ट्राय केलं असेल्.अतिषय चवीष्ट गुजराथी ४ कोर्स मील होतं.
पहिला कोर्स मसाला ताक, जलजीरा,सॉफ्ट ड्रिंक्सचा. त्याच्या जोडीला पापड आणी आंबट्,गोड्,तिखट चटण्या. (लसणाची ओली चटणी लाजवाब !!) पण पापडावर फार ताव मारू नका असं मालकच सांगून गेला. पुढच्या जेवणासाठी पोटात जागा ठेवा.. आणी हे तंतोतंत खरं होतं. पुढचा कोर्स होता स्टार्टर्सची थाळी. ह्यात होता बटाटावडा, कटलेट्,मिरची भजी,साधा ढोकळा,पांढरा ढोकळा,दाबेली. मेन कोर्स मधे चार भाज्या( ह्यात एक कार्लं काजूची भाजी होती. केवळ अप्रतीम चव.) बाजरीची भाकरी, पुर्या, फुलके, गुजराथी डाळ, स्वीट्स (नारळीपाक), खिचडी कढी . पुढचा कोर्स केशरपिस्ता आईसक्रीम. आणी ईतकं सगळं खाऊन गुंगी आली असेल तर सगळ्यात शेवटी मसाला चहा. सर्व काही अनलिमिटेड.किड्स ईट फ्री.

रेस्टॉरंटचा मालक अगदी जातीने सर्वांना आग्रह करकरून खायला घालत होता. आई वडलांना सुखाने जेवता यावं म्हणून बच्चे कंपनीलाही एंटरटेन करत होता. एकुणात एक चवीष्ट आणी तुडुंब पोटभरीचा सुखद अनुभव.

वा वा !
धन्यवाद प्रॅडी.. जायलाच हवं.. आत्ता एडीसनच्या "झोपडी" मध्ये गुजराथी खाल्ल्यापासून आम्हांला परत गुजराथी खावसं वाटायला लागलं आहे.. "खबर" मध्ये थाळी बद्दल वाचलं होतं..आता तू फर्स्ट हँड रिपोर्ट दिलास..
ऊन कमी झालं की एखाद्या विकेंडला डिकेटर वारी करायला हवी..

पॅराडाईज बिर्याणी लई भारी आहे.. !!

रच्याकने.. अल्फारेटातली दालिया आणि कॅफे इफेंडी दोन्ही बंद झाली.. Sad दोन्ही आमच्या फार आवडत्या जागा होत्या..

इंटरमेजो मध्ये जाऊन आलो एकदाचे.. मस्त फूड आणि ambiance.. ! कॉफी आणि डेजर्ट भारी होती एकदम..

अरे ते ईफेंडी उघडणार आहे परत असं ऐकलं.आणी ते दालिया पीचट्री सिनेमाच्या शेजारी पाहिलं. अजून एक ..इथे अस्थानी आहे पण मॅन्सेलच्या जवळ ते नवरंग थियेटर सुरू झालंय. जाऊन आलात का तिकडे? देशी सिनेमे सस्तेमे.

इफेंडी परत सुरू झालं हायवे ९ वर... फूड क्वालिटी अगदी तशीच आहे. नक्की ट्राय करा !

पॅराडाईज बिर्याणीच्या अगदी शेजारी असलेलं 'नाम थाई' पण ट्राय करा नक्की. सॅटेचा कंटाळा आला असेल तर थाई फूडसाठी हीच जागा!

मॅनसेल रोडवर बॉम्बे कॅफे म्हणून सुरू झालय. आधी तिथे संतूर नावाचं भंगार रेस्टॉरंट होतं. पण हे बॉम्बे कॅफे चक्क चांगलं निघालं त्यामानाने. डीनर मेन्यू चांगला आहे एकदम! चव आणि क्वांटीटी दोन्हीच्या बाबतीत

डुलूथ मधलं रॉयल इंडियन क्विझीन आम्हांला खूप आवडलं. अ‍ॅब्बॉट्स ब्रीज आणि पिचट्री इंडस्ट्रीअलच्या इंटरसेक्शनला आहे. दर गुरूवारी डोसा नाईट असते. १० प्रकारचे डोसे मिळतात. विकेंडला केरळी पद्धतीचा बफे असतो. त्यात अप्पम विथ सांबार किंवा नारळाचं दुध, इडिअप्पम, वेळप्पम, अडई, केरळी स्टाईल चिकन करी, क्रॅब करी, गोड आणि तिखट आप्पे असे सगळे प्रकार असतात. सर्वाणापेक्षा चांगलं वाटलं. Wink

सर्वाणापेक्षा चांगलं वाटलं. Wink >> कळलं Wink
'रॉयल इंडियन' छान आहे, आम्हालाही आवडलं. सर्वाणा भयंकर बिघडलेलं आहे. आमच्या वेळी जेंव्हा ते 'मद्रास सर्वणा भवन' होतं तेंव्हा खूप छान होतं. Happy
सॅटेचा कंटाळा आला असेल तर थाई फूडसाठी हीच जागा! >> थाय मध्ये सगळ्यात श्रेष्ट 'टॉप स्पाइस' आहे

अर्बनस्पून अॅप डाउनलोड करा, डनवुडीच्या १० मैल रेडीयस मध्ये ५०+ इंडियन रेस्टराँ सापडतील. शाॅर्टलीस्ट करायला रिव्युज वाचा. अजुनहि बिझनेस करत असतील तर चांगलीच असणार. Happy

Pages