छत्रपती घराणे

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago

महाराजांचे पूर्वज आणि वंशज..

करवीर शाखेचे शेवटून दुसरे छ. शाहू महाराज म्हणजे प्रसिद्ध पुरोगामी विचारवन्त कोल्हापूरचे शाहू महाराज !
सातारा शाखेचे सध्याचे छ. उदयन महाराज आणि करवीर शाखेचे सध्याचे छ. राजाराम महाराज सर्वाना परिचित आहेतच...

व्यंकोजी राजे म्हणजे तंजावर शाखा.

shivaji.jpg

इथे फॅमिली ट्री टाकायला अडचण येते आहे. म्हणून रनिंग मजकूर लिहीत आहे.

बाबाजी भोसले (जन्म १५३३) (वेरुळचे पाटील भोसले.)
त्यांचे प्रथम पुत्रः- मालोजी भोसले , त्यांची पत्नी उमाबाइ ह्या फलटणच्या नाईक-निम्बाळकर यांच्या कन्या.
द्वितीय पुत्रः- विठोजी ,पत्नी आउ बाइ. याना ८ पुत्र आणि १ कन्या.
(अम्बिकाबाइ १ .सम्भाजी २.खेलोजी ३ .मालोजी ४ .कबाजी ५.नागोजी ६ .परसोजी ७.त्रिम्बकजी ८. ककाजी)
मालोजी भोसले(१५४२-१६१९)

पुत्र
१. शाहाजी - पत्नी- जिजाबाई (सिन्दखेडचे लखुजी जाधव यांची कन्या. सिन्दखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे (जाधवांचे !)वंशज)
२.शरीफजी -पत्नी दुर्गाबाई. शरीफजी नगरच्या जवळच्या प्रसिद्ध भातवडीच्या लढाईत मारले गेले.

शाहाजी भोसले (१५९४-१६६४)
शाहाजी अहमदनगरच्या निजामशाहीत नन्तर विजापूरच्या आदिलशाहीत सरदार होते. सुरुवातीस नगरची निजामशाही मोगलापासून वाचवण्यासाठी निजामाचा वजीर मलिकम्बरला बरोबर घेऊन मोगलांचा व विजापूरकरांचा पराभव केला.(भातवडीची लढाईं. नगरपासून १५-२० किमी.). भातवडीच्या लढाईत सासरे लखूजी जाधव विरोधात मोगलांच्या बाजूने लढत होते.!!
शाहाजी नन्तर विजापूर दरबारी गेले. कर्नाटकात गेले. तिकडेच निधन झाले.
शाहाजी भोसले -- पत्नी १. जिजाबाई---->पुत्र १.सम्भाजी (१६२३), २. महाराज ! Happy

पत्नी २. तुकाबाई-------> पुत्र व्यंकोजी उर्फ एकोजी राजे (तंजावर शाखा )

पत्नी ३. नरसाबाई----> पुत्र-संताजी.

छत्रपती शिवाजी महाराज

पत्नी १. सगुणाबाई (शिर्के घराणे ) -----> कन्या-- राजकुवर (गणोजी शिर्के यांची पत्नी.)

पत्नी २. सईबाई (नाईक निम्बाळकर यांची कन्या)--> पुत्र --(धर्मवीर)सम्भाजी
-->कन्या- सखूबाई व इतर २
पत्नी ३.सोयराबाई(हंबीर राव मोहितेंची बहीण ) ------>पुत्र ---राजाराम
-----> कन्या- बळीबाई
पत्नी ४.पुतळाबाई (मोहिते घराणे)
पत्नी ५. लक्ष्मीबाइ (विचारे)
पत्नी ६.सकवारबाई (गायकवाड ) -----> कन्या -कमळाबाई
पत्नी ७.काशीबाई ( जाधव घराणे)
पत्नी ८. गुणवन्ताबाई (इंगळे यांची कन्या)
धर्मवीर छ.सम्भाजी महाराज
१६५७-१६८९

मातोश्री -सईबाई पत्नी - येसूबाई. -------> पुत्र --शाहू (१६८२-१७४९)

सम्भाजी महाराजांचा वध झाल्यावर येसूबाई व ७ वर्षाचा शाहू मोगलानी कैद केले. १८ वर्षे म्हणजे औरंगजेब मरेपर्यन्त शाहू कैदेत होता. औरंग्जेब मेल्यावर त्याच्या मुलाने शाहू ला मुक्त केले. तोपर्यंत सोयराबाईचे चिरंजीव व सम्भाजीचे सावत्र भाऊ राजाराम राजे झाले . पुढे औरंग्जेबाच्या त्रासाला कंटाळून राजारामाने जिंजी गाठली व रामचन्द्र अमात्य यांच्या साह्याने मराठेशाही चालवली. राजारामाची पत्नी ताराबाइ हिने सातारा गादी ताब्यात घेतली. पुढे शाहू सुटून आल्यावर शाहू व ताराबाईची लढाई झाली. शाहूने विजय मिळवून सातारा गादी ताब्यात घेतली. व ताराबाईने पन्हाळ्याकडे प्रस्थान केले.

शाहू महाराज
मातोश्री- येसूबाइ , पत्नी १. सकवारबाई
२. सगुणाबाई. -------------------------> शाहू निपुत्रिक होते.
----------------------------------------------------------------------------------

छ. राजाराम

मातोश्री:-सोयराबाई , पत्नी १. ताराबाई (१६७५-१७६१) --------->पुत्र- शिवाजी(१६९६-१७२६)
२.जानकीबाई
३.राजसबाई ------> पुत्र सम्भाजी(१६९८-१७६०)
४.अम्बिकाबाई (सती गेली)
५. सगुणाबाई

राजारामाचा मृत्यु १७०० मध्ये सिंहगडावर झाला. (आता गेल्यावर विपन्नावस्थेतील समाधीचे दर्शन घ्या)
त्यानन्तरही ताराबाईने औरंगजेब मरेपर्यन्त त्याला झुंज देऊन मराठेशाही टिकवली. ताराबाई ८६ वर्षे जगली. पन दुर्दैवाने भाऊबन्दकीने स्वकीयांच्याच कैदेत तिचे बरेच आयुष्य(३५ वर्षे) गेले. सम्भाजी (सावत्रमुलगा) व राजसबाई यानी १७ वर्षे आणि शाहूने १८ वर्षे कैदेत ठेवले.
chhatrapati shivaji maharaj family tree in marathi

विषय: 
प्रकार: 

रॉबीनसाहेबांनी छान माहिती एकत्रीत केली आहे.

शिवाजी महाराजांनी एव्हढ्या महत्प्रयासाने निर्माण केलेले राज्य नंतरच्या पिढ्यांना टिकवता आले नाही :अरेरे:.
संभाजी महाराजांना पकडुन देण्यात गणोजी शिर्के (हे शिर्के म्हणजे वर उल्लेख केलेले शिवाजींची कन्या राजकुवर चे पती ?) यांनी औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खानाला टिप दिली होती. महाराजांचा ठाव ठिकाणा, सैन्या बाबत माहिती घरच्यांनीच शत्रुला दिली. संताजी - धानाजी मधे पण गैरसमजाने शक्तीपात झाला. संताजी सारखा शुर सेनापती फंदफितुरांमुळे औरंगजेबाला मारता आला.

नुकतेच शंभुराजे नावाचे के फालतू नाटक बघितले, इतिहासाची मोडतोड याव्यतिरिक्त काहीही म्हणता येणार नाही त्या नाटकाबद्दल.... ज्याला "संभाजी" समजलाच नाही त्याने हे नाटक लिहिलेय. नाटक बघून फार चिड आली होती.

शिवाजी महाराजांनी एव्हढ्या महत्प्रयासाने निर्माण केलेले राज्य नंतरच्या पिढ्यांना टिकवता आले नाही >>> कारण, "स्वराज्य" म्हण्जे काय हेच त्याच्या पचनी कधी पडले नाही. गणोजी शिर्क्याना वतनदारी हवी होती.. ती आदिलशहा, औरंगजेब यापैकी कुणीही दिली तरी चालली असती. त्यासाठी त्यानी स्वतःच्याच बहिणीच्या नवर्‍याचा बळी दिला!!! हे आपले पूर्वज. आणि त्यानंतर त्याच्याच वंशज त्यातून काही जास्त शिकलेत अशातला भाग नाही. आजही भारतामधे हेच दुहीचे स्वार्थाचे राज्कारण दिसऊन येते. मराठी माणून भैयाचा गळा धरतो. कर्नाटकी माणूस मरठ्याला मारतो. आणि तामिळ माणूस कर्नाटकीला. इशान्य राज्यातल्या मुलामुलीना आपण सरळ तोंडावर नेपाळी चिनी म्हणून मोकळे होतो.
कधी कधी वाटतं, आपण एक देश, एक राष्ट्र ही संकल्पना कधीच समजू घेऊ शकत नाही. कदाचित आपल्याच गुणसूत्रात काही दोष असावा.

mr. robinhud,
apan ji mahiti denyacha prayatn kelay to kahi aunshi thik ahe pn rajenbaddl ekeri ullekh krava itk moth ajvr kuni navt ani pudhehi nasel ani tumhi hi cheshta keli ahe .......

11 वर्षापूर्वी च्या धाग्यावर कमेंट करण्यासाठी चाळीस मिनटं जुना आयडी का आला असेल?
(घेणंदेणं नाहीये मला पण उगी आपल्या चौकशा)

छान माहिती!

शिवाजी महाराजांनी एव्हढ्या महत्प्रयासाने निर्माण केलेले राज्य नंतरच्या पिढ्यांना टिकवता आले नाही >>> हे समजले नाही. एकूण "मराठा साम्राज्य" पुढे जवळजवळ १४०+ वर्षे होतेच की, आणि भारताचा प्रचंड भाग व्यापून होते. नंतर इंग्रज आले नसते, तर कदाचित पुढे आणखीही राहिले असते.

गेल्या ३००-४०० वर्षांतील महाराष्ट्राच्या इतिहासात कोणाच्याच मुलींबद्दल फारशी माहिती उपलब्ध दिसत नाही. जे राजे किंवा पेशवे होते त्यांच्या बायकांबद्दल निदान थोडीफार आहे पण मुलींबद्दल नाही.

>>जे राजे किंवा पेशवे होते त्यांच्या बायकांबद्दल निदान थोडीफार आहे पण मुलींबद्दल नाही.<<
पेट्रिआर्कित तसं आढळणं दुर्मिळ, तरिहि ताराराणींचं (सरसेनापती हंबीरराव मोहित्यांची कन्या) उदाहरण इथे लागु होइल. मराठा साम्राज्याची मशाल पेटती ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे...

छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख अनेक ठिकाणी छ. शिवाजी महाराज असा केला जातो, पूर्ण छत्रपती शब्द लिहावा लागू नये म्हणून.
जसे आपण ती. काका, चि. मुलगा वगैरे shortforms वापरतो तीर्थरूप, चिरंजीव यासाठी तसा हाही सर्वमान्य shortform आहे का?
असल्यास माहिती नाही पण का कोण जाणे थोडा वाचताना डोळ्यांस खटकतो..अर्थातच हे वैयक्तिक मत आहे.

परवा एका Whattsapp group वर वी. जिजाऊ असा उल्लेख वाचला. आधी कळलंच नाही मग समजलं की ते वीरमाता जिजाऊ आहे.

तरिहि ताराराणींचं (सरसेनापती हंबीरराव मोहित्यांची कन्या) उदाहरण इथे लागु होइल. मराठा साम्राज्याची मशाल पेटती ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे... >>> हो ताराराणीच डोक्यात आल्या होत्या ते लिहीताना. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल काहीच वाद नाही. पण त्यांच्याबद्दलचीही प्रचलित माहिती एक सून, एक राणी म्हणून आहे. कोणाच्याच मुलीबद्दल फारसे दिसले नाही.

कदाचित असे असेल की हा सगळा इतिहास जे राजे (किंवा नंतर पेशवे) होते त्यांच्या घराण्याच्या "सेण्ट्रिक" आहे. त्यामुळे त्यातील मुली जर लग्ने होउन सरदार व इतर मातब्बर घराण्यांमधे जरी गेल्या असतील तरी त्यांची कामगिरी फारशी पुढे नोंदली गेली नाही. आणि लग्नेही लहान वयात झाल्याने मूळच्या घरी काही करण्याआधीच लग्ने होउन जात.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख अनेक ठिकाणी छ. शिवाजी महाराज असा केला जातो, पूर्ण छत्रपती शब्द लिहावा लागू नये म्हणून.>>>> मला नुसतं छत्रपती शिवाजी महाराज हे नाव पण खटकतं. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज असं सगळं नाव घेतलं की मला बरं वाटतं.

Pages