ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं !
भरं ऊन्हात पाऊस घेवुन आभाळ मनात दाटतं
तरी पाऊलं चालत रहातात, मनं चालत नाही
घामाशिवाय शरिरामधे कुणीच बोलत नाही
तितक्यात कुठुनं एक ढग सुर्यासमोर येतो,
ऊन्हामधला काही भाग पंखाखाली घेतो…
वारा ऊनाड मुलासारखा सैरावैरा पळत रहातो…..
पानाफुला, झाडांवरती छपरावरती चढुन पहातो……..
दुपार टळुन संध्याकाळचा सुरु होतो पुन्हा खेळ…
ऊन्हामागुन चालत येते, गारं गारं कातरवेळ…
चक्क डोळ्यांसमोर ॠतु कुसं बदलुन घेतो
पावसाआधी ढगांमधे कुठुन गारवा येतो………==================================================
कवी सौमित्रांची हि कविता आजहि ऐकली कि भर उन्हात गारव्याची जाणीव होते.
पाऊस - तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. अशा या पाऊसवेड्यांमध्ये हिरव्या ऋतुत मनसोक्त भटकंती करणार्या पर्यटकांचाही समावेश होतो आणि भिजून चिंब करणार्या ठिकाणाला भेटी द्यायच्या याद्या तयार होऊ लागतात.
आता तुम्ही म्हणत असाले कि, बाहेर एव्हढे कडक ऊन आहे, अंगाची लाही लाही होत आहे आणि याने काय हे पावसाचे लावले आहे. पावसाला तर अजुन अवकाश आहे. अहो, म्हणुनच तर........ डोळ्यांना थोडासा गारवा देण्यासाठीच तर हा फोटोप्रपंच!!!!
पुढच्या महिन्यात पावसाला सुरुवात होईल तो पर्यंत तुम्ही सुद्धा या पावसाळ्यात कुठे जायचे ते प्लानिंग करून ठेवा. आयत्यावेळी शोधाशोध करण्यात संपूर्ण पावसाळा निघुन जाईल. 
चला तर मग आज मी तुम्हाला मुंबई-पुण्याच्या जवळपास असलेल्या धबधब्यांची सहल घडवून आणतो.
(हो, पण माझी फि माहित आहे ना!!! विसरलात
अहो तुमचे प्रतिसाद - ती देण्यात कुठेहि कंजुसपणा करू नका नाहीतर धबधब्याजवळच सोडुन येईन परत :))
फक्त एक काम करायचे ऑफिस/घरामध्ये असाल तर एक कप गरमागरम चहा/कॉफी सोबत घ्यायचा, जर जमलच तर कांदाभजीही आणि गारवाची सीडी ऐकत हि सफर करा.
==================================================
भंडारदरा
==================================================
==================================================
लोणावळा
==================================================
==================================================
माळशेज घाट
==================================================
==================================================
भाजे गाव (लोणावळा)
==================================================
==================================================
कार्ला
==================================================
==================================================
नांगरतास धबधबा (आंबोली-सावंतवाडी)
==================================================
==================================================
ठोसेघर धबधबा (सातारा)
==================================================
==================================================
दाभोसा धबधबा (जव्हार)
==================================================
==================================================
कसारा घाटातुन जाताना
==================================================
==================================================
पवई तलाव - पावसाळ्यात
==================================================
==================================================
शांग्रीला वॉटरपार्क (कृत्रिम धबधबा
)
==================================================
==================================================
फिरून फिरुन दमलात??? घ्या मग गरमागरम मक्याचे कणीस, मस्त तिखटमीठ और लिंबू मारके
(प्रत्येकाच्या स्क्रीनवर आहे, त्यामुळे इतरांचा विचार करू नका, पटकन संपवा
)
==================================================

फोटो बघता बघता भिजुन चिंब
फोटो बघता बघता भिजुन चिंब झालो
एकदम भारी!
एकदम भारी!
क्लाssssssssssssssssssssसच
क्लाssssssssssssssssssssसच ... एकसे बढकर एक
आहाहा! अगदी गारेगार वाटलं.
आहाहा! अगदी गारेगार वाटलं.
मस्त फोटो.
छानच !!!!!!!!!!
छानच !!!!!!!!!!
.
.
योगेश...मस्तच
योगेश...मस्तच फोटो...आत्ताच्या आत्ता तिथे जाउन भिजावसं वाटतंय
.
.
योगेश, आयला फोटो बघुनच इतका
योगेश, आयला फोटो बघुनच इतका भिजलो कि सर्दी झाली.... आ...छी...
अमेझिंग आहेत सगळे धबधबे.
अमेझिंग आहेत सगळे धबधबे. आवडले फोटो.
योगेश, ओके.
योगेश, ओके.
आहाहा अप्रतिम
आहाहा
अप्रतिम
एकदम छान योगेश...
एकदम छान योगेश... फोटोग्राफिचा अप्रतिम नमूना....
भिजलो
भिजलो
फोटो आवडले .धबधब्यातल आणि
फोटो आवडले .धबधब्यातल आणि लहान मुलातल चैतन्य खास .
योगेश अप्रतीम
योगेश अप्रतीम
खरोखरच पावसात भिजल्यासारखं
खरोखरच पावसात भिजल्यासारखं वाटंतय..........
खरच यार भिजून गेलो. आत्त कणिस
खरच यार भिजून गेलो.
आत्त कणिस खायला पाहीचे
एक पार्सल,पाटव...........
cool photos मला ठोसेघर
cool photos
मला ठोसेघर धबधब्याची माहिती पाहिजे आहे.
धन्यवाद. मला ठोसेघर धबधब्याची
धन्यवाद.
मला ठोसेघर धबधब्याची माहिती पाहिजे आहे.>>>>>आ_भास, ठोसेघरचा धबधबा सातार्यापासुन अंदाजे १७-१८ किमी अंतरावर आहे. ठोसेघरला गेलात तर सज्जनगड, चाळकेवाडी पवनचक्की (सातार्यात राहून) एका दिवसात पाहुन होऊ शकते. अजुन एखादा दिवस हाताशी असेल तर यवतेश्वर, कास तलाव, कास पठार अवश्य बघा. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य काही औरच असते.
जबरदस्त !! अमोल केळकर
जबरदस्त !!
अमोल केळकर
सुपर सुपर सुपर!!!!!!!!!
सुपर सुपर सुपर!!!!!!!!! गार्गार फोटोज..
अप्रतिम
अप्रतिम ......................
जिप्सीजी [ कीं योगेश ? ],
जिप्सीजी [ कीं योगेश ? ], अप्रतिम ! या थंडाईबद्दल .... हु...हु..श्य.. धन्यवाद !
मार्लेश्वरला पावसाळ्यात जरूर जा, कॅमेरा घेऊन !
<< योगेशने भिजवल्यावर, थंडी वाजली तर आमच्या राजापूरला उन्हाळ्यावर जायला विसरू नका हो. >> दिनेशदा, सटाण्याहून कान्हाला जाताना असंच एक उन्हाळं आहे पण तिथं इतका गलिच्छपणा आहे कीं किळसच येते ! राजापूरचं उन्हाळं खूपच स्वच्छ व नीटनेटकं ठेवलंय. [तिथंच जवळपास नदीच्या कांठी गर्द झाडीत एक मठ/आश्रम आहे ना? खूप छान वाटलं होतं तिथंही जावून ! 'अर्जुना' नदी का ती ? छान नांव आहे. ]
परशुरामाचा घाट उतरून चिपळूणकडे जाताना डाव्या हाताला एक देखणा पावसाळी धबधबा आहे. थोडंसं झाडीतून जावून त्याच्या पायथ्याशी जातां येतं. सुदैवानं अजूनही 'बियरच्या बाटल्या व कर्कश संगीताची' बाधा न झालेल्या या धबधब्याचा चिपळूणकर पावसाळ्यात मनसोक्त आनंद लुटतात.
अमोल, वर्षूदी, किरण, भाऊ काका
अमोल, वर्षूदी, किरण, भाऊ काका प्रतिसादाबद्दल धन्स
जिप्सीजी [ कीं योगेश ? ], >>>>>>काहिहि चालेल
धागा जेंव्हा पोस्ट केला होता तेंव्हा "योगेश२४" होतो आणि परत हा धागा वर आला तेंव्हा "जिप्सी" 
आतापर्यंत मार्लेश्वरात तीन वेळा गेलो पण तीन्ही वेळेस डिसेंबर महिन्यातच.
मार्लेश्वरला पावसाळ्यात जरूर जा, कॅमेरा घेऊन !>>>>>नक्कीच
परशुरामाचा घाट उतरून चिपळूणकडे जाताना डाव्या हाताला एक देखणा पावसाळी धबधबा आहे>>>>>"सवतसडा" धबधबा का?
अप्रतिम... :स्मितः
अप्रतिम... :स्मितः
<< "सवतसडा" धबधबा का? > >
<< "सवतसडा" धबधबा का? > > येस, सर !
मस्तच. जिप्सी. पावसाळ्यात
मस्तच. जिप्सी. पावसाळ्यात लोणावळा पक्का.
खूप खूप खूपच सुंदर आवडले फोटो
खूप खूप खूपच सुंदर आवडले फोटो पाऊस पडायच्या अगोदरच अंग भिजले.
एकदम सह्हीच.
एकदम सह्हीच.
Pages