ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं !
भरं ऊन्हात पाऊस घेवुन आभाळ मनात दाटतं
तरी पाऊलं चालत रहातात, मनं चालत नाही
घामाशिवाय शरिरामधे कुणीच बोलत नाही
तितक्यात कुठुनं एक ढग सुर्यासमोर येतो,
ऊन्हामधला काही भाग पंखाखाली घेतो…
वारा ऊनाड मुलासारखा सैरावैरा पळत रहातो…..
पानाफुला, झाडांवरती छपरावरती चढुन पहातो……..
दुपार टळुन संध्याकाळचा सुरु होतो पुन्हा खेळ…
ऊन्हामागुन चालत येते, गारं गारं कातरवेळ…
चक्क डोळ्यांसमोर ॠतु कुसं बदलुन घेतो
पावसाआधी ढगांमधे कुठुन गारवा येतो………==================================================
कवी सौमित्रांची हि कविता आजहि ऐकली कि भर उन्हात गारव्याची जाणीव होते.
पाऊस - तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. अशा या पाऊसवेड्यांमध्ये हिरव्या ऋतुत मनसोक्त भटकंती करणार्या पर्यटकांचाही समावेश होतो आणि भिजून चिंब करणार्या ठिकाणाला भेटी द्यायच्या याद्या तयार होऊ लागतात.
आता तुम्ही म्हणत असाले कि, बाहेर एव्हढे कडक ऊन आहे, अंगाची लाही लाही होत आहे आणि याने काय हे पावसाचे लावले आहे. पावसाला तर अजुन अवकाश आहे. अहो, म्हणुनच तर........ डोळ्यांना थोडासा गारवा देण्यासाठीच तर हा फोटोप्रपंच!!!!
पुढच्या महिन्यात पावसाला सुरुवात होईल तो पर्यंत तुम्ही सुद्धा या पावसाळ्यात कुठे जायचे ते प्लानिंग करून ठेवा. आयत्यावेळी शोधाशोध करण्यात संपूर्ण पावसाळा निघुन जाईल. 
चला तर मग आज मी तुम्हाला मुंबई-पुण्याच्या जवळपास असलेल्या धबधब्यांची सहल घडवून आणतो.
(हो, पण माझी फि माहित आहे ना!!! विसरलात
अहो तुमचे प्रतिसाद - ती देण्यात कुठेहि कंजुसपणा करू नका नाहीतर धबधब्याजवळच सोडुन येईन परत :))
फक्त एक काम करायचे ऑफिस/घरामध्ये असाल तर एक कप गरमागरम चहा/कॉफी सोबत घ्यायचा, जर जमलच तर कांदाभजीही आणि गारवाची सीडी ऐकत हि सफर करा.
==================================================
भंडारदरा
==================================================
==================================================
लोणावळा
==================================================
==================================================
माळशेज घाट
==================================================
==================================================
भाजे गाव (लोणावळा)
==================================================
==================================================
कार्ला
==================================================
==================================================
नांगरतास धबधबा (आंबोली-सावंतवाडी)
==================================================
==================================================
ठोसेघर धबधबा (सातारा)
==================================================
==================================================
दाभोसा धबधबा (जव्हार)
==================================================
==================================================
कसारा घाटातुन जाताना
==================================================
==================================================
पवई तलाव - पावसाळ्यात
==================================================
==================================================
शांग्रीला वॉटरपार्क (कृत्रिम धबधबा
)
==================================================
==================================================
फिरून फिरुन दमलात??? घ्या मग गरमागरम मक्याचे कणीस, मस्त तिखटमीठ और लिंबू मारके
(प्रत्येकाच्या स्क्रीनवर आहे, त्यामुळे इतरांचा विचार करू नका, पटकन संपवा
)
==================================================

साल्या, पाऊस सुरू तर होवू दे
साल्या, पाऊस सुरू तर होवू दे आधी...
उगाच का त्रास देतो आहेस बाबा ! अप्रतिम आहेत रे सगळेच फोटो !!
जिप्सी, तुम्हाला किंवा इथल्या
जिप्सी, तुम्हाला किंवा इथल्या वाचकांपैकी कोणाला तो एक धबधबा माहित आहे का? तुम्ही चासकमान वरुन भीमाशंकरला जाताना भीमाशंकरच्या थोडासा अलिकडे लागतो. त्याचा सकाळमधे फोटो आला होता आणि आम्ही शोधत शोधत गेलो होतो. आधी कार पार्क केल्यावर एक दरी उतरावी लागते, मग एक नदी ओलांडावी लागते, मग एक छोटी टेकडी चढत आणि शेतं क्रॉस करत या फॉल जवळ पोहोचतो आपण. खरा adventurous प्रवास होता तो. १० वेळा तरी चिखलात घसरुन पडलो. पण पोचल्यावर स्वर्ग होता. इतका मोठा आणि सुंदर फॉल मी नंतर कधीच पाहिला नाही.
नंतर खुप वर्षं जायला जमलं नाही आणि आता तो रस्ता सापडत नाही. कोणी गाइड करेल का, प्लिज? मी तो दिवस विसरुच शकत नाही. इतकी amazing जागा मी परत कधी बघितलीच नाही.
मस्तच आहेत सगळे धबधबे... मला
मस्तच आहेत सगळे धबधबे...
मला दुसरा फोटो लईच आवडला...
मस्तच रे.... छान फोटो... अगदि
मस्तच रे.... छान फोटो...
अगदि आतुरतेने पावसळ्या ची वाट बघतोय...
एकदा का सुरुवात झाली की मी मोकळा माझ्या घोड्या वरुन फिरायला....
Pages