दिवाळी अंक २००८ पूर्वतयारी

Submitted by Admin-team on 26 August, 2008 - 01:56

नमस्कार मायबोलीकर

यंदा मायबोली दिवाळी अंकाचे ९वे वर्ष. गेली ८ वर्षे आपल्या सहकार्यामुळेच दरवर्षी उत्तमोत्तम अंक प्रकाशित होत आहे. तेव्हा यंदा संपादक मंडळात ज्यांना काम करायची इच्छा आहे त्यांनी तसेच ज्याना layout,illustrations, देवनागरीकरण, शुद्धलेखन तपासणी करायची इच्छा आहे त्यांनी इथे लिहावे.

तसेच आपल्या काही सूचना असल्यास इथे लिहाव्यात.

आधीचे अंक इथे वाचायला मिळतील.

मी पण .. मी पण ....
(एक आवाज: पण काय ते बोला की)
..... भीषण शांतता ......

परागकण

शोनु... अभिनंदन... सर्वोत्कॄष्ट दिवाळी अंक निर्मितीसाठी हार्दिक शुभेच्छा.
देवनागरीकरण, शुध्दलेखन या व्यतिरिक्त कोणकोणत्या प्रकारे सहकार्य करणे शक्य आहे हे कळाले तर बरे होईल.. म्हणजे त्याप्रमाणे आपआपला खारीचा वाटा उचलता येईल.

शोनू... अभिनंदन.. Happy
काही मदत लागली तर सांग नक्की..

मी करण्यासारखं काही काम असेल तर जरून सांगा.. लिखाणाचे एडीटींग.. देवकरण.. किंवा ईतरही काही...
मला आवडेल करायला. Happy

अभिनन्दन शोनु , संपादक मंडळात सहभागी व्हायला आवडेल.

अभिनंदन शोनु! Happy
कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास नक्की सांग!
~ पन्ना

अरे वा.. अभिनंदन ग शोनू.
मलाही आवडेल मदत करायला...

वा.. जोरात तयारी चालू झालीये की..
एक से एक दिग्गज दिसतायत संपादक मंडळात.. Happy
अंकाची आतुरतेने वाट पहात आहे..

संपादक,
कृपया यावेळेचा दिवाळी अंक डाउनलोड करता येईल आणि प्रिंट घेता येईल असा करा. मागच्यावर्षी तो PDF मध्ये उपलब्ध केला गेला नव्हता.

अडम, तुला कुठे दिसली संपादक मंडळीतल्या माबोकरांची नावं?

एक सूचना : दिवाळी अंकाबद्दलच्या सर्व मुख्य posts पहिल्या पानावर चिकटवता येतील का ?

शोनू - हार्दिक अभिनंदन..... मी प्रूफ रिडिंगचे काम पूर्वी केले आहे...... मी यामध्ये मदत करू शकते...... कल्पना.....

संपादक,
धन्यवाद, तुमच्या ई-पत्रा बद्दल.
(मी योग्य जागी माझा प्रतिसाद देत आहे ना?)
देवनागरी करण कसे करावे, या बद्दल मला काही माहीती नाहिये, त्यामुळे त्याबद्दल मी काही संगु शकणार नाही.
शुध्द्लेखन-- जरा अवघड प्रांत आहे.
आणि इतर कामां मध्ये काय काय येईल?
काम करण्याची मनापसुन ईच्छा आहे, पण अजुन स्पष्ट कल्पना आली नाहीये.

माझ्या या शंका दुर होतील का?
अनघा
***********************************
If there is a way, I will find one.
If there is none, I will make one.

देवनागरीकरण आणि शुद्धलेखन या कामात मदत करायला नक्की आवडेल....

Pages