दुनियादारी: गेला मित्र कुणीकडे....

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

नुकतेच दुनियादारी हे श्री सुहास शिरवळकर यांचे पुस्तक वाचले.... सुरुवात टु शेवट... लै भारी! Happy एकदम कालीजच्या दिवसांची याद आली!
कॉलीजला असताना लै दुनियादारी केली .... त्यातली काही तर कॉलीजनंतर अनेक वर्षे निस्तरण्यात गेली! अश्याच एका दुनियादारीत एक जण भेटला, तो पुढे मित्र झाला....पुढील ८ वर्षे तो मित्र म्हणुन वागत होता, पण "तुम्ही एखाद्याला सर्वकाळ मुर्ख बनवु शकता, तुम्ही सर्वांना काही काळ मुर्ख बनवु शकता, पण तुम्ही सर्वांना सर्वकाळ मुर्ख बनवु शकत नाही" ह्या उक्तीनुसार काही काळाने त्या मैत्रीचा बुरखा फाटायला सुरुवात झाली..

त्याच 'मित्रा' शी निगडीत गेल्या दोन वर्षा पुर्वी केलेल्या एका दुनियादारीबद्द्ल...

मी अन माझा बी एस्सी च्या शेवटच्या दिवसापासुनचा (दुसर्‍या एका दुनियादारी बद्दल कॅन्टीनवर रात्री १० वाजता बोलणे चालु असताना हा भेटला! तसा वर्गातलाच होता, पन एस. वाय. ला एक वर्षे नापास झाल्याने टी. वाय. तो नवीन क्लासमेटपासुन तुटक रहायचा, असो) पासुनचा! पुढे अगदी जिवलग, मित्र अगदी जिवलग बनलो! एकाच कपात चहा पिणारे, वगैरे ईत्यादी!

एम एस्सी नंतर त्याला कंपनीत नोकरी (आर अ‍ॅन्ड डी विभागात) मिळाली नाही, म्हणुन तो मार्केटींग ला गेला. एम आर झाला. जाम वैतागला. त्याची मैत्रीण त्यावेळी शिकत होती. दरम्यान, मी एक दोन नोकर्‍या बदलुन सिप्ला मध्यी जॉईन झालो. एका महिन्यात त्याल सिप्ला मध्ये बोलावुन घेतला! (बॉस अन काही वरिष्ठ अगदीच फिदा होते कामावर... मग मित्राचे काम करुन टाकले.) फिरतीची नोकरी सुटल्याने, अन एकाच ठिकाणची नोकरी लागल्याने, नोकरीच्या १० व्या दिवशीच त्याने त्याच्या जुन्या मैत्रीणीसोबत लग्न केले. (ती स्टोरी वेगळी! लै इंटरेस्टिंग हे! असु द्या!) सहा महिन्या नंतर त्याला ग्लेनमार्क च्या आर अ‍ॅन्ड डी चा कॉल आला. सहा महिने सिप्लात होताच. अनुभव कामी आला.... ग्लेनमार्क ला चिकटला तो!

सिप्लात असताना आमच्या सिनिअर मुळे आम्हाला पी एच डी बद्दल कळले. अन मग सोबत प्रयत्न सुरु केले. त्या काळी माझ्या खिशातले सगळे पैसे असेच मित्र खात्यात खर्च व्हायचे! हिशेब कधी केला नाही.. मला घरची काहीच आर्थिक जबाबदारी नसल्याने, पगार हा कधी न भेटलेल्या पॉकेटमनी सारखा खर्च व्हायचा!

पुढे एक वर्षात मी युरोपात पी एच डी ला गेलो. त्याचे ही प्रयत्न चालु च होते. पण बायको शिकत्/पार्ट टाईम नोकरी करत होती, मग त्याचे काम थोडे हातचे राखुण होते. मी माझ्या लॅब ला प्रयत्न करुण पाहिला, पण मॅरिड म्हणुन प्रोफेसर नको म्हणाले. एका फेलोशिप/पगारात दोन जण राहतील अशी परिस्थिती नव्हती.

त्याच्या बायकोचे शिक्षण संपले. गेल्या एक दोन वर्षात नेहमी भेटुन ती ही माझी 'चांगली मैत्रीण' झाली होती.. पुढे तिने आम्हाला राखी बांधली होते, मग काय.... मानलेली बहीणच! मग तर हिशेबाचा प्रश्नच नव्हता..... तिने ही पार्ट टाईम नोकरी सुरु केली. तिनेही त्याच्या साठी पोझिशन बघणे सुरु केले (मी अन मित्राने तिला हे सर्व कसे करायचे ते सांगितले होतेच. ती तशी खुपच चतुर आहे!). मग मित्राला युरोपातच दुसरीकडे पोझिशन मिळाली!
ते चार वर्षे आम्ही हवेतच होतो.... पण राहुन राहुन, कॉलेजचे अन सिप्ला मधले दिवस आठवत होतो.... पीएच्डी ला जरी जमले नाही, तरी पुढे कधी शक्य झाल्यास एकत्र एका ठिकाणी रहायचे अन एकत्र काम करायचे असे आम्ही दर आठवड्याला फोन/साईप्/याहु/जीमेल वर ठरवत होतो........

मी ४ वर्षात पी एच डी पुर्ण केली अन २००६ ला परत आलो. युपीएससी, टाटा कॅन्सर हॉस्पीटल मार्गे रिलायन्स ला जॉईन झालो, ऑगस्ट २००७. तोवर मित्र पी एच डी च्या शेवटापर्यंत आला होता. मध्यंतरी त्याच्याच विद्यापीठात एका प्राध्यापकाशी बोलुन त्याच्य बायकोला काही काम मिळवले, अन पुढे त्याच कामावर थेसिस लिहुन तिला ही एक पी एच डी मिळाली होती. काही थातुर मातुर कामाला या देशात पीएच. डी. देतात, हे सिद्ध झाले! (म्हंजे हिचे शिक्षण, डिप्लोमा इंजिनीअरींग, मग बी कॉम, मद दुर शिक्षणाने कुठे एम एस्सी कश्यात तरी, अन मग पी एच डी दिली ती शैक्षणीक कामासाठी / विद्यार्थ्यांना शिकवायला काही अ‍ॅनिमेटेड फाईल बनवायच्या कामात!) असो. मी दुसर्‍याच्या क्षेत्रातल्या कामाचे मुल्यमापन करु नये. पण तिला तिच्या कामात मदत करताना मला कळलेले कामचे स्वरुप असे होते.

शिक्षणाने माणुस मोठा होतो, त्याचे विचार प्रगल्भ होतात, पाय जमीनीवर येतात असे मला वाटते. पण दोघांना पीएचडी मिळाल्यामुळे ही दोघे जमिनीच्या वर हॅलिकॉप्टर मध्येच होती असे कळायला लागले. दोहे ही कमावते झाल्याने अन युरो त कमाई झाल्याने ह्यांच्या डोक्यात हवा जाउ लागली होती कि काय अशी शंका आली. कारण, काही जुन्या मित्रांसोबतच ह्यांचे संबंध कारण नसताना (क्षुल्लक आर्थिक कारणांवरुन?) बिघडले गेले.. गावाकडे ही ह्यांच्या भेटी काही अप्रिय बातम्या देऊ लागल्या. पण तो घरोघरी असणारा वाद असतो त्यामुळे असो असो.

ऑगस्ट २००८. मित्राची पीएच्डी पुर्ण झाली. पण मित्राला परत भारतात यायचे नव्हते, अन तिथे काही पुढे काम मिळत नव्हते. परेशान झाला होता. त्याच्या बायकोची पी एचडी संपल्याने ती भारतात आली होती. कारण मध्ये दोन अडीच वर्षे ती आली नव्हती.
मी मुंबईत नोकरी करत होतो अन मला भारता बाहेर जायचे नव्हते. तश्यातच, २००७ पासुन जुन्या साहेबाने बोलावणे धाडले होते कि तु ये परत इकडे युरोपात ये म्हणुन! मी एक वर्षे टेंगळ्मंगळ केली... मग ह्या मित्राला सांगितले, जा माझ्या साहेबाकडे जागा आहे, तु अर्ज कर. मी साहेबाला नाही म्हणालो, अन मित्राला त्याच दिवशी साहेबाकडे अर्ज करायला सांगितला..... साहेबाने त्याल बोलावले!:) (नशीब मी, साहेबाला हा माझा मित्र आहे हे सांगितले नाही, अन्यथा अजुन एक रामायन घडले असते!) अन मला साहेबाने मेल केला, कि मी अजुन एक भारतीय घेतला आहे, तु आता इथे ये! (मी तिथे एकटा भारतीय असल्याला कंटाळलो होतो) पण मी नाही म्हणालो.

एक गोम अशी होती, कि माझ्या साहेबाकडे तीन वर्षाची पोझिशन होती, पण पहिले एक वर्षे बायकोला डिपेंडंट व्हिसा मिळणार नव्हता, व्हिसिटर म्हणुनच तीन/सहा महिने अश्या भेटी देता येणार होत्या. माझ्या लग्नाला १ च वर्ष झालेले होते, अन घरचे लोक अश्या दुर राहण्याला विरोध करत होते. पण मग मित्र अन त्याची बायको, मला भयानक फोर्स करु लागले. शेवटी, मी अन मित्राने ने युरोपात रहायचे, अन त्याच्या अन माझ्या बायकोने मुंबईत रहायचे. व्हिजिटर व्हिसा वर तीन्/सहा महिने युरोपात जायचे असा पर्यार देऊन मला समजावले.... अन एक वर्ष, असे भुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र उडुन जाईल असे हे ही समजावले. पण मला भारतात केवळ बायकोसोबत राहणेच नव्हे, तर स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी थांबायचे होते. दरम्यान मी गावाकडे दुध धंदा सुरु केला होता, अन उस/साखर/गुळ डोक्यात बसले होते. त्यासाठी प्रयत्न सुरु होते....

तश्यात मित्राची बायको भारतात आली होती.. ती मुंबईत माझ्या घरी आली, अन मला कागदपत्रे घेऊन दिल्ली ला व्हिसाला पाठवले.... पहिल्या दिल्ली भेटीत मी हात हलवत परत आलो. कारण तेच ते एम्बसी समोर उभे रहा, भारतीय परराष्ट्र सेवेचे शिक्के घ्या... ह्या सर्व प्रकाराला मे वैतागलो होतो. पाच दिवस दिल्लीत राहुनही फक्त एकच शिक्का झाला अन मी पुन्हा आलो. पण मित्राच्या बायकोने मला परत पाठवले, कि नाही, आपल्याला युरोपातच एकत्र राहयचे आहे... तु काही कर पण व्हिसा मिळव. (ते दोघे तिथे युरोपातच राजधानीच्या शहरात राहत असल्याने, त्यांना व्हिसा खुप सहज मिळाला होता. पण इथे भारतात, मुंबई दिल्ली च्या वार्या करायला मी वैतागलो होतो. पी एच डी च्या वेळी ही खुप त्रास झाला होता!) मग, दुसर्‍या भेटीत रेल्वे तिकिटे मिळाली नाही, तर विमानाने दिल्लीला गेलो. पण तेच! कागदपत्र पुर्ण झाली नाही.... मी मागे फिरणार होतो. पण मित्राच्या बायकोने माझ्यावर दिल्लीत असताना पण फोनवर वॉच ठेवला होताच... शेवटी एका एजंटकडी पासपोर्ट अन कागदपत्रे देऊन मी परत मुंबईला आलो.....मग दोन महिन्यात रितसर व्हिसा झाला.

मित्राची बायको युरोपला परत निघाली. माझेकडे काही दिवस राहुन अन गावाकडे काही दिवस राहुण ती पुन्हा युरोपला जाणार होती. अन मग ते दोघे कामाच्या ठिकाणी हजर होणार होते. तिचे विमान राखी पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशीचे होते. ती आदल्या दिवशी माझेकडे मुंबईत आली. दिवसभर खरेदी केली. तिने एक दोन ठिकाणी राख्या खरेदीसाठी किंमती विचारल्या, पण महाग वाटल्याने घेतल्या नाहीत. (वाशी चे मॉल कित्त्ती महाग!) मी ही गुपचुप एक गिफ्ट खरेदी केले. खुप महाग नव्हते, पण तिला छान काही येईल असे होते! चंपी ने सुचवले होते. ... संध्याकाळी घरी आलो, मला वाटले ती आता राखी बांधेल . पण नाही...... ती विसरली! मग मीच तिला गिफ्ट दिले, पण ती म्हणाली कि लगेज जास्त झालेय, नको! तिला कळलेच नाही, कि हे मी युरोपाय जाणार्‍या मैत्रीणीला देत नाही तर, रक्षाबंधन निमित्त एका (मानलेल्या) बहिणीला देतोय! ..... नातेसंबंध बहुदा विसरली होती! संध्याकाळी तिला विमानतळावर पोहचवले, अन मग मी चंपीजवळ बोललो, कि आज तिने मला दुखावले! भावाला विसरली! रक्षाबंधन च्या दिवशी इथे असुनही राखी बांधली नाही! Sad

मग मी रिलायन्स चा राजीनामा दिला.... तिकिटे काढली.....! बायकोला अन घरच्यांना समजावले कि एक वर्षे थोडा त्रास होईल पण मग सर्व ठिक होईल. पण- किंतु- लेकिन- परंतु- अन, अन अन... माननीय परम मित्राचा मेल आला कि, तो माझ्या साहेबाकडे जाणार नाही, त्याला दुसरीकडे जास्त पगाराची पोझिशन मिळाली आहे. आता मी एकट्यानेच जावे! त्याने अन त्याच्या बायकोने दुसरीकडील पोझिशनचे व्हिसा मिळवले आहेत अन ते तिकडे जाणार आहेत! .......झाले, आमचे हात पाय च गळाले..... जे नको तेच पुन्हा...... एकटेपण! (बायको ला लगेच नेता येणार नव्हते, नंतर प्रयत्न करावे लागणार होते. सहा महिने ते एक वर्षे लागु शकत होते! पोझिशन ३ वर्षाची होती, कायम पण होऊ शकत होती!.....)

मित्राला खुप विनवणी केली...... पण मित्राने मग, त्या दुसर्‍या पोझिशनला पैसे कसे जास्त मिळणार आहेत ते मला सांगितले, पटवायला बघितले. पण मग, जिथे खर्च जास्त तिथेच पगार जास्त हे सुत्र त्याला समजावले. त्याला ज्या नवीन शहरात पोझिशन होती, ते युरोपातले महाग शहरांपैकी एक आहे हे ही समजावले. पण मग, तो बायकोला लगेच नेता येईल ह्या पॉइंट ने अडुन बसला.....अन आम्हा दोघांना एकाच लॅब मध्ये काम करायला मिळणार, ह्या सुरुवातीला मला पोझिशन अ‍ॅक्शेप्ट करायला लावताना वापरलेल्या इमोशनल वाक्याचा त्याला विसर पडला..... असो असो.

त्याने अचानक नकार देऊन, मला जो धक्का दिला तो अवर्णनीय होता... पण मला इलाज नव्हता. भारतातली नोकरी सोडुन मी विमानाची तिकिटे काढुण बसलो होतो. शेवटी, पत्थर पे दिल रखके, बायकोला साश्रु नयनांनी निरोप देऊन मी युरोपाला गेलो. (अगदी, इमिग्रेशन च्या टेबलावर शिक्का मारेस्तोवर काचेतुन बायको कडे बघत होत! अक्षरशः बायकोच्या डोळ्यात पाणी पाहुन, मन पिळवटले होते. पण परिस्थिती अशी झाली होती, कि जाण्यावाचुन पर्याय नव्हता!) पण युरोपात टिकलो नाही. तब्येत अन मानसिक स्थिती ढासळली अन चार महिन्यातच परत आलो. चार महिन्यात ४०० युरो फोनवर खर्च झाले हा भाग वेगळा!पण तिथे केलेल्या कामावर एक रिसर्च पेपर मिळाला! हे ही नसे थोडके!

अर्थात, पुढे मित्राला ही नवीन ठिकाणी गेल्यावर एकाच महिन्यात बायकोला पुन्हा भारतात पाठवावे लागले, कारण तब्बल दहा वर्षानंतर त्यांना गुड न्युज होती! पण त्या देशात तिला लगेच प्रेग्नंसी बेनिफिट मिळु शकले नाही... मेडीकल इंन्स्युरंस ला एक वर्षे वेटिंग टाईम नंतर प्रेग्नंसी बेनिफीट देतात. जर सोशल सिक्युरीटी असेल तर मग लगेच बेनिफिट मिळतात. ..... अन आज दोन वर्षा नंतर ही त्याला त्याच्या बायकोला युरोपात नेता आले नाही! प्रेग्नंसी अन लहान बाळा चे संगोपन ह्यात ही इकडे अन तो तिकडे असे झाले! त्याला लवकर भारतात यायचे नाही, 'युरो' मध्ये कमवायची सवय सुटत नाही.... मला फसवल्याची शिक्षा त्यांना मिळाली असे समजुन मी आनंदी होऊ शकतो, पण नाही, असे एकमेकांपासुन दुर राहणे कधीही वाईट! देव करो अन त्यांना लवकरच एकाच ठिकाणी एकत्र रहायला मिळो!

***
पुढे डिसेंबर २००८ ला परत भारतात आलो. तोवर ऑस्ट्रेलियन प्रोफेसर ने बोलावणे धाडले होते! पण त्या व्हिसात ६ महिने वाया गेले. डिसेंबर २००८ ते जुन २००९ हे सहा महिने बेकार राहिलो... विसा ची कागदे जमवणे अन अर्ज करणे.......जे नको तेच पुन्हा पुन्हा करावे लागले! पैसे ही संपत आले होते. युरोपाला जाऊन येण्यातच (विमान प्रवास अन पाच महिने बेकारी ) तिथली केलेली कमाई संपली होती! भारतात नोकरी मिळणे अवघड होते, कारण मी पोस्ट डॉक मध्येच सोडली होती. रिलायन्स ची नोकरी १२ महिन्यातच सोडली होती. माझी वर्क हिस्टरी खराब झाली होती! (सुदैवाने ऑस्ट्रेलियन प्रोफेसर, जो कि माझा खुप जुना मित्र ही आहे, त्याला हे सगळे माहिती होते, त्यामुळे त्यानेच धीर दिला. अन आज मी, चंपी अन ... एकत्र राहत आहोत!)...... मग एका मित्राकडुन पैसे उसणे घेतले, अन आमचे दोघांचे ऑस्ट्रेलियाचे तिकिट काढले! एका महिन्याने इथुन त्याचे पैसे परत केले!

****
आज जवळपास एक वर्षानंतर जेंव्हा हा सगळा विचार करतो...तेंव्हा असे वाटते,

१) मित्रावर भरोसा ठेऊन जर भारतातील नोकरी सोडली नसती, तर भारतात बढती मिळाली असती. गृप लिडर झालो असतो.
२) गावाकडे भारतातच दुधा च्या धंद्यात अजुन वाढ करता आली असती. दुसरा धंदा, पक्षी- उसाचे गुर्‍हाळ, चालु करता आले असते.
३) भारतात असताना बाळ झाले असते. अन आता इथे एकट्याने/दुकट्याने बाळाचे करताना आमचे जे हाल होत आहेत, होणार आहेत, ते झाले नसते. चंपीला अगदीच एकटे पडल्यासारखे झाले नसते! (दोघांच्या आई इतक्या वयस्कर आहेत, कि त्यांना इथे येणे शक्य नाही. चंपी ने मला एकट्याला इथे सोडुन परत जायला नकार दिला. अन बहिणी अन वहिणी पण येणे अवघड आहे. तिथे गावी अडचण!)

***
ह्या दुर्घटनेला सुरुवात होउन दोन वर्षे झाल्यानंतर, आज त्या मित्राची अन त्याच्या बायकोची प्रचंड आठवण येते आहे! Happy

पण यातुन काही शिकणार का?....... नाही, कारण दुनियादारी हा आमचा धर्म आहे, तो आम्ही पाळणारच! Happy हम कभी नही सुधरेंगे! Happy

प्रकार: 

Happy

------------------------------------------------------

चला! 'दुनियादारी फॅन क्लब' मधे अजुन एक अ‍ॅड Wink

तरुणाईला बरोब्बर शब्दात पकडण्याची जादु जमली आहे त्या जादुगाराला....

दुनियादारी मीही ३ वर्षांपुर्वी वाचलं. फार आवडलं. 'ह्या लेखकाला भेटायचंच' ठरवलं. पण माहित नव्हतं तेव्हा.. Sad

चंपक प्रत्येकाला आयुष्यात वाईट अनुभव येतात , मलाही आलेत .एनी वे हे तुझं रंगीबेरंगी पान आहे , तुझे विचार आहेत , पण खरं सांगु मला नाही पटलं , आपलेच दात अन आपलेच ओठं , कितीही झालं आणि मित्रं कसाही असला तरी तो मित्रचं असतो , त्याच्याबद्दल सार्वजनिक ठिकाणी लिहण्यात काहीच हशील नाही .
असो , तुला तुझ्या दु:खांचा विसर पडो . ऑल द बेस्ट .

मी नुसतं 'दुनियादारी' वाचलं आणि प्रतिसाद लिहीला होता...
श्री चा प्रतिसाद वाचल्यावर लेख वाचला. आणि श्री ला अनुमोदन द्यावसं वाटलं.

दु:खांचा विसर पडो . ऑल द बेस्ट

चंपक मित्रा.....
छान लिहलयस!
हे असे मित्र खुपदा भेटतात!..... आणि आपल्यासारखे दुनियादारी करणारे हमखास फसतात!
असो तरीही दुनियादारी सुटत नाहीच!

श्री...
दु:ख विसरण्याचा एक प्रकार म्हणा हवे तर ह्या लिखानाला!

पण काय होते, कि आपण शांत बसतो, अन हे लोक उजळ माथ्याने आपल्यासमोर वावरत राहतात. मागील वर्षी भारतात असताना, ही मित्राची बायको अचानक आमच्या एका सरांच्या घरी दिसली. ते सर आता कुलगुरु आहेत. तिथे सर माझी खरडपट्टी काढत होते, कि मी रिलायन्स का सोडली, आता स्पेन का सोडले, अन आता रिकामा का? अन आता ऑस्ट्रेलियाला जातो का? हे धरसोड बंद कर वगैरे म्हणुन. अन मला ह्या मित्राचे उदाहरण देत होते, कि तो बघ कसा, पी एच डी झाला कि लगेच पोस्ट डॉक ला गेला..किती विचारी, समजुतदार वगैरे वगैरे... मी म्हणालो, कि सर, मी ह्याच मित्रा च्या सांगण्यावरुन असे निर्णय घेतले...... तर मग मध्येच ही मैत्रीण बोलली कि, बघा ना, आपण आपले निर्णय स्वतः घ्यायचे असतात, असे दुसर्यावर अवलंबुन नसते रहायचे. आम्ही आमचा फायदा बघितला.तुला तुझा फायदा बघायला काय झाले होते?..... हे बाणेदार उद्गार ऐकुण वाटले, कि उल्टा चोर कोतवाल को डाटे?!!? मी तर बेशुद्धच पडणार होतो Happy पण हसलो मनात!

आपण आपला गाढवपणा कबुल करायला लाजायचे कश्याला! आपण जर आपल्यावर हसलो नाही, तर जग आपल्यावर हसते! Happy

>>तर मग मध्येच ही मैत्रीण बोलली कि, बघा ना, आपण आपले निर्णय स्वतः घ्यायचे असतात, असे दुसर्यावर अवलंबुन नसते रहायचे.

हे म्हणजे फारच झाले!

मग तु सुनवलस का नाहीस यावर काही तिला?

नेकी कर कुवेमे डाल.
जो दुसर्‍यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला....
इत्यादी पाठ करणे!! बरे वाटेल. Happy

आपली परीक्षेची वेळ होती, कोणीनाकोणीतरी निमित्त म्हणून उभं राह्यलं असं समजायचं. तावून सुलाखून त्यातून बाहेर कसं पडतोय ते बघायचं, पडलो असलो तर त्याबद्दल आनंद मानायचा.

बास इतकंच!
बाकी पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा आहेतच.

मायबोली ही काही खाजगी सूड उगवण्याची जागा नव्हे....

ह्या धाग्याचा दुसर्‍या एका बीबीशी सम्बंध आहे असे वाटू लागले आहे.

आत्ता तुझ्या रंगीबेरंगी मधल्या उडवलेल्या पानाचा अर्थ लागला . बाकी नंतर बोलू कधीतरी . Happy

बायदवे , जर्मनीत अशी सहजा सहजी पी एच डी मिळत नाही रे . Happy तुला जर " त्या " देशाचा उल्लेख करायचा नसेल तर अ‍ॅटलिस्ट जर्मनीचे नांव तरी काढून टाक , असा माझा प्रामाणिक सल्ला आहे . Happy ( सात वर्षं ह्या देशाचे मीठ खातेय , तेव्हढे तरी खाल्ल्या मिठाला मला जागायला हवे ना . Happy )

आपण आपला गाढवपणा कबुल करायला लाजायचे कश्याला! आपण जर आपल्यावर हसलो नाही, तर जग आपल्यावर हसते! >>> चंपक, चूक झाली असं वाटत असेल तर ती संबंधितांसमोर, स्वतःशी कबूल करायला लाजू नये ते ठीक. पण नाही त्याठिकाणी (पब्लिक मधे!)कारण नसताना हा गाढवपणा सांगणे हा अजून एक वेडेपणा होईल असे नाही का वाटत? आता इथे हे लिहून लोकांना फुकट करमणूक देणे हा तुझा उद्देश आहे का? की उलट सुलट प्रतिक्रिया ऐकायची हौस आहे ?

>>आता इथे हे लिहून लोकांना फुकट करमणूक देणे हा तुझा उद्देश आहे का? की उलट सुलट प्रतिक्रिया ऐकायची हौस आहे ?

मला वाटतय की त्याने मनात साचलेल लिहुन मन मोकळ केलय... बस्स इतकच!

चंपक,
Accept it as a lesson learnt, and move on!

चंपक सेठ तुम्ही धंदा कसा करणार ?

ह्या प्रकारातुन मी तावुन सुखावून निघालो असेन (असे वाटते !) ... पण खुप पोळल्याची कधी जाणिव झाली नाही. मित्रां साठी काही करतांना परतीची अपेक्षाच ठेवायची नाही. जे काही करायचे आहे किंवा करत असतो ते केवळ स्वत: ला आनंद देण्यासाठी. जिथे अपेक्षा निर्माण होतात तिथे तोंड भाजुन निघायचीच शक्यता जास्त असते...

दारु ची नशा ४ तासात उतरते, पैशाची (रुपये, $, Euro) नशा सर्व नाते संबंध विसरायला लावते, अगदीच वाईट.

चंपक शेठ - धक्का बसल्यावर काही काळानंतर मनुष्य सावरतोच (नैसर्गिक आहे). पण असल्या धक्क्यातुन जी प्रगल्भता (maturity) येते ति कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही...

बुमरॅन्ग, ऋयाम, मानसी, संपदा, श्री, उदय, नीधप, मैत्रेयी, माणसी, टोणगा, मुटेसाहेब ... प्रक्रियेबद्दल धन्यवाद!

मी जे लिहेले, ते निव्वळ माझे मन मोकळे करण्यासाठी होते. गेली दोन वर्षे ही गोष्ट माझ्या मनात दररोजच असे. पन मी कुणाला कधी ही बोललो नाही. पण मनात मात्र अनेकदा उजळणी झाली. विशेषतः मी देशात मित्रांना, मायबोलीकरांना, कुटुंबीयांना काही सामाजिक/ व्यावसायीक कल्पना राबवायला सांगितले कि, त्यांचा प्रश्न असे, कि तुला जर हेच करायचे होते, तर तु तिकडे का गेलास? तु इथे आलास कि मग सुरु करु. गेलेल अजुन एक-दोन वर्षे तर काय बिघडले? कुलगुरु सरांचे उदाहरण मी वर दिलेले आहेच.

मग, मी इकडे का आलो? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधताना माझ्या डोळ्यासमोरुन हा घटनाक्रम तरळत असे. पण मी आजवर हा घटनाक्रम कुणालाही बोललो नव्हतो. मी मायबोलीवर आजवर अनेक चांगले अनुभव शेअर केले आहेत. मला अडचणीच्या काळात मदत केलेल्यांचा कृतज्ञतापुर्ण उल्लेख केलेला आहेच. तसा हा एक वाईट अनुभव शेअर केला. असे वाईट अनुभव इथे अनेकांनी शेअर केलेले आहेतच. त्यावर बर्‍या वाईट प्रतिक्रिया अपेक्षित असतातच, पण असे वाटले नव्हते कि मायबोलीकर मला एकदम आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करुन, सुड घेण्याची भाषा वापरतील. सुड घेणे हा माझा पिंड नाही. तशी मला शिकवण ही नाही. या घटनाक्रमात मला झालेला आर्थिक तोटा हा खुपच छोटा होता, पण मानसिक त्रास जास्त होता. एक वाईट स्वप्न म्हणुनच मी ह्याकडे बघीतले.

पण नेहमीच मनात दडवणे अन आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहणे, हे ही न्याय्य नाही, असे वाटले म्हणुन मी इथे मन मोकळे केले. कुणाला आवडणे, न आवडणे हा गौण भाग.

*******
केवळ वाईट लोक भेटले/ वाईट घटणा घडल्या म्हणुन आयुष्य थांबत नाही. अश्या घटना, लोक आयुष्यात येतच असतात, अन त्यातुन अपण बाहेर पडतही असतो. हा अनुभव ही त्या बर्‍या वाईट अनुभवांच्या हिमनगाच्या एका टोकाएवढाच मानायचा. 'राम-कृष्ण ही आले गेले, त्याविन का जग हे अडले', असे काहीसे म्हणायचे अन अश्या लोकांपासुन सावध रहायचे.

*******

उदय,

अपेक्षा नव्हतीच रे काही. पण असा धक्का ही अपेक्षीत नव्हता हे नक्की! मी कधी कुणाशी वैयक्तीक फायद्यासाठी संबंध जोडला, मैत्री केली, असे आजवर घडलेले नाही. पेट्रो कंपनीच्या एम डी पासुन पेट्रोल पंपावर काम करणारे पोरांपर्यंत सर्व प्रकारचे माझे मित्र आहेत. मैत्रीतुन स्वार्थ साधणे /फायदा करुन घेणे ही कल्पनाच मला मान्य नाही!

पण असल्या धक्क्यातुन जी प्रगल्भता (maturity) येते ति कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही...
>>>>>> नक्कीच! हे अनुभव खुप शिकवतात. अन हो, धंद्याबद्द्ल म्हणाल, तर सगळे काही ट्रॅक वर आहे! बस आपकी दुवा है! Happy
*******

अपेक्षा ह्या अनेक प्रकारात मोडतात... मी स्वार्थासाठी या अर्थाने म्हटलेलेच नाही. त्याही पलीकडे तुमचे व्यक्तीमत्व आहे हे मी आजतागायतच्या लिखाणा वरुन समजतो. तुमच्या बाबत मला मानसिक, भावनीक या अर्थाने म्हणायचे होते उदा. राखीच्या दिवशीचा अपेक्षा भंग, मित्राच्या सोबत काम करायला मिळावे असो.

मन मोकळे केलेस चांगले केले, उगाच दडपणात कशाला जगायचे... आता झाले गेले विसरुन पुढे चालायचे. शुभेच्छा.

आपण आपले निर्णय स्वतः घ्यायचे असतात, असे दुसर्यावर अवलंबुन नसते रहायचे. आम्ही आमचा फायदा बघितला.तुला तुझा फायदा बघायला काय झाले होते?..... >> हे मात्र १००% खरे.

मित्रांना आर्थिक मदत करणे, अगदी सख्या भावप्रमाणे मैत्री असणे वगैरे सर्व समजु शकते. पण केवळ मित्राच्या सांगण्यावरुन स्वतःचे career आणि पर्यायाने भविष्य पणाला लावणारा निर्णय घेणे, हे मैत्री कीतीही पक्की असेल तरी पटत नाही. आणि तेसुद्धा घरच्यांचा विरोध असताना.

नाही, कारण दुनियादारी हा आमचा धर्म आहे, तो आम्ही पाळणारच! हम कभी नही सुधरेंगे! >>>>> अगदी... ठेच लागुनही आपण शहाणे होत नाही, त्याला कोण काय करणार Wink

आपण आपले निर्णय स्वतः घ्यायचे असतात, असे दुसर्यावर अवलंबुन नसते रहायचे. आम्ही आमचा फायदा बघितला.तुला तुझा फायदा बघायला काय झाले होते?>>>>> हे मात्र अतीच होतं...

रक्षाबंधन च्या दिवशी इथे असुनही राखी बांधली नाही!>>>> हे मात्र सगळ्यात वाईट.. Sad

चंपक.. इकडे मन मोकळं करून बरं वाटतय ना आता?
छोड रे.. हळूहळू तुझ्या मनाला झालेल्या जखमा भरतील.. झाले गेले पूर्ण पणे विसरला नाहीस तरी आठवणींची धार बोथट होईल.काही काळाने ही घटना सांगतांना तू हसशील सुद्धा Happy
u hv learnt the most important lesson of your life '(आपण आपले निर्णय स्वतः घ्यायचे असतात, असे दुसर्यावर अवलंबुन नसते रहायचे') in a bit hard way.

हे मैत्री कीतीही पक्की असेल तरी पटत नाही.>>>

नक्कीच! तो काळच असा होता, कि अगदी 'दो जिस्म, एक जान', 'दुनिया कि कोई ताकत हमे अलग नही कर सकती'.. ई ई असा दोस्ती-मस्ती चा काळ होता! ..... आता मागे वळुन बघताना जाणवते कि ते फक्त एकतर्फी प्रेम होते Happy पण ठिक आहे, त्यातल्या काही चांगल्या आठवणी मनात शिल्लक ठेवुन बाकीचे विसरु!

काही काळाने ही घटना सांगतांना तू हसशील सुद्धा >>>> नक्कीच! आपणच आपल्यावर हसलेले बरे! लोकं हसण्यापेक्षा! Happy

<< बुमरॅन्ग, ऋयाम, मानसी, संपदा, श्री, उदय, नीधप, मैत्रेयी, माणसी, टोणगा, मुटेसाहेब ... प्रक्रियेबद्दल धन्यवाद! >>

चंपकजी,
कोणत्या प्रक्रिये बद्दल बोलताय तुम्ही ?
अहो मी काहीच प्रक्रिया नाही केली हो... Lol