मासे २) तांब

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 12 May, 2010 - 03:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांब माशाच्या तुकड्या साधारण ४-५
आल लसुण पेस्ट १ चमचा
चवी पुरते मिठ
मसाला १ ते २ चमचे
हिंग, हळद पाव चमचा
लिंबु रस १ चमचा
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

तांब च्या तुकड्या स्वच्छ धुवुन त्याला आल लसुण पेस्ट, हिंग, हळद, मसाला, मिठ, लिंबु रस चोळून घ्यावा. वेळ असेल तर थोडा वेळ मुरवत ठेवावेत. नंतर तवा गरम करुन तेल टाकुन त्यावर तुकड्या टाकाव्यात. खालुन ४-५ मिनिटांत शिजतात मग पलटी करुन ५ मिनीटे शिजवाव्यात.

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी
अधिक टिपा: 

आले लसुण पेस्ट न लावता ठेचलेल्या लसणाची फोडणी देउन तुकड्या तळल्या तरी चालतात.
आले लसुण लावलेल्या तुकड्यांना शक्यतो नॉन स्टीक तवा वापरावा म्हणजे तुकड्या चिकटत नाहीत.
नॉन स्टीक तवा नसल्यास तुकड्यांना रवा लावावा म्हणजे त्या चिकटत नाहीत.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तांब.... मी हे नाव पहिल्यांदाच ऐकलेय..

जागु, फोटोही टाक ना आधीचा आणि नंतरचा म्हणजे मासाही ओळखता येईल..

बराच मोठा दिसतोय.. चवीला कसा लागतो हा मासा??

मी गेल्या दिवाळीच्या वेळी मासळीबाजारात दिसणारे पण मी कधी न खाल्लेले मासे आणुन खायचा प्रयत्न केला होता. काही काही मासे चवीला चांगले वाटले तर काही फार आवडले नाही..

अग साधारण घोळीच्या माश्यासारखी चव असते. चांगली असते. हा छोटाच आहे ह्याच्यापेक्शा मोठा असतो.

वॉव!!! काय मस्त तळला गेलाय!!
उद्या पुन्हा पाहीन फोटो.... आज गुरुवार आहे Wink

जागु तु वडा च्या लिंकवर या बीबीची लिंक दिलीस म्हणून इथे ही हजेरी लावली.. Happy पण ही पाकृ इंटरेस्टींग नाही वाटली... Sad Uhoh फोटोमुळे असेल. कच्चा आणि मग थेट तळलेले तुकडे.. मधली रेसिपी फार सॉलिड लिहितेस... अर्थात हा बीबी ऑलमोस्ट एक वर्षापुर्वीचा आहे... Happy

जागू असला कुठला मासा तू खात नाहीस ग. आजून एक तू तो मासा खातेस आम्ही त्याला बंगाली मासे म्हणतो मी त्यांना आमच्या इकडे वजनावर भेटतात मोठे मोठे जाडे जाडे असतात कसे लागतात ते ग........................