तोक्यो गटग - मे २०१० (वृत्तांत)

Submitted by ऋयाम on 7 May, 2010 - 11:02
ठिकाण/पत्ता: 
आसाकुसा, कामीनारी मोन जवळ. वेळ १०:३० पासुन... दिवसः ९ मे, २०१०.

९ मे रोजी तोक्योमधे "तोक्यो-गटग २०१०" आयोजित केलं जात आहे.

आपण जपानमधे असाल आणि अजुन नोंदणी केली नसेल तर जरुर करा.
या बाफावर केलेल्या नोंदणीची नोंद लवकरात लवकर घेतली जाईल याची खात्री देतो.

तुर्तास अगत्य (लवकर नोंदणी आणि मग त्याप्रमाणे) येणेचे करावे.

संपर्कासाठी दुरध्वनी: ०८०-४१५०-२५०९.

* हो, हो उद्याच! मान्यः - खुप उशीर झाला लिहायला.. पण या तर खरं. रविवार आहे, खुप मजा येईल...

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ये हुइ ना बात.... Happy चलो असाकुसा.. (अस कस येउ विचार न करता या) !!
येळ सकाळची हाय.. नाहीतर निर्मळ नोमिखाई वाचली असेल तर गैर समज व्ह्यायचा Proud

तर तोक्यो गटग पार पडले...वृत्तांताची जबाबदारी ऋयाम कडे सोपवली आहे.
शेवटी मी जरा धावपळ केली आणि करायला लावली पण लोक हो ईलाज नव्हता.पण मजा आली!!
माता ने!

तोक्यो गतग.. मस्त झाले.. इन मीन तीन साण लोक होतो Proud
सगळ्याना भेटुन आनंद झाला... एम्बी. ऋयाम अरिगातो.. गतग ठरवल्याबद्दल Happy

स्टे-ट्युन्ड फॉर फोतोज.. Wink

तो~क्यो गटग ९ मे २०१० आज मोठ्या दिमाखात पार पडले.

वृत्त्तांत : -

आजच्या गटगला उपस्थित राहिलेल्या सर्वच मायबोलीकरांचे आभार! Happy
तुमच्या उपस्थितीशिवाय हे गटग शक्य झाले नसते!

सांख्यिकीच्या दृष्टीकोणातुन पाहता, आजच्या गटगला, एकुण महिलांची उपस्थिती ही ३०% अर्थात "महिला आरक्षणाचे किमान धोरण पुर्ण करणारी" होती. उपस्थित महिलांचे याबद्दल पुन्हा एकदा आभार.

आजच्या गटगला उपस्थित न राहु शकलेल्या, परंतु बाहेरुन पाठिंबा देणार्‍या सदस्यांचेही जाहिर आभारः -
१) सायो. @ (चु/अ/बिन)चुक किनारा... ?
२) महेश. @ बेंगलोर पण मन =( १/२ पुणे , १/२ तो~क्यो.)
३) रैना. @ सध्या दुर्दैवाने मुंबई. (असं त्याच म्हणाल्या)
४) वर्षा. @ मायबोलीवरील जुनं नाव 'सायुरी' ___ सध्या @न्यु~ जर्सी(!?)
५) चिन्गी. @ टोक्यो, पण सध्या आजारी असल्याने चुना...
६) आडो. @ .... ह्यांनी मात्र प्वालिटीक्स केलं. बाहेरुन पाठिंबा म्हणत स्वतः गुपचुप दुसर्‍या गटगला
"प्रमुख पाहुण्या" वगैरे म्हणुन उपस्थित राहिल्या. (@ कु. फे. हे. पा. वगैरे वगैरे.. )

* बाहेरुन पाठिंबा देणार्‍या सदस्यांची सदस्यसंख्या प्रचंड असल्याने अनावधानाने नाव मिसले असल्यास अनुल्लेख न समजता, जरुर संपर्क साधावा. यादी अपडेटली जाईल. Wink
==> चिन्गी यांचे नाव टाकले गेले आहे.

वृत्तांत देण्याआधी एक फोटो, भेटण्याचं ठिकाण अर्थात "आसाकुसा"चा...

___asakusa.jpg

गटग बद्दल मुख्य घडामोडी: -
१) "आपण जपानमधे राहत आहोत"चं भान ठेवुन, बरोब्बर १०:३० ला भेटायचे ठरल्याप्रमाणे सगळे वेळेवर आले.

२) सगळेच पहिल्यांदा भेटत असल्याने ओळखींचा राऊंड झाला.
* मग माबोबद्दल थोड्या गप्पा, अटाळणिय!
* विशेष नमुद करण्यासारखे तुक किंवा अननुल्लेख वगैरे टाकले/केले गेले नाहीत, का. न.

३) इतर गप्पा:
* "जपानबद्दलच्या अनुभवांबद्दल", "परतुनि पाहे" बद्दल गहन चर्चा. ज्येष्ठ मंडळींकडुन अनुभवकथन.
* कोण कुठे राहतो. कोणाचं माहेर कुठे, सासर कुठे. कोणाचे काका कोणाच्या माहेरच्या जवळ आणि कोणाची
आत्या कोणाच्या सासरच्या घराजवळ राहते. आणि इतक्या जवळ असुन आपण आज जपानमधे भेटलो. हेहेहे..
* इतर कुठल्याही देशापेक्षा जपानमधली लाईफस्टाईल कशी चांगली, रात्री सेफ कसं वगैरे वगैरे... (इतर देशांवर
तुक न टाकता... )

४) @ खादाडी: -
* काही नाही तर "स्टारबक्स" सही.
* इथेच 'बायबाय' होईल असं दिसत असताना उपस्थित सदस्यांपैकी 'बॅचलर' / 'रिकामटेकड्या' सदस्यांकडे
पाहुन 'तुमचं जेवायचं काय?' हा प्रश्न आणि 'काही नाही' असं उत्तर.... त्यांच्या चेहेर्‍याकडे पाहुन, आणि
असंही गटगच्या निमित्ताने म्हणुन 'तेन या' हॉटेलला देणगी द्यायचं ठरलं...
* शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारची व्यंजने असल्याने कोणाच्याही पोटावर पाय आला नाही.

५) अवांतर पण महत्त्वपुर्ण निरीक्षणे: -
@ उपस्थितांपैकी केदार्_जोशी बोर्डात आलेला माणुस आहे. लय भारी रे केदार्_जोशी!!! Happy
* या वाक्यातला भर "बोर्डात आलेला" वर असुन "माणुस आहे" वर नाही...
@ समस्त उपस्थितांचा, त्यांच्या नकळत एका चायनीज पोरीने लगे हाथ फोटो काढला. * माझं लक्ष गेल्यावर
घाबरुन तिनं कॅमेरा ऑफ वगैरे केला...

६) उपस्थित जनसमुदाय: -

जाऊदे. कुठे थापा मारु.....

एकुण संख्या : ३.
केदार्_जोशी, एम्बीजपान आणि मी. Wink
* ३०% महिला आरक्षणाच्या उमेदवार : - एम्बीजपान...
* केदार्_जोशी: - "तेन या" मधल्या खादाडीची काळजी घेतल्याबद्दल आभार!!! Happy

आणि हो! घाबरु नका लोक्स. पुढच्या वर्षी अजुन लोक जमतील. तोपर्यंत आरिगातो~ गोझाईमास आणि सायोनारा!!! Happy सर्वांचे आभार! पुन्हा भेटुया पुढच्या वर्षी!!!

*** आणि हो.
चु. भु. दे. घे. चु. भु. दे. घे. चु. भु. दे. घे.
वृत्तांतामधेही काही कमीजास्ती वाटल्यास जरुर कळवा. लवकरात लवकर एडीटले जाईल.

नादखुळा रे ऋयाम-साण.... DID मिथुनच्या भाषेत... क्या बात.. क्या बात.. क्या बात.. Happy

एकुण महिलांची उपस्थिती ही ३०% >>> आपला गटग माबोच्या सध्याच्या ट्रेंड ला धरुन होता.. Proud
पोरीने लगे हाथ फोटो काढला >> मान गये आपकी नजर.. Proud

एम्बी आणि ऋयाम-साण यांची जपानी भाषेवरची गहन चर्चा स्ता-बा मधे झाली..
जापानी भाषेचा वाडःमयीन उहापोह काफे-मोका चे गरमा-गरम घुटके घेत पार पडला.
त्यानी लगेचच एकमेकांची लेव्हल माहीत करुन घेतली.. Proud (जपानीज ची हो Wink ) , माझी लेव्हल त्याना सगळ्यात शेवटी.. जेव्हा मी गिंझा-सेन ला गिंझा-सान म्हणालो तेव्हाच कळून आली.. Proud

मधेच राखी सावंतच्या च्या प्रसंगाला उजाळा मिळाला..

दोघांचेही चेहेरे पाहाण्यासारखे झाले, जेव्हा मी त्याना सांगितले कि,

१. अजूनही मी कोहीत साखर घालून पितो..
२. जापानी स्टीक्स नी मला अजून जेवता येत नाही
३. पासमो वापरत नाही..
४. सुशी चाखलेली नाही...
५. नोमिकाया केलेल्या नाहीत..
असे बरेच.. शेवटी त्यानी.. "हाय कंबख्त तुने जापान अनुभवा ही नही" अस म्हणुन एक तु.क. टाकला. Proud

तरी... एकदम मस्त वाटले सगळ्याना भेटुन.. Happy , राइ-नेन दे माता काइ-गी ओनेगाइशिमास..
मायबोलीचे पण धन्यवाद !! Happy

@ केदार्_जोशी,

<"हाय कंबख्त तुने जापान अनुभवा ही नही">
तो येकच तुक होता रे Wink

राखी सावंतचा आयटम लय भारी होता Biggrin

धन्यवाद,

मस्त वृत्तांत. Proud बाहेरुन का होईना पाठींबा देणार्‍यांचे आभार मानल्याबद्दल धन्यवाद.
तेनयामध्ये जेवलात? Angry केदार, यासाई तेनदोन का? यम्मी...
प्रायव्हेट सर्क्युलेशनने फोटो ओनेगाई शिमास.
रुयाम, भाऊसाहेबांना चाट मारली का? Wink

अरे जपानकर्स लोकांनी संख्येबद्दल वाईट वाटून घेऊ नये. शेवटी भेटलात हेच महत्त्वाचं. फोटो प्रायव्हेटली पाठविण्याची सोय करावी (हे तुझ्याकरिता केदार).

ऋयाम, आमचंही डोंबिवली गटग पार पडलं. विराट संख्या नसली तरी कविताने आयोजित केलं आणि आम्ही ८-९ जणं भेटलो, ओळख झाली हेच महत्त्वाचं.

सही वृत्तांत! सुगोई... श्याशीन ओनेगाई शिमास
बरं देवळाशी भेटलात तर दर्शन वगैरे घेतलत की नाही? देवाचं म्हणतेय.. Proud

मस्त वृत्त्तांत. जपानमधल्या पहिल्याच गटग बद्दल अभिनंदन.
माझा ही बाहेरून पाठींबा होताच. पण पाठिंब्यासाठी एक सूटकेस मिळाल्याने पाठींबा गुप्त ठेवावा लागला.

जपानमधल्या पहिल्याच गटग बद्दल अभिनंदन.>>>> विकु, तुमचा जाहीर णिषेध. २००३ सालच्या ऑगस्ट महिन्यात आम्ही पाच सहा जण (शिबुयाच्या राजमहलमध्ये) भेटलो होतो. सांगण्यास आनंद होतो की तेव्हा भेटलेली डोकी आत्ताच्या दुप्पट होती. Proud

ऋयाम मस्त रे वृत्त्तांत...आडो तुमचे पण गटग नीट पार पडले तर
खरंच संख्येपेक्षा शेवटी भेटलो हेच महत्त्वाचं आहे.केदार केव्हाचे टयून होऊन बसलो आहोत पाठवा की फोटो....

गोमेन गोमेन मिळाले...सहीच की!!
काल दोन्ही बॅचलर मंडळींना लग्न या विषयावरून छळायचा प्रयत्न करताच दोघांनीही शिताफीने विषय बदलून टाकला...पण मग केदार पहिल्या फोटूमधली ती सुंदरा कोण?
नवीन लाईफ मेंबर की काय?

@ उपस्थितांपैकी केदार्_जोशी बोर्डात आलेला माणुस आहे. लय भारी रे केदार्_जोशी!!!
* या वाक्यातला भर "बोर्डात आलेला" वर असुन "माणुस आहे" वर नाही...
हे जबरीच Lol

Pages