मायबोली पत्रक

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

काही कारणामुळे काही दिवस (कधी कधी काही महिने) मायबोलीला भेट देणं जमत नाही. तेंव्हा तुमच्या सोयीसाठी अधून मधून या पत्रकातून ईमेल द्वारा मायबोलीला तुमच्या जवळ आणण्याचा हा प्रयत्न आहे. सध्या मायबोलीकरांच्या दृष्टीने नवीन काय विशेष आहे हे देखील तुम्हाला या सुविधेमधून कळेल. आणि जर बर्‍याच दिवसात तुम्ही मायबोलीला भेट दिली नसेल, तर एकदा चक्कर मारून तर पहा.

विषय: 
प्रकार: 

हे पत्रक म्हणजेच 'Email newsletter' का?
सदस्यत्व --> संपादन मधे 'Email newsletter' असे दिसते. पण त्यात Save ह्या button शिवाय काहीच दिसत नाही.

नात्या, लिंक माझे सभासदत्व - संपादन इथे आहे. संपादनवर क्लिक केले की दिसते. तिथे सबस्क्राईब करायचे आहे, ते केले मी पण अजून काही डीटेल्स वगैरे दिसले नाहीत. बहुधा इमेलमधे यावे न्यूजलेटर?

पहिलं पत्रक आलं.. कल्पना छान आहे.. Happy
हे साधारण जुन्या मॉड्स चॉईस सारखं झालं... त्याच पत्रकातल्या लिंक्स इथे पण मॉड्स चॉईस किंवा तत्सम काहितरी विभाग देऊन देता येतील का?

या पत्रकातल्या लिंक्स मायबोलीकरांनीच ठरवलेल्या निवडक १० मधल्या आहेत. प्रत्येक पानावर लेख/कथा/कवितेखाली निवडक १०त नोंदवा अशी लिंक आहे. त्यावर टीचकी मारून तुम्ही तुमच्या निवडक १०त नोंदवू शकता.
नवीन लेखन या पानावर, निवडक मायबोली या दुव्यावरून एकत्रितपणे सगळ्यांना काय निवडक वाटतंय याची यादी आहे. त्या यादीतल्या नोंदी पत्रकासाठी वापरल्या जाणार आहेत.
जितके जास्त लोक निवडक १० वर टीचकी मारतील तितकी ही यादी भरभर सरकेल.

सगळ्यात वर असलेली नोंद कायमच वर राहील का? का त्यापेक्षा जास्त मते मिळाली नाही तर सर्वोत्तम नोंद कायम तिथेच राहील? याचे उत्तर नाही. ती नोंद कायम रहाणार नाही. जितके जास्त लोक निवडक १० त नोंद करतील तसे नव्या नोंदीना जागा करण्यासाठी जुन्या आपोआप खाली येतील.

झकासराव तुम्ही इमेल पाहण्यासाठी कुठले सॉफ्टवेअर वापरता ते कळू शकेल का? म्हणजे काय अडचण आहे ते पाहता येईल.

शैलजा, धन्यवाद!

कल्पना आवडली. सध्या हे पत्रक सोडुन सगळ्यात लोकप्रिय 'निवडक १०' कुठे बघायला मिळतील? त्या पानाची लिंक मायबोली मुखपृष्ठावर उपलब्ध करुन देता येईल का?

सही आहे संकल्पना.
पण "निवडक १०" या पर्यायाचा अ‍ॅक्टीव्ह मेंबर्सनी, रिलीजियसली वापर केला तरच या मायबोली विशेष यादीमध्ये नविन आणि निवडक आर्टीकल्स दीसतील. जे सध्या दीसत नाहीये.

आत्तापर्यंतच्या निवडक दहांची यादी पत्रकामधुन पुरवण्यापेक्षा, प्रत्येक महिन्याची वेगळी यादी तयार केली तर ते जास्त सोयिस्कर होईल असे वाटते. नाहीतर प्रत्येक पत्रकात तेच ते निवडक दहा दीसत राहतील.

पहिले पत्रक आले पण इमेल मधे.

संकल्पना मस्त आहे.

मी सध्या अशीच एक संकल्पना राबवतो आहे. लवकरच (जुन २०१०) पासुन प्रिंट सुविधेद्वारे पण सुरु होईल. असो. माझ्या अनेक संकल्पना सुरु होतात अन चालुच राहतात Happy

अनेक धन्यवाद !

मस्त आहे पत्रक, पण ते बर्‍याच जणांच्या बल्क मेल मधे गेलेले असणार.
जे सभासद बरेच दिवस इथे आलेले नाहित, त्याना पण पाठवले असेलच ना ? त्या सर्वानी परत इथे यावे, असे मला मनापासून वाटते.

लेखन हक्क संबंधित प्रश्न:

हे पत्रक मायबोली बाहेरील मित्रांना फॉर्वर्ड केले तर चालेल का? (पत्रक छापुन वाटप करणे नाही!- बिल वाटायचे वय गेले :)) म्हणजे मायबोली चे सभासद होण्यास ते उद्युक्त होतील. न झाल्यास, किमान मायबोली वर काय उपक्रम चालु आहेत ते तरी कळेल!

उदा. मी ग्रंथाली वाचक चळवळीची माहिती पत्रके अश्या प्रकारे पाठवत असतो. 'ग्रंथाली ' ने मला तशी परवाणगी दिलेली आहे.

हे पत्र मायबोलीबाहेर जरूर फॉरवर्ड करा. पण एक गोष्ट सांभाळून. एखाद्याला जर हे ईमेलद्वारे नको असेल आणि त्यांनी तशी विनंती केली तर त्यांना परत हे पाठवले जाणार नाही याची काळजी घ्या. ज्यांना हे वाचण्यात रस नाही त्यांच्याही मताची आपण कदर केली पाहिजे.

प्रकाश काळेल, अनुमोदन!

मायबोलीपासून दूर असणार्‍यांसाठी याचा उपयोग केला जाणार असेल तर आणि "मायबोलीकरांच्या दृष्टीने नवीन काय विशेष आहे" असा उल्लेख असल्याने. एकदा पाठवलेल्या इमेलमध्ये ज्या लिन्क्स आहेत त्यातली एकही लिंक पुढच्या महिन्याचा इमेलमध्ये नसली पाहिजे.

कल्पना छान आहे, पण मी इथे नेहमी असतो. त्यामुळे परत मला इ मेल नको आहे, तो नको असल्यास काय करावे?

(तसे एक मेल आले त्याचा अनुल्लेख करता येतो, पण किती ठिकाणी अनुल्लेख करावा? इथेही बर्‍याच लेख कवितांचा करतोच. त्यामुळे जरा त्या पत्रकातून मुक्ती हवी आहे.)

नाही मी पाहिले. इ मेल न्युजलेटर मध्ये तो काल पर्यंत होता. पूर्णच इ मेल काढले की मग व्यक्तीगत संपर्क पण कोणी करु शकणार नाही, त्यामुळे ते हवे आहे पण लेटर नको.

मेल न्युजलेटर मध्ये एक ऑपश्न हवा. Happy सध्या तिथे You have been automatically subscribed to one or more sections. Subscribe to additional ones here असे येत आहे.

Pages