भुताचा फोटो ?

Submitted by नितीनचंद्र on 13 April, 2010 - 00:11

माझ्या राखण व बोलका या कथा माबोवर प्रसिध्द झाल्यावर भुतांचे व म्रुत्युनंतरचे जीवन याबाबत बरेच कुतुहल निर्माण झाले. एका माबोकराने तर राजापुराजवळ भुते विकत मिळतात अशी माहिती संगीतली.

http://www.maayboli.com/node/14421 राखण

http://www.maayboli.com/node/14500 बोलका

http://www.maayboli.com/node/38587 चकवा

या विषयावर अजुन इंटरनेट वर शोधले असता भुतांचे फोटो हा विषय मिळाला. मराठीतल्या म्रुत्युनंतरचे जीवन विषयक पुस्तकातले फोटो आधीच पाहिले होते. मग सुरवात केली.

हा पहा एक फोटो. चेहेरा जरा अस्पष्ट आहे.

DSC00003.JPG

मग आणखी काही फोटो ज्या इमारतीच्या आसपास घेतले त्या इमारतीचा लांबुन घेतलेला फोटो.
DSC00005.JPG

हा चेहेरा आणखी स्पष्ट झाला.

DSC00007.JPG

मग आणखी उत्कंठा वाढली आणि आणखी एक फोटो जो जरा जास्तच स्पष्ट झाला.DSC00006.JPG

काय शंका आहे ? हा चेहेरा पाहिल्यासारखा वाटतोय ?

?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
हो मी हा चेहेरा रोजच आरश्यातपहातो. शेवटचा फोटो माझाच आहे.
आधीचे दोन फोटो माझ्या मुलीचे आहेत. अस म्हणतात या पध्दतीने भुतांचे फोटो घेता येतात. जे फोटो इंटरनेट वर आहेत ते असेच अस्पष्ट आहेत. खात्रीने सांगता येत नाही ते खरे फोटो आहेत का खोटे. मला खात्रीलायक काढता आले तर आपल्याला दिसतीलच माबोवर.

गुलमोहर: 

Lol Lol Lol Lol Lol

काल रात्री १२:३० नंतर जोरदार चीं चीं असा आवाज झाला. बघतो तर काय माझ्या pc वर शेवटचा फोटो आणि त्याच्या समोर भेदरलेली एक अस्पष्ट आकृती थरथर कापत तरंगतेय.. Proud

काल रात्री १२:३० नंतर जोरदार चीं चीं असा आवाज झाला. बघतो तर काय माझ्या pc वर शेवटचा फोटो आणि त्याच्या समोर भेदरलेली एक अस्पष्ट आकृती थरथर कापत तरंगतेय..

होराव काल अमावस्या होती. ती अस्पष्ट आक्रुती माझा फोटो समजुन माझ्यासमोरच आली. मग मी सांगितल माणसात आणि माणसाच्या फोटोतला फरक ओळखायला शिका. आता ती अस्पष्ट आक्रुती माबोच्या सर्व जुन्या सदस्यांकडे जाणार आहे हे शिकायला. काय किरु चालेल ना ?

हा काहीतरी वेगळ करण्याचा पहिलाच प्रयत्न. मला खरच भुतांचे फोटो काढायचे होते. जवळच्या स्मशानात जायला भिती ही वाटत होती. मग आमच्याच टेरेसवर काही फोटो कुणीही समोर नसताना घेतले. अस वाटल होत की जेव्हा ते पाहिन तेव्हा त्यात काही आक्रुत्या दिसतील. अस काहीच दिसल नाही.पण माझे व माझ्या मुलीचे फोटो नाईट व्हीजन मोड मध्ये असले डेंजर आले की तेच दाखवुन गम्मत करावी असे वाटले. धन्यावाद प्रतिसादाबद्दल

Pages