भुताचा फोटो ?

Submitted by नितीनचंद्र on 13 April, 2010 - 00:11

माझ्या राखण व बोलका या कथा माबोवर प्रसिध्द झाल्यावर भुतांचे व म्रुत्युनंतरचे जीवन याबाबत बरेच कुतुहल निर्माण झाले. एका माबोकराने तर राजापुराजवळ भुते विकत मिळतात अशी माहिती संगीतली.

http://www.maayboli.com/node/14421 राखण

http://www.maayboli.com/node/14500 बोलका

http://www.maayboli.com/node/38587 चकवा

या विषयावर अजुन इंटरनेट वर शोधले असता भुतांचे फोटो हा विषय मिळाला. मराठीतल्या म्रुत्युनंतरचे जीवन विषयक पुस्तकातले फोटो आधीच पाहिले होते. मग सुरवात केली.

हा पहा एक फोटो. चेहेरा जरा अस्पष्ट आहे.

DSC00003.JPG

मग आणखी काही फोटो ज्या इमारतीच्या आसपास घेतले त्या इमारतीचा लांबुन घेतलेला फोटो.
DSC00005.JPG

हा चेहेरा आणखी स्पष्ट झाला.

DSC00007.JPG

मग आणखी उत्कंठा वाढली आणि आणखी एक फोटो जो जरा जास्तच स्पष्ट झाला.DSC00006.JPG

काय शंका आहे ? हा चेहेरा पाहिल्यासारखा वाटतोय ?

?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
हो मी हा चेहेरा रोजच आरश्यातपहातो. शेवटचा फोटो माझाच आहे.
आधीचे दोन फोटो माझ्या मुलीचे आहेत. अस म्हणतात या पध्दतीने भुतांचे फोटो घेता येतात. जे फोटो इंटरनेट वर आहेत ते असेच अस्पष्ट आहेत. खात्रीने सांगता येत नाही ते खरे फोटो आहेत का खोटे. मला खात्रीलायक काढता आले तर आपल्याला दिसतीलच माबोवर.

गुलमोहर: 

हा हा हा हा ... मस्तै.

भुतं कुठे विकत मिळतात? काय भाव आहे सध्या? मला हवीयेत अर्धा डझन... घरकामाला उपयोगी पडतील. नुसत्याच टिवल्याबावल्या करत फिरण्यापेक्षा जरा आमच्या उपयोगी तरी पडा म्हणावं.

Pages