|| नभे व्यापिले सर्व सॄष्टीस आहे | रघूनायका ऊपमा ते न साहे ||

Submitted by maitreyee on 3 September, 2008 - 23:48

P1000743.jpg

साध्या कॅनन पॉवर र्शॉट ने काढलेला फोटो. हा भव्य पुतळा अन वर पूर्ण भरून आलेले आभाळ , हे काँबिनेशन सही वाटले म्हणून टाकलाय इथे!!
(वर लिहिलेल्या ओळी दासबोधातील आहेत)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही !

    ***
    ...s a Moebius signature. This is a Moebius signature. Th...

    मैत्रेयी, अप्रतिम!!! हे बघितल्यावर काय वाटलं ते मला लिहिताच येईना!

    मस्त आलाय फोटो. कोठे आहे हा पुतळा? ते कोकणात परशुराम म्हणून ठिकाण आहे तेथे का?

    मैत्रेयी, छान आहे छायचित्र. पण ' रघूनायका ऊपमा ते न साहे ||' या ओवीचा अर्थ काय होतो लक्षात आला नाही. कृपया सांग.

    धन्यवाद Happy गजानन, भावना पोचल्या! मलाही तस्सेच वाटले ते दृ ष्य पाहून !
    हा पुतळा शेगाव च्या आनंद सागर amusement park मधे आहे. फार सुन्दर आहे ते ठिकाण. हा पुतळा आणि इतर संतांचे, शिवराय, असे एक से एक पुतळे तिथे आहेत.

    अहा!!!

    बी, मला वाटते अर्थ असा असेल कि, आभाळ सगळ्या जगाला व्यापून घेते (म्हणजे ते किती मोठे आहे) पण श्रीरामाचे वर्णन करायला ती उपमा पण पुरणार नाही.

    असामी अग्दी अगदी.. नभाच्या व्याप्तीपेक्षा रामाची व्याप्ती मोठी आहे, अनुपमेय आहे..
    मैत्रेयी मस्तच, शिर्षक सुद्धा आवडलं.. पुतळा कोणी बनवलाय माहितेय?

    जय जय रघुवीर समर्थ..

    खरच या प्रकशचित्रालादेखील काही उपमाचं नाही....

    मस्त. आभाळाच्या रंगछटा मस्त. आणि पूतळ्याबद्दल तर काय बोलावे!!

    असामी, धन्यवाद.. छानच अर्थ आहे.

    धन्यवाद,

    धन्यवाद याब्द्द्ल की हा फोटो बघुन शेगावला जायची ओढ जाग्रुत झाली.
    बाकी फोटो छान जमलाय. (black and white whith colour). काय मस्त रंगछटा आहेत......

    अधभुत्...अचाट्...अप्रतीम...
    काँबिनेशन सहीच आहे...