ज्वारीचे नूडल्स

Submitted by योगिता on 4 September, 2008 - 04:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चायनीज पदार्थ आवडणाऱ्या, भाज्या, भाकरी न खाणाऱ्या मुलांसाठी आणि एकूणच सर्वांसाठी पौष्टिक पदार्थ करून पाहा. ......

साहित्य -
दोन वाट्या ज्वारीचे पीठ, कोबी, गाजर, फ्लॉवर, ढोबळी मिरची प्रत्येकी एक वाटी, स्वीट कॉर्नचे दाणे, मोड आलेले मूग, मटार, भिजवलेले शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे प्रत्येकी अर्धी वाटी, फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, रिफाईंड तेल एक डाव, चवीपुरते मीठ, लसूण- आलं पेस्ट दोन चमचे.

क्रमवार पाककृती: 

कृती -
आपण भाकरीसाठी जसे पीठ मळतो तसे चवीपुरते मीठ घालून ज्वारीचे पीठ मळावे. सोऱ्याला थोडासा तेलाचा हात लावून त्यात शेवेची जाड ताटली घालून शेव चाळणीवर पाडावी व आपण उकडीचे मोदक वाफवतो त्याप्रमाणे शेव चमक येईपर्यंत वाफवावी. सर्व भाज्या बारीक उभ्या चिराव्यात. कढईत तेल, मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करावी. त्यात नंतर आलं- लसूण पेस्ट घालावी. नंतर सर्व भाज्या घालाव्यात. सर्व भाज्या वाफल्यावर त्यात ज्वारीचे नूडल्स घालावेत. हलक्‍या हाताने नूडल्स, भाज्या परताव्यात. वरून थोडे चवीपुरते मीठ घालावे. गरम गरम नूडल्स सर्व्ह करावेत.

अधिक टिपा: 

अशाप्रकारे आपण नाचणी, मका, तांदूळ, बाजरी या पिठांचेही नूडल्स करू शकतो.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी करुन बघेन.. या आठवड्यात....

खुपच वेगळी, छान पाककृती आहे.

ज्वारीच्या पीठाचे नूडल्स! आयडीया भारी आहे. भाकरी न जमणार्‍या (आणि कंटाळा करणार्‍यांना ;)) वरदानच Happy

सही!
----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

मी पण करते ह्या खुप मस्त लागतात

मुलं ह्या पदार्थाने नकीच खूष होतील..... २ मिनिट्....मैगीच्या ऐवजी घरचा पौष्टीक पदार्थ..... मी नातवंडाना नक्की करून घालीन....

अरे वा!! सहीच आहे हा पदार्थ!

वा. दिनेशदांनी नुडल्स टाकल्यात त्यात विकतच्या नुडल्सपेक्षा अशा तांदळाअच्या, ज्वारीबाजरीच्या, नाचणीच्या नुडल्स करुन वापरता येतील. पुर्णपणे पौष्टिक नाश्ता मिळेल.

चमक येइपर्यन्त उकडणे म्हणजे काय?
उकडायची प्रोसेस जरा सविस्तर लिहिणार का?

प्रकार मस्त आहे. मुलीला आवडेल.