लाफींग बेडुक आणि ब्रँडी

Submitted by विनायक on 13 April, 2010 - 20:36

"लाफींग बुद्धासारखे डोक्यावरती उलटे हात करुन उभ्या असलेल्या ढोल्या बेडकाच्या पोटाला ब्रँडी लावून त्यांना टबमध्ये पाण्यात बुडवल्यास घरातील कोणाला सर्दी न होता घरात समॄध्दी येते"......अहो अहो थांबा...."कोणाला हे कळतंय का काय आहे ते" असं म्हणून लगेच ह्या धाग्याचा नंबर पार्ल्यावर टाकू नका....अहो हा तर मुख्य डिसी गटगनंतर हॉटेलवर झालेल्या मिनी गटग चा निष्कर्ष आहे...कसं काय म्हणता...मग वाचा....

दुपारी जोरदार जेवणानंतर सर्व मायबोलीकरांची यथेच्छ खेचण्याचा कार्यक्रम झाला होता....मंडळींची हसून हसून पोटं दुखत होती....पोरं लालूच्या घराच्या परसात असलेल्या घसरगुंड्या, झोपाळे यांची यथेच्छ मोडतोड करीत होती....ज्ञाती, सिंडी, मो यांचे नवरे आणि खुद्द मी वरती पोरांना संभाळून कंटाळलो होतो.त्यामुळे कार्यक्रम संपून सगळेजणं वर आलेले बघून आम्ही एक सुटकेचा नि:श्वास टाकला होता. लोकं एकमेकांना पुस्तके, बिया,मसाले आणि टाळ्या देण्यात गुंग झाली होती. बाराकरांची बस रवाना झाली आणि आपल्यालाही आता निघायला हवं याची जाणीव अटलांटा कंपूतल्या काही जबाबदार (उदा. मी, सुनीत) व ज्येष्ठ! (जोग काका) व्यक्तीमत्वांना झाली म्हणून सगळयांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मी एक जोरदार शिट्टी मारली....पण नेहमीप्रमाणे त्या शिट्टीने आमचं पोरगं सुद्धा दचकलं नाही....काही बायकांनी माझ्याकडे तु.क. टाकले आणि सगळेजणं परत आपआपल्या उद्योगाला लागले. मग मी, सुनीत, राहुल वगैरे मंडळींनी स्वतः जावून बायकांना (आपआपल्या) निघण्याची विंनंती(!) केली. त्याचाही काही उपयोग झाला नाही....कसा होणार?...लालूच्या घरातून कोणाचा पायच निघत नव्हता....मग सुनीतने एक जोरदार "सायलेंस" अशी आरोळी ठोकली...मग मात्र जनता थोडीशी हालली....

मग हळूहळू एक-एक करुन सर्व गाड्यांचं एका मेडेटेरेनीयन खानावळीकडे प्रस्थान झालं.....तिथे हमस आणि पिटा ब्रेड्च्या वेगवेगळ्या प्रकारांचा जवळपास तीस एक मायबोलीकरांनी फडशा पाडला. एवढं गिर्‍हाईक एकदम आलेलं बघून लवकरच त्या दुकानदाराने दुकान बंद केलं......

अशा प्रकारे दिवसभर खूप खाल्ल्याने दुखू लागलेली पोटं आणि हसल्यामुळं दुखू लागलेले गाल घेऊन सगळ्या गाड्या हॉटेलवर पोहोचल्या.... जरा फ्रेश होऊन हळूहळू सगळी जनता आम्ही कब्जा केलेल्या सुईट वर जमा होऊ लागली....नवे-जुने अ‍ॅडमीनही सपत्नीक दाखल झाले...मात्र पाच मिनिटात बॅगा ठेऊन येतो म्हणालेले पन्ना, फचीन आणि विशाल अर्ध्या तासानंतर उगवले...त्यामागचे कारण पन्नाने सांगितले ते असे "फचीन आणि विशाल आंघोळ करत होते!!"......ह्या वाक्यामुळे प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेल्या शंकेला नितीनने वाचा फोडली परंतु दोन्ही अ‍ॅडमीन उपस्थित असल्यामुळे हा बाफ गुंडाळावा लागला...अधिक माहितीसाठी खुद्द फचीन आणि विशालशी संपर्क साधावा....

त्यानंतर मायबोलीच्या सवयीप्रमाणे खाली दिलेल्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा, उद्बोधक चर्चा, परीसंवाद, मतभेद, इत्यादी इत्यादी झाले.... विषय खालीलप्रमाणे-
१. २६/११ चा हल्ला आणि भारतीय शासन व पोलीस यंत्रणा
२. फेसबुकवरील फार्मव्हीलआणि मायबोलीवरील नवीन बा.फं
३. फेंग्श्युई
४. लाफींग बुद्धा, त्याची ढेरी आणि सम्रुद्धी
५.वादग्रस्त मायबोलीकर आणि चविष्ट भांडणे
६. पोटाला ब्रँडी चोळण्याचे फायदे
७. कुणाला स्वतःच्या पोटाल्या लावलेली ब्रँडी (किंवा इतर काहीही) जर का चाखता येत असेल तर त्या कलेचा लास वेगास मधे कसा उपयोग करुन घेता येऊ शकतो...
८. वर्जीनियातले रस्त्यावर फिरणारे चिंकी लोकं कसे उदार मनाचे आहेत...इत्यादी, इत्यादी....
एका कोपर्‍यामध्ये सिंडी, अमृता यांची विषयाला सोडून असंबद्ध अशी काहीतरी बडबड चालूच होती, ज्याकडे नंतर सर्वांनी (दोघी झोपेत आहेत असे समजून) दुर्लक्ष करायला सुरुवात केली....

एवढ्या कमी वेळात एवढ्या महान आणि वैविध्यपूर्ण विषयावर फक्त मायबोलीकरच बोलू शकतात ह्याची प्रत्येकाला खात्री पटत होती...कदाचित सर्वांचीच रात्रीची झोप झाली तरी नसावी किंवा दुपारची (मि. लालूंनी स्वहस्ते तयार करुन दिलेली) जास्त झाली तरी असावी.

मग शेवटी शेवटी जेव्हा झोपेने डोळे अक्षरशः मिटायला लागले तेव्हा एक एक जण उठू लागला....पोटं भरलेली होती पण गप्पांची भूक काही मिटत नव्हती....ह्या गप्पा संपूच नयेत असं प्रत्येकाला वाटत होतं पण झोपेपुढे हात टेकल्याने एवढ्यावरच समाधान मानून ह्या मिनी गटगची सांगता झाली....

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही.... धमाल आली रात्री खूप. सगळे थकलेले होते त्यामुळे लवकर रात्री २ वाजताच मैफिल संपली नाही तर रात्र जागून काढली असती.,

Lol आयला, कोण कोणाच्या लेखण्या , गायनी गळे गुलदस्त्याबाहेर निघायला लागलेत. धन्य हो वैद्यसाहेब! नाव रोशन केलत.

अरे आपण अ‍ॅडमिनना केलेली मागणी नाही का सांगीतली. मायबोलीवर निषेधासाठी एक फेकुन मारता येईल असा अंड्यांचा एमोटीकॉन हवाच ते. त्यांनी बहुदा ती मान्य केलीये Proud

Lol सही लिहिलंय रे विनायक... पुन्हा एकदा ती सगळी चर्चा आठवली... खरंच, मनात येईल त्या विषयांवर बोलत होते लोक..

अरे काय उगाच मी न केलेल्या आंघोळीविषयी लिहिताय? माझी आंघोळ हा काय चर्चेचा विषय आहे का? त्यापेक्षा हिंदी आणि इंग्रजी सिनेमांमधल्या नट्यांच्या आंघोळीविषयी बोला की जरा.. Proud

अरे अरे जरा जपुन, अशाने मायबोलीवर एखाद्या सुबकठेंगणीचं तुझ्यावर लक्ष असेल तर उगाच गैरसमज व्हायचा. त्यांना बोलू दे मनात येइल त्या विषयावर, तु नकोस तुझ्या मनात येणार्‍या विचारांना सरळ वेशीवर .... आपलं बाफं वर टांगू.

सह्ही! Lol

आज हे पुन्हा वाचलं..स्मॄतीभ्रंश झाल्यासारखं काहीही आठवत नाहीये हे आत्ता…पण लयी भारी गप्पा Rofl