आमच्याकडचा गणपती

Submitted by संयोजक on 2 September, 2008 - 18:47

आपल्या घरी, कॉलनीत, सोसायटीत अथवा मंडळात यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा केलात??
त्याचे वर्णन इथे प्रतिसादात लिहा अथवा प्रकाशचित्र चढवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या घरचा गणपती. Happy

verG.jpgHorg.jpg

लालु,
सहीच मूर्ती आहे. एकदम गोंडस आहेत बाप्पा.
मोदकाचे ताट कुठय? Happy

आमच्या घरचा गणपती........................

DSCN4541-1.jpg

लालू, आर्च, यश तिघांच्याही घरचे बाप्पा सुंदर आहेत!
आर्च, मोदक मस्त दिसताहेत!
लालू, यश, मोदक कुठे आहेत? Happy

हा आमच्या घरचा गणपती..
Copy_of_DSC02039.jpg
==================
बोला...
गणपती बाप्पा....
मोरया....

बाली मधे मी जी गणरायाची मुर्ती घेतली ती हीच मुर्ती! ज्वालामुखीपासून निर्माण झालेल्या दगडापासून तयार केलेली. मुषक वाहन असलेली मुर्ती खूप शोधली पण बालीत गणपतीचे वाहन मुषकाला मानत नाहीत. काळा रंग मी कधी वापरत नाही, तशा रंगाच्या वस्तू मी कधी विकत देखील घेत नाही. काळ्या रंगाचे काठ असलेली एक सुंदर साडी मी बहिणीसाठी विकत घेतली होती पण काळे काठ पाहून ती साडी रद्द करून नविन दुसरी विकत घेतली. ही मुर्ती घेताना मला तिचा काळा रंग पाहून विदर्भातील काळी कसदार मातीचं माझ्या डोळ्यांपुढे आली. कुणाला नजर लागू नये म्हणू आपण काळ्या रंगाची तिट लावतो. ही मुर्ती माझ्या घरात, अगदी दरवाज्यासमोर मी विराजमान केली आणि परदेशात माझ्यावर कुठेलच विघ्न येऊ देऊ नकोस हे एकच मागणे मी या मुर्तीला मागितले आहे. दर गणशोत्सवात मला जमेल तेवढे पूजन मी या मुर्तीचे करतो.. करत राहीन. गणेशोत्सवात ताजी दुर्वा, जास्वंदाची ताजी फुले, कोवळी आम्रपल्लवी मिळावी म्हणून मी इथल्या काही बागांमधे फिरलो तेंव्हा कुठे श्रींसाठी मला ही सोय करता आली. मग भल्या पहाटे माझ्या कडील पातेल्यात जास्वंदाची तुरेदार फुले पाहून मला कोण आनंद झाला. घरी देशात शाळकरी असताना अशाच कळ्या पाण्यात ठेवून दुसर्‍या दिवशी त्याची फुले देवासाठी उमलत. मला उकडीचे मोदक येत नाहीत.. कधी करून पाहिले नाहीत. म्हणून फक्त पुरणाचे मोदक केलेत. खरे तर ते गव्हाच्या कणकेत सारण भरून तळायचे होते पण सकाळी सकाळी आवरता आवरता मला तितका वेळ मिळाला नाही. म्हणून पुरण केले होते त्यालाच मोदकाचा आकार दिला. या मुर्तीला मी दुध-पाणी-तुलसीपत्र हे सर्व तांब्यात ठेवून मी तिला स्नान घातले आणि स्नान घालताना जेंव्हा ओम म्हंटले तेंव्हा मला प्रसन्नतेचा एक वेगळाच स्पर्श जाणवला.

माझा हा गणोबा तुम्हाला देखील विध्नांपासून दूर ठेवो..

गणपती बाप्पा मोरया!

DSC02714.jpg

|| ॐ गं गणपतये नमः ||
इथे हलवले आहे...

मी ह्या वेळी eco-friendly गणपती घरी करायचे ठरविले आणि गणपती बाप्पाच्या कृपेने सगळे छान झाले...तर हा आहे आमच्या घरचा गणपती बाप्पा!!

छान आहे ग एकदम बाप्पा आणि उंदिर तर खासच. Happy

अरे वा प्रिती, छानच केला आहेस ग गणपती. कशाचा केलास?

मस्तच जमलाय गणपती आणि उंदिर दोन्ही Happy

सगळ्या बाप्पा.न्ना मनोभावे नमस्कार. सुरेख मुर्त्या आणि अप्रतिम सजावट मन अगदि प्रसन्न झाल. प्रिति अभिनन्दन! कणकेचा बाप्पा आणि उ.न्दिर केलायस का?

हा आमचा गणपती बाप्पा.आम्ही श्री ची मुर्ती फायबर ची आणली आणि घरीच विसर्जन केली.
And mainly this Murti is painted by my wife.
Ganpati Bappa Morya..........

धन्स अमृता, तृप्ती, आर्च, मराठमोळी!!
गणपती आणि उंदिर दोन्ही Michaels मधे मिळणार्या wet clay पासुन केले आहेत...पहिलाच प्रयत्न्न होता, पुढच्या वर्षी अजुन improvements करीन.

03092008936.jpg03092008936_0_0.jpgहा आमचा गणपती बाप्पा.आम्ही श्री ची मुर्ती फायबर ची आणली आणि घरीच विसर्जन केली.
And mainly this Murti is painted by my wife.
Ganpati Bappa Morya..........

सगळ्यांचेच गणपती बाप्पा सुंदर आहेत!
प्रिती, पहिला प्रयन्त मस्तच!! eco friendly बाप्पा आवडले!

लालु, तुमच्या बाप्पाचे ध्यान विशेष आवडले! Happy

लालू, बाप्पांची मूर्ती मस्तच दिसतेय फेट्यात. भारतातून आणलेली की इथली?

आमचा बाप्पा
bappa2.jpgbappa1.jpg

एक बाप्पासाठी.. एक उंदीरमामासाठी..
modak.jpg

नैवेद्य
naivedya.jpg

भंडार... बाप्पाच्या आरतीसाठी
bhandar.jpg

पुढच्या वर्षी लवकर या...
visarjan.jpg

मनी, बाप्पाची मूर्ती एकदम सुरेख. नैवेद्याचं ताट आणि मोदक - सगळं छानच दिसतय!

वाह.. मस्त फोटो आहेत.... एकदम homely looks आहेत सगळ्याच फोटोंमधे.. Happy

सर्वांचे लाडके नि सुंदर बाप्पा... वरिल सर्व फोटोंमध्ये मस्तच दिसताहेत..
इको फ्रेंडली गणपती पहिल्यांदाच बघितला.. छान..
मनकु.. रांगोळ्या मस्त.. अजुन येउदे..

-::- -::- -::--::--::--::--::-
गणा धाव रे.. मला पाव रे..

गणपती कोकणातलो... आमच्या गावाकडलो..

Image038.jpg

गणराय निघाले गावाला... तेव्हा.. घरासमोरील अंगणात..
Image084.jpg

चैन पडे ना आम्हाला..
Image092_0.jpg

पायी हळु हळु चाला .. मुखाने गजानन बोला..
Image098.jpg

गणपती बाप्पा मोरया..
Image103.jpg

नदिच्या तिरी विराजमान..
Image093.jpg

-::- -::- -::--::--::--::--::-
गणा धाव रे.. मला पाव रे..

ए काय मस्त आहेत गणपती सगळ्यांचे..... खूप खूप छान वाटलं इतक्या गणपतींचं दर्शन घेऊन Happy
लालु....एकदम पुणेशाही आहेत तुझे बाप्पा तर Happy
आर्च तुझे मोदक तर अप्रतिम आहेत.
यश तुझा बाप्पा तर राजेशाही आहे Happy
मनी सगळेच फ़ोटो प्रसन्न आहेत.
हिम्स..आरास खूप आवडली
बी......तुझं खरंच कौतुक वाटतं रे....... !!
प्रीती......छानच जमलाय गणपती आणि मोदक सुद्धा !!
विनय.....मस्तच केलाय तुझ्या बायकोने बाप्पा Happy
माणक्या सही रे.....!! जबरी आल्या आहेत रांगोळ्या !!
यो....सगळेच फ़ोटो छान आलेत !!

हा आमचा बाप्पा
DSC03929-3.jpg

आणि ही आरास

DSC03939-1.jpgDSC03936.jpg

जयावी........... तुझ्याकडचा गणपती पण छान आहे........ आरास पण छान आहे..............

जयावी,
बाप्पा मस्तच आणि आरासही सुंदर.

Pages